Home Blog Page 315

NEET UG 2023 : NEET मध्ये ‘इतके’ मार्क्स असतील तरच मिळेल सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये अॅडमिशन

NEET UG 2023

करिअरनामा ऑनलाईन । 7 मे रोजी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये (NEET UG 2023) प्रवेशासाठी राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षा NEET (UG) नंतर, विद्यार्थी आता निकालाची प्रतीक्षा करत आहेत. पेपर दिल्यानंतर विद्यार्थी आता परीक्षेत किती रँक मिळवू शकतात याचा हिशेब मांडत आहेत. यावेळी कट ऑफ वाढू शकतो. 550 पेक्षा जास्त रँक असलेल्यांनाच शासकीय वैद्यकीय महाविद्यालये प्रवेश मिळणार आहेत.
कटऑफ वाढण्याची शक्यता
यावर्षीचा पेपर थोडा सोपा असल्याने कट ऑफ काही मार्कांनी वाढू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मागील वर्षांच्या तुलनेत कटऑफ एक ते दोन गुणांनी वाढू शकते. तथापी मागील वर्षांची सर्व आकडेवारी पाहता, NEET UG मध्ये 550 पेक्षा जास्त अखिल भारतीय रँक असलेल्या विद्यार्थ्यांना (NEET UG 2023) राज्यातील सरकारी महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळू शकतो. महात्मा गांधी मेमोरियल मेडिकल कॉलेज, इंदूरबद्दल सांगायचे झाल्यास मागील वेळी NEET समुपदेशनात ओपनिंग रँक 676 आणि क्लोजिंग रॅंक 635 होती.

अचानक सहा हजार विद्यार्थी वाढले (NEET UG 2023)
इंदूरमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत अचानक वाढ झाली आहे. यंदा शहरातून २४ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. याआधी 2022 मध्ये 18 हजार संख्या होती. या आधीही बोलायचे झाले तर 2021 मध्ये 16 हजार आणि 2020 मध्ये 17 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यावेळी देशभरातून NEET UG परीक्षेला बसणाऱ्यांची संख्या वाढल्याचा परिणाम शहरातही दिसून येत आहे. यावेळी देशभरातून सुमारे 20 लाख विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत.
27 जून रोजी जाहीर होऊ शकतो निकाल
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) सुमारे 45 दिवसांनंतर NEET UG ची तात्पुरती अॅन्सर की घोषित करू शकते आणि 52 दिवसांनंतर निकाल देऊ शकते. गेल्या वर्षी तात्पुरती अॅन्सर की 45 दिवसांनंतर जारी करण्यात आली होती. यंदा  27 जूनच्या आसपास निकाल जाहीर होऊ (NEET UG 2023) शकतो. गेल्या वर्षी 17.64 लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यंदा तीन लाखांहून अधिक विद्यार्थी वाढले आहेत. तात्पुरती अॅन्सर की जारी केल्यानंतर प्रश्नांवर हरकती मागविण्यात येतील. यानंतर अंतिम अॅन्सर की प्रसिद्ध केली जाईल.

NEET कडे विद्यार्थ्यांचा कल वाढला
इतर परीक्षांच्या तुलनेत NEET UG मधील विद्यार्थ्यांची आवड ज्या प्रकारे वाढत आहे, ते पाहता NEET UG ही देशातील सर्वात मोठी परीक्षा म्हणून उदयास आली आहे, असे परीक्षा (NEET UG 2023) तज्ज्ञ विजेत जैन सांगतात. देशात व राज्यात वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत आणखी वाढ होऊ शकते. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा परीक्षेचा पेपर थोडा सोपा असल्याने कटऑफमध्ये थोडी वाढ होऊ शकते.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NEET UG Exam 2023 : चेकिंगच्या नावाखाली मुलींना काढायला सांगितले इनरवेअर; मुलांच्या अंगठ्याही घेतल्या काढून

NEET UG 2023

करिअरनामा ऑनलाईन । रविवारी देशभरातील विविध (NEET UG Exam 2023) परीक्षा केंद्रांवर NEET UG परीक्षा पार पडली. या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांसोबत गैरवर्तन झाल्याच्या घटना बऱ्याचवेळा घडत असतात. असाच एक प्रकार चेन्नईमध्ये घडला आहे. चेन्नईच्या  परीक्षा केंद्रातून एक अत्यंत लाजिरवाणी घटना समोर आली आहे. इथे महिला उमेदवारांना तपासणीदरम्यान अंडरगारमेंट्स काढण्यास सांगण्यात आल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे.
NEET- UG 2023 दरम्यान, काही उमेदवारांनी आरोप केला की त्यांना त्यांचा पोशाख काढण्यास सांगण्यात आलं किंवा त्यांना आतमध्ये घालण्यास सांगितलं होतं. तसंच काही अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांकडून कपडे बदलण्यास सांगितलं. इतकंच नाही तर काही महिला उमेदवारांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टनुसार सेंटरवर काही मुलींच्या ब्रा स्ट्रिप्स तपासण्यात आल्या तर काहींना ब्रा काढून ठेवण्यास सांगण्यात आलं.

परीक्षा केंद्रावरील प्रशासन एवढयावरच थांबले नाही. त्यांनी महिला उमेदवारांना त्यांच्या जीन्स त्यांच्या आईच्या लेगिंग्ससह एक्सचेंज करण्यास बजावलं. अनेक उमेदवारांचा (NEET UG Exam 2023) या गोष्टीला विरोध होता; मात्र ही परीक्षा महत्वाची असल्याने  उमेदवारांना त्यांच्या मनाविरुध्द कृत्य करावं लागत होतं. परीक्षा केंद्राच्या आजूबाजूला कोणत्याही प्रकराची कपडे बदलण्याची खोली नसल्याने महिला उमेदवारांना मोकळ्या जागेतच कपडे बदलावे लागले. तसंच आपल्या मुलींचं संरक्षण व्हावं यासाठी महिला उमेदवारांच्या पालकांनी पडदा धरला.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, परीक्षा केंद्रावर काही मुलांच्या सोन्याच्या अंगठ्या काढून घेण्यात आल्या. तसंच काही उमेदवारांच्या जवळील एक वस्तू काढून घेऊन (NEET UG Exam 2023) मगच त्यांना आतमध्ये प्रवेश देण्यात आला.
काही विद्यार्थी ड्रेस कोडचे पालन करत नाहीत आणि म्हणून त्यांना त्यांचा पोषाख बदलण्यास सांगितले. मात्र या सर्व प्रकरणाची आता NTA नं दखल घेतली आहे. NTA ने सांगितले की, परीक्षा केंद्रावरील कर्मचार्‍यांना महिला उमेदवारांच्या छेडछाडीत गुंतलेल्या संवेदनशीलतेची जाणीव ठेवण्यासाठी ते सर्वसमावेशक सूचना जारी करतील; अशी माहिती देण्यात आली आहे. मात्र विद्यार्थिनींसोबत झालेल्या हा प्रकार अतिशय लाजिरवाणा असून पालकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Google India Jobs : खुषखबर!! Google भारतात करणार ‘या’ पदांवर नवीन भरती; बघा डिटेल्स

Google India Jobs

करिअरनामा ऑनलाईन । IT क्षेत्रात नोकरी करण्याची इच्छा (Google India Jobs) असणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे.  जगातील नामांकित कंपनी असलेल्या गुगलने भारतात सॉफ्टवेअर इंजिनीअर्सची भरती करणार असल्याचं जाहीर केलं आहे. गुगलसारख्या कंपनीत नोकरी करण्याची इच्छा असलेले सर्व उमेदवार पात्रतेनुसार या नोकरीसाठी अर्ज करू शकतात.
असं असेल जॉब प्रोफाईल (Google India Jobs)
‘सॉफ्टवेअर इंजिनीअर 3 गुगल नेस्ट’ या पदावर काम करणाऱ्या उमेदवारावर प्रॉडक्ट किंवा सिस्टीम डेव्हलपमेंट कोड लिहिण्याची जबाबदारी असेल. इतर डेव्हलपर्सनी लिहिलेल्या कोडचा रिव्ह्यू घेणं, त्याबाबत फीडबॅक देणं, डिझाईनच्या रिव्ह्यूबाबत सहकारी व भागधारक यांच्याशी चर्चा करणं किंवा चर्चांचं नेतृत्व करणं, दस्तऐवजीकरणामध्ये सहभाग घेणं, तसंच उत्पादनाबाबतचे अपडेट्स व ग्राहकांचे अभिप्राय यावर आधारित माहिती तयार करणं अशा पद्धतीच्या जबाबदाऱ्या या उमेदवाराला पार पाडाव्या लागतील. त्यासाठी उमेदवाराकडे किमान पात्रता कोणती असावी, तसंच कोणत्या उमेदवारांना अधिक प्राधान्य दिलं जाईल, याबाबत कंपनीनं माहिती दिली आहे.

आवश्यक पात्रता
1. या क्षेत्रातली पदवी किंवा त्या दर्जाचा समान प्रात्यक्षिक अनुभव.
2. एक किंवा त्यापेक्षा अधिक प्रोग्रामिंग लँग्वेजेसमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचा 2 वर्षांचा अनुभव किंवा अ‍ॅडव्हान्स
3. डिग्रीसह एका वर्षाचा अनुभव. (Google India Jobs)
4. डेटा स्ट्रेक्चर्स किंवा अल्गोरिदम्समध्ये 2 वर्षांचा अनुभव.
5. कम्प्युटर सायन्समधली मास्टर्स डिग्री किंवा पीएचडी असेल तर उमेदवाराला प्राधान्य दिलं जाईल.
6. सॉफ्टवेअर इंजिनीअर 3, सिक्युरिटी/प्रायव्हसी, गुगल क्लाउड
7. प्रॉडक्ट किंवा सिस्टीम डेव्हलपमेंट कोड लिहिणं यासह इतर सर्व जबाबदाऱ्या गुगल नेस्टच्या पदाप्रमाणेच असतील.

सॉफ्टवेअर इंजिनीअर, डेव्हलपर टूल्स
या पदासाठी काम करणाऱ्या उमेदवाराला कंपनीमधल्या व बाहेरील व्यक्तींसाठी सूचनात्मक दस्तऐवजीकरण करावं लागेल. तसंच इंजिनीअर्सनी तयार केलेली माहिती तपासणं, संपादित करणं या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. इतर डेव्हलपर्सनी लिहिलेल्या कोडचा रिव्ह्यू घेणं, त्याबाबत फीडबॅक देणं, दस्तऐवजीकरणामध्ये सहभाग घेणं, तसंच उत्पादनाबाबतचे अपडेट्स व ग्राहकांचे अभिप्राय यावर (Google India Jobs) आधारित माहिती तयार करणं, ट्रायएज प्रॉडक्ट किंवा सिस्टीममधल्या समस्यांचं विश्लेषण करून त्यांचं निराकरण करणं, हार्डवेअर नेटवर्क, दर्जा किंवा सर्व्हिस ऑपरेशन्सवर त्याचा होणारा परिणाम तपासणं या काही जबाबदाऱ्या या पदावर काम करणाऱ्या उमेदवाराकडे असतील.
आवश्यक पात्रता
1. कम्प्युटर सायन्समधली पदवी किंवा समान दर्जाचा अनुभव
2. प्रोग्रामिंग लँग्वेजेस (उदा. C++, Java) डेव्हलपमेंटमध्ये 5 वर्षांचा अनुभव
3. इंजिनीअर्स किंवा डेव्हलपर्ससाठी दस्तऐवजीकरणाबाबत किंवा संशोधनाबाबतचा अनुभव
4. परफॉर्मन्स अ‍ॅनालिसिस आणि ऑप्टिमायझशनचा अनुभव असल्यास प्राधान्य (Google India Jobs)
5. अ‍ॅक्सेसिबल टेक्नॉलॉजिज विकसित करण्याचा अनुभव असल्यास उमेदवाराला प्राधान्य दिलं जाईल.
6. एम्बेडेड सिस्टिम्सचं ज्ञान असलेल्या, तसंच वेगानं बदलणाऱ्या वातावरणात प्रगती करण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य मिळेल.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : WiFi चे पूर्ण नाव काय? पहिली ट्रेन कोठे धावली? इंटरव्ह्यूमध्ये विचारतात असे भन्नाट प्रश्न

GK Updates 8 May (1)

करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.
प्रश्न: DSLR कॅमेराचे पूर्ण नाव काय आहे? (GK Updates)
उत्तर- डिजिटल सिंगल लेन्स रिफ्लेक्स कॅमेरा
प्रश्न: जगातील पहिली ट्रेन कोणत्या देशात धावली?
उत्तर- इंग्लंड (1826)
प्रश्न: देशातील पहिली इलेक्ट्रिक ट्रेन कुठे आणि केव्हा धावली?
उत्तर- देशात प्रथमच इलेक्ट्रिक ट्रेन 3 फेब्रुवारी 1925 रोजी बॉम्बे व्हीटी ते कुर्ला हरवार दरम्यान चालवण्यात आली.

प्रश्न: कोणत्या प्राण्याला वाळवंटाचे जहाज म्हणतात?
उत्तर – उंट (GK Updates)
प्रश्न: रेल्वे ट्रॅकच्या मीटर गेजची रुंदी किती आहे?
उत्तर – 1 मीटर
प्रश्न: दिल्लीची सुलतान रजिया सुलतान कोणाची मुलगी होती?
उत्तर- शम्स-उद्दीन इल्तुतमिश

प्रश्न: पहिली बुलेट ट्रेन कोणत्या देशात धावली?
उत्तर: जपान
प्रश्न: कोणता खंड ‘हजार भाषांचा देश’ म्हणून ओळखला जातो?
उत्तर: आफ्रिका
प्रश्न: (GK Updates) कांचनगंगा पर्वत शिखर कोठे आहे?
उत्तर – सिक्कीम
प्रश्न: इंटरनेटसाठी वापरल्या जाणार्‍या वायफायचे पूर्ण नाव काय आहे?
उत्तर- वायरलेस फिडेलिटी (Wireless Fidelity)
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NPCIL Recruitment : सरकारी नोकरी!! दरमहा 56,100 पगार; देशाच्या न्युक्लीयर पॉवर कार्पोरेशनमध्ये ‘या’ पदांवर भरती सुरु

NPCIL Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । न्युक्लीयर पॉवर कार्पोरेशन ऑफ (NPCIL Recruitment) इंडिया लिमिटेड, मुंबई अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून उप व्यवस्थापक, कनिष्ठ हिंदी अनुवादक, समूह ‘ए’ उप व्यवस्थापक, समूह ‘बी’ कनिष्ठ हिंदी अनुवादक ही पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने  अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 12 मे 2023 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मे 2023 आहे.
संस्था – न्युक्लीयर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई
भरली जाणारी पदे – (NPCIL Recruitment)
1. उप व्यवस्थापक
2. कनिष्ठ हिंदी अनुवादक
3. समूह ‘ए’ उप व्यवस्थापक
4. समूह ‘बी’ कनिष्ठ हिंदी अनुवादक
पद संख्या – 136 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (NPCIL Recruitment)
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 12 मे 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 मे 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –
उमेदवारांनी संबंधित पदांनुसार बी.ई./ बी. टेक./बी. एस.सी. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
मिळणारे वेतन –
1. उपव्यवस्थापक – 56,100/- रुपये दरमहा
2. कनिष्ठ हिंदी अनुवादक – 35,400/- रुपये दरमहा (NPCIL Recruitment)
3. गट ‘अ’ उपव्यवस्थापक – 56,100/- रुपये दरमहा
4. गट ‘ब’ कनिष्ठ हिंदी अनुवादक – 35,400/- रुपये दरमहा
आवश्यक कागदपत्रे –
1. Resume (NPCIL Recruitment)
2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
3. शाळा सोडल्याचा दाखला
4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
6. पासपोर्ट साईझ फोटो
काही महत्वाच्या लिंक्स – (NPCIL Recruitment)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.npcil.nic.in
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Exam 2023 : UPSC प्रिलिम्सचे अॅडमिट कार्ड जारी; असं करा डाउनलोड

UPSC Exam 2023

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा (UPSC Exam 2023) पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र जारी केले आहे. यंदाच्या UPSC CSE परीक्षा 2023 साठी अर्ज करणारे उमेदवार त्यांचे हॉल तिकीट अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वरून डाउनलोड करू शकतात. यावर्षी UPSC सिव्हिल सर्व्हिसेस प्रिलिम्स परीक्षा 28 मे 2023 रोजी होणार आहे.
UPSC नागरी सेवा परीक्षेद्वारे एकूण 1255 पदांची भरती केली जाणार आहे. UPSC ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, उमेदवार अॅप्लीकेशन आयडी आणि रोल नंबरच्या मदतीने प्रवेशपत्र डाउनलोड करा
असं डाउनलोड करा UPSC CSE परीक्षेचं अॅडमिट कार्ड (UPSC Exam 2023)
1- सर्वप्रथम आयोगाची अधिकृत वेबसाईट upsc.gov.in किंवा psconline.nic.in ला भेट द्या.
2- येथे नागरी सेवा (प्राथमिक) परीक्षा, 2023 लिंकवर क्लिक करा.
3- आता प्रवेशपत्र डाउनलोड करा.
4- विनंती केलेली माहिती अॅ ड करा आणि सबमिट करा.
5- अॅडमिट कार्ड स्क्रीनवर दिसेल.
6- डाउनलोड करा आणि प्रिंट घ्या.

जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, यावर्षी UPSC नागरी सेवा परीक्षेद्वारे IAS, IPS साठी एकूण 1105 पदांची भरती केली जाईल. याशिवाय, IFS म्हणजेच भारतीय वन (UPSC Exam 2023) सेवेमध्ये एकूण 150 पदे भरली जातील. या पदांसाठी नोंदणी प्रक्रिया 01 फेब्रुवारी 2023 रोजी सुरू झाली. यामध्ये अर्ज करण्यासाठी 21 फेब्रुवारी 2023 पर्यंत मुदत देण्यात आली होती.
या विभागांमध्ये होणार भरती –
1. भारतीय प्रशासकीय सेवा (IAS)
2. भारतीय परराष्ट्र सेवा
3. भारतीय पोलीस सेवा (IPS)
4. भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा, गट ‘अ’
5. भारतीय नागरी लेखा सेवा, गट ‘अ’
6. भारतीय कॉर्पोरेट कायदा सेवा, गट ‘अ’
7. भारतीय संरक्षण लेखा सेवा, गट ‘अ’ (UPSC Exam 2023)
8. भारतीय संरक्षण संपदा सेवा, गट ‘अ’
9. भारतीय माहिती सेवा, गट ‘अ’
10. भारतीय पोस्टल सेवा, गट ‘अ’
11. भारतीय P&T खाते आणि वित्त सेवा, गट ‘अ’
12. भारतीय रेल्वे संरक्षण दल सेवा, गट ‘अ’
13. भारतीय महसूल सेवा (सीमाशुल्क आणि अप्रत्यक्ष कर) गट ‘अ’
14. भारतीय महसूल सेवा (आयकर) गट ‘अ’ (UPSC Exam 2023)
तुम्ही अधिसूचनेत इतर विभागांचे तपशील पाहू शकता. या विभागांमध्ये पदाच्या आधारे पोस्टिंग केले जाते. प्रिलिम परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांना मुख्य परीक्षा आणि अंतिम मुलाखतीला उपस्थित राहावे लागते.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Technology Courses : टेक्नॉलॉजीमध्ये करिअर करायचंय? 12वी नंतर शिका ‘हा’ अभ्यासक्रम; इथे आहे टॉप कॉलेजची यादी

Technology Courses

करिअरनामा ऑनलाईन । तंत्रज्ञान हे झपाट्याने वाढणारे क्षेत्र आहे. तंत्रज्ञानात (Technology Courses) भविष्य घडवायचे असेल, तर 12 वीनंतर योग्य अभ्यासक्रम निवडणे खूप महत्त्वाचे आहे. भारतात 12वी पूर्ण केल्यानंतर, तुमच्याकडे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात करिअर करण्याचे अनेक मार्ग आहेत. भारतात अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत, तुम्हाला फक्त तुमच्यासाठी योग्य कोर्स निवडायचा आहे. येथे आम्ही अशाच काही कोर्सेसबद्दल माहिती देत आहोत; ज्या कोर्सच्या माध्यमातून तुम्ही 12वी नंतर टेक्नॉलॉजीमध्ये करिअर घडवू शकता.
तंत्रज्ञानातील करिअर बिल्डिंग कोर्स (Technology Courses)
1. बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (B.Tech) : B.Tech हा 4 वर्षांचा पदवीपूर्व पदवी कार्यक्रम आहे ज्यामध्ये संगणक विज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल इ. सारख्या अनेक अभियांत्रिकी विषयांचा समावेश आहे. भारतात आयआयटी, एनआयटी, बीआयटीएस (Technology Courses) आणि डीटीयूसह अनेक शीर्ष विद्यापीठे किंवा महाविद्यालये बी.टेक ऑफर करतात.

2. बॅचलर ऑफ सायन्स इन कॉम्प्युटर : या कोर्सला थोडक्यात B.Sc.Cs. म्हणतात. हा 3 वर्षांचा पदवीपूर्व पदवी कार्यक्रम आहे जो संगणक विज्ञान संकल्पना आणि प्रोग्रामिंग भाषांवर लक्ष केंद्रित करतो. संगणक विज्ञान मध्ये B.Sc. हे ऑफर करणार्‍या आघाडीच्या महाविद्यालयांमध्ये सेंट झेवियर्स कॉलेज, मुंबई, क्राइस्ट युनिव्हर्सिटी, बंगलोर आणि लोयोला कॉलेज, चेन्नई यांचा समावेश आहे.
3. बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्स (BCA) : BCA हा 3 वर्षांचा पदवीपूर्व पदवी कार्यक्रम देखील आहे जो संगणक ऍप्लिकेशन्स आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटवर लक्ष केंद्रित करतो. BCA साठी भारतातील सर्वोच्च कॉलेजपैकी सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर (Technology Courses) स्टडीज अँड रिसर्च (SICSR), पुणे, ख्रिस्तू जयंती कॉलेज, बंगलोर आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU) ही कॉलेज आहेत.

4. बॅचलर ऑफ सायन्स इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (B.Sc. IT) : B.Sc. IT हा 3 वर्षांचा पदवीपूर्व पदवी कार्यक्रम आहे जो माहिती तंत्रज्ञान संकल्पना आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटवर केंद्रित आहे. बी.एस्सी. आयटी ऑफर करणार्‍या काही मुख्य महाविद्यालयांमध्ये मुंबई विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठ आणि सिक्कीम मणिपाल विद्यापीठ इत्यादींचा समावेश आहे.
5. अभियांत्रिकी पदवी (B.E.) : B.E. हा 4 वर्षांचा पदवीपूर्व पदवी कार्यक्रम आहे ज्यामध्ये विविध अभियांत्रिकी विषय जसे की संगणक विज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल इ. अभ्यासक्रम शिकता येतात. आयआयटी, एनआयटी, बीआयटीएस आणि डीटीयू इत्यादी हा अभ्यासक्रम (Technology Courses) देणार्‍या देशातील सर्वोत्तम संस्था आहेत.
येथे आम्ही फक्त काही सर्वोत्तम अभ्यासक्रमांची यादी दिली आहे; याध्यमातून तुम्ही 12वी नंतर टेक्नॉलॉजीमध्ये तुमचे भविष्य घडवण्यासाठी वरीलपैकी एखादा पर्याय निवडू शकता.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Jobs : स्पोर्ट्स कोट्यातून सेंट्रल GST & Customes झोनमध्ये नवीन भरती; दरमहा 81 हजार पगार

Government Jobs (42)

करिअरनामा ऑनलाईन । सेंट्रल जीएसटी आणि कस्टम्स, पुणे झोन (Government Jobs) येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून कर सहाय्यक, स्टेनोग्राफर ग्रेड-II, हवालदार ही पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2023 आहे.
संस्था – सेंट्रल जीएसटी आणि कस्टम्स, पुणे झोन
भरली जाणारी पदे –
1. कर सहाय्यक
2. स्टेनोग्राफर ग्रेड-II
3. हवालदार
पद संख्या – 11 पदे (Government Jobs)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 मे 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Government Jobs)
1. कर सहाय्यक – उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष शिक्षण घेतले असणे आवश्यक आहे. तसेच संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. डेटा एंट्रीचा वेग प्रति तास 8000 असणं आवश्यक आहे.
2. स्टेनोग्राफर – 12वी पास किंवा मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून समकक्ष शिक्षण घेतले असणे आवश्यक आहे. कौशल्य चाचणी नियम श्रुतलेख 10 मिनिटे @ गती 80 शब्द प्रति मिनिट प्रतिलेखन 50 मिनिटे (इंग्रजी) असणं आवश्यक आहे.
3. कॉन्स्टेबल – कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी किंवा समकक्ष पदवी घेतली असणे आवश्यक आहे.

मिळणारे वेतन –
1. कर सहाय्यक – 25,000/- ते 81,000/- रुपये दरमहा
2. स्टेनोग्राफर ग्रेड-II – 25,000/- – 81,000/- रुपये दरमहा
3. हवालदार – 18,000/- – 56,900/- रुपये दरमहा
आवश्यक कागदपत्रे –
1. Resume (Government Jobs)
2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
3. शाळा सोडल्याचा दाखला
4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
6. पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्याचा पत्ता – (Government Jobs)
सहआयुक्त, कॅडर कंट्रोल सेल, सेंट्रल जीएसटी आणि कस्टम्स, पुणे झोन, जीएसटी भवन : 41-ए, ससून रोड, समोर. वाडिया कॉलेज, पुणे 411 001 (Government Jobs)
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक महितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.cbic.gov.in/
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SSC HSC Board Results : 10वी 12वी निकालासंदर्भात मोठी अपडेट!! कधी जाहीर होणार निकाल?

SSC HSC Board Results

करिअरनामा ऑनलाईन । 10वी आणि 12वी परीक्षेच्या निकलाविषयी (SSC HSC Board Results) महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या यंदाच्या हायस्कूल आणि इंटरमिजिएटचे निकाल लवकरच जाहीर होणार आहेत. यासंदर्भात महाराष्ट्र बोर्डाचा निकाल पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र बोर्डाने या महितीला अधिकृत दुजोरा दिला नाही.
10वी आणि 12वीचा परिक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर, mahahsscboard.in किंवा mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर विद्यार्थी त्यांचा निकाल पाहू शकतात. या अधिकृत वेबसाइटवर विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे. निकाल तपासण्यासाठी, विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर, जन्मतारीख आणि प्रवेशपत्र, ओळखपत्र यांसारखे तपशील नोंद करावे लागतील.

12वीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधीत पार पडली तर 10वीची परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च या कालावधीत पार पडली. 12वीच्या परीक्षेसाठी (SSC HSC Board Results) राज्यातून 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी 10वीची परीक्षा दिली होती.
कधी जाहीर होणार निकाल?
CBSE ने सध्या अधिकृत वेबसाइटची तारीख आणि वेळ जाहीर केलेली नाही. परंतु, मिळालेल्या माहितीनुसार बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. तर दहावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जूनच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच (SSC HSC Board Results) बारावीच्या उत्तरपत्रिका पडताळणीचे तसेच मॉडरेशनचे काम अंतिम टप्प्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे. मात्र या निकालासंदर्भात बोर्डाने या माहितीला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

इतके गुण मिळणे आवश्यक
महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी आणि बारावी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात एकूण 33% गुण मिळणे आवश्यक आहे. तुम्हाला कोणत्याही एका किंवा दोन विषयात तुमच्या किमान गुणांपेक्षा कमी गुण मिळाले, तर तुम्हाला कंपार्टमेंट परीक्षेत बसावे लागेल. दुसरीकडे, विद्यार्थ्यांना (SSC HSC Board Results) दोनपेक्षा जास्त विषयात कमी गुण मिळाल्यास नापास मानले जाईल. अशा विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार नाही.
2022 मध्ये, महाराष्ट्र बोर्डाचा 10वीचा निकाल 17 जून 2022 रोजी जाहीर झाला होता. तर 12 वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल 8 जून 2022 रोजी हीर झाला होता. निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच लिंक सक्रिय करण्यात आली. मात्र यंदा निकालाला उशीर होणार नाही. पुढील आठवड्यापर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IITM Recruitment 2023 : ग्रॅज्युएट्ससाठी ‘या’ शासकीय संस्थेत नोकरीची संधी; या लिंकवर करा Apply

IITM Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय उष्ण कटिबंधीय हवामानशास्त्र (IITM Recruitment 2023) संस्था, पुणे येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सेक्शन ऑफिसर पदाच्या 04 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुन 2023 आहे. तसेच ऑफलाईन अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख 22 जून 2023 आहे.

संस्था – भारतीय उष्ण कटिबंधीय हवामानशास्त्र संस्था
(INDIAN INSTITUTE OF TROPICAL METEOROLOGY)
भरले जाणारे पद – सेक्शन ऑफिसर
पद संख्या – 04 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
वय मर्यादा – 56 वर्षे (IITM Recruitment 2023)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन/ ऑफलाईन
अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – प्रशासकीय अधिकारी, भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, डॉ होमी भाभा रोड, पाषाण, पुणे – 411008
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जून 2023 (IITM Recruitment 2023)
ऑनलाईन अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – 22 जून 2023

निवड प्रक्रिया – मुलाखत
आवश्यक शैक्षणिक पात्रता – i) Bachelor’s degree ii) 5 years administrative / Accts/purchase & stores experience (relevant to the post in a Govt. or Semi-Govt. Organization of which at least 3 years should be in a supervisory grade).
मिळणारे वेतन – Pay Level 7 of 7th CPC, Rs. 44,900/- to 1,42,400/- and allowances as admissible.

असा करा अर्ज – (IITM Recruitment 2023)
1. या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन अर्ज करू शकतात.
3. तसेच ऑफलाईन अर्जाची प्रत दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावी.
4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
निवड प्रक्रिया –
1. वरील पदांकरीता उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
2. उमेदवारांच्या गुणांच्या टक्केवारी नुसार मुलाखतीसाठी उमेदवार शॉर्टलिस्टि केले जातील.
3. पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर राहावे.
4. मुलाखतीसाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.

भरतीचा तपशील –

IITM Pune Vacancy 2023 details

काही महत्वाच्या लिंक्स – (IITM Recruitment 2023)
अधिक महितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.tropmet.res.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com