NEET UG Exam 2023 : चेकिंगच्या नावाखाली मुलींना काढायला सांगितले इनरवेअर; मुलांच्या अंगठ्याही घेतल्या काढून

करिअरनामा ऑनलाईन । रविवारी देशभरातील विविध (NEET UG Exam 2023) परीक्षा केंद्रांवर NEET UG परीक्षा पार पडली. या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांसोबत गैरवर्तन झाल्याच्या घटना बऱ्याचवेळा घडत असतात. असाच एक प्रकार चेन्नईमध्ये घडला आहे. चेन्नईच्या  परीक्षा केंद्रातून एक अत्यंत लाजिरवाणी घटना समोर आली आहे. इथे महिला उमेदवारांना तपासणीदरम्यान अंडरगारमेंट्स काढण्यास सांगण्यात आल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे.
NEET- UG 2023 दरम्यान, काही उमेदवारांनी आरोप केला की त्यांना त्यांचा पोशाख काढण्यास सांगण्यात आलं किंवा त्यांना आतमध्ये घालण्यास सांगितलं होतं. तसंच काही अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांकडून कपडे बदलण्यास सांगितलं. इतकंच नाही तर काही महिला उमेदवारांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टनुसार सेंटरवर काही मुलींच्या ब्रा स्ट्रिप्स तपासण्यात आल्या तर काहींना ब्रा काढून ठेवण्यास सांगण्यात आलं.

परीक्षा केंद्रावरील प्रशासन एवढयावरच थांबले नाही. त्यांनी महिला उमेदवारांना त्यांच्या जीन्स त्यांच्या आईच्या लेगिंग्ससह एक्सचेंज करण्यास बजावलं. अनेक उमेदवारांचा (NEET UG Exam 2023) या गोष्टीला विरोध होता; मात्र ही परीक्षा महत्वाची असल्याने  उमेदवारांना त्यांच्या मनाविरुध्द कृत्य करावं लागत होतं. परीक्षा केंद्राच्या आजूबाजूला कोणत्याही प्रकराची कपडे बदलण्याची खोली नसल्याने महिला उमेदवारांना मोकळ्या जागेतच कपडे बदलावे लागले. तसंच आपल्या मुलींचं संरक्षण व्हावं यासाठी महिला उमेदवारांच्या पालकांनी पडदा धरला.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, परीक्षा केंद्रावर काही मुलांच्या सोन्याच्या अंगठ्या काढून घेण्यात आल्या. तसंच काही उमेदवारांच्या जवळील एक वस्तू काढून घेऊन (NEET UG Exam 2023) मगच त्यांना आतमध्ये प्रवेश देण्यात आला.
काही विद्यार्थी ड्रेस कोडचे पालन करत नाहीत आणि म्हणून त्यांना त्यांचा पोषाख बदलण्यास सांगितले. मात्र या सर्व प्रकरणाची आता NTA नं दखल घेतली आहे. NTA ने सांगितले की, परीक्षा केंद्रावरील कर्मचार्‍यांना महिला उमेदवारांच्या छेडछाडीत गुंतलेल्या संवेदनशीलतेची जाणीव ठेवण्यासाठी ते सर्वसमावेशक सूचना जारी करतील; अशी माहिती देण्यात आली आहे. मात्र विद्यार्थिनींसोबत झालेल्या हा प्रकार अतिशय लाजिरवाणा असून पालकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com