Home Blog Page 314

SSB Recruitment 2023 : देशसेवेची मोठी संधी!! 10 वी/12 वी/ ITI उमेदवारांसाठी सशस्त्र सीमा बलात 914 जागांवर भरती 

SSB Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । 10वी पास उमेदवारांना देशसेवेची (SSB Recruitment 2023) उत्तम उत्तम संधी निर्माण झाली आहे. सशस्त्र सीमा बल अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 914 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल.
संस्था – सशस्त्र सीमा बल (भारत सरकार)
पद संख्या – 914 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच जाहीर होईल

भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता – (SSB Recruitment 2023)
1. हेड कॉन्स्टेबल (इलेक्ट्रिशियन) – 15 पदे
उमेदवार 10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा ITI+ 01 वर्ष अनुभव किंवा 02 वर्षाचा ITI डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक.
2. हेड कॉन्स्टेबल (मेकॅनिक) – 296 पदे
उमेदवार 10वी उत्तीर्ण, ऑटोमोबाईल/मोटर मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI डिप्लोमा, तसेच अवजड वाहन चालक परवाना असणे आवश्यक.
3. हेड कॉन्स्टेबल (स्टुअर्ड) – 02 पदे
उमेदवार 10वी उत्तीर्ण, कॅटरिंग किचन मॅनेजमेंट डिप्लोमा तसेच 01 वर्ष अनुभव आवश्यक.
4. हेड कॉन्स्टेबल (व्हेटनरी) – 23 पदे (SSB Recruitment 2023)
उमेदवार 12वी (बायोलॉजी) उत्तीर्ण, पशुवैद्यकीय आणि पशुधन विकास किंवा पशुवैद्यकीय स्टॉक -असिस्टंट कोर्स किंवा पशुसंवर्धन अभ्यासक्रम केला असणे आवश्यक.
5. हेड कॉन्स्टेबल (कम्युनिकेशन) – 578 पदे
उमेदवार 12वी (PCM) उत्तीर्ण किंवा इलेक्ट्रॉनिक्स/कम्युनिकेशन/कॉम्प्युटर सायन्स/IT इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक.

वय मर्यादा – 18 ते 27 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी – जनरल/ओबीसी : 100/- रुपये [SC/ST/ExSM/महिला:फी नाही]
मिळणारे वेतन – 25,500/- ते 81,100/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत (SSB Recruitment 2023)

काही महत्वाच्या लिंक्स – (SSB Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.ssbrectt.gov.in
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Vocational Course : दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट देतंय रोजगाराची संधी; नाव नोंदणी सुरु

Vocational Course

करिअरनामा ऑनलाईन । पुण्यातील प्रसिध्द श्रीमंत दगडूशेठ (Vocational Course) हलवाई गणपती हा लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखला जातो. या ट्रस्टच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी अनेक उपक्रम राबवले जातात. या ट्रस्टच्या माध्यमातून तरुणांना रोजगार देण्यासाठी खास कोर्स सुरू करण्यात आला आहे. त्याचा फायदा पुणे तसंच परिसरातील तरुणांना होणार आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि (Vocational Course) शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औंध, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तरुणांसाठी रोजगाराची संधी निर्माण झाली आहे. ट्रस्टने माफक दरात अल्प मुदतीचे रेफ्रीजरेशन, वॉशिंगमशिन, एअरकंडिशनिंग प्रशिक्षण कोर्सचे आयोजन केलं आहे.

कोर्ससाठी आवश्यक पात्रता – (Vocational Course)
रेफ्रिजरेटर, वॉशिंगमशीन, एअरकंडीशन प्रशिक्षण कोर्ससाठी विद्यार्थी हा 10 वी पास किंवा 12 वीची परीक्षा दिलेला असावा. तो 12वीमध्ये पास किंवा नापास असला तरीही चालेल.
वय मर्यादा – या प्रशिक्षणाची वय मर्यादा 18 ते 35 वर्षे आहे.
कोर्स कालावधी – 90 दिवस
कोर्स फी – 400/- रुपये
आवश्यक कागदपत्रे – (Vocational Course)
1. आधार कार्डाची झेरॉक्स
2. 10 वी किंवा त्यापूढील कोणत्याही शिक्षणाचे मार्कशीट आवश्यक.

प्रशिक्षणाचे ठिकाण – गणपती सदन, पहिला मजला, 132 बुधवार पेठ, दगडूशेठ गणपती मंदिरामागे, पुणे – 411002
संपर्क क्र. – (020) 24492000/ 24498989
या प्रशिक्षणासाठी इच्छूक उमेदवारांची नोंदणी प्रक्रिया (Vocational Course) सुरु असून प्रथम येणाऱ्या उमेदवारास प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा; असं आवाहन श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने केलं आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SSC CHSL Recruitment 2023 : 12वी पाससाठी खुषखबर!! स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत तब्बल 1600 जागांवर भरती

SSC CHSL Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधत असणाऱ्या (SSC CHSL Recruitment 2023) तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. यामुळे 12 वी पास उमेदवारांना केंद्रीय सरकारी नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे. या माध्यमातून कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA), डेटा एंट्री ऑपरेटर (DEO), डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’ या पदांच्या एकूण 1600 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 जून 2023 आहे.
संस्था – स्टाफ सिलेक्शन कमिशन (Staff Selection Commission)
भरली जाणारी पदे – (SSC CHSL Recruitment 2023)
1. कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)
2. डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)
3. डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’
पद संख्या – 1600 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 जून 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA) – उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 12 वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. (SSC CHSL Recruitment 2023)
2. डेटा एंट्री ऑपरेटर – मान्यताप्राप्त मंडळाकडून गणित विषयासह विज्ञान शाखेत 12वी उत्तीर्ण किंवा समकक्ष.
वय मर्यादा – 01 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी –
100 रुपये/- (SSC CHSL Recruitment 2023)
[SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

मिळणारे वेतन –
1. कनिष्ठ विभाग लिपिक – पे लेवल-2 (19,900-63,200 रुपये).
2. डेटा एंट्री ऑपरेटर – पे लेवल-4 (25,500-81,100 रुपये) और लेवल-5 (29,200-92,300 रुपये).
3. डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’’- पे लेवल -4 (25,500-81,100 रुपये).

नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत.
काही महत्वाच्या लिंक्स – (SSC CHSL Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – ssc.nic.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MSACS Recruitment 2023 : पात्रता फक्त 4 थी पास; शासनाच्या ‘या’ संस्थेत नोकरीची मोठी संधी

MSACS Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण (MSACS Recruitment 2023) संस्थेमार्फत विविध पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून ICTC समुपदेशक, अटेंडंट क्लिनर ही पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मे 2023 आहे.
संस्था – महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था
पद संख्या – 2 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 मे 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – District AIDS Prevention & Control Unit, Solapur, Maharashtra

भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1) ICTC समुपदेशक – 01 पद
-शरीरविज्ञान / सामाजिक कार्य / समाजशास्त्र / मानव विकास / नर्सिंग मध्ये पदवीधर पदवी सह समुपदेशनाचा 03 वर्षांचा अनुभव (MSACS Recruitment 2023)
– शरीरविज्ञान / सामाजिक कार्य / समाजशास्त्र / मानव विकास / नर्सिंग मध्ये पदव्युत्तर पदवी 03) ज्ञान आणि कौशल्ये, उमेदवार संगणक साक्षर असावा एमएस ऑफिसचे कामकाजाचे ज्ञान, इंटरनेट आणि इलेक्ट्रॉनिक मेलचा वापर.
2) अटेंडंट क्लिनर – 01 पद
उमेदवार 4 थी पास तसेच अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य

वय मर्यादा – 08 मे 2023 रोजी 60 वर्षापर्यंत.
परीक्षा फी – फी नाही
मिळणारे वेतन –
1. ICTC समुपदेशक – 21,000/- रुपये दरमहा
2. अटेंडंट क्लिनर – 18,000/- रुपये दरमहा (MSACS Recruitment 2023)
नोकरी करण्याचे ठिकाण – सोलापूर (महाराष्ट्र)

काही महत्वाच्या लिंक्स – (MSACS Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.solapur.gov.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Teachers Megabharti : आनंदाची बातमी!! लवकरच राज्यात होणार शिक्षकांची बंपरभरती

Teachers Megabharti

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षकांमधील नाराजी दूर करण्यासाठी (Teachers Megabharti) राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. महाराष्ट्रातील सरकारी कर्मचारी आणि शिक्षक जुन्या पेन्शन योजनेवरुन सरकारवर नाराज आहे. विधान परिषद निवडणुकीत शिक्षक मतदार संघात भाजप-शिवसेना युतीला फटका बसला होता. आता राज्यात शिक्षकांची मेगा भरती होणार आहे. ही भरती नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी राज्यात शिक्षक भरती करणार असल्याची घोषणा केली.
किती शिक्षकांची भरती होणार
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले की, पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला सुमारे 30,000 शिक्षकांची भरती केली जाईल. भरती प्रक्रियेत सध्याच्या आरक्षणाचे नियम पाळले जातील. भरतीसाठी मुलाखतीही घेण्यात येतील. राज्य शालेय शिक्षण (Teachers Megabharti) विभागाकडून पहिल्या टप्प्यात 30 हजार शिक्षकांची भरती करणार असल्याचे शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी सांगितले. आम्ही या वर्षी जूनमध्ये नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी प्रक्रिया पूर्ण करु; असा दावाही त्यांनी केला.

भरतीचा दुसरा टप्पा (Teachers Megabharti)
दुसऱ्या टप्प्यात आणखी 20,000 शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे. राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या आधार पडताळणीनंतर दुसऱ्या टप्प्यात किती शिक्षकांची भरती करायची आहे, याचा निर्णय घेतला जाईल, असे दीपक केसरकर यांनी सांगितले.
इतकी पदे रिक्त
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अंदाजे 27 हजार, आणि माध्यमिक शाळेतील अंदाजे 13 हजार अशी एकूण 40 हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत, असा दावा शिक्षक संघटनांकडून केला जातो. आता त्यातील तीस हजार पदे भरण्यात येणार असल्यामुळे शिक्षकांवरील अतिरिक्त ताण (Teachers Megabharti) कमी होणार आहे.
केंद्र सरकार आदिवासी समुदायाच्या विकासासाठी 740 एकलव्य मॉडल स्कूल स्थापन केले जाणार आहेत. 38 हजार 800 शिक्षकांची भरती केली जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी नॅशनल डिजीटल लायब्ररीसह काही योजना जाहीर केल्या. यात प्रामुख्याने 740 एकलव्य मॉडलच्या स्कूल सुरू करण्यात येणार असल्याचा निर्णय जाहीर केला होता.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Foreign Study Scholarship : महाराष्ट्र शासनाचा उपक्रम!! परदेशात शिक्षण घेण्यासाठी ‘अशी’ मिळवा स्कॉलरशिप

Foreign Study Scholarship

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्रातील अनेक होतकरु तरुण (Foreign Study Scholarship) शिष्यवृत्तीच्या जोरावर पदवीपर्यंत शिक्षण घेतात. याच शिष्यवृत्तीच्या जोरावर ते आयुष्यातील शिक्षणाचा महत्वाचा टप्पा पूर्ण करतात. मात्र अनेकांना शैक्षणिक शिष्यवृत्ती विषयी पुरेशी माहिती नसते. परदेशातील शिक्षणाचा सर्व खर्च पेलवत नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी परदेशात जाता येत नाही. यासाठीच आज आम्ही तुम्हाला विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग शिष्यवृत्ती संदर्भात सविस्तर माहिती देणार आहोत.
या विद्यार्थ्यांना लागू होते शिष्यवृत्ती (Foreign Study Scholarship)
1. विद्यार्थी हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असावा.
2. महाराष्ट्रातील विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशात पदव्युत्तर पदवी आणि पीएचडीसाठी.
3. प्रवेश घेऊ इच्छित असणारे विद्यापीठ THE (Times Higher Education) किंवा QS (Quacquarelli Symonds) या पद्धतीच्या मानांकांमध्ये 200 नंबरच्या आत असावे.

काय आहे योजनेचा उद्देश
विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना राबवण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाने 21 ऑगस्ट 2018८ रोजी घेतला होता.
असा करा अर्ज
1. या शिष्यवृत्ती संदर्भात विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गासाठी असणाऱ्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या संकेतस्थळावर जाहिरात उपलब्ध होते. (Foreign Study Scholarship)
2. विद्यार्थ्याने जाहिरातीसोबत प्रसिद्ध करण्यात आलेल्या विहित नमुन्यातील अर्ज विभागाच्या पुढील अधिकृत संकेतस्थळावरून डाऊनलोड करावा.

अधिकृत वेबसाईट – (Foreign Study Scholarship)
1. www.maharashtra.gov.in https
2. mahaeschol.maharashtra.gov.in
3. https://sjsa.maharashtra.gov.in
महत्वाचे –
– प्रत्येक वर्षी जून महिन्यामध्ये या शिष्यवृती अंतर्गत अर्ज मागविण्यात येतात.
– शिष्यवृत्ती देण्याच्या एकूण जागांमध्ये 30 टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत.
शिष्यवृत्ती कोणकोणत्या क्षेत्रासाठी लागू?
1. कला, वाणिज्य, विज्ञान, व्यवस्थापन, विधी, अभियांत्रिकी / वास्तुकला शास्त्र आणि औषधनिर्माण शास्त्र.
2. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी अर्ज करताना पदव्युत्तरसाठी किंवा पीएचडी अभ्यासक्रमासाठी अर्ज करताना, यापूर्वी इतर कोणत्याही राज्य शासनाची अथवा केंद्रशासनाची परदेशी शिष्यवृत्ती घेतलेली नसावी. अन्य प्रशासकीय विभागाच्या परदेशी शिष्यवृत्तीच्या योजनेसाठी अर्ज केलेला नसावा.

आवश्यक वय मर्यादा
1. जाहिरात प्रसिद्ध झालेल्या महिन्याच्या पहिल्या तारखेस उमेदवारांचे वय 35 वर्षापेक्षा जास्त नसावे.
2. पीएच.डी.साठी 40 वर्षे कमाल वयोमर्यादा आहे. (Foreign Study Scholarship)
शिष्यवृत्तीसाठी अटी
1. विद्यार्थ्यांच्या पालकांचे/ कुटुंबाचे व विद्यार्थी नोकरी करीत असल्यास एकूण स्वतःचे उत्पन्न धरून सर्व मार्गांनी मिळणारे मागील आर्थिक वर्षांतील उत्पन्न रुपये ८ लाखापेक्षा जास्त नसावे.
2. विद्यार्थी किंवा पालक किंवा दोन्ही नोकरीत असल्यास आयकर विवरणपत्र, फॉर्म नं 16 व सक्षम प्राधिकारी यांच्याकडील मागील आर्थिक वर्षाचे कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळणाऱ्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र.
3. भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून किमान 60 टक्के गुणासंह पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
4. पीएचडीसाठी किमान 60 टक्के गुणासह पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका परीक्षा उत्तीर्ण असावी.
5. या योजनेचा लाभ एकाच कुटुंबातील एका विद्यार्थ्यास फक्त एकदाच घेता येतो.
6. शिक्षणासाठी आवश्यक असलेला कालावधी किंवा त्यापुर्वीच्या कालावधीपर्यंतच परदेशात राहण्याचे हमीपत्र राज्य शासन व परदेशातील भारतीय दूतावासास लिहून द्यावे लागते. (Foreign Study Scholarship)
7. परदेशी शैक्षणिक संस्थांकडून अनकंडिशनल ऑफर लेटर मिळालेले असेल, त्यांनाच ही शिष्यवृत्ती अनुज्ञेय आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UGC NET 2023 : UGC NET परीक्षेसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरु; असा करा अर्ज

UGC NET 2023

करिअरनामा ऑनलाईन । UGC NET 2023 साठी अर्ज करु (UGC NET 2023) इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच NTA आज दि. 10 मे 2023 पासून UGC NET 2023 साठी अर्ज प्रक्रिया सुरु करणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार UGC NET च्या अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात. त्याची अधिकृत घोषणा UGC ने केली आहे. या परीक्षेसाठी महत्त्वाच्या तारखा काय आहेत आणि अर्ज कसा करणार याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

यूजीसीचे अध्यक्ष एम जगदेश कुमार यांनी ट्विट केले (UGC NET 2023) आहे की; ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 10 मे 2023 पासून सुरू होईल आणि 31 मे 2023 रोजी संध्याकाळी 5 वाजता संपेल. परीक्षेची तारीख 13 जून 2023 ते 22 जून 2023 असेल. याशिवाय, उमेदवार https://ugcnet.nta.nic.in/ या लिंकवर क्लिक करून UGC NET 2023 साठी थेट अर्ज करू शकतात.

काही महत्वाच्या तारखा – (UGC NET 2023)
1. UGC NET 2023 साठी अर्ज सुरू होण्याची तारीख – 10 मे 2023
2. UGC NET 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मे 2023
3. UGC NET 2023 परीक्षा – 13 जून ते 22 जून 2023

UGC NET 2023 साठी असा करा अर्ज –
1. UGC NET च्या अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर भेट द्या.
2. मुख्यपृष्ठावर, Register Here या लिंकवर क्लिक करा.
3. आवश्यक तपशील भरा आणि नोंदणीकृत फोन नंबर आणि ईमेल आयडी वर प्रदान केलेला OTP वापरून लॉग इन करा. (UGC NET 2023)
4. आवश्यक कागदपत्रे, छायाचित्र आणि स्वाक्षरी jpg स्वरूपात अपलोड करा.
5. तपशील पुन्हा तपासा आणि तुमच्या श्रेणीनुसार अर्ज शुल्क भरा.
6. फॉर्म सबमिट करा आणि पुष्टीकरण पृष्ठ डाउनलोड करा.
7. भविष्यातील वापरासाठी त्याची प्रिंटआउट घ्या.
UGC NET 2023 जून परीक्षा 83 विषयांसाठी CBT मोडमध्ये घेतली जाईल. परीक्षेत दोन पेपर असतील. परीक्षा देण्यासाठी उमेदवार इंग्रजी किंवा हिंदी (UGC NET 2023) भाषा निवडू शकतात. उमेदवार 3 तासांच्या आत प्रश्नपत्रिका गोळा करू शकतात. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 2 गुण दिले जातील आणि चुकीच्या उत्तरांसाठी निगेटिव्ह मार्किंग केले जाणार नाही.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

LBSNAA Mussoorie : हा आहे IAS-IPS चा कारखाना; जाणून घ्या LBSNAA अॅकॅडमीबद्दल 7 खास गोष्टी

LBSNAA Mussoorie

करिअरनामा ऑनलाईन । UPSC नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या (LBSNAA Mussoorie) सर्व उमेदवारांना लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी (LBSNAA) येथे प्रशिक्षणासाठी बोलावले जाते. ही अकादमी मसुरी, उत्तराखंड येथे आहे जी डोंगराळ भागात आहे. या प्रशिक्षण अकादमीमध्ये कठोर नियमांचे पालन करावे लागते. अकादमीच्या परिसरात फोन वापरण्यास मनाई आहे. अकादमीमध्ये धूम्रपान आणि मद्यपान देखील प्रतिबंधित आहे. अशाच काही महत्त्वाच्या आणि आश्चर्यकारक गोष्टींची माहिती या लेखात देण्यात आली आहे.

LBSNAA Mussoorie

1972 पर्यंत LBSNAA चे नाव ‘नॅशनल अॅकॅडमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन’ होते
15 एप्रिल 1958 रोजी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री पंडित गोविंद बल्लभ पंत यांनी सर्व भरतींना सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी मसुरी येथील चार्लविले इस्टेट (LBSNAA Mussoorie) येथे राष्ट्रीय अकादमी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी या अकादमीचे नाव राष्ट्रीय प्रशासन अकादमी असे होते. 1972 मध्ये ते बदलून लाल बहादूर शास्त्री अकादमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन करण्यात आले. त्यानंतर 1973 मध्ये “राष्ट्रीय” शब्द जोडला गेला आणि तो “लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी” असा बनला.

 

LBSNAA Masoorrie

अकादमीचे गाणे (LBSNAA Mussoorie)
LBSNAA चे अकादमी गाणे हे प्रख्यात बंगाली संगीतकार, गीतकार आणि गायक श्री अतुल प्रसाद सेन (1871 – 1934) यांनी रचलेले बंगाली गाणे आहे. ते एक यशस्वी वकील, समाजसेवी, समाजसेवक, शिक्षणतज्ज्ञ आणि साहित्यिक होते. 11 मे 1973 ते 11 एप्रिल 1977 या काळात अकादमीचे संचालक असलेल्या श्री राजेश्वर प्रसाद यांच्या कार्यकाळात अकादमीने ते स्वीकारले होते.

LBSNAA Mussoorie

बांगलादेश, भूतान, म्यानमार आणि मालदीवमधील नागरी सेवकांना देते ट्रेनिंग
LBSNAA केवळ भारतीय नागरी सेवकांनाच प्रशिक्षण देत नाही तर बांगलादेश, भूतान, मालदीव आणि म्यानमारमधील काही निवडक नागरी सेवकांना देखील प्रशिक्षण देते. हे (LBSNAA Mussoorie) सर्व येथे आंतरराष्ट्रीय नागरी सेवक प्रथम त्यांच्या भारतीय समकक्षांसह 3 महिन्यांच्या फाउंडेशन कोर्सचे प्रशिक्षण घेतात.

 

 

LBSNAA Mussoorie

ड्रेस कोडचे होते काटेकोर पालन
प्रशिक्षण अधिकाऱ्यांना LBSNAA च्या आवारात फक्त औपचारिक पोषाख घालण्याची परवानगी आहे. मेसमध्ये खाण्यासाठीही ड्रेसकोड ठरवून दिला आहे. कोणताही अधिकारी त्याच्या खोलीबाहेर बाथरुममधील चप्पल किंवा सॅन्डल घालून फिरू शकत नाही. असे केल्यास दंड भरावा लागतो.
क्लास रूम ड्रेस कोडमध्ये पुरुष अधिकाऱ्यांना उन्हाळ्यात नेकटाईसह फुल स्लीव्ह शर्ट आणि पॅंट आणि हिवाळ्यात नेकटाईसह फुल स्लीव्ह शर्ट, जॅकेट आणि पॅंट घालणे (LBSNAA Mussoorie) बंधनकारक आहे. यासोबतच लेदर शूजही अनिवार्य आहेत. तर महिला प्रशिक्षण अधिकाऱ्यांसाठी फॉर्मल शूज/सँडलसह साडी/सलवार-कमीज/चुरीदार-कुर्ता/वेस्टर्न बिझनेस सूट परिधान करणे बंधनकारक आहे. जेवण करतानाही सर्व अधिकाऱ्यांना हा ड्रेसकोड पाळावा लागतो.

LBSNAA Mussoorie

प्रत्येक वस्तूवर आहे अकादमीचा लोगो
अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी LBSNAA चे स्मरणिका दुकान आहे. येथे प्रशिक्षणादरम्यान शारीरिक हालचालींसाठी सर्व उपकरणे उपलब्ध आहेत. राईडिंग हेल्मेट, ट्रॅक सूट, अकादमी स्वेटर इ. यासोबतच स्टेशनरी आणि अधिकाऱ्यांना लागणाऱ्या इतर सर्व वस्तूही इथे उपलब्ध आहेत. या दुकानात (LBSNAA Mussoorie) मिळणाऱ्या प्रत्येक वस्तूवर अकादमीचा लोगो लावलेला आहे.

 

LBSNAA Mussoorie

अकादमीमध्ये सामान्य लोकांना प्रवेश नाही (LBSNAA Mussoorie)
सामान्य लोकांना LBSNAA मध्ये प्रवेश करण्याची परवानगी नाही. एखाद्याला पर्यटक म्हणून अकादमी आतून पाहायची असेल तर अकादमीच्या नियमात तसे करण्यास मनाई (LBSNAA Mussoorie) आहे. सामान्य लोकांना अकादमीमध्ये दोन प्रकारे प्रवेश मिळू शकतो. अकादमीने एखाद्याला पाहुणे वक्ता म्हणून निमंत्रित केल्यास तो अकादमीच्या आत जाऊ शकतो किंवा अकादमीत प्रशिक्षण घेणाऱ्या अधिकाऱ्यांचे कुटुंबीय आणि ओळखीच्या व्यक्तींनाच अकादमीमध्ये प्रवेश दिला जातो.

 

 

LBSNAA Mussoorie

ट्रेनिंग नंतर मिळते MA पदवी
LBSNAA मधून 2 वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर उत्तीर्ण होणाऱ्या प्रत्येक IAS अधिकाऱ्याला जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) द्वारे मान्यताप्राप्त सार्वजनिक व्यवस्थापन पदवीमध्ये MA प्रदान करते. ही पदवी केवळ UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा उत्तीर्ण (LBSNAA Mussoorie) करणाऱ्या IAS अधिकाऱ्यांसाठी उपलब्ध आहे. LBSNAA राज्य सेवेतून पदोन्नती झाल्यानंतर आयएएस बनलेल्या अधिकाऱ्यांनाही प्रशिक्षण देते.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : राज्याच्या ‘या’ महापालिकेत विना परीक्षा थेट मुलाखत; दरमहा 45 हजार पगार; काय आहे पात्रता?

Job Notification (48)

करिअरनामा ऑनलाईन । सोलापूर महानगरपालिका येथे (Job Notification) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राणी संग्रहालय संचालक, पशु वैद्यकीय अधिकारी, जीवशास्त्रज्ञ अशी रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 12 मे 2023 आहे.
संस्था – सोलापूर महानगरपालिका, सोलापूर
भरली जाणारी पदे –
1. प्राणी संग्रहालय संचालक
2. पशु वैद्यकीय अधिकारी
3. जीवशास्त्रज्ञ (Job Notification)
पद संख्या – 03 पदे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 12 मे 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Notification)
1. प्राणी संग्रहालयाचे संचालक – उमेदवाराने पशुवैद्यकीय विज्ञान (MVSC) मध्ये पदव्युत्तर पदवी असणं आवश्यक आहे. तसंच प्राणी संग्रहालयाशी संबंधित कामाचा 5 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
2. पशुवैद्यकीय अधिकारी – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पशुवैद्यकीय शास्त्रात पदव्युत्तर पदवी असणं आवश्यक आहे. तसंच पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून शासकीय/निमशासकीय/अनुमानित. S. संस्थेतील किमान 03 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. (Job Notification)
3. जीवशास्त्रज्ञ – उमेदवाराकडे प्राणीशास्त्र / मायक्रोबायोलॉजीमध्ये पदव्युत्तर पदवी असणं आवश्यक आहे. पदव्युत्तर पदवी आणि/किंवा आरोग्य सेवेमध्ये शीत निवारक कार्याचा अनुभव असणं आवश्यक आहे.
मिळणारे वेतन –
1. प्राणी संग्रहालय संचालक – 45,000/- रुपये दरमहा
2. पशु वैद्यकीय अधिकारी – 30,000/- रुपये दरमहा
3. जीवशास्त्रज्ञ – 20,000/- रुपये दरमहा

आवश्यक कागदपत्रे –
1. Resume (Job Notification)
2. 10वी, 12वी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
3. शाळा सोडल्याचा दाखला
4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
6. पासपोर्ट साईझ फोटो
मुलाखतीचा पत्ता –
सामान्य प्रशासन विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर.

काही महत्वाच्या लिंक्स – (Job Notification)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.solapurcorporation.gov.in/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ISRO Recruitment : 10वी/ ITI/डिप्लोमा उत्तीर्णांसाठी ISRO देणार नोकरीची संधी!! महिन्याचा 63,758 पगार 

ISRO Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । ISRO सतीश धवन अंतरिक्ष केंद्र शार (ISRO Recruitment) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून तांत्रिक सहाय्यक, वैज्ञानिक सहाय्यक, ग्रंथालय सहाय्यक, तंत्रज्ञ-बी, आणि ड्राफ्ट्समन पदांच्या एकूण 94 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मे 2023 आहे.
संस्था – ISRO सतीश धवन अंतरिक्ष केंद्र शार
भरली जाणारी पदे – (ISRO Recruitment)
1. तांत्रिक सहाय्यक – 12 पदे
2. वैज्ञानिक सहाय्यक – 06 पदे
3. ग्रंथालय सहाय्यक – 02 पदे
4. तंत्रज्ञ-बी – 71 पदे
5. ड्राफ्ट्समन – 03 पदे
पद संख्या – 94 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 मे 2023
वय मर्यादा – 18 ते 35 वर्षे (ISRO Recruitment)

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. तांत्रिक सहाय्यक – First Class Diploma in a relevant field from a recognized University /Institution. (Read PDF for complete details)
2. वैज्ञानिक सहाय्यक – First Class B.sc in the Relevant Disciplines from a recognized university. (Read PDF for complete details)
3. ग्रंथालय सहाय्यक – First Class Master’s Degree in Library Science/ Library & Information Science or equivalent (ISRO Recruitment)
from a recognized University/ Institution.
4. तंत्रज्ञ-बी – SSLC/SSC pass + ITI/NTC/NAC in any one of the following trades from NCVT. (Read PDF for complete details)
5. ड्राफ्ट्समन – SSLC/SSC pass + ITI/NTC/ NAC in Draughtsman (Civil/ Mechanical) Trade from NCVT

मिळणारे वेतन –
1. तांत्रिक सहाय्यक Rs. 63,758/- दरमहा
2. वैज्ञानिक सहाय्यक Rs. 63,758/- दरमहा
3. ग्रंथालय सहाय्यक Rs. 63,758/- दरमहा
4. तंत्रज्ञ-बी Rs. 30,814/- दरमहा (ISRO Recruitment)
5. ड्राफ्ट्समन Rs. 30,814/- दरमहा
असा करा अर्ज –
1. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करावा.
3. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत अपलोड करणे आवश्यक आहे.
4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
5. उमेदवारांनी अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे.

निवड प्रक्रिया –
1. The detailed selection process of SDSC SHAR Jobs 2023 is given below.
2. Written Objective Exam (ISRO Recruitment)
3. Skill Test (If Required)
4. Document Verification
5. Medical Test.

काही महत्वाच्या तारखा – (ISRO Recruitment)

SDSC SHAR Bharti 2023
काही महत्वाच्या लिंक्स – (ISRO Recruitment)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट- www.shar.gov.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com