Job Notification : राज्याच्या ‘या’ महापालिकेत विना परीक्षा थेट मुलाखत; दरमहा 45 हजार पगार; काय आहे पात्रता?

करिअरनामा ऑनलाईन । सोलापूर महानगरपालिका येथे (Job Notification) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राणी संग्रहालय संचालक, पशु वैद्यकीय अधिकारी, जीवशास्त्रज्ञ अशी रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 12 मे 2023 आहे.
संस्था – सोलापूर महानगरपालिका, सोलापूर
भरली जाणारी पदे –
1. प्राणी संग्रहालय संचालक
2. पशु वैद्यकीय अधिकारी
3. जीवशास्त्रज्ञ (Job Notification)
पद संख्या – 03 पदे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 12 मे 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Notification)
1. प्राणी संग्रहालयाचे संचालक – उमेदवाराने पशुवैद्यकीय विज्ञान (MVSC) मध्ये पदव्युत्तर पदवी असणं आवश्यक आहे. तसंच प्राणी संग्रहालयाशी संबंधित कामाचा 5 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
2. पशुवैद्यकीय अधिकारी – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पशुवैद्यकीय शास्त्रात पदव्युत्तर पदवी असणं आवश्यक आहे. तसंच पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून शासकीय/निमशासकीय/अनुमानित. S. संस्थेतील किमान 03 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. (Job Notification)
3. जीवशास्त्रज्ञ – उमेदवाराकडे प्राणीशास्त्र / मायक्रोबायोलॉजीमध्ये पदव्युत्तर पदवी असणं आवश्यक आहे. पदव्युत्तर पदवी आणि/किंवा आरोग्य सेवेमध्ये शीत निवारक कार्याचा अनुभव असणं आवश्यक आहे.
मिळणारे वेतन –
1. प्राणी संग्रहालय संचालक – 45,000/- रुपये दरमहा
2. पशु वैद्यकीय अधिकारी – 30,000/- रुपये दरमहा
3. जीवशास्त्रज्ञ – 20,000/- रुपये दरमहा

आवश्यक कागदपत्रे –
1. Resume (Job Notification)
2. 10वी, 12वी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
3. शाळा सोडल्याचा दाखला
4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
6. पासपोर्ट साईझ फोटो
मुलाखतीचा पत्ता –
सामान्य प्रशासन विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर.

काही महत्वाच्या लिंक्स – (Job Notification)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.solapurcorporation.gov.in/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com