UPSC Exam 2023 : UPSC प्रिलिम्सचे अॅडमिट कार्ड जारी; असं करा डाउनलोड

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा (UPSC Exam 2023) पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र जारी केले आहे. यंदाच्या UPSC CSE परीक्षा 2023 साठी अर्ज करणारे उमेदवार त्यांचे हॉल तिकीट अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वरून डाउनलोड करू शकतात. यावर्षी UPSC सिव्हिल सर्व्हिसेस प्रिलिम्स परीक्षा 28 मे 2023 रोजी होणार आहे.
UPSC नागरी सेवा परीक्षेद्वारे एकूण 1255 पदांची भरती केली जाणार आहे. UPSC ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, उमेदवार अॅप्लीकेशन आयडी आणि रोल नंबरच्या मदतीने प्रवेशपत्र डाउनलोड करा
असं डाउनलोड करा UPSC CSE परीक्षेचं अॅडमिट कार्ड (UPSC Exam 2023)
1- सर्वप्रथम आयोगाची अधिकृत वेबसाईट upsc.gov.in किंवा psconline.nic.in ला भेट द्या.
2- येथे नागरी सेवा (प्राथमिक) परीक्षा, 2023 लिंकवर क्लिक करा.
3- आता प्रवेशपत्र डाउनलोड करा.
4- विनंती केलेली माहिती अॅ ड करा आणि सबमिट करा.
5- अॅडमिट कार्ड स्क्रीनवर दिसेल.
6- डाउनलोड करा आणि प्रिंट घ्या.

जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, यावर्षी UPSC नागरी सेवा परीक्षेद्वारे IAS, IPS साठी एकूण 1105 पदांची भरती केली जाईल. याशिवाय, IFS म्हणजेच भारतीय वन (UPSC Exam 2023) सेवेमध्ये एकूण 150 पदे भरली जातील. या पदांसाठी नोंदणी प्रक्रिया 01 फेब्रुवारी 2023 रोजी सुरू झाली. यामध्ये अर्ज करण्यासाठी 21 फेब्रुवारी 2023 पर्यंत मुदत देण्यात आली होती.
या विभागांमध्ये होणार भरती –
1. भारतीय प्रशासकीय सेवा (IAS)
2. भारतीय परराष्ट्र सेवा
3. भारतीय पोलीस सेवा (IPS)
4. भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा, गट ‘अ’
5. भारतीय नागरी लेखा सेवा, गट ‘अ’
6. भारतीय कॉर्पोरेट कायदा सेवा, गट ‘अ’
7. भारतीय संरक्षण लेखा सेवा, गट ‘अ’ (UPSC Exam 2023)
8. भारतीय संरक्षण संपदा सेवा, गट ‘अ’
9. भारतीय माहिती सेवा, गट ‘अ’
10. भारतीय पोस्टल सेवा, गट ‘अ’
11. भारतीय P&T खाते आणि वित्त सेवा, गट ‘अ’
12. भारतीय रेल्वे संरक्षण दल सेवा, गट ‘अ’
13. भारतीय महसूल सेवा (सीमाशुल्क आणि अप्रत्यक्ष कर) गट ‘अ’
14. भारतीय महसूल सेवा (आयकर) गट ‘अ’ (UPSC Exam 2023)
तुम्ही अधिसूचनेत इतर विभागांचे तपशील पाहू शकता. या विभागांमध्ये पदाच्या आधारे पोस्टिंग केले जाते. प्रिलिम परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांना मुख्य परीक्षा आणि अंतिम मुलाखतीला उपस्थित राहावे लागते.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com