Home Blog Page 299

EMRS Recruitment 2023 : शिक्षकांसाठी केंद्र सरकारची बंपर जॉब ओपनिंग!! लवकरच होणार 38480 जागांवर भरती

EMRS Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधत असणाऱ्या तरुणांसाठी (EMRS Recruitment 2023) सरकारने एक चांगली संधी निर्माण केली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने एकलव्य मॉडेल रेसिडेन्शिअल स्कूलमध्ये भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या माध्यमातून EMRS अंतर्गत 38,480 उमेदवारांची शिक्षक आणि शिक्षकेतर पदांवर भरती केली जाणार आहे.
या भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया अद्याप सुरु झाली नाही. लिंक ओपन झाल्यानंतर मात्र इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाईन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि महत्वाच्या सूचना जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्यायची आहे.

अशी होणार निवड –
पात्र उमेदवारांची निवड परीक्षेच्या (EMRS Recruitment 2023) माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी तीन तासांची लेखी परीक्षा होईल. यानंतर मुलाखत आणि शेवटी कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. सर्व टप्पे यशस्वीपणे पार करणाऱ्या उमेदवारांची निवड अंतिम असेल.
कधी करता येईल अर्ज –
अर्जाची लिंक अद्याप सक्रिय केलेली नाही. अर्ज कधी सुरू होतील आणि शेवटची तारीख काय आहे? अशा माहितीसाठी वेळोवेळी अधिकृत वेबसाइटला भेट देत रहा. इथे तुम्हाला सर्व माहिती मिळेल. अर्ज करण्यासाठी आणि तपशील जाणून घेण्यासाठी, NTA च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या – recruitment.nta.nic.in.

रिक्त पदांचा तपशील – (EMRS Recruitment 2023)
प्राचार्य – ७४० पदे
उपप्राचार्य – ७४० पदे
पदव्युत्तर शिक्षक – ८१४० पदे
पदव्युत्तर शिक्षक (Computer Science) – ७४० पदे
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक – ८८८० पदे
कला शिक्षक – ७४० पदे
संगीत शिक्षक – ७४० पदे
शारीरिक शिक्षण शिक्षक – १४८० पदे
ग्रंथपाल – ७४० पदे (EMRS Recruitment 2023)
स्टाफ नर्स – ७४० पदे
वसतिगृह वॉर्डन – १४८० पदे
लेखापाल – ७४० पदे
खानपान सहाय्यक – ७४० पदे
चौकीदार – १४८० पदे
कुक – ७४० पोस्ट
समुपदेशक – ७४० पदे
चालक – ७४० पदे
इलेक्ट्रिशियन कम प्लंबर – ७४० पदे
गार्डनर – ७४० पदे
कनिष्ठ सचिवालय सहाय्यक – १४४० पदे
लॅब अटेंडंट – ७४० पदे
मेस हेल्पर – १४८० पदे
वरिष्ठ सचिवालय सहाय्यक – ७४० पदे
सफाई कामगार – २२२० पदे

EMRS Recruitment 2023

असा करा अर्ज –
1. सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटला भेट द्या. एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल (EMRS) भर्ती 2023 च्या अधिकृत वेबसाईटवर जा. कोणत्याही फसव्या क्रियाकलाप टाळण्यासाठी तुम्ही अधिकृत आणि अधिकृत वेबसाईटवर प्रवेश करत असल्याची खात्री करा.
2. अधिसूचना वाचा – पात्रता निकष, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि उपलब्ध पदांशी संबंधित इतर महत्त्वाचे तपशील समजून घेण्यासाठी अधिसूचना नीट वाचा.
3. नोंदणी करा किंवा साइन अप करा. तुम्ही नवीन अर्जदार असल्यास आवश्यक माहिती देऊन वेबसाइटवर स्वतःची नोंदणी करा. तुम्ही आधीच नोंदणीकृत (EMRS Recruitment 2023) असल्यास तुमचे क्रेडेन्शियल्स वापरून लॉग इन करा.
4. अर्ज भरा – अर्ज फॉर्ममध्ये जा आणि सूचनांनुसार वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता, कामाचा अनुभव आणि इतर कोणत्याही संबंधित माहिती काळजीपूर्वक भरा. कोणत्याही त्रुटी टाळण्यासाठी सबमिट करण्यापूर्वी माहिती दोनदा तपासा.
5. कागदपत्र अपलोड करा – आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करा, जसे की शैक्षणिक प्रमाणपत्रे, ओळखीचा पुरावा, पासपोर्ट-आकाराचे छायाचित्र आणि स्वाक्षरी, निर्दिष्ट फाइल आकार आणि स्वरूप आवश्यकतांनुसार. कागदपत्रे स्पष्ट आणि सुवाच्य (EMRS Recruitment 2023) असल्याची खात्री करा.
6. फी भरा – ऑनलाइन पेमेंट गेटवेद्वारे आवश्यक अर्ज फी भरून अर्ज प्रक्रिया पूर्ण करा. भविष्यातील संदर्भासाठी पेमेंट पावती सेव्ह करा.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Teachers News : मोठी बातमी!! 2 हजार 384 शिक्षक आता केंद्रप्रमुख होणार; पहा कोणत्या जिल्ह्यात किती जागा?

Teachers News

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 5 जून रोजी (Teachers News) जाहिरात काढत केंद्र प्रमुखांच्या रिक्त जागा भरणार असल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान यावेळी राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये 2 हजार 384 केंद्र प्रमुखांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे यासाठी 6 जूनपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. या महिन्याच्या अखेरीस ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांना देखील स्पर्धा परीक्षेद्वारे केंद्रप्रमुख होण्याची संधी मिळणार आहे.

कोण असतो केंद्रप्रमुख –
केंद्रप्रमुख हा प्रशासन व शिक्षकांमधील दुवा असतो. तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र प्रमुखांच्या अंतर्गत 13 ते 16 शाळा येतात. विशेष म्हणजे केंद्रप्रमुखांची 50 टक्के पदे शिक्षकांमधून पदोन्नतीने भरली जातात. तसेच उर्वरित 50 टक्के पदे महाराष्ट्र (Teachers News) राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून ‘केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा 2023’ द्वारे भरण्यात येणार आहेत. तर जि.प. शिक्षकांनी पदोन्नतीची संधी मिळाल्यामुळे अनेकांनी तयारी सुरु केली आहे. तसेच अनेक शिक्षकांकडून परीक्षेची तयारी देखील केली जात आहे. त्यामुळे आपल्याला देखील केंद्रप्रमुख पद मिळावे अशी अपेक्षा अनेक शिक्षकांची आहे.

राज्यातील 34 जिल्ह्यात होणार भरती
राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये 2 हजार 384 केंद्र प्रमुखांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पण या पदासाठी अर्ज करण्यास 50 वर्ष वयाची अट घातल्यामुळे अनेक शिक्षक (Teachers News) परीक्षेच्या संधीपासून वंचित राहणार आहेत. तर 50 वर्षावरील शिक्षकांना परीक्षेची संधी मिळावी अशी मागणी पुढे येत आहे. तसेच ती मागणी मान्य न झाल्यास परीक्षेलाच उच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी काही शिक्षकांनी सुरु केली आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती जागा? (Teachers News)
नाशिक 122, नंदुरबार 33, धुळे 40, जळगाव 80, अमरावती 69, बुलढाण 65, अकोला 42, वाशिम 35, यवतमाळ 90, नागपूर 68, वर्धा 43, भंडारा 30, गोदिया 42, गडचिरोली 50, चंद्रपूर 66, छत्रपती संभाजीनगर 64, हिंगोली 34, परभणी 43, जालना 53, बीड 78, लातूर 50, धाराशिव 40, नांदेड 87, ठाणे 47, रायगड 114, पालघर 75, पुणे 153, अहमदनगर 123, सोलापूर 99, कोल्हापूर 85, सांगली 67, सातारा 111, रत्नागिरी 125 आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 61 जागांवर केंद्रप्रमुख भरले जाणार आहेत.

ऑनलाईन होणार परीक्षा
केंद्रप्रमुख होण्यासाठी शिक्षकांना ऑनलाईन परीक्षा द्यावी लागणार आहे. 200 गुणांची ऑनलाईन परीक्षा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार (Teachers News) आहे. तर या 200 गुणांमध्ये दोन विभाग असून, पहिल्या विभागात बुद्धिमत्ता चाचणी आणि अभियोग्यता हा घटक असेल. दुसऱ्या विभागात शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह याविषयीचा अभ्यासक्रम असणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job in Shirdi : साई चरणी नोकरीची संधी; ‘या’ पदावर होणार नवीन उमेदवारांची निवड

Job in Shirdi

करिअरनामा ऑनलाईन । श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था,शिर्डी (Job in Shirdi) अंतर्गत श्री साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूल, शिर्डी येथे प्राथमिक शिक्षक पदाच्या एकूण 02 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी  खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2023 आहे.

संस्था – श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी) अंतर्गत श्री साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूल, शिर्डी
भरले जाणारे – प्राथमिक शिक्षक
पद संख्या – 02पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी, ता. राहाता, जि. अहमदनगर, 42310
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जुन 2023

नोकरी करण्याचे ठिकाण – शिर्डी, अहमदनगर
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job in Shirdi)
1. प्राथमिक शिक्षक – HSC, D.Ed, English Medium (T.E.T. Qualified)
असा करा अर्ज –
1. वरील पदांसाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इतर कोणत्याही स्वरूपात (Job in Shirdi) आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
3. विहीत वेळेनंतर / दिनांकानंतर आलेले अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2023 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – sai.org.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NARI Pune Recruitment : महिन्याला 1 लाख पगार देणारी नोकरी!! पुण्याच्या राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेत ‘या’ पदावर भरती

ITBP Recruitment 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, पुणे (NARI Pune Recruitment) अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सल्लागार (गैर-वैद्यकीय) पदाच्या काही रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जून 2023 आहे.

संस्था – राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, पुणे
भरले जाणारे पद – सल्लागार (गैर-वैद्यकीय)
पद संख्या – 02 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 जून 2023

नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
वय मर्यादा – 70 वर्षे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (NARI Pune Recruitment)
1. Candidates possessing PhD Degree in relevant subject (Anthropology, Health science, Psychology, Population.
2. sciences and other Social science concerning Tribal areas)

मिळणारे वेतन – Rs.1,00,000/- दरमहा
असा करा अर्ज –
1. या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी (NARI Pune Recruitment) नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.nari-icmr.res.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
पात्रता निकष –
NARI Pune Bharti 2023 - Eligibility Criteria

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.nari-icmr.res.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ITBP Recruitment 2023 : इंडो तिबेटन बॉर्डर पोलिस दलात नवीन उमेदवारांना मिळणार नोकरीची संधी

ITBP Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या (ITBP Recruitment 2023) तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इंडो-तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत हेड कॉन्स्टेबल पदांच्या एकूण 81 जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज  करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 09 जून 2023 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जुलै 2023 आहे.

संस्था – इंडो तिबेटन बॉर्डर पोलिस
भरले जाणारे पद – हेड कॉन्स्टेबल
पद संख्या – 81 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत
वय मर्यादा – 18 ते 25 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 09 जून 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 जुलै 2023

भरतीचा तपशील – (ITBP Recruitment 2023)

ITBP Vacancy 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. Passed 10 examinations from a recognized Board or equivalent
2. Passed Auxiliary Nursing Midwifery Course from a recognized institution
3. Registered in the Nursing Council of Central Government or Government.
मिळणारे वेतन – 25,500/- ते 81,100/- रुपये दरमहा (ITBP Recruitment 2023)
असा करा अर्ज –
1. वरील भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. कोणताही ऑफलाईन अर्ज स्वीकारला जाणार नाही.
3. पदाच्या आवश्यकतेनुसार सर्व आवश्यक तपशील ऑनलाईन अर्ज फॉर्ममध्ये नमूद करा.
4. ऑनलाईन अर्जाची लिंक 09 जून 2023 पासून सुरु होईल.

निवड प्रक्रिया – (ITBP Recruitment 2023)
1. Physical Efficiency Test (PET)
2. Physical Standard Test (PST)
3. Written Test
4. Practical Examination (ITBP Recruitment 2023)
Detailed Medical Examination (DME)/ Review Medical Examination (RME).

पात्रता निकष –

ITBP Bharti 2023

काही महत्वाच्या लिंक्स – (ITBP Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – recruitment.itbpolice.nic.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Success Story : विना कोचिंग फक्त सेल्फ स्टडी; दुसऱ्याच प्रयत्नात बनली IAS; भारतात मिळवली 6 वी रॅंक

UPSC Success Story of Gahana James

करिअरनामा ऑनलाईन । संघ लोकसेवा आयोगाने 2022 मध्ये (UPSC Success Story) घेतलेल्या परीक्षेमध्ये गेहना नव्या जेम्सने संपूर्ण भारतात 6 वा क्रमांक मिळवून प्रशासकीय अधिकारी बनण्याचे तिचे बालपणीचे स्वप्न पूर्ण केले आहे. तिला मिळालेल्या अनपेक्षित यशाने ती भारावून गेली आहे. हे यश मिळवताना तिने तिच्या काकांकडून प्रेरणा घेतल्याचे ती आवर्जून सांगते.

UPSC Success Story of Gahana James

गेहना केरळची रहिवासी आहे. तिचे वडील प्रोफेसर सी. के. जेम्स थॉमस कॉलेजमधून निवृत्त झाले आहेत. जपानमधील भारतीय राजदूत IFS अधिकारी सिबी जॉर्ज हे गेहनाचे काका (UPSC Success Story) आहेत. नागरी सेवेत जाण्यासाठी आपल्याला काकांकडून प्रेरणा मिळाल्याचे ती सांगते. देशात सर्वात कठीण समजली जाणारी संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा देताना गेहनाने कोणत्याही प्रकारचा कोचिंग क्लास लावला नाही. सेल्फ स्टडीच्या जोरावरच ती ही परीक्षा पास झाली आहे.

UPSC Success Story of Gahana James

वर्तमानपत्र वाचण्याची सवय उपयोगी ठरली (UPSC Success Story)
गेहना जेम्स सांगते; “परीक्षेची तयारी करत असताना माहिती गोळा करत असताना मी जास्त करुन वर्तमानपत्र आणि इंटरनेटवर अवलंबून होते. दररोज नियमाने वर्तमानपत्र वाचण्याची सवय मला फायदेशीर ठरली. मी लहानपणापासून वर्तमानपत्र वाचत आले आहे. माझा (UPSC Success Story) पहिल्यापासूनच सेल्फ स्टडीवर विश्वास आहे. त्यामुळे मी कोणत्याही कोचिंग क्लासचा आधार घेतला नाही. स्वतःवरील विश्वासामुळे मी UPSCची परीक्षा देताना अवघ्या दुसऱ्याच प्रयत्नात ही परीक्षा पास केली आहे. याबरोबरच माझे काका सिबी जॉर्ज, ग्रॅज्युएशन करत असलेला माझा धाकटा भाऊ हे दोघे मला सतत प्रोत्साहन देत होते. त्यामुळे अभ्यास करताना माझ्यावर कोणत्याही प्रकारचं दडपण नव्हतं”

UPSC Success Story of Gahana James

परिणामांचा विचार न करता मी पुढे सरकत राहिले
गेहना सांगते; “नागरी सेवक बणण्याचे माझे लहानपणापासूनचे स्वप्न होते. इतिहास या विषयात पदवी आणि राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळविल्यानंतर मी महात्मा गांधी (UPSC Success Story) विद्यापीठातून पीएचडी केली. मी नेहमी परीक्षेत सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला आणि निकालाचा विचार कधीच केला नाही. यावेळीही मी तेच केले. परिणामांचा विचार न करता मी पुढे सरकत राहिले आणि यात मी यशस्वी झाले याचा मला खूप आनंद आहे.”
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Kotak Scholarship 2023 : 10 वी पास झालाय ना…कोटक एज्युकेशनने आणली आहे मोठी स्कॉलरशीप!! इथे करा अर्ज

Kotak Scholarship 2023

करिअरनामा ऑनलाईन । इयत्ता दहावीची परीक्षा पास (Kotak Scholarship 2023) झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. कोटक एज्युकेशन फाउंडेशन (KEF), कोटक महिंद्रा ग्रुपच्या CSR अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सीने संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशातील विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप प्रोग्राम आणला आहे. आर्थिकदृष्ट्या वंचित घटकांमधील 11+ वर्गातील गुणवंत विद्यार्थांना पुढील शिक्षण घेण्यास मदत होण्यासाठी कोटक ज्युनियर स्कॉलरशिप प्रोग्राम सुरु करण्यात आला आहे.
नुकतंच दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एका उत्तम स्कॉलरशीपची संधी आहे. ही स्कॉलरशीप कोटक महिंद्रा या कंपनीची आहे. कोटक कनिष्ठ शिष्यवृत्ती हा समाजातील (Kotak Scholarship 2023) आर्थिकदृष्ट्या वंचित घटकांमध्ये शिक्षण आणि उपजीविकेला प्रोत्साहन देण्यासाठी कोटक महिंद्रा समूहाच्या कंपन्यांचा एक सहयोगी CSR प्रकल्प आहे. याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

कोटक कनिष्ठ शिष्यवृत्ती 2023
असे आहेत पात्रता निकष – (Kotak Scholarship 2023)
1. अर्जदारांनी दहावीच्या बोर्ड परीक्षेत ८५% पेक्षा जास्त गुण मिळवलेले असावेत.
2. अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रु. 3,20,00/- किंवा कमी
3. मुंबई महानगर प्रदेश (MMR) येथील मुलं या स्कॉलरशीपसाठी अर्ज करू शकता.
4. अर्ज करण्या साठी वेबसाईट – https://kotakeducation.org/kotak-junior-scholarship/

या शिष्यवृत्तीची वैशिष्ट्ये –
1. इयत्ता 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम दिली जाईल.
2. शिष्यवृत्ती कार्यक्रमाच्या कार्यकाळात विद्यार्थ्यांच्या सहभागाच्या ऍक्टिव्हिटी जसे की वन-टू-वन मार्गदर्शन, शैक्षणिक समर्थन, करिअर मार्गदर्शन (Kotak Scholarship 2023) सत्र, प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी समर्थन, एक्सपोजर व्हिझिट्स आणि होम व्हिझिट्स करण्यात येतील.

कोटक एज्युकेशन फाउंडेशन –
शालेय शिक्षण, शिष्यवृत्ती आणि व्यावसायिक शिक्षण यासारख्या विविध शिक्षण-आधारित हस्तक्षेपांद्वारे वंचित कुटुंबातील मुले आणि तरुणांना आधार देणे हे कोटक एज्युकेशन फाउंडेशनचे उद्दिष्ट आहे जेणेकरून ते दारिद्र्यरेषेच्या वर जाऊ शकतील आणि शाश्वत प्रक्रियेद्वारे सन्मानाचे जीवन जगू शकतील. 2007 मध्ये नोंदणीकृत, कोटक एज्युकेशन फाउंडेशनने मुंबई आणि जवळपासच्या उपनगरातील (Kotak Scholarship 2023) सुमारे २०० शाळांना भागीदारी आणि समर्थन दिले आहे आणि सुमारे 1 लाखाहून अधिक विद्यार्थी, सुमारे 1000 शाळाप्रमुख, 10 हजार शिक्षक आणि सुमारे 30000 अधिक शाळा पालकांना प्रभावित केले आहे. कोटक एज्युकेशन फाउंडेशन कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना अभियंता, डॉक्टर आणि आर्थिक व्यावसायिक बनण्यास मदत करण्यात यशस्वी झाले आहे. सध्या, कोटक एज्युकेशन फाउंडेशन मुंबई, नाशिक, पालघर, ठाणे आणि पुणे येथे शालेय शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण प्रकल्पांसाठी काम करत आहे आणि शिष्यवृत्ती प्रकल्पासाठी आणि कोविडमुळे नकारात्मक परिणाम झालेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत यासाठी भारतभर ते काम करत आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Re Exam : 10वी-12वीची फेर परीक्षा 18 जुलैपासून; इथे पहा संपूर्ण वेळापत्रक

Re Exam

करिअरनामा ऑनलाईन | दहावी-बारावी बोर्डाच्या पुरवणी (Re Exam) परीक्षा 18 जुलै 2023 पासून सुरू होत आहेत. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्वरित परीक्षा घेतल्या जात आहेत. बारावीच्या लेखी परीक्षा 18 जुलै ते 8 ऑगस्टदरम्यान होतील. तर व्यवसाय अभ्यासक्रमाच्या परीक्षा 18 जुलै ते 5 ऑगस्टदरम्यान होतील.

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता दहावी आणि बारावीच्या जुलै – ऑगस्टमध्ये घेण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार 18 जुलैपासून परीक्षा सुरु होणार आहेत. राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी ही माहिती दिली (Re Exam) आहे. लेखी पुरवणी परीक्षा पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येईल. तर दहावीची परीक्षा 18 जुलै ते 1 ऑगस्टदरम्यान होईल. बारावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 18 जुलै ते 5 ऑगस्टदरम्यान होणार आहे. तसंच परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक हे मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे.

दहावी आणि बारावीच्या फेरपरीक्षेचं सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या http://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च (Re Exam) माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाकडे छापील स्वरूपात देण्यात येणारं वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घेऊन विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ठ व्हावं. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेनं छपाई केलेलं तसेच व्हॉट्सअॅप किंवा तत्सम माध्यमातील वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असं आवाहन ओक यांनी केलं आहे.

या परीक्षेचे आवेदनपत्रे ही ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी जुलै-ऑगस्ट 2023 मध्ये होणाऱ्या परीक्षेची आवेदनपत्रे त्यांच्या उच्च माध्यमिक (Re Exam) शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत भरावी. सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी पुढील बाबी लक्षात घ्याव्यात.

ऑनलाईन आवेदन पत्रासंदर्भात सूचना – (Re Exam)
1. ऑनलाईन आवेदनपत्र भरताना फेब्रुवारी-मार्च 2023 परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची या परीक्षेतील माहिती आवेदनपत्रात ऑनलाईन घेता येईल.
2. श्रेणीनुसार करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फेब्रु-मार्च 2023 मधील उत्तीर्ण विद्यार्थ्यासाठी जुलै-ऑगस्ट 2023 व फेब्रुवारी-मार्च 2024 अशा लगतच्या दोनच संधी उपलब्ध राहतील यांची नोंद घ्यावी.
3. सर्व विभागीय मंडळातील उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयानी निर्धारित शुल्क मंडळाने निश्चित केलेल्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करुन चलनाची प्रत व विद्यार्थ्यांच्या याद्या दिलेल्या मुदतीच संबंधित विभागीय मंडळाकडे सादर कराव्यात.
4. आवेदनपत्रे नियमित शुल्काने भरावयाच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

PMC Recruitment : पुणे महानगरपालिकेत नोकरीची मोठी संधी; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड

PMC Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । आरोग्य खात्याकडील पुणे शहर (PMC Recruitment) एड्स नियंत्रण संस्था, पुणे महानगरपालिका यांच्या गाडीखाना येथील प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिटकरिता पुणे मनपा रुग्णालयांतील FICTC केंद्रांकडे विविध पदांवर नवीन उमेदवारांची भरती केली जाणार आहे. या भरतीच्या माध्यमातून समुपदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या 12 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून पुढील 8 दिवसांपर्यंत सोमवार ते शुक्रवार (शासकीय सुट्टी वगळून) सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत समक्ष अर्ज सादर करायाचा आहे.

संस्था – पुणे महानगरपालिका, पुणे
भरले जाणारे पद –
1. समुपदेशक – 11 पदे
2. प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 11 पदे
पद संख्या – 12 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे

अर्ज करण्याची पद्धत्त – उमेदवाराने समक्ष पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – पुणे शहर एड्स नियंत्रण संस्था, डॉ. कोटणीस आरोग्य केंद्र, पहिला मजला, 663, शुक्रवार पेठ, गाडीखाना, पुणे 411002
अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून पुढील 8 दिवसांपर्यंत (13 जून 2023)
निवड प्रक्रिया – मुलाखत

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
समुपदेशक – (PMC Recruitment)
1. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण व मास्टर ऑफ सोशल वर्कची (MSW) पदवी उत्तीर्ण.
2. एच. आय. व्ही. एड्स विषयक समुपदेशनाचा किमान 3 वर्षांचा कामाचा अनुभव आवश्यक आहे.
प्रयोगशाळा तंत्रज्ञ –
1. मान्यता विद्यापीठाची शास्त्र शाखेची पदवी (बी.एस.सी. व डी.एम.एल.टी. उत्तीर्ण
2. एच.आय.व्ही. रक्तचाचणी कामाचा लॅबोरेटरी मधील किमान 3 वर्षांचा कामाचा अनुभव आवश्यक आहे.

असा करा अर्ज –
1. या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. टपालाने आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत
3. जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून पुढील ८ दिवसांपर्यंत सोमवार ते शुक्रवार (शासकीय सुट्टी वगळून) सकाळी 4. ११.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत समक्ष अर्ज सादर करावयाचा आहे. (PMC Recruitment)
5. पुणे शहर एड्स नियंत्रण संस्था, डॉ. कोटणीस आरोग्य केंद्र, पहिला मजला, ६६३, शुक्रवार पेठ, गाडीखाना, पुणे ४११००२ येथे कार्यालयीन वेळेत (शासकीय सुट्टी वगळता) ऑफलाईन पध्दतीने अर्ज स्वीकारले जातील.
6. अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
उमेदवारांना वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सर्व सुचना, गुणवत्ता यादी वेबसाईटवर www.punecorporation.org प्रसिध्द करण्यात येतील.

काही महत्वाच्या लिंक्स – (PMC Recruitment)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.pmc.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

पत्रकार व्हायचंय? कराड येथील शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरु

Journalism Course

करिअरनामा ऑनलाईन । पत्रकारिता हा आजच्या काळात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करणारा अभ्यासक्रम म्हणून प्रचलित आहे. बदलत्या काळात युवकांसमोर बेरोजगारीची समस्या उभी आहे. अनेक पारंपरिक अभ्यासक्रमांतून रोजगार मिळवणे अवघड झालेले असताना पत्रकारितेसारख्या अभ्यासक्रमाकडे रोजगाराची एक चांगली संधी मिळविण्याचा पर्याय म्हणून बघितले जात आहे. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे पत्रकारिता क्षेत्रात झालेल्या अनेक बदलांमुळे तसेच डाटा आणि डिजिटल पत्रकारितेच्या उदयामुळे या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. नोकरीसोबतच अनेक व्यवसायांची दारे या क्षेत्रातून उघडली जाऊ शकतात. अशा अनेक संधींमुळे पत्रकारिता या पदवीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

करिअरच्या हजारो संधी

वेब पोर्टल्स, ब्लॉग, यू-ट्यूब चॅनेल, सोशल मिडिया हॅंडलिंग, डिजीटल मार्केटिंग, टीव्ही चॅनेल्स, सिनेमा, माहितीपट, वृत्तपत्र, मासिक, रेडिओ, जनसंपर्क (पब्लिक रिलेशन) या माध्यमांमध्ये वेगवेगळ्या पदांवर नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. तसेच ही पदवी प्राप्त केल्यावर वार्ताहर, पत्रकार, माध्यम सल्लागार, वृत्तवाहिनी निवेदक, जहिरात अधिकारी, रेडिओ जॉकी, शासकीय व खाजगी जनसंपर्क अधिकारी, मुक्त पत्रकार यांसारख्या पदांवर काम करता येते.

शिवाजी विद्यापीठाचे एकमेव मान्यताप्राप्त पत्रकारिता महाविद्यालय कराड येथे

बॅचलर ऑफ जर्नालिझम हा अभ्यासक्रम शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड (श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित) येथे २००७-०८ पासून सुरू आहे. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर मान्यताप्राप्त हा अभ्यासक्रम विद्यापीठाव्यतिरिक्त असलेले हे एकमेव महाविद्यालय. महाविद्यालयाची सुसज्ज इमारत, निसर्गरम्य परिसर, अद्ययावत संगणक कक्ष, रेडिओ, टिव्ही, आयटी कक्ष यांसह तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि १००% नोकरीची हमी ही महत्त्वाची वैशिष्ट्ये असणारे हे महाविद्यालय आहे. महाविद्यालयातील तज्ज्ञ मार्गदर्शक, महाविद्यालयात आयोजित करण्यात येणारे विविध उपक्रम व प्रत्यक्ष व्यवसायिक अनुभव यांमुळे महाविद्यालयाची गुणवत्तेची परंपरा अखंडित आहे. महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले आहे. या अभ्यासक्रमाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पत्रकारितेची पदवी फक्त एका वर्षात प्राप्त करता येते.

प्रवेशासंदर्भात महत्त्वाचे

कालावधी- १ वर्ष (२ सत्र)
प्रवेश क्षमता- मर्यादित (३० विद्यार्थी)
पात्रता – कोणत्याही शाखेचा पदवीधर
वय- अट नाही
शुल्क – माफक प्रवेश व शैक्षणिक शुल्क

प्रवेश परीक्षा – १०० गुण
वेळ – २ तास
स्वरूप – लेखी
प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम – सामान्य ज्ञान व भाषा (काठिण्य पातळी – पदवी)
प्रवेश प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – ५ जून २०२३
प्रवेश प्रक्रिया – विद्यार्थ्यांनी महाविद्यालया भेट देऊन प्रवेश अर्ज भरावा. यानंतर प्रवेश परीक्षा घेऊन उमेदवारांची निवड करण्यात येईल.

प्रवेशासाठी संपर्क –

संभाजी पाटील – 9922098199, जीवन अंबुडारे – 9823418457, स्नेहलता शेवाळे – 8329312088
प्राचार्य डॉ. महेश गायकवाड – 8208835510