पत्रकार व्हायचंय? कराड येथील शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरु

करिअरनामा ऑनलाईन । पत्रकारिता हा आजच्या काळात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करणारा अभ्यासक्रम म्हणून प्रचलित आहे. बदलत्या काळात युवकांसमोर बेरोजगारीची समस्या उभी आहे. अनेक पारंपरिक अभ्यासक्रमांतून रोजगार मिळवणे अवघड झालेले असताना पत्रकारितेसारख्या अभ्यासक्रमाकडे रोजगाराची एक चांगली संधी मिळविण्याचा पर्याय म्हणून बघितले जात आहे. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे पत्रकारिता क्षेत्रात झालेल्या अनेक बदलांमुळे तसेच डाटा आणि डिजिटल पत्रकारितेच्या उदयामुळे या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. नोकरीसोबतच अनेक व्यवसायांची दारे या क्षेत्रातून उघडली जाऊ शकतात. अशा अनेक संधींमुळे पत्रकारिता या पदवीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

हे पण वाचा -
1 of 281

करिअरच्या हजारो संधी

वेब पोर्टल्स, ब्लॉग, यू-ट्यूब चॅनेल, सोशल मिडिया हॅंडलिंग, डिजीटल मार्केटिंग, टीव्ही चॅनेल्स, सिनेमा, माहितीपट, वृत्तपत्र, मासिक, रेडिओ, जनसंपर्क (पब्लिक रिलेशन) या माध्यमांमध्ये वेगवेगळ्या पदांवर नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. तसेच ही पदवी प्राप्त केल्यावर वार्ताहर, पत्रकार, माध्यम सल्लागार, वृत्तवाहिनी निवेदक, जहिरात अधिकारी, रेडिओ जॉकी, शासकीय व खाजगी जनसंपर्क अधिकारी, मुक्त पत्रकार यांसारख्या पदांवर काम करता येते.

शिवाजी विद्यापीठाचे एकमेव मान्यताप्राप्त पत्रकारिता महाविद्यालय कराड येथे

बॅचलर ऑफ जर्नालिझम हा अभ्यासक्रम शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड (श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित) येथे २००७-०८ पासून सुरू आहे. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर मान्यताप्राप्त हा अभ्यासक्रम विद्यापीठाव्यतिरिक्त असलेले हे एकमेव महाविद्यालय. महाविद्यालयाची सुसज्ज इमारत, निसर्गरम्य परिसर, अद्ययावत संगणक कक्ष, रेडिओ, टिव्ही, आयटी कक्ष यांसह तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि १००% नोकरीची हमी ही महत्त्वाची वैशिष्ट्ये असणारे हे महाविद्यालय आहे. महाविद्यालयातील तज्ज्ञ मार्गदर्शक, महाविद्यालयात आयोजित करण्यात येणारे विविध उपक्रम व प्रत्यक्ष व्यवसायिक अनुभव यांमुळे महाविद्यालयाची गुणवत्तेची परंपरा अखंडित आहे. महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले आहे. या अभ्यासक्रमाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पत्रकारितेची पदवी फक्त एका वर्षात प्राप्त करता येते.

प्रवेशासंदर्भात महत्त्वाचे

कालावधी- १ वर्ष (२ सत्र)
प्रवेश क्षमता- मर्यादित (३० विद्यार्थी)
पात्रता – कोणत्याही शाखेचा पदवीधर
वय- अट नाही
शुल्क – माफक प्रवेश व शैक्षणिक शुल्क

प्रवेश परीक्षा – १०० गुण
वेळ – २ तास
स्वरूप – लेखी
प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम – सामान्य ज्ञान व भाषा (काठिण्य पातळी – पदवी)
प्रवेश प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – ५ जून २०२३
प्रवेश प्रक्रिया – विद्यार्थ्यांनी महाविद्यालया भेट देऊन प्रवेश अर्ज भरावा. यानंतर प्रवेश परीक्षा घेऊन उमेदवारांची निवड करण्यात येईल.

प्रवेशासाठी संपर्क –

संभाजी पाटील – 9922098199, जीवन अंबुडारे – 9823418457, स्नेहलता शेवाळे – 8329312088
प्राचार्य डॉ. महेश गायकवाड – 8208835510