Home Blog Page 279

BARTI UPSC Coaching 2023 : UPSC करणाऱ्यांसाठी ‘बार्टी’ देतय मोफत प्रशिक्षण; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

BARTI UPSC Coaching 2023

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (BARTI UPSC Coaching 2023) वतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी अपडेट आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या ( Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute / BARTI) वतीने अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांसाठी मोफत अनिवासी प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी दि. 14 ऑगस्टपर्यंत अर्ज करायचे आहेत.

यासाठी यंदा 300 विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. ही निवड करण्यासाठी सामाईक प्रवेश परीक्षा (CET) घेतली जाणार आहे. ही CET येत्या दि. 27 ऑगस्ट रोजी घेतली (BARTI UPSC Coaching 2023) जाणार असून, यामध्ये गुणानुक्रमे आणि संवर्गानिहाय पात्र विद्यार्थ्यांची निवड केली जाणार असल्याचे ‘बार्टी’चे महासंचालक सुनील वारे यांनी सांगितले.
इथे करा अर्ज –
CET परीक्षेसाठी इच्छुकांना ऑनलाइन अर्ज करावे लागणार आहेत. यासाठी www.siac.org.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
300 विद्यार्थ्यांना मिळणार लाभ – (BARTI UPSC Coaching 2023)
राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील (SC) एकूण 300 विद्यार्थ्यांची या मोफत प्रशिक्षणासाठी निवड केली जाणार आहे. यासाठी निवडलेल्या विद्यार्थ्यांना दिल्ली येथील प्रशिक्षण संस्थेमध्ये संघ लोकसेवा आयोगाच्या ( पूर्व व मुख्य) पूर्वतयारी प्रशिक्षणासाठी पुरस्कृत केले जाणार आहे.

आरक्षणाचा तपशील –
एकूण 300 जागांपैकी महिलांसाठी 30 टक्के जागा (90 जागा) या महिलांसाठी, दिव्यांग व्यक्तीसाठी (Person With Disability) 4 टक्के जागा (12 जागा) आणि अनुसूचित (BARTI UPSC Coaching 2023) जातीअंतर्गत येत असलेल्या वंचित जातींमधील (वाल्मीकी व तत्सम जाती उदा. होलार, बेरड, मातंग, मांग, मादगी आदी) विद्यार्थ्यांकरिता 5 टक्के जागा (15 जागा) राखीव असणार आहेत.
विद्यार्थ्यांकडे ही पात्रता असणे आवश्‍यक –
1. विद्यार्थी हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा.
2. संबंधितांकडे राज्यातील अनुसूचित जातीचा दाखला व अधिवास असावा.
3. इच्छुक विद्यार्थी हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
4. विद्यार्थ्याचे वय हे संघ लोकसेवा आयोगाच्या अटी व शर्तीनुसार असावे.
5. उमेदवार केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 2024 मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी पात्र असावा.
6. वार्षिक उत्पन्न कमाल 8 लाखापर्यंत असावे

दरमहा प्रत्येकास 13 हजार रुपये विद्यावेतन
या प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे दिल्ली येथील प्रशिक्षण संस्थेचे प्रशिक्षण शुल्क भरण्यात येते. याशिवाय हे प्रशिक्षण अनिवासी असल्याने या विद्यार्थ्यांना दिल्ली येथील निवास व भोजनाच्या व्यवस्थेकरिता दरमहा प्रत्येकी रक्कम 13 हजार रुपये विद्यावेतन देण्यात येते. (BARTI UPSC Coaching 2023)
या प्रशिक्षणाच्या सुरवातीस दिल्ली येथे जाण्याकरिता प्रत्येकी 5 हजार रुपये (फक्त एकदा) आणि प्रशिक्षण संपल्यानंतर परतीच्या प्रवासाकरिता प्रत्येकी 5 हजार रुपये (फक्त एकदा) प्रवास खर्च दिला जातो. तसेच पहिल्या महिन्यासाठी आर्थिक मदत म्हणून प्रत्येकी 3 हजार रुपये हे एकरकमी दिले जातात, असे बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी सांगितले.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Mumbai Port Trust Recruitment : मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत क्रीडा प्रशिक्षणार्थी भरती सुरु; या पत्यावर करा अर्ज

Mumbai Port Trust Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । मुंबई पोर्ट ट्रस्ट, मुंबई येथे क्रीडा (Mumbai Port Trust Recruitment) प्रशिक्षणार्थी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 54 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2023 आहे.

संस्था – मुंबई पोर्ट ट्रस्ट, मुंबई
भरले जाणारे पद – क्रीडा प्रशिक्षणार्थी
पद संख्या – 54 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 जुलै 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई

वय मर्यादा – (Mumbai Port Trust Recruitment)
किमान – 18 वर्षे
कमाल – 25 वर्षे
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जे.टी. महासचिव, मुंबई बंदर प्राधिकरण स्पोर्ट्स क्लब, दुसरा मजला, रेल्वे व्यवस्थापकाची इमारत, रामजीभाई कमानी मार्ग, वसंत हॉटेल जवळ, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-400 001
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज संबंधित पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे. (Mumbai Port Trust Recruitment)
3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
4. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

भरतीचा तपशील – (Mumbai Port Trust Recruitment)

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अर्जाचा नमुना – CLICK

अधिकृत वेबसाईट – www.mumbaiport.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

DRDO Recruitment 2023 : DRDO अंतर्गत 55 पदांवर नवीन भरती; ऑनलाईन करा Apply 

DRDO Recruitment 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । संरक्षण संशोधन आणि विकास संस्था भरती (DRDO Recruitment 2023) व मूल्यांकन केंद्र अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रकल्प शास्त्रज्ञ B, प्रकल्प शास्त्रज्ञ C, प्रकल्प शास्त्रज्ञ D, प्रकल्प शास्त्रज्ञ F पदाच्या एकूण 55 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑगस्ट 2023 आहे.

संस्था – संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (Defence Research & Development Organisation)
भरले जाणारे पद –
1. प्रकल्प शास्त्रज्ञ B – 12 पदे
2. प्रकल्प शास्त्रज्ञ C – 30 पदे
3. प्रकल्प शास्त्रज्ञ D – 12 पदे
4. प्रकल्प शास्त्रज्ञ F – 01 पद
पद संख्या – 55 पदे (DRDO Recruitment 2023)
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 ऑगस्ट 2023

वय मर्यादा –
1. प्रकल्प शास्त्रज्ञ B – 35 वर्ष
2. प्रकल्प शास्त्रज्ञ C – 40 वर्ष
3. प्रकल्प शास्त्रज्ञ D – 45 वर्ष
4. प्रकल्प शास्त्रज्ञ F – 55 वर्ष
मिळणारे वेतन – (DRDO Recruitment 2023)
1. प्रकल्प शास्त्रज्ञ B Rs. 90,789/- PM
2. प्रकल्प शास्त्रज्ञ C Rs. 1,08,073/- PM
3. प्रकल्प शास्त्रज्ञ D Rs. 1,24,612/- PM
4. प्रकल्प शास्त्रज्ञ F Rs. 2.20,717/- PM

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. मुदतीनंतर आलेल्या अर्जांचा कोणत्याही प्रकारे विचार करण्यात येणार नाही .
निवड प्रक्रिया –
1. या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
2. विशिष्ट परीक्षेच्या आधारे निवडलेले उमेदवार येथे होणाऱ्या वैयक्तिक मुलाखतीत स्कोअर दिसणे आवश्यक आहे.
3. RAC/DRDO ने ठरवल्याप्रमाणे दिल्ली किंवा इतर कोणतेही ठिकाण निवडलेल्या उमेदवारांना नियुक्तीची ऑफर मर्यादित राहील.
4. गुणवत्तेच्या क्रमाने रिक्त पदांची संख्या. नियुक्ती मात्र,वैद्यकीय पात्रता यासारख्या समाधानकारक अटींच्या अधीन असतील. (DRDO Recruitment 2023)
5. शासनाच्या गट ‘अ’ तांत्रिक पदांसाठी विहीत परीक्षा. भारताचे फील्ड सेवेच्या दायित्वासह आणि वर्ण पूर्ववृत्तांची पडताळणी याशिवाय PwD/SC/ST/OBC/EWS प्रमाणपत्र इ.ची पडताळणी, कुठेही लागू.
6. अंतिम निकाल (वैयक्तिक उमेदवारासाठी सानुकूलित) RAC वेबसाईटवर rac.gov.in उपलब्ध करून दिला जाईल.
7. मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी अर्जदारांना कोणत्याही टीए/डीएचा हक्क मिळणार नाही.
8. अर्जासोबत संबंधित प्रमाणपत्र / कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडल्या पाहिजेत.
9. कोणत्याही बाबतीत अपूर्ण अर्ज फेटाळण्यास जबाबदार असेल.

IMPORTANT CONTACT DETAILS :
1. For all queries related to applying online for this advertisement, please contact phone no. 011‐23889528 (DRDO Recruitment 2023)
2. For any other queries related to this advertisement, please contact 011‐23830599 or email at [email protected] or [email protected]
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट I – rac.gov.in
अधिकृत वेबसाईट II – www.drdo.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Talathi Bharti 2023 : तलाठी भरतीसाठी रेकॉर्ड ब्रेक अर्ज दाखल; 4644 पदांसाठी 10 लाख अर्ज; ‘या’ महिन्यात होणार परीक्षा

Talathi Bharti 2023 (13)

करिअरनामा ऑनलाईन । राज्य शासनाच्या भूमी अभिलेख विभागामार्फत (Talathi Bharti 2023) करण्यात येणाऱ्या तलाठी भरतीसाठी अपेक्षेपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. 4644 पदांसाठी आज अखेर 10 लाखांवर अर्ज प्राप्त झाले आहेत. दरम्यान अपेक्षेपेक्षा अधिक अर्ज आल्याने उमेदवारांना अर्ज करणे आणि परीक्षा शुल्क भरण्यासाठी एक दिवसाची मुदत वाढवून देण्यात आली आहे. तर तलाठी भरतीसाठी ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात लेखी परीक्षा होण्याची शक्यता आहे.

राज्यातील 36 जिल्ह्यांचे कामकाज महसूल विभागाकडून केले जाते. या विभागाअंतर्गत अगदी गावपातळीवर तलाठ्यांमार्फत सर्व कारभार सुरू असतो. सध्या राज्यात सुमारे चार हजारहून अधिक तलाठ्यांची पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे महसूलासंदर्भात गाव पातळीवर विविध प्रकारचे (Talathi Bharti 2023) कामकाज करणे अवघड होऊ लागले आहे. हा ताण कमी करण्यासाठी राज्य शासनाने रिक्त असलेली तलाठ्यांची पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान 4644 जागांसाठी शेवटच्या दिवसापर्यंत 10 लाखांवर अर्ज आल्याची माहिती भूमी अभिलेख विभागाचे अतिरिक्त आयुक्त आनंद रायते यांनी दिली आहे. तसेच अर्जदारांची संख्या वाढल्यामुळे (Talathi Bharti 2023) उमेदवारांना अर्ज करणे आणि परीक्षा शुल्क भरण्यासाठी एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे आता 18 जुलैपर्यंत रात्री 11:55 पर्यंत अर्ज करता येणार आहे.

12 वी आणि पदवीचे शिक्षण पूर्ण झालेले उमेदवार तलाठी भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. उमेदवारांची वयोमर्यादा मोजण्यासाठी दि. 17 जुलै 2023 हा दिनांक आहे. खुल्या (Talathi Bharti 2023) प्रवर्गातील उमेदवारांना 1 हजार रुपये, तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 900 रुपये परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे. उमेदवारांना  https://mahabhumi.gov.in/mahabhumilink या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. तसेच अधिक माहितीसाठी या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन भूमी अभिलेख विभागाकडून करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Law Colleges in Maharashtra : ‘लॉ’ करण्यासाठी प्रवेश घेत असाल तर सावधान!! ‘या’ लॉ कॉलेजेसना बार कौन्सिलची मान्यताच नाही

Law Colleges in Maharashtra

करिअरनामा ऑनलाईन । कायद्याचे शिक्षण घेण्याकडे (Law Colleges in Maharashtra) तरुण तरुणींचा कल वाढत चालला आहे. कायद्याचे शिक्षण घेवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना ही बातमी चकित करुन सोडेल. राज्यातील 243 विधी महाविद्यालयांना बार कौन्सिल ऑफ इंडियाची मान्यताच नसल्याचे वृत्त समोर आले आहे. मुंबईसह महाराष्ट्र राज्यात 316 महाविद्यालयांमध्ये विधी शिक्षण दिले जाते. परंतु 243 महाविद्यालयांना बार कौन्सिल ऑफ इंडिया यांची मान्यता किंवा परवानगी नुतनीकरण झाले नसल्याची बाब समोर आली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून अशा महाविद्यालयात प्रवेश बंद करण्याची मागणी केली आहे.

पहा यादी –
महाराष्ट्र राज्यातील मुंबई विद्यापीठ, टिळक विद्यापीठ, एसएनडीटी महिला विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अमरावती विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अशा विद्यापीठाच्या अंतर्गत 316 पैकी फक्त 71 महाविद्यालयांकडे बार कौन्सिल ऑफ इंडियाची परवानगी आहे. तर, दोन (Law Colleges in Maharashtra) महाविद्यालये बंद आहेत.
नामांकित असलेले गव्हर्नमेंट लॉ कॉलेज, जितेंद्र चौहान लॉ कॉलेज, केसी लॉ कॉलेज, पद्मश्री डीवाय पाटील लॉ कॉलेज, सिद्धार्थ लॉ कॉलेज, डॉ बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज, न्यू लॉ कॉलेज, रिझवी लॉ कॉलेज, एसएनडीटी लॉ कॉलेज, टिळक लॉ कॉलेज, मॉडर्न लॉ कॉलेज सिंबायोसिस लॉ कॉलेज, अंजुमन इस्लाम लॉ कॉलेज, बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेज या विधी महाविद्यालयांकडे परवानगी आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री तसेच उच्च व तंत्र शिक्षण सचिव यांस लेखी पत्र पाठवले आहे. बार कौन्सिल ऑफ इंडिया यांची (Law Colleges in Maharashtra) मान्यता नसलेल्या किंवा परवानगी नुतनीकरण नसल्यास त्या महाविद्यालयांना प्रवेश प्रक्रियेपासून मज्जाव करण्याची मागणी गलगली यांनी केली आहे. सध्या बार कौन्सिल ऑफ इंडिया यांची मान्यता नसलेल्या किंवा परवानगी नुतनीकरण (Permit Renewal) नसलेल्या विधी महाविद्यालयावर दंडात्मक कारवाई करत मान्यता रद्द करण्याची आवश्यकता असल्याचे गलगली यांनी नमूद केले आहे. मुख्य म्हणजे मुंबई विद्यापीठ किंवा अन्य विद्यापीठाने आपल्या कार्यक्षेत्रात असलेल्या सर्व विधी महाविद्यालयाची प्रत्येक शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी सर्व कागदपत्रे आणि (Law Colleges in Maharashtra) परवानगीची माहिती संकलित करण्याची गरज आहे. विशेष करुन बार कौन्सिल ऑफ इंडिया यांची मान्यता नसलेल्या किंवा परवानगी नुतनीकरण केल्याचे कागदपत्रे प्रत्येक महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित केल्यास विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीस सत्य परिस्थिती लक्षात येईल, असेही गलगली यांनी म्हटले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Talathi Bharti 2023 : तलाठी भरतीच्या अर्जासाठी मुदत वाढली; आज रात्री 11:55 पर्यंत करता येणार अर्ज

Talathi Bharti 2023 (12)

करिअरनामा ऑनलाईन । संपूर्ण राज्यात तलाठी पदभरतीसाठी (Talathi Bharti 2023) अर्ज प्रक्रिया सुरु असताना महाराष्ट्र शासनाची महसूल विभागाची वेबसाईट सोमवारी दिवसभर बंद राहिल्याने उमेदवारांना अर्ज भरता आला नाही. याबाबत झालेला गोंधळ समोर आल्यानंतर सोमवारी संध्याकाळी साडेपाच वाजता महसूल व वनविभागातर्फे भूमी अभिलेख विभागाचे अतिरिक्त संचालक आनंद रायते यांनी शुद्धीपत्रक काढून एका दिवसाची मुदतवाढ दिल्याचे जाहीर केले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत तलाठी (गट क) संवर्गातील एकूण 4644 पदांसाठी अर्ज करण्यासाठी सोमवार दि. 17 जुलै हा शेवटचा दिवस होता. उमेदवार अर्ज (Talathi Bharti 2023) करण्याच्या गडबडीत असताना सकाळी 11 वाजल्यापासूनच अधिकृत वेबसाईट बंद होती. अनेक उमेदवारांना अर्ज भरण्यात अडचण येत असल्याची माहिती मिळताच सोमवारी संध्याकाळी ई-महाभूमी (महसूल व वनविभाग) अतिरिक्त संचालक आनंद रायते यांनी यासंदर्भात मुदत वाढीबाबत शुद्धीपत्रक काढले.
त्यानुसार आता  दि. 18 जुलै 2023 रोजी रात्री  11:55 वाजेपर्यंत तलाठी भरतीच्या रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. तर ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षेचे शुल्क भरण्यासाठी दि. 20 जुलै रात्री 11:55 वाजेपर्यंत वेळ वाढवून देण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Jobs : 10वी पास ते ग्रॅज्युएटसाठी सरकारी नोकरी!! अर्थ व सांख्यिकी संचालनालयात तब्बल 260 पदांवर भरती

Government Jobs (50)

करिअरनामा ऑनलाईन । अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई अंतर्गत (Government Jobs) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब, सांख्यिकी सहाय्यक गट क, अन्वेषक गट क पदांच्या एकूण 260 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑगस्ट 2023 आहे.

संस्था – अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई
भरले जाणारे पद –
1. सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब – 39 पदे
2. सांख्यिकी सहाय्यक गट क – 94 पदे
3.अन्वेषक गट क – 127 पदे
पद संख्या – 260 पदे (Government Jobs)
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 ऑगस्ट 2023

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा –
खुला प्रवर्ग- 18 ते 38 वर्षे
राखीव प्रवर्ग- 18 ते 43 वर्षे
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब – Post Graduate Degree in Statistics / Biometrics / Math / Economics / Econometrics / Mathematical economics / Commerce.
2. सांख्यिकी सहाय्यक गट क – Post Graduate Degree in Math / Economics/ Commerce / Econometrics / Statistics.
3. अन्वेषक गट क – 10th Pass

मिळणारे वेतन – (Government Jobs)
1. सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब [एस-14 : 38600- 122800]
2. सांख्यिकी सहाय्यक गट ककार्यकर्ता [एस-10 : 29200- 92300]
3. अन्वेषक गट क [एस- 8 : 25500- 81100]
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज सादर करण्याच्या (Government Jobs) सविस्तर सूचना www.mahades.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
4. अर्ज दिलेल्या मुदती अगोदर खाली दिलेल्या लिंक वर सादर करावे.

पात्रता निकष –

काही महत्वाच्या लिंक्स – (Government Jobs)
अधिक महितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.mahades.maharashtra.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : चिप्सच्या पुड्यात कोणता वायू भरला जातो? वाचा मुलाखतीत धांदल उडवणारे प्रश्न

GK Updates 17 July

करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न 1 : ऑस्कर पारितोषिक मिळवणारी पहिली महिला कोण आहे?
उत्तर : भानु अथेय्य
प्रश्न 2 : भारताचे राष्ट्रीय वाक्य कोणते आहे?
उत्तर : ‘सत्यमेव जयते’
प्रश्न 3 : चिप्सच्या पुड्यात कोणता वायू भरला जातो?
उत्तर : नायट्रोजन (GK Updates)

प्रश्न 4 : भारतातील कोणत्या राज्याची राजभाषा इंग्रजी आहे?
उत्तर : नागालँड
प्रश्न 5 : जागतिक दहशतवाद विरोधी दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो?
उत्तर : 11 सप्टेंबर
प्रश्न 6 : (GK Updates) भारतातील पहिले इलेक्ट्रॉनिक शहर कोणते आहे?
उत्तर : बेंगलोर
प्रश्न 7 : शंभू महादेवाच्या डोंगर रांगा कोणत्या जिल्ह्यात आहेत?
उत्तर : सातारा
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NIELIT Recruitment 2023 : सरकारी नोकरी!! राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्थेत ‘या’ पदावर भरती 

NIELIT Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि (NIELIT Recruitment 2023) माहिती तंत्रज्ञान संस्था अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शास्त्रज्ञ ‘सी’, वैज्ञानिक ‘बी’, कार्यशाळा अधीक्षक, सहायक संचालक (प्रशासन), उप व्यवस्थापक (डेटाबेस), खाजगी सचिव, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (स्टोअर), वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (सिव्हिल), कार्मिक सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक (लेखा), कनिष्ठ सहाय्यक, ड्रायव्हर, इलेक्ट्रीशियन, ग्रंथालय सहाय्यक, मल्टी टास्किंग स्टाफ या पदांच्या एकूण 56 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑगस्ट 2023 आहे.

संस्था – राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था
भरली जाणारी पदे – शास्त्रज्ञ ‘सी’ 01 पदे
वैज्ञानिक ‘बी’ 01 पद
कार्यशाळा अधीक्षक 01 पद
सहायक संचालक (प्रशासन) 01 पद
उप व्यवस्थापक (डेटाबेस) 04 पदे
खाजगी सचिव 01 पद
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक 05 पदे
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (स्टोअर) 01 पद
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (सिव्हिल) 01 पद
कार्मिक सहाय्यक 13 पदे (NIELIT Recruitment 2023)
वरिष्ठ सहाय्यक 01 पद
वरिष्ठ सहाय्यक (लेखा) 12 पदे
कनिष्ठ सहाय्यक 02 पदे
ड्रायव्हर 07 पदे
इलेक्ट्रीशियन 02 पदे
ग्रंथालय सहाय्यक 02 पदे
मल्टी टास्किंग स्टाफ 01 पद
पद संख्या – 56 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 ऑगस्ट 2023

नोकरी करण्याचे ठिकाण – भारतात कुठेही
वय मर्यादा – 40 वर्षे
अर्ज फी – (NIELIT Recruitment 2023)
– लेव्हल – 10 आणि त्यावरील
SC/ST/PWD/महिला उमेदवार/माजी सैनिक – Rs. 400/-
सामान्य आणि इतर सर्व – Rs. 800/-
– लेव्हल-7 आणि त्याखालील
SC/ST/PWD/महिला उमेदवार/माजी सैनिक – Rs. 300/-
सामान्य आणि इतर सर्व – Rs. 600/-
निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा आणि मुलाखत
Application Fees –
NIELIT Bharti 2023

मिळणारे वेतन –
शास्त्रज्ञ ‘सी’ Level-11 in the Pay Matrix (Rs. 67700-208700)
वैज्ञानिक ‘बी’ Level-10 in the Pay Matrix (Rs. 56100-177500)
कार्यशाळा अधीक्षक Level-10 in the Pay Matrix (Rs. 56100-177500)
सहायक संचालक (प्रशासन) Level-10 in the Pay Matrix (Rs. 56100-177500)
उप व्यवस्थापक (डेटाबेस) Level-07 in the Pay Matrix (Rs. 44900- 142400)
खाजगी सचिव Level-07 in the Pay Matrix (Rs. 44900- 142400)
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक Level-06 in the Pay Matrix (Rs. 35400-112400)
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (स्टोअर) Level-06 in the Pay Matrix (Rs. 35400-112400)
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (सिव्हिल) Level-06 in the Pay Matrix (Rs. 35400-112400)
कार्मिक सहाय्यक Level-06 in the pay Matrix (Rs. 35400-112400)
वरिष्ठ सहाय्यक Level-06 in the pay Matrix (Rs. 35400-112400) (NIELIT Recruitment 2023)
वरिष्ठ सहाय्यक (लेखा) Level-06 in the pay Matrix (Rs. 35400-112400)
कनिष्ठ सहाय्यक Level -2 in the pay Matrix (Rs. 19900-63200)
ड्रायव्हर Level -2 in the pay Matrix (Rs. 19900-63200)
इलेक्ट्रीशियन Level -2 in the pay Matrix (Rs. 19900-63200)
ग्रंथालय सहाय्यक Level -2 in the pay Matrix (Rs. 19900-63200)
मल्टी टास्किंग स्टाफ Level-1 in the pay matrix (Rs. 18000- 56900)

आवश्यक कागदपत्रे –
1. जन्मतारीख प्रमाणपत्र (मॅट्रिक/हायस्कूल/एसएससी प्रमाणपत्र)
2. जात प्रमाणपत्र (SC/ST/OBC), लागू असल्यास.
3. EWS प्रमाणपत्र, लागू असल्यास. (NIELIT Recruitment 2023)
4. आवश्यक पात्रतेची पदवी जी त्याला गुणपत्रिकेसह पदासाठी अर्ज करण्यास पात्र बनवते
5. PWD प्रमाणपत्र, लागू असल्यास
6. फोटो ओळखपत्र
असा करा अर्ज –
1. उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खाली दिलेल्या लिंक वर सादर करावे.

निवड प्रक्रिया –
1. वैज्ञानिक ‘बी’ पदावर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांची अंतिम निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीत उमेदवारांच्या एकत्रित कामगिरीवर आधारित असेल.
2. निवडीसाठी मुलाखतीला उपस्थित राहणे अनिवार्य आहे. (NIELIT Recruitment 2023)
3. केवळ 1:3 च्या रेशनमधील गुणवत्ता स्थान आणि आरक्षण धोरण इत्यादींवर आधारित निवडलेल्या उमेदवारांना रिक्त पदांची संख्या: उमेदवारांची संख्या, जे लेखी परीक्षेत पात्र आहेत, त्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
4. लेखी परीक्षा आणि मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA भरला जाणार नाही.
भरतीचा तपशील –
NIELIT Bharti 2023
काही महत्वाच्या लिंक्स – (NIELIT Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.nielit.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Sub Divisional Magistrate : कसं व्हायचं उपजिल्हाधिकारी? कोणती परीक्षा द्यावी लागते? असतात ‘या’ जबाबदाऱ्या… मिळतात अनेक सुविधा

Sub Divisional Magistrate

करिअरनामा ऑनलाईन । भारतात कोणत्याही जिल्ह्यातील (Sub Divisional Magistrate) प्रशासकीय प्रमुख हा त्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी म्हणजेच Collector असतो. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखणे यासह महसूल, निवडणूक आणि जिल्ह्यातील विविध व्यवस्थापन करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे असते. याबरोबरच जिल्हा दंडाधिकारी म्हणूनही ते काम करतात.
DM पदाखालोखाल तेवढेच महत्त्वाचे आणि DM इतकेच महत्त्व आणि अधिकार असणारे पद Sub Divisional Magistrate म्हणजेच उप जिल्हा दंडाधिकारी हे आहे. एसडीएमला विभाग स्तरावरचे सर्व अधिकार असतात. DM आणि SDM ही दोन्ही पदे अत्यंत महत्त्वाची आणि जबाबदारीची असतात. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या प्रत्येक उपविभागात एक SDM असतो जो सर्व तहसीलदारांवर नियंत्रण ठेवतो.

असं होता येईल SDM –
SDM हा उच्च स्तरावरील अधिकारी असतो. त्याची नेमणूक स्पर्धापरीक्षांच्या माध्यमातून केली जाते. SDM अधिकाऱ्यांची भरती करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये MPSC म्हणजेच Maharashtra Public Service Comission ही परीक्षा घेते. या परीक्षेत SDM पदासोबत अजून बऱ्याच (Sub Divisional Magistrate) अधिकारी पदांची भरती केली जाते.
काय आहे पात्रता –
1. उपजिल्हाधिकारी होण्यास वयाची १८ वर्षे पूर्ण झालेली असणे आवश्यक असते.
2. MPSCच्या नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवार ही परीक्षा वयाच्या 18 ते 38 पर्यंत देऊ शकतात.
3. तर इतर उमेदवार वयाच्या 18 ते 43 व्या वर्षांपर्यत ही परीक्षा देऊ शकतात.
4. MPSCच्या नियमांनुसार राज्यसेवा परीक्षा देण्यासाठी काही मर्यादा घालून देण्यात आल्या आहेत.
5. सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना 6 वेळा, OBC व इतर प्रवर्गातील उमेदवारांना 9 वेळा तर, SC आणि ST प्रवर्गातील उमेदवारांना अमर्यादवेळा ही परीक्षा देता येते.

असं आहे परीक्षेचं स्वरुप – (Sub Divisional Magistrate)
SDM पदासाठी भरती केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) आणि राज्यांच्या लोकसेवा आयोगांद्वारे केली जाते. SDM बनण्यासाठीची परीक्षा तीन टप्यात पूर्ण होते. पुर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीनंतर उमेदवारांची SD पदासाठी नियुक्ती केली जाते. सोबतच PCS म्हणजेच Provincial Civil Service आयोजित परीक्षांच्या माध्यमातूनही या पदासाठी नियुक्ती केली जाऊ शकते.
SDM हे राज्य नागरी सेवा परीक्षेतील सर्वात मोठे पद आहे. या परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांची उपविभागीय दंडाधिकारी (SDM) पदावर नियुक्ती केली जाते तर आयएएस अधिकाऱ्याला त्याच्या संवर्गातील प्रशिक्षणादरम्यान किंवा नंतर एसडीएम पदावर प्रथम पोस्टिंग देखील मिळू शकते.
SDM पदावर कामाची कोणतीही निश्चित वेळ नसल्यामुळे अधिकाऱ्याला कर्तव्यासाठी सदैव तत्पर रहावे लागते. एसडीएमला त्यांच्या क्षेत्रातील प्रशासनाच्या बाबींमध्येही लक्ष घालावे लागते.

SDM अधिकाऱ्याला मिळतात या सुविधा –
उपजिल्हाधिकारी हे उच्च स्तरावरील पद असल्यामुळे सरकारकडून या व्यक्तीला काही सुविधा दिल्या जातात. SDM अधिकाऱ्याला साधारणपणे 56 हजार ते 77 हजारांपर्यंत वेतन दिले जाते. शिवाय या अधिकाऱ्याला नियमाप्रमाणे सोयी सुविधाही पुरवल्या जातात; ते पाहूया
– सरकारी निवास (Sub Divisional Magistrate)
– सुरक्षा कर्मचारी आणि घरगुती कामासाठी कर्मचारी
– सरकारी वाहने
– मोफत टेलिफोन कनेक्शन आणि वीज
– सरकारी दौऱ्यांदरम्यान निवास
– उच्च शिक्षणासाठी रजा
– सरकारी पेन्शन

SDM अधिकाऱ्याला पार पाडाव्या लागतात या प्रमुख जबाबदाऱ्या –
1. प्रशासकीय आणि न्यायिक कार्य
2. प्रादेशिक विवादांचे निराकरण
3. आपत्ती व्यवस्थापन
4. महसुली कामांमध्ये जमिनीच्या नोंदींची देखभाल करणे
5. महसूल बाबींचे आचरण
6. सीमांकन आणि अतिक्रमण हाताळणे (Sub Divisional Magistrate)
7. सार्वजनिक जमिनीचे संवर्धन, जमीन नोंदणी.
8. राज्यांमध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या सदस्यांच्या निवडणुका घेणे इ.
9. विवाह नोंदणी, OBC, SC/ST आणि जन्म व रहिवासी प्रमाणपत्र.
10. विविध प्रकारची नोंदणी, विविध प्रकारचे परवाने जारी करणे आणि नूतनीकरण करणे हे देखील SDM चे काम आहे.
11. फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ नुसार, अनेक किरकोळ कृत्यांतर्गत एसडीएम विविध न्यायिक कार्य करणे.
एसडीएम पदावर असलेले अधिकारी पदोन्नती मिळाल्यानंतर जिल्हा दंडाधिकारी आणि राज्य सरकारमध्ये सचिव होऊ शकतात. राज्य प्रशासकीय सेवेत एसडीएम हे पद अग्रक्रमावर आहे हे स्पष्ट करा. पदवी उत्तीर्ण झालेले उमेदवारच या पदासाठी सहभागी होऊ शकतात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com