Home Blog Page 280

Career Success Story : ‘तिने’ असं काय केलं म्हणून Google ने दिली एवढी मोठी ऑफर; पॅकेजचा आकडा ऐकून थक्क व्हाल!! 

Career Success Story Aaradhya Tripathi

करिअरनामा ऑनलाईन । तुम्हाला माहित आहे का? गुगल सारख्या (Career Success Story) कंपन्यांमध्ये किती पगार मिळतो? इथल्या पगाराचे आकडे आपल्या कल्पनेपलीकडील असतात. त्यामुळेच गुगलमध्ये नोकरी मिळवण्याचं आकर्षण अनेक तरुणांना असतं. एका तरुणीवर गूगलने अक्षरशः पैशाचा पाऊस पाडलाय. B. Tech मधून इंजिनिअरिंग केलेल्या उत्तर प्रदेशच्या आराध्या त्रिपाठीला गुगलकडून नोकरीची ऑफर मिळाली आहे. सध्या आराध्या त्रिपाठी ही तिच्या MMMUT युनिव्हर्सिटीमधली सगळ्यात जास्त पॅकेज घेणारी विद्यार्थिनी ठरली आहे. ती सध्या खूप चर्चेत आहे. आराध्याला गुगलमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनिअर म्हणून प्लेसमेंट मिळाली आहे. तुम्ही अंदाजही लावू शकणार नाही एवढं विक्रमी पॅकेज गूगलने आराध्याला ऑफर केलं आहे.

सर्वाधिक पॅकेज घेणारी विद्यार्थिनी
आराध्या त्रिपाठी ही मदन मोहन मालवीया युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीची विद्यार्थिनी आहे. आराध्या त्रिपाठीला गुगलकडून नोकरीची ऑफर आली आहे. तिला अमेरिकन (Career Success Story) टेक जायंटकडून 52 लाख रुपयांचे पॅकेज मिळाले आहे. आराध्या त्रिपाठी ने MMMUT मधून Computer Engineering मध्ये B. Tech केलंय. तिला मिळालेले पॅकेज हे MMMUT मध्ये मिळालेले आत्तापर्यंतचे सर्वाधिक पॅकेज आहे. आराध्याला गुगलमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनिअर म्हणून प्लेसमेंट मिळाली आहे.

वडील वकील तर आई गृहिणी (Career Success Story)
आराध्या त्रिपाठी ही उत्तर प्रदेशची रहिवासी आहे. तिचे वडील अंजनी नंदन त्रिपाठी हे गोरखपूरच्या सिव्हिल कोर्टात वकील आहेत, तर आई गृहिणी आहे. आराध्या त्रिपाठी लहानपणापासूनच अभ्यासात हुशार आहे. शालेय शिक्षणानंतर आराध्या त्रिपाठी MMMUT मध्ये B. Tech करण्यासाठी गेली आणि तिथूनच तिच्या आयुष्याला टर्निंग पॉईंट मिळाला.

आधी मिळालं होतं 32 लाखाचं पॅकेज
आराध्या त्रिपाठीने स्केलर अकॅडमी मधून इंटर्नशिप (Career Success Story) केली आहे. या इंटर्नशिप नंतर तिला स्केलरकडून 32 लाख रुपयांचे पॅकेज ऑफर करण्यात आले होते. पण आता तिला गुगलकडून चांगली ऑफर मिळाली असल्यामुळे तिने स्केलरची ऑफर नाकारली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Teachers Recruitment : शिक्षकांची प्रतिक्षा संपली!! रखडलेल्या भरतीला मिळाला मुहूर्त; पहा किती शिक्षकांना मिळणार नोकरी

Teachers Recruitment (1)

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील रखडलेल्या शिक्षक भरतीला (Teachers Recruitment) पुन्हा एकदा मुहूर्त मिळाला आहे. राज्यात २०१८ मध्ये पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती सुरु झाली होती. या माध्यमातून १९६ संस्थांतील ७६३ रिक्त पदांसाठी मुलाखतीस पात्र असणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून, संबंधित उमेदवारांची मुलाखत आणि अध्यापन कौशल्य चाचणी शिक्षण संस्थांकडून दि. १८ जुलै ते ११ ऑगस्ट या कालावधीत होणार आहे; अशी माहिती शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली आहे.

२०१८मध्ये पवित्र पोर्टलमार्फत १२ हजार पदांसाठी शिक्षक भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. सुरुवातीला यामध्ये सहा ते सात हजार पदांची भरती करण्यात आली. मात्र तांत्रिक अडचणींमुळे पुढे ही प्रक्रिया रखडली. आता पुन्हा ३० हजार रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्याची घोषणा (Teachers Recruitment) शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. त्याबरोबरच रखडलेल्या भरती प्रक्रियेतील १९६ संस्थांतील ७६३ रिक्त पदांसाठीही भरती प्रक्रिया होणार आहे.

मुलाखतीसह पदभरतीमध्ये सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) प्रवर्गासाठी जागा असणाऱ्या संस्थांपैकी ज्या संस्थांच्या जाहिरातीमध्ये खुल्या (समांतर आरक्षणाशिवाय) प्रवर्गासाठी जागा नाहीत अशा उर्वरित १९६ संस्थांसाठी एसईबीसी प्रवर्गासाठीच्या जागा योग्य त्या प्रवर्गामध्ये घेऊन पात्र उमेदवाराकडून नव्याने प्राधान्यक्रम घेण्यात आलेले आहेत. त्यात ६ वी ते १२ वी या गटातील रिक्त पदांसाठी कार्यवाही (Teachers Recruitment) करण्यात येत आहे. या संस्थांना मुलाखत आणि अध्यापन कौशल्यासाठी या पूर्वीच्या तरतुदीनुसार एका जागेसाठी दहा उमेदवार उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.
त्यासाठी ७६३ पदांवर निवडीसाठी एकूण ५ हजार ५३५ प्राधान्यक्रमावर उमेदवारांची शिफारस झाली आहे. मुलाखतीसाठी शिफारस केलेला गट, विषय आणि आरक्षण विचारात घेऊन संस्थांकडून निवड केली जाईल. मुलाखत आणि अध्यापन कौशल्यातून निवड होऊन शाळेत रुजू होणाऱ्या उमेदवारांना शालार्थ प्रणालीमार्फत वेतन सुरू होणार असल्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी सांगितले.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : माऊंट एव्हरेस्ट कोणत्या देशात आहे? प्रश्न वाटतात साधे पण ऐनवेळी उडतो गोंधळ; एकदा पहाच

GK Updates 16 Jul

करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न 1 : जगातला सर्वात जास्त तंबाखूचे उत्पादन करणारा देश कोणता आहे?
उत्तर : चीन
प्रश्न 2 : दुधाची शुद्धता कोणत्या यंत्राद्वारे चेक केली जाते?
उत्तर : लैकटोमीटर (GK Updates)
प्रश्न 3 : महात्मा गांधी यांना सर्वप्रथम राष्ट्रपीता ही पदवी कोणी दिली आहे?
उत्तर : सुभाषचंद्र बोस

प्रश्न 4 : माऊंट एव्हरेस्ट कोणत्या देशामध्ये आहे?
उत्तर : नेपाळ (GK Updates)
प्रश्न 5 : वाघ भारताव्यतिरिक्त कोणत्या देशाचा राष्ट्रीय पशु आहे?
उत्तर : अमेरिका
प्रश्न 6 : (GK Updates) भारताची पहिली महिला शासिका कोण होती?
उत्तर : रजीया सुलतान
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Jobs : देशसेवेची मोठी संधी!! ब्रिगेड ऑफ द गार्ड्स रेजिमेंटल सेंटरमध्ये भरतीची संधी; पात्रता फक्त 10 वी पास

Government Jobs (49)

करिअरनामा ऑनलाईन । ब्रिगेड ऑफ द गार्ड्स रेजिमेंटल सेंटर, कामठी (Government Jobs) येथे विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत. या माध्यमातून ऑफिस सुपरवायझर, ऑफिस मॅनेजर, असिस्टंट सीएडी मॅनेजर पदांच्या एकूण 3 रिक्त जागा भरल्या जातील. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 ऑगस्ट 2023 आहे.

संस्था – ब्रिगेड ऑफ द गार्ड्स रेजिमेंटल सेंटर, कामठी
भरले जाणारे पद –
1. ऑफिस सुपरवायझर
2. ऑफिस मॅनेजर (Government Jobs)
3. असिस्टंट सीएडी मॅनेजर
पद संख्या – 03 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 ऑगस्ट 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Adm Bn Cdr, GRC, Kamptee PIN-900 746, C/o 56 APO

नोकरी करण्याचे ठिकाण – कामठी जि. नागपूर
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. ऑफिस सुपरवायझर –
10+2 pass or above with adequate managerial, accounting and documentation related skills along with knowledge of operating MS-Office and generic Computer operations
2. ऑफिस मॅनेजर – 10+2 pass or above with adequate managerial, accounting and documentation related skills along with knowledge of operating MS-Office and generic Computer operations
3. असिस्टंट सीएडी मॅनेजर – Preferably 12th/ graduate with basic computer knowledge, experience in handling stores and interpersonal skills. Preference for Ex-Serviceman with prior experience of handling CSD

मिळणारे वेतन –
1. ऑफिस सुपरवायझर 15,000/- रुपये दरमहा
2. ऑफिस मॅनेजर 15,000/- रुपये दरमहा (Government Jobs)
3. असिस्टंट सीएडी मॅनेजर 18,000/- रुपये दरमहा
असा करा अर्ज –
1. उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जासोबत संबंधित प्रमाणपत्र/ कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडणे आवश्यक आहे.
3. अपूर्ण अर्ज फेटाळले जातील.

भरतीचा तपशील – (Government Jobs)

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GCE Karad Recruitment 2023 : प्राध्यापकांसाठी खुषखबर!! राज्यातील ‘या’ गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये मिळणार नवीन उमेदवारांना संधी 

GCE Karad Recruitment 2023 (2)

करिअरनामा ऑनलाईन । शासकीय अभियांत्रिकी (GCE Karad Recruitment 2023) महाविद्यालय, कराड अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रॅक्टिस/अ‍ॅडजंक्ट फॅकल्टीचे प्राध्यापक पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2023 आहे.

संस्था – शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कराड
भरले जाणारे पद –
1. प्रॅक्टिस
2. अ‍ॅडजंक्ट फॅकल्टीचे प्राध्यापक
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जुलै 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – कराड, जि. सातारा

असा करा अर्ज – (GCE Karad Recruitment 2023)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2023 आहे.
3. उमेदवारांनी केवळ खाली दिलेल्या लिंकद्वारे ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
4. अर्ज सादर करण्याच्या (GCE Karad Recruitment 2023) सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

काही महत्वाच्या लिंक्स – (GCE Karad Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पह – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – gcekarad.ac.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IIT Brand Management Course : चक्क फ्री कोर्स… तोही IIT मधून!! आता घरबसल्या शिका ‘ब्रँड मॅनेजमेंट’; मिळवा लाखोंमध्ये पगार

IIT Brand Management Course

करिअरनामा ऑनलाईन । IITमधील करिअर  हे तगड्या पगाराचे (IIT Brand Management Course) आणि उच्च मागणी असलेले करिअर मानले जाते. IIT सारख्या संस्थांमधून पदवी घेणं खूप महाग आहे, परंतु आज आम्ही तुम्हाला असा एक पर्याय सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही घरबसल्या IIT मधून ‘ब्रँड मॅनेजमेंट फ्री ऑनलाईन कोर्स’ करू शकता.
जर तुम्ही मार्केटिंग प्रोफेशनल किंवा मास कम्युनिकेशन आणि पत्रकारितेचे विद्यार्थी असाल आणि तुम्हाला जाहिरात, जनसंपर्क आणि ब्रँडिंगमध्ये करिअर करायचे असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ब्रँड मॅनेजमेंट हे आजच्या व्यावसायिक जगामध्ये लाखोंमध्ये पगार असलेले आणि उच्च मागणी असलेले करिअर मानले जाते.

साधारणपणे, जर एखाद्या उमेदवाराकडे ब्रँड मॅनेजमेंटमध्ये रिक्त पदासाठी IITसारख्या नामांकित संस्थेचे प्रमाणपत्र असेल तर त्याची निवड होण्याची शक्यता वाढते. जरी IIT आणि IIT सारख्या संस्थांमधून पदवी खूप महाग असली तरी  आज आम्ही तुम्हाला असा एक पर्याय सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही घरबसल्या IIT मधून ‘ब्रँड मॅनेजमेंट फ्री ऑनलाइन कोर्स’ करू शकता.

IIT रुड़की येथून करता येईल मोफत ऑनलाईन कोर्स (IIT Brand Management Course)
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) रुड़की कडून मोफत ब्रँड मॅनेजमेंट ऑनलाईन Couse चा पर्याय देखील उपलब्ध आहे. IIT रुड़कीद्वारे ‘उत्पादन आणि ब्रँड मॅनेजमेंट’ या विषयावर 12 आठवड्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम आयोजित केला जातो. कोणताही अंडर-ग्रॅज्युएट किंवा (IIT Brand Management Course) पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थी किंवा कार्यरत व्यावसायिक हा कोर्स करू शकतो. आयआयटी रुड़कीच्या उत्पादन आणि ब्रँड मॅनेजमेंटच्या मोफत ऑनलाइन कोर्ससाठी ऑनलाइन लेक्चर व्हिडिओ केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या स्वयम पोर्टलद्वारे आयोजित केले जातील.

ही परीक्षा द्यावी लागेल
अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर, जर तुम्हाला प्रमाणपत्र मिळवायचे असेल, तर तुम्हाला एक परीक्षा द्यावी लागेल ज्यासाठी 1000 रुपये शुल्क निश्चित केले आहे. किमान 40% गुण मिळविणाऱ्या उमेदवारांना NPTEL आणि IIT रुड़कीच्या लोगोसह ई-प्रमाणपत्र जारी केले जाईल.

31 जुलैपर्यंत करू शकता नोंदणी
IIT रुड़कीच्या ब्रँड मॅनेजमेंट मोफत ऑनलाईन कोर्ससाठी नोंदणी एनपीटीईएलच्या ऑनलाइन कोर्सेस पोर्टल, onlinecourses.nptel.ac.in वर करावी लागेल. यासाठी 31 जुलैपर्यंत नोंदणी करता येईल. तथापी हा अभ्यासक्रम 24 जुलैपासून सुरु होईल आणि 13 ऑक्टोबर 2023 पर्यंत (IIT Brand Management Course) चालेल. दरम्यान, प्रमाणपत्र मिळविण्यासाठी 18 ऑगस्टपर्यंत परीक्षेची नोंदणी करावी लागणार असून परीक्षा 29 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Nagar Parishad Recruitment 2023 : ग्रॅज्युएट/इंजिनियर्ससाठी मोठी अपडेट!! राज्याच्या नगर परिषदांमध्ये निघाली भरतीची जाहिरात; 1782 पदे रिक्त

Nagar Parishad Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । राज्य शासनाच्या नगरपरिषद (Nagar Parishad Recruitment 2023) प्रशासन संचालनालय अधिनस्त महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा मधील खालील संवर्गातील रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून गट-क (श्रेणी अ, ब आणि क ) मधील तब्बल 1782 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2023 आहे.

संस्था – राज्य शासन नगरपरिषद प्रशासन संचालनालय अधिनस्त महाराष्ट्र नगरपरिषद
भरले जाणारे पद – गट-क (श्रेणी अ, ब आणि क )
पद संख्या –
1. स्थापत्य अभियंता – 397 पदे
2. विद्युत अभियंता – 48 पदे
3. संगणक अभियंता – 45 पदे
4. मलनिस्सारण व स्वच्छता अभियंता – 65 पदे
5. लेखापाल/ लेखापरीक्षक – 247 पदे
6. कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी – 579 पदे
7. अग्निशमन अधिकारी – 372 पदे
8. स्वच्छता निरीक्षक – 35 पदे (Nagar Parishad Recruitment 2023)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑगस्ट 2023
HelpDesk – 919513252077

काही महत्वाच्या तारखा –

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. स्थापत्य अभियंता –
1. मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदवीधारक
2. एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण
3. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक.
2. विद्युत अभियंता – (Nagar Parishad Recruitment 2023)
1. मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून विद्युत अभियांत्रिकी शाखेतील पदवीधारक
2. एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण
3. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक.
3. संगणक अभियंता –
1. मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून संगणक अभियांत्रिकी शाखेतील पदवीधारक
2. एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण
3. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक.

4. मलनिस्सारण व स्वच्छता अभियंता –
1. मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून मलनिस्सारण व स्वच्छता अभियंता अभियांत्रिकी शाखेतील पदवीधारक
2. एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण
3. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक.
5. लेखापाल/ लेखापरीक्षक –
1. मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून वाणिज्य सारण ट-क शाखेतील पदवीधारक
2. एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण
3. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक
6. कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी –
1. मान्यताप्राप्त पदवीधारक
2. एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण

7. अग्निशमन अधिकारी –
1. मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून कोणत्याही शाखेचा पदवीधारक
2. अग्निशमन केंद्र अधिकारी आणि प्रशिक्षक पाठ्यक्रम केंद्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूरमधून उत्तीर्ण
3. एम. एस. सी. आय. टी. परीक्षा किंवा (Nagar Parishad Recruitment 2023) समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण
4. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक.
8. स्वच्छता निरीक्षक –
1. मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक
2. मान्यताप्राप्त संस्थेकडील स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण असलेला
3. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक

भरतीचा तपशील – (Nagar Parishad Recruitment 2023)

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण (Nagar Parishad Recruitment 2023) असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खाली दिलेल्या लिंकवरून सादर करावेत.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.mahadma.maharashtra.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CUET Result 2023 : CUETचा निकाल जाहीर; इथे पहा निकाल

CUET Result 2023

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय विद्यापीठ सामाईक (CUET Result 2023) प्रवेश परीक्षा म्हणजेच CUETचा निकाल शनिवारी जाहीर झाला आहे. त्यामुळे केंद्रीय विद्यापीठांसह सहभागी शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) आपल्या वेबसाईटवर हा निकाल जाहीर केला आहे. परीक्षेचा निकाल cuet.samarth.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल, अशी माहिती विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष एम. जगदीश कुमार यांनी त्यांच्या ट्विटर हॅन्डल वरुन दिली आहे.

केंद्रीय, राज्य, अभिमत आणि इतर सहभागी खाजगी विद्यापीठे, स्वायत्त (CUET Result 2023) संस्थांच्या विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावरील सीयुईटी प्रवेश परीक्षा घेतली जाते. गेल्या वर्षी म्हणजे 2022 पासून याची सुरवात करण्यात आली होती.
यावर्षी परीक्षेला सुमारे 14 लाख 90 हजार उमेदवारांनी (CUET Result 2023) नोंदणी केली होती, तर 13 लाख उमेदवारांनी परीक्षा दिली होती. उमेदवारांसाठी 29 जून ते 1 जुलै या कालावधीत उत्तरतालीका प्रसिद्ध करण्यात आली होती. यावेळी सुमारे 25 हजार 782 आव्हाने प्राप्त झाली होती. एनटीएने काही दिवसांसाठी दररोज रात्री सुधारित तात्पुरती उत्तरे प्रसिध्द केली होती. त्यानंतर हा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Prasar Bharati Recruitment 2023 : डिप्लोमा/ग्रॅज्युएट्सना प्रसार भारतीमध्ये नोकरीची संधी!! दरमहा 75 हजार पगार

Prasar Bharati Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । प्रसार भारती येथे रिक्त पदाच्या (Prasar Bharati Recruitment 2023) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कॅमेरा कंट्रोल युनिट ऑपरेटर पदांच्या 4 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2023 आहे.

संस्था – प्रसार भारती
भरले जाणारे पद – कॅमेरा कंट्रोल युनिट ऑपरेटर
पद संख्या – 4 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन (Prasar Bharati Recruitment 2023)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जुलै 2023

नोकरी करण्याचे ठिकाण – दिल्ली
वय मर्यादा – 40 वर्षे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – Diploma, Graduation from any of the recognized boards or Universities.
मिळणारे वेतन – Rs. 70,000/- दरमहा
असा करा अर्ज – (Prasar Bharati Recruitment 2023)
1. उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.prasarbharati.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
4. अर्ज दिलेल्या मुदती अगोदर खाली दिलेल्या लिंक वर सादर करावे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – prasarbharati.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Anganwadi Bharti 2023 : राज्याच्या ‘या’ जिल्ह्यात अंगणवाडी मदतनीस भरती!! शिक्षण फक्त 12 वी पास

Anganwadi Bharti 2023 (5)

करिअरनामा ऑनलाईन । एकात्मिक बाल विकास सेवा योजना केंद्र (Anganwadi Bharti 2023) पुरस्कृत योजने अंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी पालघर (नागरी) जि. पालघर या कार्यालयातील अंगणवाडी मदतनीस यांची रिक्त पदे सरळ नियुक्तीने भरण्याकरिता पालघर जिल्हयातील (मोखाडा, वाडा, विक्रमगड, तलासरी या तालुक्यातील) स्थानिक रहिवाशी असलेल्या महिला उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी इच्छुक महिला उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर  ऑफलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2023 आहे.

प्रकल्प – एकात्मिक बाल विकास सेवा योजना केंद्र पुरस्कृत योजना
भरले जाणारे पद – अंगणवाडी मदतनीस
पद संख्या – 08 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जुलै 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार महिला 12 वी पास असणे आवश्यक आहे.

नोकरी करण्याचे ठिकाण – पालघर
वय मर्यादा – (Anganwadi Bharti 2023)
1. किमान 18 वर्षे
2. कमाल 35 वर्षे
3. विधवा उमेदवारांसाठी वय मर्यादा कमाल 40 वर्षे राहील.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – C/o जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बाल विकास दालन क्र.005, नवीन जिल्हा परिषद इमारत, कोळगाव, तळमजला, ता. पालघर, जिल्हा – पालघर
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जासोबत जन्मतारखेचा पुरावा, शैक्षणिक पात्रतेचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र (स्वतःचे नावाचे), अनुभव प्रमाणपत्र, विधवा ( अटी व शर्तीमधील क्र. ६ नुसार दाखला) अनाथ महिला असल्यास (अटी व शर्तीमधील क्र. ७ नुसार दाखला) इ.च्या सक्षम प्राधिका-याकडून साक्षांकित (Anganwadi Bharti 2023) केलेल्या प्रती जोडणे आवश्यक आहे, जोडले नसल्यास अगर साक्षांकित नसल्यास याबाबतचे गुण दिले जाणार नाहीत.
3. उमेदवारांनी अर्ज मुदतीच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
4. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

भरतीचा तपशील –

काही महत्वाच्या लिंक्स – (Anganwadi Bharti 2023
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – palghar.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com