IIT Brand Management Course : चक्क फ्री कोर्स… तोही IIT मधून!! आता घरबसल्या शिका ‘ब्रँड मॅनेजमेंट’; मिळवा लाखोंमध्ये पगार

करिअरनामा ऑनलाईन । IITमधील करिअर  हे तगड्या पगाराचे (IIT Brand Management Course) आणि उच्च मागणी असलेले करिअर मानले जाते. IIT सारख्या संस्थांमधून पदवी घेणं खूप महाग आहे, परंतु आज आम्ही तुम्हाला असा एक पर्याय सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही घरबसल्या IIT मधून ‘ब्रँड मॅनेजमेंट फ्री ऑनलाईन कोर्स’ करू शकता.
जर तुम्ही मार्केटिंग प्रोफेशनल किंवा मास कम्युनिकेशन आणि पत्रकारितेचे विद्यार्थी असाल आणि तुम्हाला जाहिरात, जनसंपर्क आणि ब्रँडिंगमध्ये करिअर करायचे असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ब्रँड मॅनेजमेंट हे आजच्या व्यावसायिक जगामध्ये लाखोंमध्ये पगार असलेले आणि उच्च मागणी असलेले करिअर मानले जाते.

साधारणपणे, जर एखाद्या उमेदवाराकडे ब्रँड मॅनेजमेंटमध्ये रिक्त पदासाठी IITसारख्या नामांकित संस्थेचे प्रमाणपत्र असेल तर त्याची निवड होण्याची शक्यता वाढते. जरी IIT आणि IIT सारख्या संस्थांमधून पदवी खूप महाग असली तरी  आज आम्ही तुम्हाला असा एक पर्याय सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही घरबसल्या IIT मधून ‘ब्रँड मॅनेजमेंट फ्री ऑनलाइन कोर्स’ करू शकता.

IIT रुड़की येथून करता येईल मोफत ऑनलाईन कोर्स (IIT Brand Management Course)
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) रुड़की कडून मोफत ब्रँड मॅनेजमेंट ऑनलाईन Couse चा पर्याय देखील उपलब्ध आहे. IIT रुड़कीद्वारे ‘उत्पादन आणि ब्रँड मॅनेजमेंट’ या विषयावर 12 आठवड्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम आयोजित केला जातो. कोणताही अंडर-ग्रॅज्युएट किंवा (IIT Brand Management Course) पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थी किंवा कार्यरत व्यावसायिक हा कोर्स करू शकतो. आयआयटी रुड़कीच्या उत्पादन आणि ब्रँड मॅनेजमेंटच्या मोफत ऑनलाइन कोर्ससाठी ऑनलाइन लेक्चर व्हिडिओ केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या स्वयम पोर्टलद्वारे आयोजित केले जातील.

ही परीक्षा द्यावी लागेल
अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर, जर तुम्हाला प्रमाणपत्र मिळवायचे असेल, तर तुम्हाला एक परीक्षा द्यावी लागेल ज्यासाठी 1000 रुपये शुल्क निश्चित केले आहे. किमान 40% गुण मिळविणाऱ्या उमेदवारांना NPTEL आणि IIT रुड़कीच्या लोगोसह ई-प्रमाणपत्र जारी केले जाईल.

31 जुलैपर्यंत करू शकता नोंदणी
IIT रुड़कीच्या ब्रँड मॅनेजमेंट मोफत ऑनलाईन कोर्ससाठी नोंदणी एनपीटीईएलच्या ऑनलाइन कोर्सेस पोर्टल, onlinecourses.nptel.ac.in वर करावी लागेल. यासाठी 31 जुलैपर्यंत नोंदणी करता येईल. तथापी हा अभ्यासक्रम 24 जुलैपासून सुरु होईल आणि 13 ऑक्टोबर 2023 पर्यंत (IIT Brand Management Course) चालेल. दरम्यान, प्रमाणपत्र मिळविण्यासाठी 18 ऑगस्टपर्यंत परीक्षेची नोंदणी करावी लागणार असून परीक्षा 29 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com