Talathi Bharti 2023 : तलाठी भरतीसाठी रेकॉर्ड ब्रेक अर्ज दाखल; 4644 पदांसाठी 10 लाख अर्ज; ‘या’ महिन्यात होणार परीक्षा

करिअरनामा ऑनलाईन । राज्य शासनाच्या भूमी अभिलेख विभागामार्फत (Talathi Bharti 2023) करण्यात येणाऱ्या तलाठी भरतीसाठी अपेक्षेपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. 4644 पदांसाठी आज अखेर 10 लाखांवर अर्ज प्राप्त झाले आहेत. दरम्यान अपेक्षेपेक्षा अधिक अर्ज आल्याने उमेदवारांना अर्ज करणे आणि परीक्षा शुल्क भरण्यासाठी एक दिवसाची मुदत वाढवून देण्यात आली आहे. तर तलाठी भरतीसाठी ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात लेखी परीक्षा होण्याची शक्यता आहे.

राज्यातील 36 जिल्ह्यांचे कामकाज महसूल विभागाकडून केले जाते. या विभागाअंतर्गत अगदी गावपातळीवर तलाठ्यांमार्फत सर्व कारभार सुरू असतो. सध्या राज्यात सुमारे चार हजारहून अधिक तलाठ्यांची पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे महसूलासंदर्भात गाव पातळीवर विविध प्रकारचे (Talathi Bharti 2023) कामकाज करणे अवघड होऊ लागले आहे. हा ताण कमी करण्यासाठी राज्य शासनाने रिक्त असलेली तलाठ्यांची पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान 4644 जागांसाठी शेवटच्या दिवसापर्यंत 10 लाखांवर अर्ज आल्याची माहिती भूमी अभिलेख विभागाचे अतिरिक्त आयुक्त आनंद रायते यांनी दिली आहे. तसेच अर्जदारांची संख्या वाढल्यामुळे (Talathi Bharti 2023) उमेदवारांना अर्ज करणे आणि परीक्षा शुल्क भरण्यासाठी एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे आता 18 जुलैपर्यंत रात्री 11:55 पर्यंत अर्ज करता येणार आहे.

12 वी आणि पदवीचे शिक्षण पूर्ण झालेले उमेदवार तलाठी भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. उमेदवारांची वयोमर्यादा मोजण्यासाठी दि. 17 जुलै 2023 हा दिनांक आहे. खुल्या (Talathi Bharti 2023) प्रवर्गातील उमेदवारांना 1 हजार रुपये, तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 900 रुपये परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे. उमेदवारांना  https://mahabhumi.gov.in/mahabhumilink या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. तसेच अधिक माहितीसाठी या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन भूमी अभिलेख विभागाकडून करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com