Home Blog Page 278

Anganwadi Bharti 2023 : महिलांसाठी खुषखबर!! सातारा, कराड येथे अंगणवाडी मदतनीस भरती सुरु

Anganwadi Bharti 2023 (6)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र शासन, महिला व बाल विकास (Anganwadi Bharti 2023) विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) सातारा पूर्व या प्रकल्पांतर्गत रिक्त असलेली मिनी अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 52 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 ऑगस्ट 2023 आहे.

संस्था – महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासन
(एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत बाल विकास प्रकल्प)
भरले जाणारे पद –
(Anganwadi Bharti 2023)
1. मिनी अंगणवाडी सेविका – 1 पद
2. अंगणवाडी मदतनीस – 51 पदे
पद संख्या – 52 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 ऑगस्ट 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय (नागरी) सातारा पूर्व, नूतन मराठी शाळेसमोर, मंगळवार पेठ, ता. कराड, जि. सातारा, पिन – 415110

नोकरी करण्याचे ठिकाण – कराड, सातारा
वय मर्यादा –
1. किमान – 18 वर्षे
2. कमाल – 35 वर्षे
3. विधवा उमेदवारांसाठी कमाल – 40 वर्षे
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
उमेदवार महिला इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
मिळणारे वेतन –
1. मिनी अंगणवाडी सेविका – रुपये 7,200/- दरमहा
2. अंगणवाडी मदतनीस – 5,500/- दरमहा

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. जाहिरातीमध्ये दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज करावा. (अर्जात खाडाखोड / गिरवागिरव करू नये. तसेच व्हाईटनरचा उपयोग करु नये. असे अर्ज रद्द करण्यात येतील.)
3. अर्ज सादर करतेवेळी सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावी. अर्ज सादर केलेनंतर कोणतेही कागदपत्र / प्रमाणपत्र घेतले जाणार नाही. (Anganwadi Bharti 2023)
4. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी. अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांच्या प्रती सक्षम प्राधिकाऱ्याने साक्षांकीत केलेल्या असाव्यात.
5. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
6. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
भरतीचा तपशील –

काही महत्वाच्या लिंक्स – (Anganwadi Bharti 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 
अधिकृत वेबसाईट – www.satara.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Krushnu Nandi : ‘चांद्रयान 3’ मोहिमेत शेतकऱ्याच्या मुलाचाही सहभाग; ISROमध्ये बसून ठेवतोय यानावर लक्ष

Krushnu Nandi

करिअरनामा ऑनलाईन । भारताने नुकतीच चंद्रावरची तिसरी (Krushnu Nandi) मोहीम सुरु केली आहे. बांकुरातल्या पत्रसैर येथील  कृष्णू नंदी हा तरुण या मोहिमेत सहभागी आहे. लहानपणापासूनच कृष्णू यांनी इंजिनीअर होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा चांद्रयान-3 मोहिमेत सहभागी आहे ही बाब निश्चितच अभिमानास्पद आहे. चिकाटीने अभ्यास करुन या तरुणाने हे यश मिळवलं आहे.

Krushnu Nandi

दुर्गम भागातील शेतकरी कुटुंबातला मुलगा 
कृष्णू लहानपणापासूनच अभ्यासात हुशार. सामान्य शेतकरी कुटुंबातला मुलगा केवळ दुर्दम्य इच्छाशक्ती आणि चिकाटीच्या जोरावर आपले स्वप्न साकार (Krushnu Nandi) करू शकतो; हे कृष्णू यांनी सिध्द केले आहे. पश्चिम बंगालच्या बांकुरा जिल्ह्यातल्या पत्रसैर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील डन्ना हे कृष्णू यांचं गांव. ते सध्या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (इस्रो) शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत.

Krushnu Nandi

चांद्रयान-3 मोहिमेत काम करण्याची संधी
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचं एक पथक चंद्राच्या दिशेने चाललेल्या मून रोव्हरचे विविध तपशील आणि हालचालींवर लक्ष ठेवत आहे. कृष्णू नंदी यांचाही या पथकात समावेश आहे. मात्र सुमारे तीन वर्षांपूर्वी कृष्णू चांद्रयान 2 प्रकल्पात नव्हते.
दुर्दैवाने ती मोहीम अयशस्वी ठरली होती. मात्र आता कृष्णू यांना चांद्रयान-3 प्रकल्पात काम करण्याची संधी मिळाली आहे.

Krushnu Nandi

बांकुराची शान..कृष्णू (Krushnu Nandi)
पत्रसैरमधल्या बमीरा गुरुदास विद्यालयातून माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर, कृष्णू यांनी चटना इथल्या कमालपूर नेताजी हायस्कूलमधून विज्ञान विषयात उच्च माध्यमिक शिक्षण घेतलं. कोलकत्ता येथील आरसीसी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमधून त्यांनी बीटेक केलं. त्यानंतर जादवपूर (Krushnu Nandi) विद्यापीठातून एमटेक पूर्ण केलं. परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर कृष्णू यांना इस्रोमध्ये नोकरी मिळाली. बांकुराची शान असलेल्या कृष्णू नंदी यांचे वडील तारापाद नंदी म्हणाले की; “कृष्णू लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होता. इंजिनीअर होण्याचं त्याचं स्वप्न होतं. चांद्रयान -3 मोहिमेत त्याचा सहभाग असल्याचा आम्हाला अभिमान आहे.”
आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी (Krushnu Nandi) केलेले कठोर परिश्रम हे कृष्णू यांच्या यशाचं गमक आहे. या गुणांच्या जोरावर त्यांनी जीवनात मोठं यश मिळवलं आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CSIR NET Result 2023 : ‘या’ तारखेला जाहीर होणार CSIR UG NETचा निकाल; इथे आहे निकालाची लिंक

CSIR NET Result 2023

करिअरनामा ऑनलाईन । CSIR UG NET 2023 परीक्षेचा निकाल (CSIR NET Result 2023) येत्या काही दिवसांमध्ये जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाईटवर हा निकाल पाहता येणार आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR NET) च्या डिसेंबर 2022 आणि जून 2023 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल लवकरच प्रसिद्ध केला जाणार आहे.

National Testing Agency ने परीक्षेची तात्पुरती उत्तरे (Provisional Answer Key) 14 जून रोजी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली होती. तर या संबंधित हरकती दाखल करण्यासाठी उमेदवारांना 16 जून पर्यंत मुदत देण्यात आली होती. यानंतर 17 जून रोजी परीक्षेची अंतिम उत्तरे (Final Answer Key) प्रसिद्ध करण्यात आली. त्यामुळे अंतिम उत्तरे प्रसिद्ध झाल्यानंतर सर्व उमेदवारांचे लक्ष आता परीक्षेच्या निकालालाकडे लागले आहे.
इतके गुण आवश्यक
CSIR NET 2023 ची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी सामान्य आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 33 टक्के गुण तर, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना किमान 25 टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे.
यंदा CSIR-UGC NET 2023 ची संयुक्त प्रवेश (CSIR NET Result 2023) परीक्षा भारतातील 178 शहरांमध्ये 6,7 आणि 8 जून रोजी देशभरात सुमारे 500 परीक्षा केंद्रांवर घेतली गेली होती. NTA ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार यावर्षी सुमारे 2 लाख 74 हजार 27 अर्जदारांनी CSIR NET 2023 ची परीक्षा दिली होती. NTAने अद्याप निकालाची तारीख जाहीर न केल्यामुळे सगळेच निकालाच्या प्रतीक्षेत आहेत.

CSIR-UGC NET 2023 चा निकाल असा पहा – (CSIR NET Result 2023)
1. सर्व प्रथम अधिकृत वेबसाईटवर CLICK करा – https://csirnet.nta.nic.in/
2. त्यानंतर निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
3. तुमचा वैयक्तिक (CSIR NET Result 2023) तपशील भरून सबमिट करा.
4. CSIR UGC NET 2023 चा निकाल समोर दिसेल.
5. निकाल डाउनलोड करा आणि पुढील वापरासाठी प्रिंट काढा.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SSC/HSC Supplementary Exam Schedule : 10वी, 12वीच्या पुरवणी परीक्षा पुढे ढकलल्या; ‘या’ तारखेला होणार पेपर

SSC/HSC Supplementary Exam Schedule

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील अनेक भागांना (SSC/HSC Supplementary Exam Schedule) पावसाने झोडपून काढले आहे. पुढील काही तास पावसाचा जोर असाच कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर 10वी व 12वी च्या पुरवणी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती राज्य मंळाच्या सचिवांनी दिली आहे. तर दुसरीकडे मुंबईसह, ठाणे, कोकण, रायगड विभागातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

10वी व 12वीच्या पुरवणी परीक्षा पुढे ढकलल्या
राज्यात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे दि. 20 जुलै 2023 रोजी होणारी पुरवणी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. इयत्ता 10 वी चे पेपर दि. 2 ऑगस्ट 2023 रोजी होतील तर 12 वीचे पेपर दि. 11 ऑगस्ट 2023 रोजी होणार असल्याची माहिती राज्य मंडळाच्या सचिवांनी दिली आहे.

या विभागातील शाळा राहणार बंद (SSC/HSC Supplementary Exam Schedule)
मुंबईसह कोकणामध्ये अतिवृष्टी झाली आहे. कोकणातल्या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे, तर मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल ट्रेनही विस्कळीत झाली आहे. हवामान खात्याचा इशारा बघता राज्य सरकारने मुंबई आणि कोकणातल्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच राज्यातील इतर भागांमध्ये स्थानिक प्रशासनाने परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा, असंही सरकारकडून (SSC/HSC Supplementary Exam Schedule) स्पष्ट करण्यात आलं आहे.
दरम्यान प्रशासनाच्या सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर असून कर्नाटक तेलंगणा तसंच इतर शेजारच्या राज्यांशी समन्वय साधण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. तसेच अतिवृष्टी होत असताना गरजेनुसार निर्णय घेण्याच्या सूचना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : प्राध्यापकांसाठी मोठी अपडेट!! राज्यातील ‘या’ कॉलेजमध्ये नवीन उमेदवारांना संधी; त्वरा करा

Job Notification (69)

करिअरनामा ऑनलाईन । सिद्धार्थ कॉलेज ऑफ वाणिज्य (Job Notification) आणि अर्थशास्त्र, मुंबई अंतर्गत सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण 34 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 ऑगस्ट 2023 आहे.

संस्था – सिद्धार्थ कॉलेज ऑफ वाणिज्य आणि अर्थशास्त्र, मुंबई
भरले जाणारे पद – सहायक प्राध्यापक
पद संख्या – 34 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 ऑगस्ट 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (Job Notification)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – I/C प्रिन्सिपल, सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स, 348, आनंद भवन, डॉ. डी.एन. रोड, फोर्ट, मुंबई-400 001

भरतीचा तपशील – (Job Notification)

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्याची शेवटची (Job Notification) तारीख 02 ऑगस्ट 2023 आहे.
3. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 

अधिकृत वेबसाईट – www.siddharthcollegeofasc.com
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Success Story : ‘सरकारी नोकरीच करायची होती!!’ इंजिनिअर अंशिका झाली IPS; सेल्फ स्टडीने मिळवून दिलं सर्वोच्च पद 

UPSC Success Story Anshika Verma IPS

करिअरनामा ऑनलाईन । आयपीएस अंशिका वर्मा ही (UPSC Success Story) तरुणांसाठी आयडॉल ठरली आहे. आपण पाहतो की UPSC परीक्षा देणारे अनेकजण कोणत्याही प्रकारचा कोचिंग क्लास न लावता अधिकारी झाले आहेत. याच यादीत अंशिका वर्माचं नाव सामील झालं आहे. अंशिका 2020 च्या बॅचची IPS आहे. ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर ती कामा संदर्भात अपडेट्स शेअर करत असते. तिच्या साधेपणाचे लाखो चाहते आहेत. तिला इन्स्टाग्रामवर लाखो लोक फॉलो करतात.

नोएडामधून घेतलं शिक्षण
अंशिका वर्माने प्राथमिक शिक्षण नोएडातून पूर्ण केलं. त्यानंतर 2014-2018 मध्ये (UPSC Success Story) गलगोटिया कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी इथून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये बी.टेक. ची डिग्री पूर्ण केली आहे.
सरकारी नोकरीच करायची होती (UPSC Success Story)
अंशिका इंजिनिअर झाली होती पण तिच्या मनात सरकारी नोकरी करायची इच्छा होती. त्यामुळे बी.टेक केल्यानंतर ती प्रयागराजला आली. इथे तिने UPSCची तयारी सुरू केली. 2019 मध्ये तिने प्रथमच परीक्षा दिली. मात्र यामध्ये तिला अपयश आले. पण हिंमत न हारता तिने प्रयत्न सुरूच ठेवले.

विना कोचिंग केला अभ्यास
अंशिकाला UPSC देताना एकदा अपयश आलं होतं. पहिल्या परिक्षेत झालेल्या चुकांमधून तिने आधीच्या चुका सुधारल्या आणि 2020 मध्ये ती दुसऱ्यांदा परीक्षेला बसली. यामध्ये अंशिकाने पूर्व आणि मुख्य दोन्ही परीक्षा उत्तीर्ण केल्या. तिने मुलाखतीतही चांगले गुण मिळवले. अंशिकाने या परिक्षेत (UPSC Success Story) संपूर्ण भारतातून 136 वी रॅंक मिळवली. तिची आयपीएस म्हणून निवड झाली व तिला उत्तर प्रदेश केडर मिळालं. अशा प्रकारे ती उत्तर प्रदेश केडरमधील नागरी सेवक झाली. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिने या तयारीसाठी कोणताही कोचिंग क्लास लावला नव्हता.
संपूर्ण देशभरात 136 वी रॅंक (UPSC Success Story)
अंशिकाने मुलाखतीत चांगले सादरीकरण केले. तिच्या उत्तम परफॉर्मन्सने तिला देशात 136 वा क्रमांक मिळवून दिला. त्यानंतर तिची IPS म्हणून निवड झाली. IPSची सेवा (UPSC Success Story) मिळाल्यानंतर अंशिकाला होम कॅडर देण्यात आले आहे.

वडील निवृत्त कर्मचारी तर आई गृहिणी
अंशिकाचे वडील उत्तर प्रदेश विद्युत निगम लिमिटेडमधून सेवा निवृत्त झाले आहेत. तर तिची आई गृहिणी आहे. इंजिनीअर असलेली मुलगी आता नागरी (UPSC Success Story) सेवक झाल्याचा तिच्या पालकांना मोठा अभिमान आहे. आपल्या मुलीने केवळ सेल्फ स्टडीच्या जोरावर यश मिळवल्याचे ते सांगतात.
सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स
अंशिका वर्मा तिच्या लूकसाठीही ओळखली जाते. इन्स्टाग्रामवर तिचे दोन लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिचं फॅन फॉलोइंग झपाट्याने वाढत आहे. तिच्या प्रत्येक पोस्टवर फॉलोअर्स लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत असतात. इंस्टाग्रामवर अंशिकाचे 1 लाख 48 हजार फॉलोअर्स आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MOIL Recruitment 2023 : ग्रॅज्युएट्ससाठी सरकारी नोकरी!! MOIL अंतर्गत ‘या’ पदांवर भरती सुरु; लगेच करा Apply

MOIL Recruitment 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । MOIL लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त (MOIL Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून पदवीधर प्रशिक्षणार्थी, व्यवस्थापक पदांच्या एकूण 21 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑगस्ट 2023 आहे.

संस्था – MOIL Limited
भरले जाणारे पद –
1. पदवीधर प्रशिक्षणार्थी (खाणी) – 15 पदे
2. पदवीधर प्रशिक्षणार्थी (यांत्रिक) – 04 पदे
3. व्यवस्थापक – 02 पदे
पद संख्या – 21 पदे (MOIL Recruitment 2023)
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 22 जुलै 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 ऑगस्ट 2023

नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर
असा करा अर्ज – (MOIL Recruitment 2023)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इतर कोणत्याही माध्यमाने आलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही.
3. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन थेट अर्ज करावे.
4. अर्ज फी भरणे अनिवार्य आहे.
5. अर्जाची फी (MOIL Recruitment 2023) फक्त ऑनलाईन पद्धतीने भरली जाईल.
6. ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी, उमेदवारांनी नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.

भरतीचा तपशील –

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.moil.nic.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Jobs : राज्यात अडीच वर्षापासून अडीच लाख पदे रिक्त; माहिती अधिकारात धक्कादायक बाब उघड

Government Jobs (51)

करिअरनामा ऑनलाईन । राज्याच्या विविध विभागात आणि (Government Jobs) जिल्हापरिषदेमध्ये 2 लाख 40 हजारांपेक्षा जास्त पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे. मागील तब्बल 30 महिन्यापासून एकही रिक्त पद भरले गेलेले नाही. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राज्यातील रिक्त पदासंदर्भात महाराष्ट्र सरकारकडे माहिती मागितली होती. यामध्ये 2.40 लाख पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे.

महाराष्ट्र राज्यातील विविध विभाग आणि जिल्हा परिषदअंतर्गत 2.44 लाखांपेक्षा अधिक पदे रिक्त असल्याचे उघड झाले आहे. शासकीय विभाग व जिल्हा परिषदेतील 31 डिसेंबर, 2020 पर्यंतची माहिती उपलब्ध झाली आहे. एकूण 29 शासकीय विभाग आणि जिल्हा परिषद यात मंजूर पदांची संख्या 10 लाख 70 हजार 840 इतकी आहे. यापैकी 8 लाख 26 हजार 435 पदे भरलेली आहेत. तर 2 लाख 44 हजार 405 पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राज्य सरकारकडे 14 जून 2023 रोजी अर्ज सादर करत महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व वर्गातील एकूण पदांची माहिती, मंजूर पदे, भरलेली पदे आणि रिक्त (Government Jobs) पदांची माहिती मागितली होती. सामान्य प्रशासन विभागाने अनिल गलगली यांना गटनिहाय शासकीय व जिल्हा परिषदेतील गट अ, ब, क आणि ड मधील दिनांक 31 डिसेंबर 2020 पर्यंतची माहिती उपलब्ध करुन दिली. एकूण 29 शासकीय विभाग आणि जिल्हापरिषद यात मंजूर पदांची संख्या 10, 70,840 इतकी आहे. ज्यापैकी 8,26,435 ही पदे भरलेली आहेत. तर 2,44,405 ही पदे रिक्त आहेत. यात शासकीय कर्मचाऱ्यांची 192425 तर जिल्हापरिषदेच्या 51980 अशी एकूण 2,44,405 पदे रिक्त आहेत.

पहा विभागवार रिक्त पदांची यादी – (Government Jobs)
1. गृह विभागाची एकूण 2,92,820 पदे मंजूर असून त्यापैकी 46,851 पदे रिक्त आहेत.
2. सार्वजनिक आरोग्य विभागाची एकूण मंजूर पदे 62,358 असून त्यापैकी 23,112 पदे रिक्त आहेत.
3. जलसंपदा विभागाची एकूण मंजूर पदे 45,217असून त्यापैकी 21,489 पदे रिक्त आहेत.
4. महसूल व वन विभागाची एकूण मंजूर पदे 69,584 असून त्यापैकी 12,557 पदे रिक्त आहेत.
5. उच्च व तंत्र विभागाची एकूण मंजूर पदे 12,407 असून त्यापैकी 3,995 पदे रिक्त आहेत.
6. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाची एकूण मंजूर पदे 36,956 असून त्यापैकी 124,23 पदे रिक्त आहेत.
7. आदिवासी विकास विभागाची एकूण मंजूर पदे 21,154 असून त्यापैकी 6213 पदे रिक्त आहेत.
8. शालेय शिक्षण व क्रिडा विभागाची एकूण मंजूर पदे 7050 असून त्यापैकी 3828 पदे रिक्त आहेत.
9. सार्वजनिक बांधकाम (Government Jobs) विभागाची एकूण मंजूर पदे 21,649 असून त्यापैकी 7751 पदे रिक्त आहेत.
10. सहकार पणन विभागाची एकूण मंजूर पदे 8867 असून त्यापैकी 2933 पदे रिक्त आहेत.
11. सामाजिक न्याय विभागाची एकूण मंजूर पदे 6573 असून त्यापैकी 3221 पदे रिक्त आहेत.
12. उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाची एकूण मंजूर पदे 8197 असून त्यापैकी 3686 पदे रिक्त आहेत.
13. वैद्यकीय शिक्षण विभागाची एकूण मंजूर पदे 36956 असून त्यापैकी 12423 पदे रिक्त आहेत.
14. वित्त विभागाची एकूण मंजूर पदे 18191 असून त्यापैकी 5719 पदे रिक्त आहेत.
15. शालेय शिक्षण विभागाची एकूण मंजूर पदे 7050 असून त्यापैकी 3828 पदे रिक्त आहेत.
16. अन्न व नागरी पुरवठा विभागाची एकूण मंजूर पदे 8308 असून त्यापैकी 2949 पदे रिक्त आहेत.
17. महिला व बालविकास (Government Jobs) विभागाची एकूण मंजूर पदे 3936 असून त्यापैकी 1451 पदे रिक्त आहेत.
18. विधि व न्याय विभागाची एकूण मंजूर पदे 2938 असून त्यापैकी 1201 पदे रिक्त आहेत.
19. पर्यटन व सांस्कृतिक विभागाची एकूण मंजूर पदे 735 असून त्यापैकी 386 पदे रिक्त आहेत.
20. सामान्य प्रशासन विभागाची एकूण मंजूर पदे 8795 असून त्यापैकी 2325 पदे रिक्त आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NET SET Exam 2023 : नेट-सेट परीक्षापूर्व प्रशिक्षण नोंदणीस मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार नोंदणी

NET SET Exam 2023

करिअरनामा ऑनलाईन । महात्मा ज्योतिबा फुले संशोधन (NET SET Exam 2023) व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थे कडून घेण्यात येणाऱ्या युजीसी नेट – सीएसआयआर-नेट, एमएच-सेट – 2023-24 या परिक्षेच्या मोफत ऑनलाईन व ऑफलाईन पुर्व तयारीसाठी ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी या संवर्गातील इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांकडून www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आलेले होते.

विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आणि त्यांच्या पुढील भवितव्याचा विचार करता महाज्योती कडून युजीसी नेट, सीएसआयआर-नेट, एमएच-सेट 2023-24 परीक्षापूर्व प्रशिक्षणासाठी दिनांक 30 जुलै 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. याकरिता अधिकृत संकेतस्थळावर अर्जाचा नमुना व तपशिलवार (NET SET Exam 2023) माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे. टपालाव्दारे, प्रत्यक्ष किंवा मेल वर प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही याची विदयार्थ्यांनी नोंद घ्यावी; असं आवाहन करण्यात आलं आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : डॉ. शरदचंद्रजी पवारसाहेब पतसंस्थेत ‘या’ पदांवर भरती; इथे पाठवा अर्ज

Job Alert (41)

करिअरनामा ऑनलाईन । पदमविभुषण डॉ. शरदचंद्रजी पवारसाहेब (Job Alert) नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, गौतमनगर अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून क्लर्क पदाच्या 07 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2023 आहे.

संस्था – पदमविभुषण डॉ. शरदचंद्रजी पवारसाहेब नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, गौतमनगर
भरले जाणारे पद – क्लर्क
पद संख्या – 07 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 जुलै 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – पदमविभुषण डॉ. शरदचंद्रजी पवारसाहेब नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित – गौतमनगर पो. कोळपेवाडी, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर
निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा

नोकरी करण्याचे ठिकाण – गौतमनगर, अहमदनगर
आवश्यक शैक्षणिक पात्रता – क्लर्क बी.कॉम / एम.कॉम / जी डी सी ॲण्ड ए संगणक प्रशिक्षित आवश्यक
असा करा अर्ज – (Job Alert)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी  शैक्षणिक प्रमाणपत्राच्या झेरॉक्स प्रती अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया –
1. या भारतीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे केली जाणार आहे.
2. उमेदवारांना लेखी परिक्षेसाठी दि. 28 जुलै रोजी कळविले जाईल.
3. उमेदवारांनी दिलेल्या संबंधित (Job Alert) पत्त्यावर लेखी परीक्षेसाठी हजर रहावे.
4. लेखी परीक्षेला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक महितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com