NET SET Exam 2023 : नेट-सेट परीक्षापूर्व प्रशिक्षण नोंदणीस मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार नोंदणी

करिअरनामा ऑनलाईन । महात्मा ज्योतिबा फुले संशोधन (NET SET Exam 2023) व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थे कडून घेण्यात येणाऱ्या युजीसी नेट – सीएसआयआर-नेट, एमएच-सेट – 2023-24 या परिक्षेच्या मोफत ऑनलाईन व ऑफलाईन पुर्व तयारीसाठी ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी या संवर्गातील इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांकडून www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आलेले होते.

विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आणि त्यांच्या पुढील भवितव्याचा विचार करता महाज्योती कडून युजीसी नेट, सीएसआयआर-नेट, एमएच-सेट 2023-24 परीक्षापूर्व प्रशिक्षणासाठी दिनांक 30 जुलै 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. याकरिता अधिकृत संकेतस्थळावर अर्जाचा नमुना व तपशिलवार (NET SET Exam 2023) माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे. टपालाव्दारे, प्रत्यक्ष किंवा मेल वर प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही याची विदयार्थ्यांनी नोंद घ्यावी; असं आवाहन करण्यात आलं आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com