Home Blog Page 267

Van Vibhag Exam : वन विभागाच्या परिक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट; 10 लाखाचे डील करुन अंतर्वस्त्रात लपवले डिव्हाईस; धक्कादायक प्रकार उघडकीस 

Van Vibhag Exam (1)

करिअरनामा ऑनलाईन । वन विभागाच्या परीक्षेदरम्यान (Van Vibhag Exam) गोंधळ उडाला आहे. या परिक्षेत पुन्हा एकदा डिव्हाईसच्या माध्यमातून कॉपी करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे उघडकीस आलं आहे. वनविभागाच्या तपासणी पथकाने सतर्कतेने हा गंभीर प्रकार उघडकीस आणला. गेल्या चार दिवसांतील ही तिसरी कारवाई असल्याने एकच खळबळ उडाली आहे; त्यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करुन परीक्षा देणारे विद्यार्थी संतप्त झाले आहेत.
याप्रकरणी परीक्षार्थी उमेश संजय हुसे (आडगाव, छत्रपती संभाजीनगर), साहित्य पुरवठा करणारा बालाजी नामदेव तोगे (खोडेगाव, छत्रपती संभाजीनगर), एजंट राजू नांगरे आणि अजय नांगरे (दोघे काद्राबाद ता. जि. छत्रपती संभाजीनगर) अशा चौघांवर कारवाई करण्यात आली आहे.

वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट कॉलेजमध्ये हा प्रकार उघडकीस आला; त्यानंतर विश्रामबाग पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद नोंद करण्यात आली. दरम्यान, चार दिवसांपूर्वी (Van Vibhag Exam) कॉपी उघडकीस आली. त्यानंतर काल डमी उमेदवारास रंगेहाथ पकडण्यात आले आणि आता डिव्हाईसद्वारे कॉपीचा प्रकार उघडकीस आला.

या सर्व प्रकारात छत्रपती संभाजीनगर कनेक्शन उघडकीस आले आहे. यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून विश्रामबाग पोलिस त्या अनुषंगाने तपास करत आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की, वनरक्षक पदासाठी ऑनलाइन परीक्षा सुरू आहेत. सांगली ते मिरज (Van Vibhag Exam) रोडवरील वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडी अँड रिसर्च या कॉलेजमध्ये वनविभागाच्या शिपाई पदासाठीच्या भरतीचा पेपर कालपासून सुरू आहे. दुपारी पेपर सुरू होण्यापूर्वी टीसीएस (TCS) कंपनीमार्फत तपासणी करण्यात आली. त्यावेळी परीक्षार्थी उमेश हुसे याच्यावर संशय आला. त्यानंतर पथकाने कसून तपासणी केली.

त्यावेळी त्याच्या अंतर्वस्त्रात एक कम्युनिकेशन डिव्हाईस, मायक्रोफोन मिळून आला. हे साहित्य कॉपीसाठी बालाजी तोगे याने दिल्याचे सांगितले. त्यानुसार दोघांना ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशी केली असता एजंट राजू नांगरे आणि अजय नांगरे यांची नावे निष्पन्न झाली. त्याअनुषंगाने त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली.
दरम्यान, गेल्या चार दिवसांतील ही तिसरी कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे. मुख्य वनसंरक्षक रामानुजम, उप वनसंरक्षक नीता कट्टे यांच्या नेतृत्वाखाली वनक्षेत्रपाल युवराज पाटील, दादा भाजबळकर व खासगी सुरक्षा रक्षकांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. आता पुन्हा सुरक्षा यंत्रणा सतर्क करण्यात आली असून उमेदवारांची काटेकोर तपासणी करण्यात येत आहे.

कॉपीसाठी झाली दहा लाखांची ‘डील’
वनविभागाच्या परीक्षेत अत्याधुनिक डिव्हाईसद्वारे कॉपीचा प्रकार उघडकीस आला. नंतर सखोल तपास केल्यानंतर एजंट राजू नांगरे व अजय नांगरे, बालाजी तोगे यांनी संगनमताने कॉपीसाठी मदत करणार असल्याचे परीक्षार्थी हुसे याने कबुली दिली. त्या मोबदल्यात दहा लाख रुपयांची डील ठरवण्यात आली होती. परीक्षेनंतर हे पैसे दिले जाणार होते. छत्रपती संभाजीनगर येथील कनेक्शन वारंवार उघडकीस आल्याने मोठे रॅकेट यानिमित्ताने समोर येत आहे. याच्या मुळापर्यंत पोलिस जाणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

अभ्यास करणाऱ्या मुलांच्या भविष्याचा प्रश्‍न (Van Vibhag Exam)
सरकारी नोकरीसाठी जीवाचे रान करून आम्ही वर्षभर अभ्यास आणि मैदानी सराव करत आहोत. कॉपी, डमी उमेदवार अशांमुळे अभ्यास करणाऱ्या मुलांच्या भविष्याचाही प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. तेव्हा परीक्षा केंद्रावर कडक सुरक्षा यंत्रणेत तपासणी झाली पाहिजे, असे मत परीक्षार्थीने व्यक्त केले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Railway Recruitment 2023 : भारतीय रेल्वेत तब्बल अडीच लाख पदे रिक्त!! केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची माहिती; जाणून घ्या कुठे आणि किती पदे रिक्त

Railway Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्या (Railway Recruitment 2023) तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेत नोकरीची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेत मोठ्या प्रमाणावर भरती होणार असल्याचे सांगितले आहे. त्यानुसार, रेल्वेच्या सर्वच विभागात सर्वच पदासाठी भरती प्रक्रिया होणार आहे. सेफ्टी स्टाफ, असिस्टंट स्टेशन मास्टर, नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगिरी, तिकीट कलेक्टर अशा पदासाठी लवकरच भरती होणार आहे. या संदर्भात लवकरच रेल्वेने भरतीसाठी तयार केलेल्या संकेतस्थळावर सूचना देण्यात येणार आहे.

किती आहेत रिक्त पदे?
भारतीय रेल्वेच्या (Indian Railway) सर्वच विभागात ग्रृप सी अंतर्गत 2,48,895 पदे रिक्त आहेत. तर ग्रुप A आणि B ची एकूण 2,070 पदे रिक्त आहेत. रेल्वे विभागाच्या माहितीनूसार, एकूण 2.4 लाख पदांसाठी लवकरच भरती प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. सेफ्टी स्टाफ, असिस्टंट स्टेशन मास्टर, नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगिरी, तिकीट कलेक्टर अशा पदासाठी भरती होणार आहे. या पदांना दोन मुख्य गटात विभाजीत करण्यात आले आहे. यामध्ये गॅझेटेड ग्रुप A आणि B पदांचा समावेश आहे. तर नॉन-गॅझिटेड पदांमध्ये ग्रुप क आणि D या पदांचा समावेश आहे.

रेल्वेमध्ये या पदांवर होणार भरती
1. ग्रुप A –
युपीएससीद्वारे आयोजीत परीक्षा, सिव्हिल सेवा परीक्षा, इंजिनिअरिंग सेवा परीक्षा आणि इतर परीक्षांच्या माध्यमातून या पदासाठी भरती प्रक्रिया (Railway Recruitment 2023) राबविण्यात येते.
2. ग्रुप B – ग्रुप बी पदांसाठी सेक्शन ऑफिसर्स ग्रेडच्या पदांचा समावेश होतो. रेल्वे कर्मचाऱ्यांकडून प्रतिनियुक्ती तत्त्वासाठी ग्रुप ‘सी’ चा पर्याय आहे.
3. ग्रुप C – या श्रेणीत स्टेशन मास्तर, तिकट कलेक्टर, क्लर्क, कमर्शियल अपरेंटिस, सेफ्टी स्टाफ, ट्रॅफिक अपरेन्टिस आणि विविध इंजिनिअरिंगची पदे (इलेक्ट्रिकल, सिग्नल आणि दूरसंचार, सिव्हिल, मॅकेनिकल) यांचा समावेश होतो.
4. ग्रुप D – ग्रुप डी मध्ये ट्रॅक-मॅन, हेल्पर, असिस्टेंट पॉईंट्स मॅन, स्वच्छता कामगार, गनमॅन, चपराशी, तसेच अन्य पदांचा समावेश आहे.

कसा करायचा अर्ज (Railway Recruitment 2023)
1. भारतीय रेल्वेची अधिकृत वेबसाईट Indianrailways.gov.in वर जा.
2. तुमचे राज्य, विभागाचा पर्याय निवडा.
3. कोणता खास विभाग, डिपार्टमेंट हवे आहे, याची निवड करा.
4. रिक्रूटमेंट सेक्शन बघा. त्यातील सूचना बारकाईने वाचा.
5. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पर्याय निवडा. तो व्यवस्थित भरा.
6. रेल्वेतील नोकरीसाठी अर्ज करताना आधार कार्ड बंधनकारक आहे.
7. त्या त्या पदासाठी आवश्यक शुल्क भरा. Submit बटणावर क्लिक करा.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Medical Admission : राज्यातील मेडिकल प्रवेशाच्या तब्बल 1000 जागा वाढल्या

Medical Admission

करिअरनामा ऑनलाईन । मेडिकलचे शिक्षण घेवू इच्छिणाऱ्या (Medical Admission) विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची अपडेट हाती आली आहे. राज्यातील मेडिकल अभ्यासक्रमांची प्रवेश संख्या आता एक हजारने वाढली आहे. MBBS च्या 900 आणि BDS च्या 100 जागा पुन्हा वाढल्या आहेत. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) प्रवेश प्रक्रिया सुरू केल्यानंतर आठ संस्थांना प्रवेशासाठी आवश्यक मान्यता नसल्याने अचानक त्यांची नावे वगळण्यात आली होती. त्यामुळे पहिल्या फेरीत त्यांचा समावेश नव्हता. आता या संस्थांना मान्यता मिळाल्याने दुसऱ्या फेरीसाठी हजार जागा पुन्हा वाढल्या आहेत.

NEET UG 2023 एमबीबीएस किंवा बीडीएस अभ्यासक्रम प्रवेशासाठी जागांची माहिती दि. 31 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यामध्ये सेवाग्राम येथील महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या संस्थेतील एमबीबीएसच्या 100 जागांसह इतर सात खासगी संस्थांमधील 900 जागांचाही प्रवेशासाठी समावेश करण्यात आला होता.

मात्र, प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर महाविद्यालयांना प्रवेशासाठी आवश्यक मान्यता प्राप्त झाली नव्हती. मान्यता नसल्याने आठ संस्थांना प्रथम प्रवेश फेरीतून वगळण्यात आले होते. त्यामुळे पहिल्या फेरीतून MBBSच्या 900 आणि BDSच्या 100 जागा कमी झाल्या. आता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून या महाविद्यालयांना प्रवेशासाठी आवश्यक मान्यता प्राप्त झाली असल्यामुळे सदर महाविद्यालयांचा समावेश दुसऱ्या प्रवेश फेरीमध्ये करण्यात येणार आहे.
राज्यातील एमबीबीएसच्या जागांचा तपशील (Medical Admission)
1. महाविद्यालये – 32
2. सरकारी जागा – 5 हजार 200
3. खासगी महाविद्यालयांतील जागा – 3 हजार 70
4. एकूण – 8 हजार 270
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BDL Recruitment 2023 : डिग्री/डिप्लोमा/एमबीए उमेदवारांसाठी नोकरीची संधी!! भारत डायनॅमिक्स अंतर्गत ‘ही’ पदे रिक्त

BDL Recruitment 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । भारत डायनॅमिक्स लिमिटेड अंतर्गत (BDL Recruitment 2023) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, कल्याण अधिकारी, कनिष्ठ व्यवस्थापक पदांच्या एकूण 45 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2023 आहे.

संस्था – भारत डायनॅमिक्स लिमिटेड
भरले जाणारे पद –
१. व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी – ४२ पदे
२. कल्याण अधिकारी – २ पदे
३. कनिष्ठ व्यवस्थापक – १ पद
पद संख्या – 45 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 सप्टेंबर 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – अमरावती, महाराष्ट्र

अर्ज फी –
१. सर्वसाधारण प्रवर्गासाठी – रु.500/-
२. SC आणि ST उमेदवार – फी नाही
काही महत्वाच्या तारखा –

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (BDL Recruitment 2023)

पदाचे नाव आवश्यक शैक्षणिक पात्रता
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी First Class Bachelor’s Degree in relevant field
कल्याण अधिकारी i) Degree in Arts / Science / Commerce or in Law University recognized by the Government
ii) Post Graduate degree or Diploma covering Labour Legislations with case law, Industrial relations, Personnel Management, Human Resource Management and other allied subjects with Labour Welfare
कनिष्ठ व्यवस्थापक First Class MBA / Post Graduate Diploma/ Post Graduate Degree in Public Relations/ Communication/ Mass Communication/ Journalism of 2-years from recognize University/ Institute

 

मिळणारे वेतन –

पदाचे नाव मिळणारे वेतन
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी Rs. 40,000-1,40,000/-
कल्याण अधिकारी Rs. 30,000-1,20,000/-
कनिष्ठ व्यवस्थापक Rs. 30,000-1,20,000/-

असा करा अर्ज –
१. वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
२. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज सादर करू शकतात.
३. अर्जाची प्रत संबंधित पत्त्यावर पाठविणे आवश्यक आहे.
४. अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे. (BDL Recruitment 2023)
५. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
६. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2023 आहे.

वय मर्यादा –

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक महतीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – bdl-india.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Mahapareshan Recruitment 2023 : 10वी/ITI उत्तीर्णांसाठी महापारेषण अंतर्गत ‘या’ पदावर भरती; ऑनलाईन करा अर्ज

Mahapareshan Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ (Mahapareshan Recruitment 2023) पारेषण कंपनी लिमिटेड, जळगाव अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) पदाच्या एकूण 37 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड, जळगाव
भरले जाणारे पद – शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)
पद संख्या – 37 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 ऑगस्ट 2023

वय मर्यादा – १८ ते ३० वर्षे (मागासवर्गीयांसाठी ०५ वर्ष शिथिलक्षम)
नोकरी करण्याचे ठिकाण – जळगाव
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परिक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औदयोगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री या व्यवसाय परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

मिळणारे वेतन – (Mahapareshan Recruitment 2023)
विद्यावेतन शासनाच्या नियमाप्रमाणे लागू होईल.
असा करा अर्ज –
१. वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
२. अर्ज करण्यापुर्वी (Mahapareshan Recruitment 2023) उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
३. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
४. उमेदवारांनी इयत्ता १० वी उत्तीर्णचे गुणपत्रक (Marksheet) व मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षांचा आयटीआय (वीजतंत्री) परिक्षा उत्तीर्ण केल्याचे सर्व सेमीस्टरचे एकत्रित गुणपत्रक, आधारकार्ड अपलोड करणे आवश्यक आहे.
५. अर्जदाराने महाराष्ट्र शासनाच्या www.apprenticeshipindia.org या वेबसाईवर नोंदणी करणे बंधन कारक आहे.  तसेच https://apprenticeshipindia.gov.inapprenticeship/opportunity या लिंकवरुन अर्ज सादर करणे अनिवार्य असेल.
६. दि. 14 ऑगस्ट 2023 नंतर ऑनलाईन नोंदणी केलेल्या उमेदवारांचा शिकाऊ उमेदवारी भरती प्रक्रियेसाठी कोणत्याही परिस्थितीत विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.mahatransco.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Talathi Bharti Exam 2023 : तलाठी भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; पहा परीक्षेच्या तारखा 

Talathi Bharti Exam 2023

करिअरनामा ऑनलाईन । भूमी अभिलेख (Talathi Bharti Exam 2023) विभागाच्यावतीने तलाठी (गट-क) या पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक आणि तारखा जाहीर झाल्या आहेत. ही परीक्षा दि. १७ ऑगस्ट ते १४ सष्टेंबर २०२३ या कालावधीत होणार आहे. प्रशासनाकडून या परीक्षेची तयारी पूर्ण झाली असून पात्र उमेदवारांना परीक्षा केंद्राचे नाव किमान दहा दिवस आधी कळविण्यात येणार आहे.

राज्यभरातून तलाठी पदाच्या ४४६६ पदासाठी ११ लाख दहा हजार ५३ उमेदवार बसणार आहेत. या उमेदवारांना परीक्षा व्यवस्थित देता यावी, यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा केंद्र असणार आहे. ही परीक्षा तीन सत्रांत होणार आहे. त्यामध्ये सकाळी ९ ते ११, दुपारी १२.३० ते २.३० आणि (Talathi Bharti Exam 2023) सायंकाळी ४.३० ते ६.३० अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेचे गाव अगोदर समजणार असून परीक्षा केंद्र, मात्र तीन दिवस अगोदर प्रवेशिकेबरोबरच दिसणार आहेत. परीक्षा केंद्रावर कोणताही अनुसुचित प्रकार घडू नये, यासाठी ही दक्षता घेण्यात आली आहे.

टीसीएस कंपनीकडून ही परीक्षा (Talathi Bharti Exam 2023) घेण्यात येणार आहे; अशी माहिती भूमी अभिलेख विभागाचे अपर जमाबंदी आयुक्त आणि राज्य परीक्षा समन्वयक आनंद रायते यांनी दिली. दरम्यान, तलाठी पदासाठी एकूण २०० गुणांची संगणकावर आधारित परीक्षा घेतली जाणार आहे. गुणवत्ता यादीमध्ये समावेश होण्यासाठी एकूण गुणांच्या किमान ४५% गुण मिळवणे आवश्‍यक आहे, असेही रायते यांनी सांगितले.
असे आहेत परीक्षेचे टप्पे – (Talathi Bharti Exam 2023)
१. पहिला टप्प्पा – १७, १८, १९, २०, २१, २२ ऑगस्ट
२. दुसरा टप्पा – २६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर
३. तिसरा टप्पा – ४ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर
४. २३, २४, २५ ऑगस्ट तसेच २, ३, ७, ९, ११, १२ आणि १३ सप्टेंबर या तारखांना परीक्षा होणार नाहीत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career as a Dog Trainer : ‘डॉग ट्रेनर’ म्हणून बनवलं जाऊ शकतं करिअर… जाणून घ्या एक इंजिनीअर कसा बनला डॉग ट्रेनर

Career as a Dog Trainer

करिअरनामा ऑनलाईन । आपलं करियर निवडताना (Career as a Dog Trainer) अभ्यासावर भर द्यावा? बाकी लोकं काय म्हणतायेत याकडे लक्ष द्यावं की स्वतःची आवड जोपासावी? असे अनेक प्रश्न आपल्या मनात येत असतात. आजकाल देशात करिअरच्या नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत. असंही म्हटलं जातं की आत्मविश्वासाच्या बळावर कुठल्याही क्षेत्रात करिअर घडवता येतं. आणि एखाद्या क्षेत्राबद्दल जर का आवड असेल तर येणाऱ्या अडचणी देखील आपल्याला कठीण वाटत नाहीत. अशीच आजची गोष्ट आहे एका इंजिनियरची, ज्यांनी आपल्या छंदालाच करियर बनवलं‌. तर कोण आहेत हे, काय आहे त्यांचा छंद आणि कसा होता त्यांचा प्रवास हे जाणून घ्या…

इंजिनीअर ते डॉग ट्रेनर (Dog Trainer)
श्रीकांत वाढी हे नागपूरमधील इलेक्ट्रॉनिक आणि टेली कम्युनिकेशन इंजिनियर आहेत. पेशाने इंजिनियर असलेल्या श्रीकांत यांना बालपणापासून कुत्र्यांबद्दल फारच आकर्षण होते. आज त्यांच्या या आवडीचे रूपांतर करिअरमध्ये झाले आहे. घरी एखादं कुत्र्याचं पिल्लू जरी आणलं तरी ते अगदी मनापासून त्याची काळजी घ्यायचे. मात्र जस जसं वय वाढत गेलं तसं शिक्षण पूर्ण करत त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि टेली कम्युनिकेशनमध्ये डिग्री मिळवली व ते इंजिनीअर बनले. मात्र कुत्र्यांसाठी असलेल्या प्रेमापोटी त्यांनी आपली आवड जोपासायचं ठरवलं आहे.

डॉग ट्रेनिंगचे घेतले प्रशिक्षण 
या मुक्या प्राण्याला शिकवण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींचा अभ्यास त्यांनी स्वतः केला आहे. सुरुवातीला इंटरनेटच्या मदतीने त्यांनी देश विदेशातील अनेक ऑनलाईन क्लासेस जॉईन करून आपले प्रशिक्षण सुरू केले. त्यानंतर भारतात होणारे अनेक सेमिनार्स देखील त्यांनी (Career as a Dog Trainer) पाहिले. ते म्हणतात की, “डॉग ट्रेनिंग ही काळाची गरज आहे व मी माझ्या शिक्षणातून या बाबतीत येणाऱ्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतो. डॉग ट्रेनर्स ना पगार देखील चांगला मिळतो, सुरुवातीला या बाबतीत एवढी जागरूकता नव्हती पण आता परिस्थिती बदलत आहे त्यामुळे इच्छुक लोकं करिअर म्हणून याचा विचार करू शकतात.

पेट ट्रेनर्सची मागणी वाढतेय (Career as a Dog Trainer)
आज-काल अनेकांच्या घरात पाळीव कुत्रा पाहायला मिळतो, पेट पेरेंटिंग (Pet Parenting) ही नवीन संकल्पना आपल्या देशात रुजू होत आहे ज्या अंतर्गत येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी आपल्याला अशा ट्रेनर्सची गरज असते. अनेक ठिकाणी देश विदेशातील कुत्र्यांच्या जाती मोठ्या प्रमाणात लोकं पाळतात. एवढंच नाही तर लोकं आपल्या कुटुंबातील एका सदस्याप्रमाणे त्या कुत्र्यांची काळजी देखील घेतात. कुत्र्यांसाठी डॉग हाऊस, डॉग फूड, डॉग क्लोथिंग यासारख्या अनेक गोष्टी बाजारात उपलब्ध झाल्या आहेत मग अशा वेळी कुत्र्यांची आवड असल्यास डॉग ट्रेनर म्हणून देखील आपण आपले उत्तम करिअर घडवू शकतो.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Tips for Freshers : अनुभव नसतानाही मिळेल नोकरी; फ्रेशर्सनी फॉलो करा ‘या’ टिप्स 

Tips for Freshers

करिअरनामा ऑनलाईन । आजच्या काळात कोणत्याही क्षेत्रात (Tips for Freshers) नोकरी मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. अनेकवेळा असे घडते की नोकरीसाठी आवश्यक पात्रता धारण करूनही नोकरी मिळण्याची संधी हातातून निसटते. बेरोजगारीचे प्रमाण सातत्याने वाढत आहे आणि अनुभवी लोकांना कामावरून काढून टाकले जात आहे. अशा स्थितीत सर्वाधिक दबाव फ्रेशर्सवर असतो. अनुभवाशिवाय नोकरी कशी मिळेल, याची चिंता त्यांना सतावत आहे.
फ्रेशरला नोकरीसाठी सर्वाधिक मेहनत करावी लागते. बहुतेक कंपन्या कामाचा अनुभव असलेल्यांना प्राधान्य देत आहेत.  आज आपण जाणून घेणार आहोत की या स्पर्धेच्या काळात फ्रेशर्सनी काय केले पाहिजे जेणेकरून त्यांना सहज नोकरी मिळू शकेल. यासाठी खालील टिप्स फॉलो करा.

1. कौशल्ये विकसित करा (Develop Skills) : उच्च स्पर्धेमध्ये तुमची नोकरी सुनिश्चित करण्यासाठी, तुमची कौशल्ये विकसित करणे सर्वात महत्वाचे आहे. शक्य तितके ज्ञान ठेवा. कंपनीत तुम्ही ज्या प्रोफाइल वर काम करण्यासाठी जात आहात त्यासाठी शोधलेल्या कौशल्यांमध्ये सुधारणा करा.
2. आकर्षक रेझ्युमे बनवा (Create an Attractive Resume) : नवीन कर्मचारी भरती करण्यासाठी कंपन्या Resume मागतात. Resume ही तुमची पहिली छाप आहे, म्हणून नेहमी सर्वोत्तम फॉरमॅटमध्ये सीव्ही (CV) बनवा. फॉरमॅट असा असावा की तुमचे सर्व तपशील स्पष्टपणे दिसतील. बायोडाटामध्ये कोणतीही चुकीची माहिती टाकू नका. तुमच्या कौशल्यांबद्दल तपशीलवार लिहा. तुमच्याकडे पोस्टसाठी शोधलेली कौशल्ये हायलाइट करण्याचा आणि लिहिण्याचा प्रयत्न करा.

3. वरिष्ठांची मदत घ्या (Seek Help from Seniors) : योग्य क्षेत्र निवडण्यासाठी मार्गदर्शन आवश्यक आहे. तुम्ही पहिल्यांदाच नोकरी करणार असाल तर त्या क्षेत्रात काम करणाऱ्या अनुभवी लोकांशी ओळख करून घ्या. शाळा किंवा महाविद्यालयात वरिष्ठांचे मार्गदर्शन घेत (Tips for Freshers) राहा. यावरून तुम्हाला नोकरी मिळवण्यासाठी आणि त्यात राहण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे याची कल्पना येईल.
4. प्रेरणादायी भाषण ऐका (Listen to an Inspirational Speech) : नोकरी मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्मविश्वास टिकवणे. काही कारणाने नाकारले गेले तर निराश होऊ नका. त्यापेक्षा स्वतःला प्रेरित करत राहा. यासाठी प्रेरणादायी भाषण ऐका किंवा पालकांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवा.

5. कोणतीही संधी गमावू नका (Don’t Miss any Opportunity) : जेव्हा तुमच्यातील कौशल्ये विकसित होतील, तुमचा सारांश तयार असेल तेव्हा तुम्ही कोणत्याही रिक्त जागेसाठी अर्ज करण्यास तयार असले पाहिजे. कोणतीही संधी हातून जाऊ देऊ नका. नोकरीसाठी अर्ज करा आणि मुलाखतीला सामोरे जा.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Diploma in Pharmacy Admission 2023 : शिवाजीराव देशमुख फाउंडेशन अंतर्गत Diploma In Pharmacy साठी प्रवेश सुरु; ना डोनेशन, ना CET

Diploma in Pharmacy Admission 2023

करिअरनामा ऑनलाईन । १२ वी च्या शिक्षणानंतर ज्या (Diploma in Pharmacy Admission 2023) विद्यार्थ्यांना फार्मसीला प्रवेश घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शिवाजीराव देशमुख फाउंडेशन सोसायटी अंतर्गत ३ कॉलेजमध्ये फार्मसी साठी ऍडमिशन प्रक्रिया सुरु झाली असून यासाठी कोणत्याही डोनेशनची आणि महत्त्वाचे म्हणजे CET परीक्षा देण्याची आवश्यकता लागणार नाही. त्यामुळे तुम्हाला अगदी सोप्प्या पद्धतीने प्रवेश मिळू शकतो. मर्यादित प्रवेश उपलब्ध असल्याने मात्र विद्यार्थ्यांना घाई करावी लागेल. सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या असंख्य संधी तसेच मेडिकल आणि ऑनलाईन फार्मसी मध्ये करिअरच्या संधी उपलब्ध करणाऱ्या डी. फार्मसी आणि बी. फार्मसी या २ वर्षाच्या प्रवेशासाठी लवकरात लवकर शिवाजीराव देशमुख फौंडेशन सोसायटीच्या खालीलपैकी कोणत्याही कॉलेज मध्ये प्रवेश घ्या…

डी. फार्मसी आणि बी. फार्मसीसाठी खालील कॉलेजमध्ये डायरेक्ट प्रवेश मिळेल

१) चन्नाबसव कॉलेज ऑफ फार्मसी, बसवकल्याण (Channbasva college of Pharmacy, Basavkalyaan)
(PCI-2694)
(Mo : 917676305300)
२) SDF कॉलेज ऑफ फार्मसी, बिदर (SDF College of Pharmacy, Bidar(
(PCI-3359)
(Mo : 7676305300)
३) श्री संगमेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी, कमलनगर (Sri Sangmeshwar College of Pharmacy, Kamalnagar)
(PCI- 2707)
(Mo : 919766554687)

काय आहेत कॉलेजची खास वैशिष्टये –

  • उच्च शिक्षित आणि अनुभवी शिक्षक
  • संपूर्ण पायाभूत सुविधा
  • स्मार्ट शिक्षण प्रणाली उपलब्ध (Diploma in Pharmacy Admission 2023)
  • मुलांना आणि मुलींना स्वतंत्र होस्टेलची सुविधा
  • डिजिटल क्लासरूम
  • डिजिटल लायब्ररी सुविधा

महत्वाची सूचना : वरीलपैकी कोणत्याही कॉलेजमध्ये कसल्याही प्रकारचे डोनेशन घेतले जात नाही.

येथे करा संपर्क :
7676305300/ 9766554687
वरील क्रमांकावर संपर्क करून आजच तुमचा प्रवेश निश्चित करा. मर्यादित प्रवेश उपलब्ध असल्याने प्रवेशासाठी घाई करा. तुमचे सर्व कागदपत्रे स्कॅन करून [email protected] या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : तुम्हाला पोहता येत असेल तर राज्याच्या ‘या’ महापालिकेत मिळेल नोकरीची संधी; त्वरा करा

Job Notification (75)

करिअरनामा ऑनलाईन । ठाणे महानगरपालिकेच्या जलतरण (Job Notification) तलाव विभागाकरीता नागरीकांना व सभासदानां पोहायला शिकविण्यासाठी एकूण ६ जलनिर्देशक / जलजिवरक्षक (१ महिला व ५ पुरूष जलनिर्देशक/जलजिवरक्षक) यांची तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पध्दतीने ०६ महिन्याकरिता करारान्वये नेमणूका करण्यात येणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2023 आहे.

संस्था – ठाणे महानगरपालिका, ठाणे
भरले जाणारे पद – जलनिर्देशक/जलजिवरक्षक
पद संख्या – 06 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 ऑगस्ट 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – नागरी सुविधा केंन्द्र, ठाणे महानगरपालिका, (मुख्यालय), तळमजला, पांचपाखाडी, ठाणे

नोकरी करण्याचे ठिकाण – ठाणे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मिळणारे वेतन – रुपये14,000/- दरमहा

असा करा अर्ज – (Job Notification)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. आवश्यक पात्रता धारण करणाऱ्या जलनिर्देशक/ जलजिवरक्षक यांनी जलतरण संबंधित अटी / शर्ती नमुद केलेल्या प्रमापत्राच्या प्रमाणित छायाकिंत प्रतीसह वरील संबंधित पत्यावर अर्ज सादर करायचे आहेत.
3. अर्ज करताना बंद लिफाफ्यावर ‘जलनिर्देशक/ जलजिवरक्षक म्हणुन नेमणुक करणेकरिता’ हा उल्लेख ठळक अक्षरात नमुद करावा.
4. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
5. मुदतीनंतर आलेल्या अर्जांचा विचार करण्यात येणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – thanecity.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com