Mahapareshan Recruitment 2023 : 10वी/ITI उत्तीर्णांसाठी महापारेषण अंतर्गत ‘या’ पदावर भरती; ऑनलाईन करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ (Mahapareshan Recruitment 2023) पारेषण कंपनी लिमिटेड, जळगाव अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) पदाच्या एकूण 37 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड, जळगाव
भरले जाणारे पद – शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)
पद संख्या – 37 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 ऑगस्ट 2023

वय मर्यादा – १८ ते ३० वर्षे (मागासवर्गीयांसाठी ०५ वर्ष शिथिलक्षम)
नोकरी करण्याचे ठिकाण – जळगाव
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परिक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औदयोगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री या व्यवसाय परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

मिळणारे वेतन – (Mahapareshan Recruitment 2023)
विद्यावेतन शासनाच्या नियमाप्रमाणे लागू होईल.
असा करा अर्ज –
१. वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
२. अर्ज करण्यापुर्वी (Mahapareshan Recruitment 2023) उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
३. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
४. उमेदवारांनी इयत्ता १० वी उत्तीर्णचे गुणपत्रक (Marksheet) व मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षांचा आयटीआय (वीजतंत्री) परिक्षा उत्तीर्ण केल्याचे सर्व सेमीस्टरचे एकत्रित गुणपत्रक, आधारकार्ड अपलोड करणे आवश्यक आहे.
५. अर्जदाराने महाराष्ट्र शासनाच्या www.apprenticeshipindia.org या वेबसाईवर नोंदणी करणे बंधन कारक आहे.  तसेच https://apprenticeshipindia.gov.inapprenticeship/opportunity या लिंकवरुन अर्ज सादर करणे अनिवार्य असेल.
६. दि. 14 ऑगस्ट 2023 नंतर ऑनलाईन नोंदणी केलेल्या उमेदवारांचा शिकाऊ उमेदवारी भरती प्रक्रियेसाठी कोणत्याही परिस्थितीत विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.mahatransco.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com