Railway Recruitment 2023 : भारतीय रेल्वेत तब्बल अडीच लाख पदे रिक्त!! केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची माहिती; जाणून घ्या कुठे आणि किती पदे रिक्त

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्या (Railway Recruitment 2023) तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेत नोकरीची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेत मोठ्या प्रमाणावर भरती होणार असल्याचे सांगितले आहे. त्यानुसार, रेल्वेच्या सर्वच विभागात सर्वच पदासाठी भरती प्रक्रिया होणार आहे. सेफ्टी स्टाफ, असिस्टंट स्टेशन मास्टर, नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगिरी, तिकीट कलेक्टर अशा पदासाठी लवकरच भरती होणार आहे. या संदर्भात लवकरच रेल्वेने भरतीसाठी तयार केलेल्या संकेतस्थळावर सूचना देण्यात येणार आहे.

किती आहेत रिक्त पदे?
भारतीय रेल्वेच्या (Indian Railway) सर्वच विभागात ग्रृप सी अंतर्गत 2,48,895 पदे रिक्त आहेत. तर ग्रुप A आणि B ची एकूण 2,070 पदे रिक्त आहेत. रेल्वे विभागाच्या माहितीनूसार, एकूण 2.4 लाख पदांसाठी लवकरच भरती प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. सेफ्टी स्टाफ, असिस्टंट स्टेशन मास्टर, नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगिरी, तिकीट कलेक्टर अशा पदासाठी भरती होणार आहे. या पदांना दोन मुख्य गटात विभाजीत करण्यात आले आहे. यामध्ये गॅझेटेड ग्रुप A आणि B पदांचा समावेश आहे. तर नॉन-गॅझिटेड पदांमध्ये ग्रुप क आणि D या पदांचा समावेश आहे.

रेल्वेमध्ये या पदांवर होणार भरती
1. ग्रुप A –
युपीएससीद्वारे आयोजीत परीक्षा, सिव्हिल सेवा परीक्षा, इंजिनिअरिंग सेवा परीक्षा आणि इतर परीक्षांच्या माध्यमातून या पदासाठी भरती प्रक्रिया (Railway Recruitment 2023) राबविण्यात येते.
2. ग्रुप B – ग्रुप बी पदांसाठी सेक्शन ऑफिसर्स ग्रेडच्या पदांचा समावेश होतो. रेल्वे कर्मचाऱ्यांकडून प्रतिनियुक्ती तत्त्वासाठी ग्रुप ‘सी’ चा पर्याय आहे.
3. ग्रुप C – या श्रेणीत स्टेशन मास्तर, तिकट कलेक्टर, क्लर्क, कमर्शियल अपरेंटिस, सेफ्टी स्टाफ, ट्रॅफिक अपरेन्टिस आणि विविध इंजिनिअरिंगची पदे (इलेक्ट्रिकल, सिग्नल आणि दूरसंचार, सिव्हिल, मॅकेनिकल) यांचा समावेश होतो.
4. ग्रुप D – ग्रुप डी मध्ये ट्रॅक-मॅन, हेल्पर, असिस्टेंट पॉईंट्स मॅन, स्वच्छता कामगार, गनमॅन, चपराशी, तसेच अन्य पदांचा समावेश आहे.

कसा करायचा अर्ज (Railway Recruitment 2023)
1. भारतीय रेल्वेची अधिकृत वेबसाईट Indianrailways.gov.in वर जा.
2. तुमचे राज्य, विभागाचा पर्याय निवडा.
3. कोणता खास विभाग, डिपार्टमेंट हवे आहे, याची निवड करा.
4. रिक्रूटमेंट सेक्शन बघा. त्यातील सूचना बारकाईने वाचा.
5. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पर्याय निवडा. तो व्यवस्थित भरा.
6. रेल्वेतील नोकरीसाठी अर्ज करताना आधार कार्ड बंधनकारक आहे.
7. त्या त्या पदासाठी आवश्यक शुल्क भरा. Submit बटणावर क्लिक करा.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com