Home Blog Page 266

NPCIL Reruitment 2023 : देशाच्या न्युक्लीयर पॉवर कार्पोरेशनमध्ये होणार नवीन उमेदवारांची निवड; दरमहा 67,700 पगार

NPCIL Reruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । न्युक्लीयर पॉवर कार्पोरेशन (NPCIL Reruitment 2023) ऑफ इंडिया अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी (विशेषज्ञ), वैद्यकीय अधिकारी (GDMO) पदाच्या एकूण 21 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2023 आहे.

संस्था – न्युक्लीयर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया
भरले जाणारे पद –
1. वैद्यकीय अधिकारी (विशेषज्ञ) – 11 पदे
2. वैद्यकीय अधिकारी (GDMO) – 10 पदे
पद संख्या – 21 पदे (NPCIL Reruitment 2023)
वय मर्यादा – 35 ते 40 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 ऑगस्ट 2023
मिळणारे वेतन –
1. वैद्यकीय अधिकारी (विशेषज्ञ) – Rs. 67,700/- दरमहा
2. वैद्यकीय अधिकारी (GDMO) – Rs.56,100/- दरमहा

असा करा अर्ज – (NPCIL Reruitment 2023)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन अर्ज करू शकतात.
3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2023 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.npcil.nic.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Scholarships for Higher Education : त्वरा करा!! सरकार देतंय उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती; अर्ज करण्यासाठी उद्या शेवटची तारीख 

Scholarships for Higher Education

करिअरनामा ऑनलाईन । शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण (Scholarships for Higher Education) विभागातर्फे खुल्या प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. या योजनेअंतर्गत पदव्युत्तर पदवी व पदव्युत्तर पदविका या विभागाअंतर्गत १० तर डॉक्टरेट विभागाअंतर्गत १० अशा एकूण २० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. त्यासाठी रविवार दि. १३ ऑगस्‍टपर्यंत अर्ज सादर करण्‍याची मुदत देण्यात आली आहे.

शिष्यवृत्तीच्या एकूण जागांपैकी ३० टक्के जागांवर मुलींची निवड करण्यात येईल. २०२३-२०२४ या वर्षासाठी विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात असून अर्जासाठी १२ जुलै ही अंतिम मुदत होती. त्यात आता १३ ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे. राज्यातील खुल्या (Scholarships for Higher Education) प्रवर्गातील ज्या गुणवंत विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर पदविका, पदव्युत्तर पदवी व पीएचडी अभ्यासक्रमासाठी परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेतला असेल, अशा विद्यार्थ्यांकरीता ही शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्‍यांच्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न ८ लाखांपेक्षा जास्त नसावे. उमेदवारांनी उच्‍च व तंत्रशिक्षण विभागाच्‍या संकेतस्थळावर अर्ज भरावा, असे आवाहन करण्‍यात आले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Success Story : पोळपाट लाटणं विकली, वाडपी बनून काम केलं; अखेर संघर्ष करुन महाराष्ट्र पोलीस झालाच

Success Story of Keval katari

करिअरनामा ऑनलाईन । अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर (Success Story) येथे राहणाऱ्या केवल दारासिंग कतारी याची ही प्रेरणादायी कहाणी आहे. आता तो महाराष्ट्र पोलीस दलात पोलिस पदावर रुजू  होणार आहे. मार्गातील अनेक अडथळे पार करत त्याने हे यश मिळवलं आहे. त्याच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच. पण त्याने हार मानली नाही. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्याने प्रसंगी आई वडिलांसोबत पोळपाट लाटणं विकलं. एव्हढंच नव्हे तर कॉलेज शिकता शिकता लग्न समारंभात वाडपी म्हणूनही काम केलं. केवल हा संगमनगरच्या संजय गांधी झोपडपट्टीत राहतो. त्याचे आई वडिल पोळपाट-लाटणे बनवण्याचे काम करतात. जत्रेत किंवा आठवडी बाजारात माल विकण्यासाठी जातात. केवल देखील त्यांच्यासोबत माल विकण्यासाठी जात असे.

अपयशाकडून यशाकडे वाटचाल
केवलच्या घरी 3 भाऊ, 2 बहिणी आणि आई-वडील असा परिवार आहे. यामध्ये केवल हा सर्वात लहान मुलगा आहे. घरच्या परिस्थितीमुळे त्याचे अभ्यासात मन रमत नव्हते. तो घराजवळील सिद्धार्थ महाविद्यालयात शिक्षण घेत होता. केवल 2008 ला दहावी नापास झाला. ऑक्टोबरच्या परीक्षेला पुन्हा बसला पण पुन्हा नापास झाला. त्यानंतर पाच वर्षानी 2013 ला त्याने दहावीची परीक्षा दिली. त्यामध्ये तो पास झाला. घरची परिस्थिती अगदी बेताची होती. तो त्याच्या आई वडिलांना लाटणे, पोळपाट, चौरंग बनवायला मदत करायचा. घरातले (Success Story) दोन भाऊ आणि आई वडिल असे सर्व मिळून हे काम करायचे. आता मागे हटायचं नाही हे त्याने ठरवलं आणि अकरावीला खूप मेहनत घेऊन त्याने 78 टक्के मिळवले.  इयत्ता 11 वी आणि 12 वीला श्रमिक महाविद्यालय संगमनेर मधून दोन्हीवेळेस तो मुलांमधून पहिला आला. अकरावीला भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेत राज्यातून दुसरा आला. 12 वीमध्ये देखील विविध स्पर्धांमध्ये त्याने पहिला क्रमांक पटकावला. मतदान जनजागृती स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून त्याने तिसरा क्रमांक मिळवला. बारावी बो च्या परिक्षेत त्याला 76 टक्के गुण मिळाले.

बारमध्ये वेटरचे काम केले
दरम्यान त्याने पोलीस भरती (Police Bharti) परीक्षेची तयारी सुरु केली. 2018 ला पहिली पोलीस भरतीची परीक्षा दिली. त्यावेळी 176 चा कट ऑफ लागला पण त्याला 170 गुण मिळाले होते. परीक्षेत यश मिळाले नाही पण परीक्षेचे स्वरुप आणि अभ्यासक्रम काय असतं हे त्याला समजलं होतं. त्याने 2019 मध्ये पूर्ण तयारी केली पण तेव्हा लॉकडाऊन लागला. त्यानंतर त्याने अभ्यास बंद केला आणि बियर बारमध्ये वेटरचे काम केले. लहानपणापासून तो लग्न समारंभात वाडपीचे काम करत आला आहे.

अशी केली पोलिस भरतीची तयारी (Success Story)
लॉकडाऊनमुळे 2019 ची भरती 2021 ला झाली. शेवटचे 3 महिने अभ्यासाला मिळाले. त्यावेळी पेपर कठीण गेला. लेखी परीक्षेत 68 गुण मिळाले. पण मेरीट 74 ला बंद झाली. दरम्यान जानेवारी 2022 पूर्णपणे अभ्यासावर लक्ष केंद्रीत केलं. सकाळी उठून मैदानी सराव, त्यानंतर दुपारी क्लास, संध्याकाळी अभ्यास आणि रात्री त्याला लाटणी पोळपाट बनवण्याच्या कामावर लक्ष द्यावे लागायचे.
हे काम पूर्ण बंद करुन त्याने पोलीस भरतीच्या (Police Bharti) अभ्यासावर लक्ष दिलं. सप्टेंबरमध्ये पोलीस भरती निघाली. त्यावेळी त्याने फॉर्म भरला. नगरपालिकेच्या लायब्ररीत अभ्यास करण्याचा निर्णय घेतला; पण तेथे भरायला पैसे नव्हते म्हणून लायब्ररीतून त्याला प्रवेश नाकारला गेला. केवल रात्री 3 वाजेयपर्यंत अभ्यास करायचा. हाती घेतलेला विषय पूर्ण वाचून झाल्याशिवाय तो पुस्तक खाली ठेवायचा नाही. घरुन 10 रुपये घेऊन अभ्यासाला बाहेर पडायचा. त्यात 2 बिस्किट पुडे घेऊन जायचा (Success Story) आणि तोच नाश्ता म्हणून खायचा. या परिक्षेत त्याला मैदानी चाचणीत 36 आणि लेखी परिक्षेत 81 असे एकूण 117 गुण मिळाले आहेत.

‘हे यश आईचं…’
“पोलिस भरती परीक्षेच्या निकालादिवशी संध्याकाळी 7 वाजता पास उमेदवारांची यादी जाहीर झाली. माझ्या एका मित्राने फोनवरुन माझं नाव यादीमध्ये आलं आहे असं सांगितलं. ही बातमी आईला सांगितल्यानंतर तिला हसू की रडू हे कळत नव्हते. पोलीस भरतीची तयारी करताना माझ्यावर कोणाला विश्वास नव्हता. पण मी सगळ्यांकडे दुर्लक्ष केलं आणि मेहनत करत राहीलो. आईने वेळप्रसंगी वडिलांशी भांडण करुन मला अभ्यासाला प्रोत्साहन दिले. त्यामुळे या यशाचे श्रेय आईला जाते;” असे केवल सांगतो.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

YCMOU MBA Admission 2023 : मुक्‍त विद्यापीठाची MBA प्रवेश प्रक्रिया सुरु; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज; पहा वेळापत्रक

YCMOU MBA Admission 2023

करिअरनामा ऑनलाईन । यशवंतराव चव्‍हाण (YCMOU MBA Admission 2023) महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठातर्फे MBA अभ्यासक्रम २०२३-२४ च्‍या प्रवेश प्रक्रियेला सुरवात झाली आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेतून पात्रता मिळवत प्रथम वर्षात प्रवेश घेता येईल. प्रवेश परीक्षेच्‍या नोंदणीची मुदत २९ ऑगस्‍टपर्यंत असून, ३० ऑगस्‍टपूर्वी नोंदणीकृत विद्यार्थ्यांना त्‍यांच्‍या सवडीनुसार ऑनलाईन प्रवेश परीक्षा देता येईल. अभ्यासक्रमाच्‍या प्रवेशासाठी शैक्षणिक पात्रतेची अट पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.

राज्‍यस्‍तरावर विस्‍तार असलेल्‍या या विद्यापीठातून MBAचे शिक्षण घेण्याची संधी राज्‍यभरातील विद्यार्थ्यांना उपलब्‍ध आहे. MBAला प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा बंधनकारक आहे. ऑनलाइन पद्धतीने घेतल्‍या जाणाऱ्या या प्रवेशप्रक्रियेत यशस्‍वी विद्यार्थ्यांना प्रवेश निश्‍चित करता येणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्‍या पोर्टलवर ऑनलाइन प्रवेश परीक्षा अर्ज व शुल्‍क भरावयाचे असून, नोंदणीकृत विद्यार्थ्यांना सराव परीक्षा देता येईल. त्‍यानंतर मुख्य प्रवेश परीक्षा देता येईल.

प्रवेश प्रक्रियेचं स्वरुप असं असेल (YCMOU MBA Admission 2023)
1. प्रवेश परीक्षेत पात्र झालेल्‍या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्‍या संकेतस्‍थळावरून प्रवेश पर्यायाद्वारे प्रवेश निश्‍चितीची प्रक्रिया पूर्ण करावी.
2. ऑनलाइन प्रवेश अर्ज भरताना शिक्षणक्रम आणि अभ्यास केंद्र तसेच विषयांची निवड करून शुल्‍क ऑनलाइन पद्धतीने भरावयाचे आहे.
प्रवेश अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्‍यानंतर मुख्यालयातील नोंदणी कक्षाशी संपर्क साधून आपली पात्रता तपासून घ्यावी. त्‍यानंतरच प्रथम वर्षाचा प्रवेश निश्‍चित झाला, असे समजण्यात येईल. प्रवेश परीक्षेत पात्र नसलेल्‍या विद्यार्थ्यांना पुन्‍हा नोंदणी करून परीक्षेला सामोरे जाता येईल, असेही विद्यापीठाने स्‍पष्ट केले आहे.

काही महत्वाच्या तारखा –
 1. प्रवेश परीक्षेच्‍या नोंदणीची मुदत : 29 ऑगस्ट 2023
2. ऑनलाइन परीक्षा देण्याची मुदत : 30 ऑगस्‍ट 2023
3. प्रवेश निश्‍चितीची मुदत : 31 ऑगस्‍ट 2023
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

An Officer’s village in Maharashtra : हे आहे महाराष्ट्रातील ‘अधिकाऱ्याचं गाव’; इथे आहेत 75 घरे अन् 50 पेक्षा जास्त सरकारी अधिकारी 

An Officer's village in Maharashtra

करिअरनामा ऑनलाईन | गाव म्हटलं की (An Officer’s village in Maharashtra) आपल्या डोळ्यासमोर उभं राहणारं चित्र म्हणजे हिरवीगार शेतं, झुळझुळ वाहणाऱ्या नद्या, पक्षांचा किलबिलाट आणि मातीची घरं. प्रत्येक गावाचं काही ना काहीतरी वैशिष्ट्य असतं. कोणी एका मंदिरासाठी प्रसिद्ध असतं तर कुठलं एक गाव विशेष कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तीमुळे ओळखलं जातं. आज आपण ज्या गावाबद्दल माहिती घेणार आहोत ते मात्र या सगळ्यांपेक्षा फारच वेगळे आहे. हे कुणा एक-दोन माणसांसाठी प्रसिद्ध नसून गावातील अनेक मंडळीमुळे प्रसिद्ध झालं आहे. तर हे गाव नेमकं कुठलं? आणि काय आहे त्याची खासियत? चला जाणून घेऊया…

An Officer's village in Maharashtra

अधिकाऱ्यांचं गाव : सानपवाडी
महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात, पैठण तालुक्यात सानपवाडी नावाचं एक गाव आहे. या गावाची विशेषता म्हणजे हे गाव तिथल्या सरकारी नोकरदारांसाठी प्रसिद्ध आहे. या गावात केवळ ७५ घरं असून त्या घरातील ५० पेक्षा जास्त मुलं वेगवेगळ्या सरकारी नोकऱ्या करतात. या गावाची एकूण लोकसंख्या ही ४०० आहे. या सरकारी अधिकाऱ्यांपैकी एक उपविभागीय अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक, 23 पोलीस कर्मचारी, 5 शिक्षक तर 6 जणं हे भारतीय सैन्य दलात काम करतात.
या व्यतिरिक्त इथे 5 इंजिनियर्स आणि 6 डॉक्टर्स देखील आहेत. गावाला प्राप्त झालेल्या शैक्षणिक उंचीमुळे त्याला ‘अधिकाऱ्यांचं गाव’ म्हणून ओळखलं जातं. गावातील रहिवासी म्हणतात की अनेक वर्षांपासून अधिकारी होण्याची परंपरा या गावात चालत आली आहे. मग शिक्षण घेणारा विद्यार्थी मुलगा आहे की मुलगी असा भेदभाव इथे केला जात नाही. गावातील रहिवासी प्रत्येक विद्यार्थ्याच्या कर्तृत्वावर तेवढाच आनंद व्यक्त करतात. गावातील प्रत्येकालाच आपल्या शिक्षित गावाचा अभिमान वाटतो.

An Officer's village in Maharashtra

कशामुळे गाव झालं शिक्षण संपन्न? (An Officer’s village in Maharashtra)
सानपवडी या गावात प्रार्थमिक शाळेपासूनच मुलांना स्पर्धा परीक्षेत सहभागी होण्याची प्रेरणा दिली जाते. तसेच इथल्या शाळांमधून अनेक वेळा प्रश्नमंजुषेसारख्या स्पर्धा घेतल्या जातात. या स्पर्धा अनेक वेळा जिल्हा व तालुका पातळीवर देखील भरवल्या जातात. शाळेतील शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना अशा शैक्षणिक आवाहनांसाठी लहानपणापासूनच घडवत असतात. त्यामुळे येथील विद्यार्थी देखील अथक परिश्रम घेत यश मिळवतात. लहानपणापासूनच स्पर्धात्मक आव्हानांची सवय असल्यामुळे या गावातील विद्यार्थी अगदी सोप्या तऱ्हेने स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करून दाखवतात. आपल्या आधी यश मिळालेल्या अधिकाऱ्यांकडून प्रेरणा घेत आजही इथले विद्यार्थी परिश्रम घेत आहेत त्यामुळे ‘अधिकाऱ्यांचं गाव’ हे नाव या गावासाठी योग्यच वाटतं.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ISRO Recruitment 2023 : 10वी पास उमेदवारांना ISRO देणार नोकरी; मिळवा सरकारी नोकरीसह भरघोस पगार!!

ISRO Recruitment 2023 (3)

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO Recruitment 2023) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून तंत्रज्ञ, ड्राफ्ट्समन पदांच्या एकूण 35 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2023 आहे.

संस्था – भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Indian Space Research Organisation)
भरले जाणारे पद –
1. तंत्रज्ञ – 34 पदे
2. ड्राफ्ट्समन – 1 पद
पद संख्या – 35 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑगस्ट 2023
वय मर्यादा – 18 ते 35 वर्षे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (ISRO Recruitment 2023)
1. तंत्रज्ञ – 10th, ITI/NTC/NAC in relevant field
2. ड्राफ्ट्समन – 10th, ITI/NTC/NAC in relevant field
मिळणारे वेतन –
1. तंत्रज्ञ – ₹21,700 ते ₹69,100 दरमहा
2. ड्राफ्ट्समन – ₹21,700 ते ₹69,100 दरमहा

असा करा अर्ज –
1. अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे.
2. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करू शकतात.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. ऑनलाइन अर्जामध्ये प्राप्त झालेला डेटा अंतिम मानला जाईल. अर्ज सादर केल्यानंतर कोणताही बदल करता येणार नाही.
5. उमेदवारांसाठी अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे.

काही महत्वाच्या तारखा –

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 

 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
ऑनलाईन नोंदणी करा – https://shorturl.at/EFUVW
अधिकृत वेबसाईट – https://www.isro.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Oil India Recruitment 2023 : ऑईल इंडिया लिमिटेड अंतर्गत ‘ही’ पदे रिक्त; इथे करा E-Mail

Oil India Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । ऑईल इंडिया लिमिटेड अंतर्गत (Oil India Recruitment 2023) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून डोमेन एक्सपर्ट पदांच्या एकूण 55 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 सप्टेंबर 2023 आहे.

संस्था – ऑईल इंडिया लिमिटेड
भरले जाणारे पद – डोमेन एक्सपर्ट
पद संख्या – 55 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन (E-Mail)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 सप्टेंबर 2023

वय मर्यादा – 60 ते 65 वर्षे
E-Mail ID – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 सप्टेंबर 2023

Department Name and No. of Posts

Department Name No of Posts
Geology 12
Geology/ Geophysics 5
Geophysics 12
Reservoir 5
Reservoir/ Chemical 1
Chemical 3
Drilling 10
Production 6
Mechanical 1

मिळणारे वेतन –

असा करा अर्ज –
1. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (ई-मेल ) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या ई-मेल पत्यावर पाठवावा.
3. अर्जासोबत आवश्यक (Oil India Recruitment 2023) कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
4. योग्य स्वरूपाशिवाय आणि पात्रतेच्या आधारे कागदपत्रांशिवाय अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 सप्टेंबर 2023 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – (Oil India Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.oil-india.com
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BEL Recruitment 2023 : पुण्यात सरकारी नोकरी!! BEL अंतर्गत ‘या’ पदांवर भरती; पात्रता इंजिनिअरिंग/MBA

BEL Recruitment 2023 (6)

करिअरनामा ऑनलाईन । भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, पुणे अंतर्गत (BEL Recruitment 2023) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अभियांत्रिकी सहाय्यक, तंत्रज्ञ, प्रशिक्षणार्थी अधिकारी- I पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 आणि 25 ऑगस्ट 2023 (पदांनुसार) आहे.

संस्था – भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, पुणे
भरले जाणारे पद – 
1. अभियांत्रिकी सहाय्यक – 04 पदे
2. तंत्रज्ञ – 06 पदे
3. प्रशिक्षणार्थी अधिकारी I – 01 पद
पद संख्या – 11 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 आणि 25 ऑगस्ट 2023 (पदांनुसार)

नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
वय मर्यादा – 28 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखत

पदाचे नाव  आवश्यक शैक्षणिक पात्रता
1. अभियांत्रिकी सहाय्यक Diploma in Engineering of a recognised institution of at least 3 years duration in the relevant subject
2. तंत्रज्ञ SSLC+ITI+ One year apprenticeship, National Apprenticeship Certificate in the relevant Trade.
3. प्रशिक्षणार्थी अधिकारी- I MBA Finance/CA/CMA from recognized University / Institution/Institute Minimum percentage of marks qualifying examination

 

मिळणारे वेतन –

पदाचे नाव वेतन
अभियांत्रिकी सहाय्यक Grade: WG-VII / CP-VI Pay Sale: Rs.24,500- 3% – Rs.90,000/- + admissible allowances CTC : Rs.6.78 Lakhs (approx.)
तंत्रज्ञ Grade: WG-IV / CP-V Pay Sale: Rs.21,500/- 3% – Rs.82,000/- + admissible allowances CTC : Rs.6.02 Lakhs (approx.)
प्रशिक्षणार्थी अधिकारी- I
  • 1st Year  – I Rs. 30,000 /- PM
  • 2nd Year – II Rs. 35,000/- PM
  • 3rd Year – III Rs. 40,000/- PM

 

असा करा अर्ज – (BEL Recruitment 2023)
1. उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करायचा आहे.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. अर्ज शुल्क पाठवण्यापूर्वी आणि अर्ज सबमिट करण्यापूर्वी उमेदवार सर्व सूचना आणि पात्रता निकष काळजीपूर्वक पार पाडू शकतात. एकदा भरलेले शुल्क परत केले जाणार नाही.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 आणि 25 ऑगस्ट 2023 (पदांनुसार ) आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
PDF जाहिरात I
PDF जाहिरात II
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – bel-india.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Krishi Sevak Bharti Syllabus 2023 : असं आहे कृषी सेवक भरती परीक्षेचे स्वरुप आणि अभ्यासक्रम; इथे आहे संपूर्ण माहिती

Krishi Sevak Bharti Syllabus 2023

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र कृषी (Krishi Sevak Bharti Syllabus 2023) विभाग ‘कृषी सेवक’ परीक्षेची तयारी करताना परीक्षेचे टप्पे, परीक्षेचा अभ्यासक्रम, पुस्तकांची यादी इत्यादी माहिती असणे आवश्यक आहे. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी महाराष्ट्र कृषी विभाग परीक्षेचा अभ्यासक्रम PDF स्वरूपात घेऊन आलो आहोत. या लेखात महाराष्ट्र कृषी विभाग कृषी सेवक परीक्षेचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. महाराष्ट्र कृषी विभाग परीक्षेचा विषयनिहाय अभ्यासक्रम, तपशीलवार गुण, परीक्षेचा कालावधी याबद्दल अधिक माहितीसाठी खाली दिलेली आहे.

महाराष्ट्र कृषी विभागाने कृषी सेवक या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज http://krishi.maharashtra.gov.in/ या वेबसाइटद्वारे ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कृषी विभाग महाराष्ट्र भर्ती मंडळ, महाराष्ट्र द्वारे जुलै 2023 च्या जाहिरातीत एकूण 2070 रिक्त पदांची घोषणा केली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी तपशीलवार जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचायची आहे. जुलै 2023 पासून शेवटच्या आठवड्यात अर्जदार या कृषी सेवक भारती 2023 साठी अर्ज करू शकतात.

महाराष्ट्र कृषी विभाग परीक्षेचा विषयनिहाय अभ्यासक्रम, तपशीलवार गुण, परीक्षेचा कालावधी याबद्दल सविस्तर जाणून घ्या (PDF) – https://krishi.maharashtra.gov.in/Site/Upload/GR/Syllabus%202023%20Agri%20Asst.pdf

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Talathi Bharti Hall Ticket 2023 : तलाठी भरती हाॅल तिकीट कसं डाऊनलोड करायचं? इथे आहे लिंक

Talathi Bharti Hall Ticket 2023

करिअरनामा ऑनलाईन ।भूमी अभिलेख (Talathi Bharti Hall Ticket 2023) विभागाच्यावतीने तलाठी (गट-क) या पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक आणि तारखा जाहीर झाल्या आहेत. ही परीक्षा दि. १७ ऑगस्ट ते १४ सष्टेंबर २०२३ या कालावधीत होणार आहे. प्रशासनाकडून या परीक्षेची तयारी पूर्ण झाली असून पात्र उमेदवारांना परीक्षा केंद्राचे नाव किमान दहा दिवस आधी कळविण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी हॉल तिकिट 17 ऑगस्ट 2023 पासून डाउनलोड केले जाऊ शकते. हॉल टिकिट डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांनी https://mahabhumi.gov.in/mahabhumilink या वेबसाइटला भेट द्यायची आहे.

ही परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरुपाची असेल. परीक्षेमध्ये 100 प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नाला एक गुण असेल. परीक्षेसाठी 2 तासाचा  कालावधी देण्यात आला आहे. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांना 50% गुण मिळवणे आवश्यक आहे. परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवड केली जाईल.
महसूल विभागात तलाठी पद हे एक महत्त्वाचे पद आहे. या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना ग्रामपंचायत आणि पंचायत समितीच्या कामकाजात सहभागी (Talathi Bharti Hall Ticket 2023) व्हावे लागते. तलाठी पद हे करिअरसाठी चांगला पर्याय आहे. या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना चांगले वेतन आणि भत्ते मिळतात. त्यांना चांगल्या कामाच्या संधीही मिळतात.

हॉल टिकिट डाउनलोड करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा (Talathi Bharti Hall Ticket 2023)
1. अर्जदार उमेदवारांनी सर्वप्रथम https://mahabhumi.gov.in/mahabhumilink या वेबसाईटला भेट द्यायची आहे.
2. होमपेजवर, ‘तलाठी भरती हॉल तिकिट डाउनलोड करा’ लिंकवर क्लिक करा.
3. तुमचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारखेचा वापर करून लॉग इन करा.
4. तुमचे हॉल तिकिट स्क्रीनवर प्रदर्शित होईल.
5. आता तुमचे हॉल तिकिट डाउनलोड करण्यासाठी, Download बटणावर क्लिक करा.
6. तुमच्या हॉल तिकिटची कागदावर प्रिंट करा आणि परीक्षा केंद्रावर घेऊन जा.
तुम्हाला हॉल तिकिट डाउनलोड करताना काही अडचण येत असल्यास, तुम्ही mahabharti.gov.in या वेबसाइटवर संपर्क साधू शकता.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com