Home Blog Page 250

GK Updates : 1 वर्षात किती तास असतात? जगात किती धर्म आहेत? स्पर्धा परिक्षेत विचारतात असे गोंधळात टाकणारे प्रश्न 

GK Updates 10 Sep.

करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न 1- आपल्याला दोन डोळे आहेत, मग (GK Updates) आपल्याला एकावेळी एकच गोष्ट का दिसते?
उत्तर – आपण गोष्टी डोळ्यांनी पाहत नाही तर मनाने पाहतो. प्रथम दोन्ही डोळे एकाच गोष्टीला लक्ष्य करतात, त्यानंतर त्या वस्तूचे अस्पष्ट चित्र तयार होते, त्यानंतर मेंदू ती वस्तू योग्य स्वरूपात दाखवतो.
प्रश्न 2- अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुमच्यासाठी आहेत पण इतरही वापरतात?
उत्तर – व्यक्तीचे नाव, कोणत्याही व्यक्तीचे नाव बहुतेकदा इतर लोक जास्त वापरतात.
प्रश्न 3 (GK Updates) जगात किती धर्म आहेत?
उत्तर – हिंदू, जैन, बौद्ध, ख्रिश्चन, इस्लाम आणि शीख हे सर्वात लोकप्रिय 5 धर्म आहेत परंतु जगात 300 पेक्षा जास्त धर्म आहेत आणि 12 विशेष धर्म आहेत.

प्रश्न 4- 01 वर्षात किती तास असतात?
उत्तर – 8760 तास
प्रश्न 5 – 01 महिन्यात किती तास असतात?
उत्तर – 730.01 तास
प्रश्न 6- हत्ती आपल्या सोंडेत एकावेळी (GK Updates) किती पाणी धरू शकतो?
उत्तर – 5 लिटर.
प्रश्न 7- अशी कोणती गोष्ट आहे जी महिन्यातून एकदा येते आणि 24 तास पूर्ण करून निघून जाते?
उत्तर – तारीख
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MRVC Recruitment 2023 : थेट द्या मुलाखत; इंजिनियर्सची मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनमध्ये होणार नवीन भरती 

MRVC Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. मार्फत (MRVC Recruitment 2023) भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखत दिनांक 25 ते 29 सप्टेंबर 2023 रोजी होणार आहे.

संस्था – मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि.
भरले जाणारे पद – प्रकल्प अभियंता / Project Engineer
पद संख्या – 20 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
01) मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 60% गुणांसह स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा समकक्ष शिक्षण घेतले असणे आवश्यक.

परीक्षा फी – फी नाही
मिळणारे वेतन – 40,000/- रुपये ते 1,40,000/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक – 25 ते 29 सप्टेंबर 2023
मुलाखतीचे ठिकाण (MRVC Recruitment 2023) Mumbai Railway Vikas Corporation Ltd, 2nd Floor, Churchgate Station Building, Churchgate, Mumbai-400020.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – mrvc.indianrailways.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NHAI Recruitment 2023 : ग्रॅज्युएट/डिग्री धारकांसाठी नोकरीची संधी!! भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात ‘ही’ पदे रिक्त 

NHAI Recruitment 2023 (2)

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय राष्ट्रीय महामार्ग (NHAI Recruitment 2023) प्राधिकरण अंतर्गत व्यवस्थापक (राजभाषा), व्यवस्थापक (कायदेशीर), GIS इंटर्न पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2023 आहे.

संस्था – भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
भरले जाणारे पद – व्यवस्थापक (राजभाषा), व्यवस्थापक (कायदेशीर), GIS इंटर्न
पद संख्या – 08 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 सप्टेंबर 2023
भरतीचा तपशील – (NHAI Recruitment 2023)

पद पद संख्या 
GIS इंटर्न 05 पदे
व्यवस्थापक (राजभाषा) 01 पद
व्यवस्थापक (कायदेशीर) 02 पदे

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद  आवश्यक शैक्षणिक पात्रता
GIS इंटर्न i) Students studying in the final year or completed the Graduation / Post Graduation during the
Academic year 2022-23 in Geo-Informatics/Remote Sensing from any recognized University / Institution.
ii) Should have obtained overall 70% marks or equivalent grade in all the previous yearly / semester examination with no backlogs (reappearance) of any subjects.
व्यवस्थापक (राजभाषा) Master’s degree of a recognized University or equivalent in Hindi with English as a subject at the degree level;
व्यवस्थापक (कायदेशीर) Degree in Law from a recognized University / Institute

 

मिळणारे वेतन –

पद निळणारे वेतन
GIS इंटर्न The interns engaged shall be paid stipend at the rate of Rs.10,000/- per month to under-graduate students and Rs.15,000/- per month to post-graduate students
व्यवस्थापक (राजभाषा) PB-3 (Rs.15600 –39100) with Grade Pay Rs.6600/- (equivalent to Level 11 in Pay Matrix as per 7 th CPC].
व्यवस्थापक (कायदेशीर) PB-3 (Rs.15600 –39100) with Grade Pay Rs.6600/- (equivalent to Level 11 in Pay Matrix as per 7 th CPC].


असा करा अर्ज –

1. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत. (NHAI Recruitment 2023)
3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
4. अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
5. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2023 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – (NHAI Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
PDF जाहिरात 1 (GIS इंटर्न) – PDF
PDF जाहिरात 2 (व्यवस्थापक) – PDF 
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा –
ऑनलाईन अर्ज करा (GIS इंटर्न) – APPLY
ऑनलाईन अर्ज करा (व्यवस्थापक) – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://nhai.gov.in/#/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

AIATSL Recruitment 2023 : 10 वी पाससाठी बंपर जॉब ओपनिंग!! AI एअरपोर्ट सर्विसेस मध्ये 998 पदांवर होणार भरती

AIATSL Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस (AIATSL Recruitment 2023) लिमिटेड अंतर्गत हँडीमन, युटिलिटी एजंट पदांच्या 998 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2023 आहे.

संस्था – एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AI Airport Services Limited)
भरले जाणारे पद – हँडीमन, युटिलिटी एजंट
पद संख्या – 998 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 सप्टेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – एचआरडी विभाग, एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड, जीएसडी कॉम्प्लेक्स, सहार पोलीस स्टेशनजवळ, सीएसएमआय विमानतळ, टर्मिनल-2, गेट नंबर 5, सहार, अंधेरी-पूर्व, मुंबई-400099

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – (AIATSL Recruitment 2023)
GEN: 28 Years
OBC: 31 Years
SC/ST: 33 Years
अर्ज फी – रु. 500/-

भरतीचा तपशील –

पद पद संख्या
हँडीमन 971 पदे
युटिलिटी एजंट 27 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
पद  आवश्यक शैक्षणिक पात्रता
हँडीमन
  • SSC /10th Standard Pass.
  • Must be able to read and understand English Language.
  • Knowledge of Local and Hindi Languages, i.e., ability to understand and speak is desirable
युटिलिटी एजंट
  • SSC /10th Standard Pass.
  • Knowledge of Local and Hindi Languages, i.e., ability to understand and speak is desirable.


मिळणारे वेतन –

पद  मिळणारे वेतन 
हँडीमन Rs. 21,330/-
युटिलिटी एजंट Rs. 21,330/-

असा करा अर्ज –
1. या पदाकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. ऑफलाईन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी वरील (AIATSL Recruitment 2023) दिलेल्या संबंधित पत्त्यावर दिलेल्या वेळेच्या आत अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2023 आहे.
5. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.aiasl.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MPSC Recruitment 2023 : PSI होण्याचे स्वप्न पूर्ण होणार!! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने काढली जाहिरात; एकूण 615 पदे

MPSC Recruitment 2023 (8)

करिअरनामा ऑनलाईन । स्पर्धा परीक्षा देवून PSI होण्याचे (MPSC Recruitment 2023) स्वप्न बाळगणाऱ्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे.  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मोठी भरती जाहीर केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक (विभागीय) पदांसाठी भरती प्रक्रिया राबावली जात आहे. याद्वारे राज्यामध्ये 615 पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी लवकरच परीक्षाही घेतली जाणार आहे. या भरतीसाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 ऑक्टोबर 2023 आहे.

आयोग – महाराष्ट्र लोकसेवा आयोग
परीक्षेचे नाव – MPSC PSI मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2023
भरले जाणारे पद – पोलिस उपनिरीक्षक
पद संख्या – 615 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 ऑक्टोबर 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – महाराष्ट्र

अर्ज फी –
अमागास – रु. 844/-
मागासवर्गीय- रु. 544/-
वय मर्यादा –
खुल्या प्रवर्गासाठी – 35 वर्षे
मागासवर्गीय/ अनाथ – 40 वर्षे

काही महत्वाच्या तारखा – (MPSC Recruitment 2023)
MPSC PSI Date

आवश्यक शैक्षणिक पात्रता – 

पद  आवश्यक शैक्षणिक पात्रता
MPSC PSI मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2023 महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अखत्यारीतील सध्या कार्यरत सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक व पोलीस शिपाई या संवर्गातील कर्मचारीच प्रस्तुत परीक्षेस पात्र असतील

मिळणारे वेतन –

पद  मिणारे वेतन 
MPSC PSI मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2023 38,000/-  to 1,22,800/-

काही महत्वाच्या सूचना –
1. अर्ज फक्त आयोगाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे स्वीकारले जातिल.
2. अर्ज https://mpsconline.gov.in संकेतस्थळावर सादर करावे.
3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
4. परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतले जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स –
1. आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीवर नोंदणी करावी.
2. अर्ज सुरू होण्याची तारीख 11 सप्टेंबर 2023 आहे.
3. नोंदणी केल्यानंतर खाते तयार केलेले असल्याचे व ते अध्यायात करण्याची आवश्यकता असल्यास ते करावे.
4. विहित कालावधीत तसेच (MPSC Recruitment 2023) विहित पद्धतीने आवशक कागदतपत्रे अपलोड करून अर्ज सादर करावा.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 ऑक्टोबर 2023 आहे.
6. परीक्षा शुल्काचा भरणा विहित पद्धतीने करावा.

अशी होणार परीक्षा –
प्रस्तुत परीक्षा खालील तीन टप्यांमध्ये घेण्यात येईल:-
(१) पूर्व परीक्षा – १०० गुण
(२) मुख्य परीक्षा – ३०० गुण
(३) शारीरिक चाचणी – १०० गुण

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : ग्रॅज्युएट्ससाठी राज्याच्या ‘या’ बँकेत निघाली भरतीची जाहिरात; लगेच करा APPLY

Job Alert (53)

करिअरनामा ऑनलाईन । गांधीबाग सहकारी बँक लिमिटेड, नागपूर (Job Alert) अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2023 आहे.

संस्था – गांधीबाग सहकारी बँक लिमिटेड, नागपूर
भरले जाणारे पद – मुख्य कार्यकारी अधिकारी
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 सप्टेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर
वय मर्यादा – 35 ते 55 वर्षे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Alert)

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
मुख्य कार्यकारी अधिकारी
  • The person shall be graduate, preferably with
    • Qualification in banking/Co-operative banking such as CAIIB/Diploma in Banking & Finance /Diploma in Co-operative Business Management or equivalent qualification; or
    • Chartered /Cost Accountant/MBA (Finance); or
    • Post Graduation in any discipline.

असा करा अर्ज –
1. या भरतीकरिता उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज सादर करण्याची (Job Alert) अंतिम तारीख 27 सप्टेंबर 2023 आहे.
3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
4. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.gandhibagbank.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Success Story : इंजिनिअरिंगची नोकरी सोडून शेती केली; ‘हे’ पीक घेतलं अन् झाला मालामाल; आहे करोडोंत कमाई!!

Success Story of Pramod Gautam

करिअरनामा ऑनलाईन । जर आपण भारतातील सर्वाधिक (Success Story) पगाराच्या नोकऱ्यांबद्दल बोललो, तर एमबीए पदवीधर आणि इंजिनियर्स यांची नावे प्रत्येकाच्या तोंडात येतात. या दोन्ही नोकऱ्या उत्कृष्ट पगार देतात. देशभरात सर्वाधिक पगार IIT आणि IIM पास पदवीधारकांना दिला जातो. पण एक व्यक्ती अशीही आहे जी कोणत्याही नोकरीशिवाय शेती करून चांगले उत्पन्नही मिळवत आहे. प्रमोद गौतम नावाच्या या व्यक्तीने इंजिनियरिंगची नोकरी सोडून शेती सुरू केली आणि तो भारतातील सर्वात श्रीमंत शेतकऱ्यांपैकी एक बनला आहे.

इंजिनियरची नोकरी सोडून शेतीकडे वळला
महाराष्ट्राचा रहिवासी असलेल्या प्रमोद गौतम याची एक अनोखी कहाणी आहे. तो नागपूरचा असून त्याने अभियंता म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याने (Success Story) नागपूरच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातून ऑटोमोबाईल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले आणि नंतर नोकरीत रुजू झाला. त्याने मोठमोठ्या कंपनीत काम केले आणि दर महिन्याला भरघोस पगार घेत राहिला. पण प्रमोदचे नोकरीत मन लागत नव्हते. या तरुणाने इंजिनियरची नोकरी सोडली आणि तो एक सर्वात श्रीमंत शेतकरी बनला. त्याने आयआयटी, आयआयएम पदवीधर आणि मोठ्या कंपन्यांच्या सीईओंपेक्षा जास्त कमाई केली आहे.  त्याने नोकरी सोडून शेतकरी आणि उद्योजक होण्याचा निर्णय घेतला. त्याच्या नावावर 26 एकर शेतजमीन होती; या जमिनीचा त्याने पुरेपूर फायदा घेतला.

नफा वाढवण्यासाठी काय केलं (Success Story)
अभियंता, शेतकरी आणि उद्योजक प्रमोद याने पारंपारिक शेतीपासून दूर राहून नवीन मार्ग निवडला. त्याने हरितगृहांमध्ये फळे आणि भाज्या वाढवण्याची कला अंगीकारली आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर केला. गौतम यांनी सुरुवातीला फक्त भुईमूग आणि हळद या पिकांची लागवड केली. त्यातही फायदा दिसत नसल्याने त्यांनी मूग डाळ पिकवण्याचा निर्णय घेतला. त्याची मुगाची डाळ पॉलिश न केलेली आणि भेसळयुक्त होती. यामध्ये फार कष्ट करण्याची गरज नव्हती.

डाळीने बनवले करोडपती
डाळीचे ही पिके घेत असताना प्रमोद गौतम यांना त्यात नफा दिसू लागला. नंतर त्यांनी ‘वंदना फूड्स’ नावाने स्वतःचा डाळीचा ब्रँड तयार केला. या ब्रँडच्या नावाखाली अनेक (Success Story) प्रकारच्या डाळी आणि धान्ये विकायला सुरुवात केली. प्रमोदचा हा ब्रँड आता अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवरही उपलब्ध आहे. यातून मिळणार्‍या कमाईबद्दल बोलायचे झाले तर या व्यवसायातून तो  दरवर्षी सुमारे एक कोटी रुपये कमावतो. या व्यवसायातून त्याला महिन्याला 10 ते 12 लाख रुपये मिळतात; ही रक्कम  आयआयटी आणि आयआयएम पदवीधरांच्या कमाईपेक्षा निश्चितच जास्त आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CBSE Exam 2024 : 10वी, 12वीचा पेपर पॅटर्न बदलला; जाणून घ्या नवीन बदलांविषयी

CBSE Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । 10वी, 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक (CBSE Exam 2024) महत्वाची अपडेट हाती आली आहे. CBSE बोर्डाने 2024 च्या पेपर पॅटर्नमध्ये अनेक मोठे बदल केले आहेत. विद्यार्थ्यांना हे नवीन पेपर पॅटर्न समजावेत यासाठी बोर्डाने सॅम्पल पेपर्सचा सेट जारी केला आहे. या सॅम्पल पेपर्सच्या मदतीने विद्यार्थ्यांना यावर्षीच्या परीक्षेत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील आणि त्यांची मार्किंग स्कीम काय असेल हे सहजपणे कळू शकेल. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने आपल्या वेबसाईटवर नवीन नमुने जारी केले आहेत. यावेळी सर्वात मोठा बदल म्हणजे आता 50 टक्के प्रश्न कॉम्पिटेन्सीवर आधारित असतील.

येथे पहा नवीन पेपर पॅटर्न
जे विद्यार्थी या वर्षीच्या परीक्षेला बसले आहेत ते अधिकृत वेबसाईटवरून PDF डाऊनलोड करू शकतात. पेपर पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना cbseacademic.nic.in. या वेब साईटला भेट द्यावी लागेल.

असे आहेत नवीन बदल (CBSE Exam 2024)
जर आपण नवीन परीक्षा पद्धतीबद्दल बोललो तर आता अधिक विश्लेषणात्मक संकल्पनेवर आधारित प्रश्न येतील. प्रश्नांची विविधता MCQ, लहान उत्तरे आणि थोडक्यात उत्तरे सारखीच राहतील. जवळपास 50 टक्के प्रश्नांचे MCQ मध्ये रूपांतर करण्यात आले असून त्यांना एक ते दोन गुण आहेत. तुम्ही वेबसाइटवरून नमुना पेपर आणि मार्किंग स्कीम दोन्ही तपासू शकता.

असं करा डाउनलोड
1. नवीन नमुना पेपर डाउनलोड करण्यासाठी, प्रथम cbseacademic.nic.in. या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
2. येथे मुख्यपृष्ठावर, प्रश्नावली (Question Bank) नावाचा विभाग शोधा आणि त्यावर क्लिक करा.
3. येथून अतिरिक्त सराव प्रश्नांवर जा आणि क्लिक करा.
4. असे केल्याने एक नवीन पेज उघडेल. या पृष्ठावर तुम्हाला अतिरिक्त सराव प्रश्न दिसतील.
5. विषयानुसार ते येथून डाउनलोड (CBSE Exam 2024) करा आणि तपासा.
6. आता यावेळेस कोणते प्रश्न येतील ते कळेल.
बोर्डाच्या पूर्व परीक्षा काही महिन्यांत सुरू होणार आहेत. ही उत्तम संधी आहे जेव्हा उमेदवार नमुना पेपर डाउनलोड करून नवीन पॅटर्न समजून घेऊ शकत नाहीत तर त्यानुसार तयारी देखील करू शकतात. नवीन माहिती मिळवण्यासाठी वेबसाईटला भेट देत रहा.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Diploma Admission 2023 : अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान डिप्लोमा प्रवेशासाठी ‘ही’ आहे शेवटची तारीख

Diploma Admission 2023

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात 10वी आणि 12 वीनंतर होणाऱ्या (Diploma Admission 2023) अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम प्रवेशासाठीची अंतिम मुदत (कटऑफ डेट) तंत्रशिक्षण संचालनालयाने जाहीर केली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी दि. १४ सप्टेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी राज्यातील शासकीय, खासगी अनुदानित, विद्यापीठ संचलित आणि खासगी विना अनुदानित पदविका शिक्षण संस्थांमध्ये दहावी आणि बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

दहावी आणि बारावीच्या निकालानंतर नियमित विद्यार्थ्यांसाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली. ही प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही प्रवेश प्रक्रियेत सामावून घेण्यात आले. या पार्श्वभूमीवर तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी प्रवेशासाठीची अंतिम मुदत आणि अन्य सूचना परिपत्रकाद्वारे जाहीर केल्या.

अशी आहे प्रवेश प्रक्रिया –
प्रवेश प्रक्रियेच्या केंद्रीभूत (कॅप) व्यक्तिरिक्त जागांसाठी ऑनलाइन नोंदणी (Diploma Admission 2023) आणि कागदपत्रांची पडताळणी, अर्ज निश्चिती या प्रक्रिया प्रवेशाच्या अंतिम मुदतपर्यंत सुरू ठेवल्या जातील. संस्थास्तरावरील कोट्यात किंवा केंद्रीभूत प्रवेशानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांनी ई छाननी पद्धत किंवा प्रत्यक्ष छाननी पद्धत याद्वारे नोंदणी, कागदपत्रांची पडताळणी, अर्ज भरल्याची निश्चिती करणे आवश्यक आहे. संबंधित उमेदवारांनी संस्थांमध्ये स्वतंत्रपणे अर्ज करणे आवश्यक आहे. त्या उमेदवारांची गुणवत्ता यादी संस्था स्तरावर तयार केली जाईल. संस्थांनी १४ सप्टेंबरपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती संस्थांना १५ सप्टेंबरला ऑनलाइन भरावी लागणार आहे. मात्र या तारखा अस्थायी स्वरुपाच्या आहेत. काही अपरिहार्य परिस्थितीत बदल झाल्यास सुधारित वेळापत्रक https://poly23.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

AIIMS Nagpur Recruitment 2023 : AIIMS अंतर्गत युवकांना नोकरीची संधी; काय आहे पात्रता? 

AIIMS Nagpur Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ (AIIMS Nagpur Recruitment 2023) मेडिकल सायन्सेस, नागपूर येथे भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2023 आहे.

संस्था – ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नागपूर
भरले जाणारे पद – कनिष्ठ निवासी/Junior Resident
पद संख्या – 25 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 सप्टेंबर 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर (महाराष्ट्र)

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार MBBS उत्तीर्ण असावा (इंटर्नशिप पूर्ण केलेला असावा) किंवा MCI द्वारे मान्यताप्राप्त समकक्ष पदवी
वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 14 सप्टेंबर 2023 रोजी 33 वर्षापर्यंत असावे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी – 500/- रुपये [SC/ST – 250/- रुपये, OPH/ PWD – शुल्क नाही]
मिळणारे वेतन – 56,100/- रुपये ते 1,77,500/- रुपये दरमहा

काही महत्वाच्या लिंक्स – (AIIMS Nagpur Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://aiimsnagpur.edu.in/
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com