Success Story : इंजिनिअरिंगची नोकरी सोडून शेती केली; ‘हे’ पीक घेतलं अन् झाला मालामाल; आहे करोडोंत कमाई!!

करिअरनामा ऑनलाईन । जर आपण भारतातील सर्वाधिक (Success Story) पगाराच्या नोकऱ्यांबद्दल बोललो, तर एमबीए पदवीधर आणि इंजिनियर्स यांची नावे प्रत्येकाच्या तोंडात येतात. या दोन्ही नोकऱ्या उत्कृष्ट पगार देतात. देशभरात सर्वाधिक पगार IIT आणि IIM पास पदवीधारकांना दिला जातो. पण एक व्यक्ती अशीही आहे जी कोणत्याही नोकरीशिवाय शेती करून चांगले उत्पन्नही मिळवत आहे. प्रमोद गौतम नावाच्या या व्यक्तीने इंजिनियरिंगची नोकरी सोडून शेती सुरू केली आणि तो भारतातील सर्वात श्रीमंत शेतकऱ्यांपैकी एक बनला आहे.

इंजिनियरची नोकरी सोडून शेतीकडे वळला
महाराष्ट्राचा रहिवासी असलेल्या प्रमोद गौतम याची एक अनोखी कहाणी आहे. तो नागपूरचा असून त्याने अभियंता म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याने (Success Story) नागपूरच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातून ऑटोमोबाईल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले आणि नंतर नोकरीत रुजू झाला. त्याने मोठमोठ्या कंपनीत काम केले आणि दर महिन्याला भरघोस पगार घेत राहिला. पण प्रमोदचे नोकरीत मन लागत नव्हते. या तरुणाने इंजिनियरची नोकरी सोडली आणि तो एक सर्वात श्रीमंत शेतकरी बनला. त्याने आयआयटी, आयआयएम पदवीधर आणि मोठ्या कंपन्यांच्या सीईओंपेक्षा जास्त कमाई केली आहे.  त्याने नोकरी सोडून शेतकरी आणि उद्योजक होण्याचा निर्णय घेतला. त्याच्या नावावर 26 एकर शेतजमीन होती; या जमिनीचा त्याने पुरेपूर फायदा घेतला.

नफा वाढवण्यासाठी काय केलं (Success Story)
अभियंता, शेतकरी आणि उद्योजक प्रमोद याने पारंपारिक शेतीपासून दूर राहून नवीन मार्ग निवडला. त्याने हरितगृहांमध्ये फळे आणि भाज्या वाढवण्याची कला अंगीकारली आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर केला. गौतम यांनी सुरुवातीला फक्त भुईमूग आणि हळद या पिकांची लागवड केली. त्यातही फायदा दिसत नसल्याने त्यांनी मूग डाळ पिकवण्याचा निर्णय घेतला. त्याची मुगाची डाळ पॉलिश न केलेली आणि भेसळयुक्त होती. यामध्ये फार कष्ट करण्याची गरज नव्हती.

डाळीने बनवले करोडपती
डाळीचे ही पिके घेत असताना प्रमोद गौतम यांना त्यात नफा दिसू लागला. नंतर त्यांनी ‘वंदना फूड्स’ नावाने स्वतःचा डाळीचा ब्रँड तयार केला. या ब्रँडच्या नावाखाली अनेक (Success Story) प्रकारच्या डाळी आणि धान्ये विकायला सुरुवात केली. प्रमोदचा हा ब्रँड आता अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवरही उपलब्ध आहे. यातून मिळणार्‍या कमाईबद्दल बोलायचे झाले तर या व्यवसायातून तो  दरवर्षी सुमारे एक कोटी रुपये कमावतो. या व्यवसायातून त्याला महिन्याला 10 ते 12 लाख रुपये मिळतात; ही रक्कम  आयआयटी आणि आयआयएम पदवीधरांच्या कमाईपेक्षा निश्चितच जास्त आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com