Home Blog Page 251

Government Job : पदवीधारकांसाठी मोठी संधी!! खादी आणि ग्रामोद्योग आयोगात होणार नवीन भरती

Government Job (8)

करिअरनामा ऑनलाईन । खादी आणि ग्रामोद्योग आयोग, मुंबई येथे (Government Job) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध पदांच्या एकूण 12 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे.

संस्था : खादी आणि ग्रामोद्योग आयोग, मुंबई
पद संख्या : 12 पदे
अर्ज करण्याची पद्धत ; ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2023
परीक्षा फी : 1000/- रुपये

भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. सहायक संचालक – I (ग्रामोद्योग):
शैक्षणिक पात्रता : (i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग/ बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी; किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून मास्टर ऑफ सायन्स, किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर ऑफ सायन्ससह मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन; आणि (ii) संबंधित क्षेत्रातील पाच वर्षांचा अनुभव.
2. सहाय्यक संचालक-I (प्रशासन आणि मानव संसाधन):
शैक्षणिक पात्रता : (i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदव्युत्तर पदवी; आणि (ii) संबंधित क्षेत्रातील पाच वर्षांचा अनुभव. (Government Job)
3. सहाय्यक संचालक-I (FBAA): (i) चार्टर्ड अकाउंटंट; किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (फायनान्स); किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून मास्टर ऑफ कॉमर्स; आणि (ii) संबंधित क्षेत्रातील तीन वर्षांचा अनुभव
4. सहायक संचालक-I (Ec.R):
शैक्षणिक पात्रता : (i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून अर्थशास्त्र/सांख्यिकी/वाणिज्य (विषय म्हणून सांख्यिकी आणि अर्थशास्त्रासह) पदव्युत्तर पदवी; आणि (ii) संबंधित क्षेत्रातील तीन वर्षांचा अनुभव.

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमाल 35 वर्षे असावे.
काही महत्वाच्या लिंक्स – (Government Job)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.kvic.gov.in
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Professor Job : प्राध्यापकांसाठी खुषखबर!! राज्याच्या ‘या’ शासकीय महाविद्यालयात नवीन जॉब ओपनिंग

Professor Job

करिअरनामा ऑनलाईन । श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय (Professor Job) महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, धुळे येथे सहायक प्राध्यापक पदाच्या एकूण 39 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 22 सप्टेंबर 2023 आहे.

संस्था – श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, धुळे
भरले जाणारे पद – सहायक प्राध्यापक (Assoc. Professor)
पद संख्या – 39 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – धुळे
वय मर्यादा –
1. इतर उमेदवार – 40 वर्षे
2. मागासवर्गीय उमेदवार – 45 वर्षे
अर्ज फी – रु. 250/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 सप्टेंबर 2023
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 22 सप्टेंबर 2023
मुलाखतीचा पत्ता – मा. अधिष्ठाता कार्यालय, श्री. भाऊसाहेबहिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,धुळे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – सहायक प्राध्यापक MD/MS
मिळणारे वेतन – रु. 1,10,000/- दरमहा

अशी होणार निवड – (Professor Job)
या पदावरील उमेदवारांचे प्रत्यक्ष मुलाखतीचे द्वारे आयोजन रोज दुपारी ठिक ०३.०० वाजता दिनांक 22/09/2023 रोजीपर्यत मा. अधिष्ठाता कार्यालय, श्री. भाऊसाहेबहिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,धुळे येथे आयोजीत केलेले आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या (Professor Job) पत्त्यावर मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.
मुलाखतीचे वेळी उमेदवारांनी मुळ प्रमाणपत्रांसह व साक्षांकित केलेल्या प्रतीसह मुलाखतीच्या ठिकाणी स्वखर्चाने हजर राहावे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://sbhgmcdhule.org/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NIA Recruitment 2023 : राष्ट्रीय तपास संस्थेत होणार नवीन भरती; ‘ही’ पदे रिक्त 

NIA Recruitment 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत (NIA Recruitment 2023) उप विधी अधिकारी, वरिष्ठ सरकारी वकील, सरकारी वकील, प्रधान माहिती अधिकारी पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 व 21 ऑक्टोबर 2023 (पदांनुसार) आहे.

संस्था – राष्ट्रीय तपास संस्था
भरले जाणारे पद – उप विधी अधिकारी, वरिष्ठ सरकारी वकील, सरकारी वकील, प्रधान माहिती अधिकारी
पद संख्या – 13 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 व 21 ऑक्टोबर 2023 (पदांनुसार )
अर्ज सादर करण्याचा पत्ता – SP (Admi), NIA मुख्यालय, CGO कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली – 110003

भरतीचा तपशील – (NIA Recruitment 2023)

भरले जाणारे पद  पद संख्या 
उप विधी अधिकारी 04 पदे
वरिष्ठ सरकारी वकील 03 पदे
सरकारी वकील 05 पदे
प्रधान माहिती अधिकारी 01 पद


आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
उप विधी अधिकारी Bachelor Degree in Law
वरिष्ठ सरकारी वकील Bachelor Degree in Law
सरकारी वकील Bachelor Degree in Law
प्रधान माहिती अधिकारी Bachelor Degree


मिळणारे वेतन –

पद  मिळणारे वेतन
उप विधी अधिकारी 56,100/- to 1,77,500/-
वरिष्ठ सरकारी वकील 67,700/- to 2,08,700/-
सरकारी वकील 78,800/- to 2,09,200/-
प्रधान माहिती अधिकारी 1,23,100/-  to 2,15,900/-


असा करा अर्ज –

1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जाचा नुमुना https://www.nia.gov.in/recruitment-notice.htm या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
3. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
4. अर्ज सादर करण्याच्या (NIA Recruitment 2023) सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
5. अर्जासोबत संबंधित प्रमाणपत्र / कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडणे आवश्यक आहे.
6. अपूर्ण अर्ज फेटाळले जातील.

काही महत्वाच्या लिंक्स – (NIA Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
PDF जाहिरात I
PDF जाहिरात II
अधिकृत वेबसाईट – tmc.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : 10वी/12वी/ग्रॅज्युएट्ससाठी टाटा मेमोरियल सेंटर देतंय नोकरीची संधी; लगेच करा Apply

Job Notification (84)

करिअरनामा ऑनलाईन । टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई (Job Notification) अंतर्गत सहायक प्रशासकीय अधिकारी, सहायक लेखाधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक ‘क’, परिचारिका ‘ए’, परिचारिका ‘ए’ (महिला), वैज्ञानिक सहाय्यक ‘ब’, सहायक सुरक्षा अधिकारी, फार्मासिस्ट ‘बी’, तंत्रज्ञ ‘सी’, लघुलेखक, तंत्रज्ञ ‘अ’, निम्न विभाग लिपिक, स्वयंपाकी ‘अ’, परिचर, व्यापार मदतनीस” पदाच्या 71 रिक्त जागाभरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2023 आहे.

संस्था – टाटा मेमोरियल सेंटर
भरले जाणारे पद – सहायक प्रशासकीय अधिकारी, सहायक लेखाधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक ‘क’, परिचारिका ‘ए’, परिचारिका ‘ए’ (महिला), वैज्ञानिक सहाय्यक ‘ब’, सहायक सुरक्षा अधिकारी, फार्मासिस्ट ‘बी’, तंत्रज्ञ ‘सी’, लघुलेखक, तंत्रज्ञ ‘अ’, निम्न विभाग लिपिक, स्वयंपाकी ‘अ’, परिचर, व्यापार मदतनीस
पद संख्या – 71 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 सप्टेंबर 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई

भरतीचा तपशील – (Job Notification)

पदाचे नाव पद संख्या
Assistant Administrative Officer 11 posts
Assistant Accounts Officer 02 posts
Scientific Assistant ‘C’ 01 post
Nurse ‘A’ 11 posts
Nurse ‘A’ (Female) 04 posts
Scientific Assistant ‘B’ 06 posts
Assistant Security Officer 04 posts
 Pharmacist ‘B’ 01 post
 Technician ‘C’ 01 post
Stenographer 01 post
 Technician ‘A’ 04 post
Lower Division Clerk 02 posts
Cook ‘A’ 01 post
Attendant 04 posts
Trade Helper 18 posts

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
Assistant Administrative Officer Graduate/ Degree Or Diploma in Personal Management
Assistant Accounts Officer Graduate/ Degree Or Diploma in Financial Management
Scientific Assistant ‘C’ B. Sc in relevant field
Nurse ‘A’ B. Sc in Nursing
Nurse ‘A’ (Female) B. Sc in Nursing
Scientific Assistant ‘B’ B. Sc in B. Sc in relevant field/ Diploma in Medical Laboratory Technology (DMLT)
Assistant Security Officer Graduation certification from Armed Forces
Pharmacist ‘B’ B. Pharm Or D. Pharm
Technician ‘C’ Diploma in Electronics/ Computer Engineering Or Graduate in Computer Science Or any other graduate
Stenographer Graduate/ Degree Or Diploma in Computer Or IT
Technician ‘A’ HSC in Science
Lower Division Clerk Graduate
Cook ‘A’ 10th Pass
Attendant Matriculation Or Equivalent Pass from recognized board
Trade Helper Matriculation Or Equivalent Pass from recognized board


असा करा अर्ज –
1. वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन सादर करायचा आहे.
2. इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
3. अर्ज शेवटच्या तारखे (Job Notification) अगोदर खालील दिलेल्या लिंक वर सादर करावे.
4. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2023 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – tmc.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MPSC Success Story : पत्रकार ते पोलिस अधिकारी… अनेक आव्हानं पेलत कोल्हापूरचा पठ्ठ्या बनला PSI

GK MPSC Success Story of Sushant Upadhye

करिअरनामा ऑनलाईन । घरची परिस्थिती आणि आपल्यावर असलेली (MPSC Success Story) कुटुंबाची जबाबदारी पार पाडत आपल्या ध्येयकडे वाटचाल करणारे अनेक ध्येयवेडे तरुण समाजात आहेत. यापैकी एक म्हणजे कोल्हापुरातील सुशांत उपाध्ये… संगणक अभियंता असलेला सुशांत याने काही काळ पत्रकारिता केली आता तो थेट राज्याच्या पोलीस दलात अधिकारी झाला आहे.

अपघातात मेंदूला बसला मार
सुशांत हा कोल्हापूरच्या जोतिबा डोंगरावरील (वाडी रत्नागिरी) रहिवासी. हे महाराष्ट्रातील प्रसिध्द पर्यटन आणि धार्मिक क्षेत्र असल्याने येथे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. शालेय शिक्षण पूर्ण झाले की इथली बरीच मुलं लहान वयात  रोजगाराकडे वळतात. सुशांतचे वडील परंपरागत जोतीबाचे पुजारी. सुशांत अवघा ७ वर्षाचा असताना त्याचा एक अपघात झाला. यात त्याच्या मेंदूला मारही लागला. यामुळे सुशांत नेहमी (MPSC Success Story) शांत शांत असायचा. यामुळे पुढे जाऊन हा शिकेल की नाही अशी त्याच्या घरच्यांना काळजी वाटत होती. अशातच सुशांतला जोतिबा डोंगरावरीलच ज्योतिर्लिंग विद्यालयात दाखल करण्यात आले. शिक्षण घेताना सुरुवातीला त्याला त्रास झाला; दरम्यान त्याच्यावर उपचार ही सुरु होते. सुशांतच्या   प्रकृतीत सुधारणा होत होती आणि तो इयत्ता पहिली पासूनच शाळेत अव्वल क्रमांक मिळवू लागला. तर २००७ साली दहावीत त्याने ७५ टक्के गुण मिळवत शाळेत पहिला क्रमांक पटकावला.

ST मधील नोकरी नाकारत पत्रकारिता निवडली (MPSC Success Story)
सुशांतने पुढेही शिकत राहायचं ठरवलं आणि २००८ साली वारणा नगर इथे महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रवेश घेतला. १२ वी नंतर त्याने कोल्हापुरातील विवेकानंद कॉलेज आणि शहाजी कॉलेजमधून B.Sc ची डिग्री घेतली. त्यानंतर BCA च्या दुसऱ्या वर्षात असताना तो पहिल्यांदा IBPS ची परीक्षा उत्तीर्ण झाला. त्याला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ ST मध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली. पण त्याला आवडीच्या क्षेत्रात काम करायचं असल्याने त्याने ST मधील नोकरी नाकारून पत्रकारिता करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्याने २०१५ साली शिवाजी विद्यापीठात पत्रकारिता अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. पत्रकारितेत शिक्षण घेत असतानाच सुशांतने एका खाजगी वृत्तवाहिनी आणि जिल्हा माहिती कार्यालय येथे इंटर्नशिप पूर्ण केली. २०१७ साली एका दैनिकात त्याने काम केलं. सोबतच स्वतःची जाहिरात आणि पब्लिक रिलेशन एजन्सी ही सुरू केली.

सुशांत असा झाला PSI
सुशांतचे काम उत्तम रीतीने सुरू होतं. मात्र त्याला स्पर्धा परीक्षा देण्याची इच्छा होती. यामुळे त्याने २०१८ साली दैनिकातून राजीनामा दिला आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागला. मुळातच अभ्यासात हुशार असलेल्या सुशांतने २०१९ साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा आणि नंतर मुख्य (MPSC Success Story) परीक्षाही उत्तीर्ण केली. दरम्यानच्या काळात कोरोना आल्याने भरती थांबली. या काळात शांत न बसता त्याने भरतीसाठी आवश्यक असलेल्या शारीरिक तंदुरुस्तीकडे लक्ष दिले. व्यायाम आणि मैदानी खेळांचा सराव तो नियमितपणे करत असे. नंतर तो नाशिकच्या पोलीस अॅकॅडमीत दाखल झाला. गुडघ्याची दुखापत सहन करुन त्याने खडतर ट्रेनिंग पुर्ण केले. मोठ्या दिमाखात दीक्षांत समारंभही पार पडलाआणि त्याची आता नागपूर इथे पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे.
सुशांत हा त्याच्या गावातील पहिला MPSC पास झालेला मुलगा असल्याने गावात त्याचे कौतुक आहे. जोतीबाच्या डोंगरावरचा गरीब पुजारी कुटुंबातील मुलाचा पत्रकार ते अधिकारी हा प्रवास अनेक तरुणांना प्रेरणा देणारा आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : हॅशटॅगची कल्पना पहिल्यांदा ‘या’ व्यक्तीच्या मनात आली; पहा कधीपासून सुरु झाला वापर…

GK Updates 9 Sep.

करिअरनामा ऑनलाईन । या व्यक्तीचे नाव क्रिस मेसिना (GK Updates) आहे. 23 ऑगस्ट 2007 रोजी क्रिसने पहिल्यांदा हॅशटॅगचा वापर केला. क्रिस हा अमेरिकेतील प्रोजेक्ट डिझायनर आहे ज्याने सिलिकॉन व्हॅलीमध्ये दहा वर्षांहून अधिक काळ काम केले आहे.

सकाळपासून संध्याकाळपर्यंत सोशल मीडियावर (GK Updates) आपण रोज अनेक पोस्ट, रील्स आणि व्हिडिओ पाहतो. या सर्वांमध्ये, काही खाद्यपदार्थांशी संबंधित तर काही प्रवास, आरोग्य, फॅशन आणि काही इतर क्षेत्रातीशी संबंधित व्हिडिओ आहेत. या सर्व अपलोड केलेल्या सामग्रीमध्ये दिसणारी एक सामान्य गोष्ट म्हणजे ‘हॅशटॅग’ (Hashtag). अनेकदा वापरकर्ते त्यांच्या पोस्ट, व्हिडिओ किंवा कोणत्याही इव्हेंटची पोहोच (Reach) वाढवण्यासाठी संबंधित हॅशटॅग वापरतात. याशिवाय हे केल्यानंतर संबंधित विषयाची माहितीही एका ठिकाणी जमा केली जाते. तथापि, हा अतिशय उपयुक्त हॅशटॅग कोणी सुरू केला याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? ते वापरण्याचा विचार सर्वप्रथम कोणी केला ते पाहूया…

क्रिस मेसिना (Chris Messina) असे या व्यक्तीचे नाव आहे. ख्रिसने 2007 मध्ये पहिल्यांदा ‘#’ वापरला. या संदर्भात ट्विटर एक्सचे सह-संस्थापक बिझ स्टोन यांनीही एक मनोरंजक किस्सा शेअर केला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ट्विटरच्या सह-संस्थापकाने सांगितले की, एक दिवस मार्केटिंग स्पेशालिस्ट क्रिस मेसिना ट्विटरच्या ऑफिसमध्ये आले; त्यावेळी ट्विटर नुकतेच सुरू झाले होते आणि कोणीही आमच्या कार्यालयात येऊ शकते. त्यांनी ऑफिसमध्ये येऊन आम्हाला आणि ट्विटरच्या इतर कर्मचाऱ्यांना काही सल्ला दिला. यावेळी त्यांनी ही (GK Updates) माहिती दिली. मात्र, त्यावेळी ते काही महत्त्वाच्या कामात व्यस्त होते, त्यामुळे त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. मात्र, नंतर त्याला ख्रिस काय म्हणत आहे ते समजले. यानंतर ख्रिस तेथून निघून गेला. यानंतर 23 ऑगस्ट 2007 रोजी त्यांनी हॅशटॅग वापरून पहिल्यांदा ट्विट केले. तेव्हापासून ते लोकप्रिय होऊ लागले. यानंतर संस्थापक म्हणतात की आम्ही हॅशटॅगचा वापर प्रत्येकासाठी सोपा केला.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ZP Recruitment 2023 : विना परीक्षा थेट द्या मुलाखत!! सातारा जिल्हा परिषदेत ‘या’ पदांवर भरती सुरु

ZP Recruitment 2023 (3)

करिअरनामा ऑनलाईन । जिल्हा परिषद, सातारा अंतर्गत (ZP Recruitment 2023) वैद्यकीय अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहायचे आहे. मुलाखती करिता उमेदवारांनी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व चौथ्या सोमवारी आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सातारा येथे मूळ कागदपत्रे तसेच मूळ कागदपत्रांच्या छायांकित प्रतीची एक प्रत घेऊन उपस्थित राहायचे आहे. यादिवशी सकाळी 10:30 ते 12:30 वाजेपर्यंत उमदवारांचे अर्ज स्विकारले जातील.

संस्था – जिल्हा परिषद, सातारा
भरले जाणारे पद – वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)
नोकरी करण्याचे ठिकाण – सातारा
वय मर्यादा – 58 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
निवड प्रक्रिया – मुलाखती
मुलाखतीचा पत्ता – आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सातारा
मुलाखतीची तारीख – प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व चौथ्या सोमवारी

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
वैद्यकीय अधिकारी – M.B.B.S.
अशी होईल निवड – (ZP Recruitment 2023)
1. या भरतीकरिता उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे.
3. मुलाखती करिता उमेदवारांनी (ZP Recruitment 2023) प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व चौथ्या सोमवारी हजर रहावे.
4. उमेदवारांनी दिलेल्या संबंधीत पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर रहावे.
5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – zpsatara.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Talathi Bharti 2023 : तलाठी भरती परीक्षा घोटाळ्याचे थेट मंत्रालय कनेक्शन; कॉपीचा दर 3 लाख; काय आहे प्रकरण? 

Talathi Bharti 2023 (22)

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात सुरु असलेल्या तलाठी (Talathi Bharti 2023) भरती परीक्षेत गैरप्रकार होत असल्याचे समोर येत असतानाच, परीक्षेच्या टीसीएस केंद्रातील कर्मचारीच परीक्षार्थींना कॉपी पुरवत असल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादमध्ये उघडकीस आला आहे. औरंगाबादच्या आय ऑन डिजीटल परीक्षा केंद्राबाहेरून एकजण कॉपी पुरवत असताना पोलिसांनी त्याला 5 सप्टेंबरला बेड्या ठोकल्या होत्या. राजू भीमराव नागरे (वय 29 वर्षे, रा. कातराबाद, औरंगाबाद) असे या आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे, नागरेला पोलिसांनी अटक करताच थेट मंत्रालयातून पोलिसांना फोनाफानी सुरु झाल्याने, या घोटाळ्याचे धागेदोरे थेट मंत्रालयापर्यंत असल्याची चर्चा आहे.

नेमकं प्रकरण काय?
या प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. 5 सप्टेंबरला पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांनी हर्मन कंपनीच्या समोरून जाणाऱ्या रोडवर काही संशयीत व्यक्ती आढळले होते. या प्रकरणात पोलिसांनी राजू भीमराव नागरे (वय 29, रा. कादराबाद) याला ताब्यात घेतले होते. या युवकाच्या जवळ मास्टर कार्ड, दोन मोबाइल आढळले होते. पोलिसांनी मोबाइल चेक केले असता, त्याच्या मोबाइलच्या टेलिग्रॅम अॅपवर पाच सप्टेंबरच्या तलाठी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेमधील ३४ प्रश्नांचे फोटो आढळून आले. यानंतर पोलिसांनी विचारणा केली असता, त्याच्यासोबत विजय पाटील, आणि अन्य दोन जण असल्याचे त्यांनी सांगितले होते. याशिवाय परीक्षेत बसलेल्या एका परीक्षार्थीचीही माहिती दिली होती. या आधारे पेालिसांनी परिक्षेस बसलेल्या परिक्षार्थीची विचारपूस केली. त्यांच्याजवळून मोबाईल जप्त करण्यात आले होते. या प्रकरणात राजु भिमराव नागरे, विजय पाटील, परिक्षार्थी व दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात एमआयडीसी सिडको पेालिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाचा तपास करीत असताना तलाठी परीक्षा केंद्रावर (Talathi Bharti 2023) असलेल्या काही कर्मचाऱ्यांचाही यामध्ये सहभाग असल्याने  त्यांचा तपास सुरु आहे. याशिवाय राजू नागरे याच्या मोबाइलमध्ये एक ‘पोलिस बाबा’ या नावाने नंबर सेव्ह आहे. या ‘पोलिस बाबा’चा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. पोलिस बाबाचा या तलाठी परीक्षेत सहभाग आहे का, याचा शोध घेण्यात येत आहे.

नागरेसाठी थेट मंत्रालयातून फोन (Talathi Bharti 2023)
मागील काही दिवसांत वेगवेगळ्या भरती परीक्षेत होणारे गैरप्रकार वाढले आहेत. या प्रकरणी अनेक गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. थेट परीक्षा केंद्रातील कर्मचारीच या सर्व घोटाळ्यात सहभागी होत असल्याने खळबळ उडाली आहे. तर या सर्व प्रकरणात मोठे रॅकेट असल्याचा आरोप होत असतानाच, आता मंत्रालय कनेक्शन देखील समोर येत आहे. औरंगाबाद पोलिसांनी कॉपी पुरवणाऱ्या नागरेला ताब्यात घेतल्यावर त्यासाठी थेट मंत्रालयातून पोलिसांना फोन येत आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाचे कनेक्शन थेट मंत्रालयापर्यंत असल्याची चर्चा आहे.

कॉपी पुरवण्याचा दर 3 लाख रुपये
परीक्षा केंद्रावर गेल्या काही परीक्षांमध्ये उमेदवारांकडे मोबाइल, इअरफोन, मख्खी फोन असे साहित्य आढळल्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. परीक्षा केंद्रात उत्तरे (Talathi Bharti 2023) परीक्षार्थीपर्यंत पोहोचविण्यासाठी तीन लाख रुपये काही कर्मचाऱ्यांनी घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिस या माहितीचाही तपास करीत आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BOB Recruitment 2023 : पदवीधारकांसाठी नोकरी!! BOB फायनान्शियल सोल्यूशन्समध्ये ‘या’ पदावर होणार नवीन भरती

BOB Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । बँक ऑफ बडोदा फायनान्शियल (BOB Recruitment 2023) सोल्यूशन लिमिटेड, मुंबई येथे प्रादेशिक संबंध अधिकारी / उपप्रादेशिक संबंध अधिकारी पदाच्या एकूण 20 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2023 आहे.

बँक – बँक ऑफ बडोदा फायनान्शियल सोल्यूशन लिमिटेड, मुंबई
भरले जाणारे पद – प्रादेशिक संबंध अधिकारी / उपप्रादेशिक संबंध अधिकारी
पद संख्या – 20 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 सप्टेंबर 2023
वय मर्यादा – 45 वर्षे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (BOB Recruitment 2023)

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
प्रादेशिक संबंध अधिकारी / उपप्रादेशिक संबंध अधिकारी Graduate 

For Regional Relationship Officer

  • Post Graduate with minimum 1 years of experience.( Retail Assets and Credit
    Cards)
  • Graduate with minimum 3 years of experience. ( Retail Assets and Credit Cards)

For Deputy Regional Relationship Officer

  • Graduate with minimum 1 year of experience. (Retail Assets and Credit Cards)

 

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.bobfinancial.com संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. ऑनलाईन अर्ज (BOB Recruitment 2023) करण्याची लिंक खाली दिलेली आहे.
5. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावा.
6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2023 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://indiancoastguard.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Coast Guard Recruitment 2023 : 10 वी/12 वी पास उमेदवारांसाठी भारतीय कोस्ट गार्डमध्ये नोकरीची संधी 

Coast Guard Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय कोस्ट गार्ड क्षेत्र अंतर्गत विविध (Coast Guard Recruitment 2023) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या माध्यमातून स्टोअर कीपर ग्रेड II, इंजिन ड्रायव्हर, मोटार ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर, सुतार, मल्टी टास्किंग स्टाफ, लस्कर प्रथम श्रेणी, मल्टी टास्किंग स्टाफ (स्वीपर/सफाईवाला) पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 ऑक्टोबर 2023 आहे.

संस्था – भारतीय कोस्ट गार्ड क्षेत्र
भरले जाणारे पद – स्टोअर कीपर ग्रेड II, इंजिन ड्रायव्हर, मोटार ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर, सुतार, मल्टी टास्किंग स्टाफ, लस्कर प्रथम श्रेणी, मल्टी टास्किंग स्टाफ (स्वीपर/सफाईवाला)
पद संख्या – 13 जागा
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 ऑक्टोबर 2023

वय मर्यादा – 18 ते 30 वर्षे
भरतीचा तपशील – (Coast Guard Recruitment 2023)

पद पद संख्या 
स्टोअर कीपर ग्रेड II 04
इंजिन ड्रायव्हर 01
मोटार ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर 01
सुतार 01
मल्टी टास्किंग स्टाफ (शिपाई) 03
लस्कर प्रथम श्रेणी 02
मल्टी टास्किंग स्टाफ (स्वीपर/सफाईवाला) 01

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद शैक्षणिक पात्रता
स्टोअर कीपर ग्रेड II
  • 12th Pass from recognized Board or University.
  • One year’s experience in handling Stores from any recognized firm or Central or State Government Organization or Public Sector Undertaking.
इंजिन ड्रायव्हर
  • Essential:-
    • Matriculation pass or its equivalent from recognized Boards.
    • Certificate of competency as Engine Driver from a recognized Government Institute or equivalent.
  • Desirable:-
    • Two years service as Sarang on a Vessel of over four hundred Boat Horse Power.
मोटार ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर
  • 10th Standard pass.
  • Must possess valid driving license for both heavy and light Motor Vehicles.
  • Should have at least two years experience in driving Motor Vehicles.
  • Knowledge of Motor Mechanism (should be able to remove minor defects in vehicles).
सुतार
  • Matriculation or equivalent
  • Should qualify a trade entrance examination.
  • Should have successfully completed apprenticeship from a recognized/ reputed workshop in the relevant trade under Apprenticeship Act 1961 or under any other recognized Apprenticeship Scheme
मल्टी टास्किंग स्टाफ (शिपाई)
  • Matriculation or equivalent pass.
  • Two years experience as Office Attendant.
लस्कर प्रथम श्रेणी
  • Matriculation or equivalent pass.
  • Three years service on a Ship or Craft. (Coast Guard Recruitment 2023)
मल्टी टास्किंग स्टाफ (स्वीपर/सफाईवाला)
  • Matriculation or equivalent pass.
  • Two years experience in clanship in any recognized firm.

आवश्यक कागदपत्रे –
1. वैध फोटो आयडी पुरावा.
2. मॅट्रिक किंवा समकक्ष मार्कशीट आणि प्रमाणपत्र.
3. 12वी/UG/PG/डिप्लोमा मार्कशीट आणि आवश्यक पात्रतेनुसार प्रमाणपत्र.
4. अनुक्रमे परिशिष्ट-II आणि परिशिष्ट-III येथे दिलेल्या विहित नमुन्यानुसार राखीव श्रेणीतील उमेदवारांसाठी नवीनतम श्रेणी प्रमाणपत्र (SC/ST/OBC).
5. अनुभव प्रमाणपत्र.
6. सध्या कोणत्याही सरकारी संस्थेत काम करण्यासाठी नियोक्त्याकडून NOC.
7. पासपोर्ट आकाराचे दोन नवीनतम रंगीत छायाचित्रे.
8. अर्जदारांनी स्वतंत्र कोऱ्या लिफाफ्यात रु. 50/- पोस्टल स्टॅम्प (लिफाफ्यावर पेस्ट केलेले) अर्जासोबत स्वतःला उद्देशून.

निवड प्रक्रिया –
1. अर्जांची छाननी – उमेदवारांकडून प्राप्त झालेल्या सर्व अर्जांची पात्रता निकष आणि आवश्यक कागदपत्रांच्या अधीन छाननी केली जाईल आणि दस्तऐवज पडताळणीसाठी आणि लेखी परीक्षेत बसण्यासाठी निवडलेल्या उमेदवारांना प्रवेशपत्र जारी केले जातील.
2. दस्तऐवज पडताळणी – निवडलेल्या सर्व उमेदवारांची लेखी परीक्षेत बसण्यापूर्वी कागदपत्र पडताळणी केली जाईल. उमेदवारांनी त्यांच्या प्रवेशपत्रांमध्ये दिलेल्या निर्देशांनुसार/सूचनांनुसार त्यांची मूळ कागदपत्रे आणि स्व-साक्षांकित झेरॉक्स प्रती (02 संच) आणणे आवश्यक आहे.
3. लेखी परीक्षा – निवडलेल्या सर्व उमेदवारांना (Coast Guard Recruitment 2023) या पदासाठी विहित शैक्षणिक पात्रतेच्या आधारे लेखी परीक्षा दिली जाईल. लेखी परीक्षा पेन-पेपर आधारित आणि एक तास कालावधी असेल. लेखी परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका (द्विभाषिक) प्रत्येक बरोबर उत्तरासाठी एक गुण असलेले 80 वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न असतील आणि कोणतेही नकारात्मक मार्किंग नसेल.
लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांनुसार गुणवत्ता यादी काटेकोरपणे तयार केली जाईल आणि आवश्यक सूचनांसह भारतीय तटरक्षक दलाच्या वेबसाइटवर प्रकाशित केली जाईल.

काही महत्वाच्या लिंक्स – (Coast Guard Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://indiancoastguard.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com