ZP Recruitment 2023 : विना परीक्षा थेट द्या मुलाखत!! सातारा जिल्हा परिषदेत ‘या’ पदांवर भरती सुरु

करिअरनामा ऑनलाईन । जिल्हा परिषद, सातारा अंतर्गत (ZP Recruitment 2023) वैद्यकीय अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहायचे आहे. मुलाखती करिता उमेदवारांनी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व चौथ्या सोमवारी आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सातारा येथे मूळ कागदपत्रे तसेच मूळ कागदपत्रांच्या छायांकित प्रतीची एक प्रत घेऊन उपस्थित राहायचे आहे. यादिवशी सकाळी 10:30 ते 12:30 वाजेपर्यंत उमदवारांचे अर्ज स्विकारले जातील.

संस्था – जिल्हा परिषद, सातारा
भरले जाणारे पद – वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)
नोकरी करण्याचे ठिकाण – सातारा
वय मर्यादा – 58 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
निवड प्रक्रिया – मुलाखती
मुलाखतीचा पत्ता – आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सातारा
मुलाखतीची तारीख – प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व चौथ्या सोमवारी

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
वैद्यकीय अधिकारी – M.B.B.S.
अशी होईल निवड – (ZP Recruitment 2023)
1. या भरतीकरिता उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे.
3. मुलाखती करिता उमेदवारांनी (ZP Recruitment 2023) प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व चौथ्या सोमवारी हजर रहावे.
4. उमेदवारांनी दिलेल्या संबंधीत पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर रहावे.
5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – zpsatara.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com