Government Job : पदवीधारकांसाठी मोठी संधी!! खादी आणि ग्रामोद्योग आयोगात होणार नवीन भरती

करिअरनामा ऑनलाईन । खादी आणि ग्रामोद्योग आयोग, मुंबई येथे (Government Job) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध पदांच्या एकूण 12 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे.

संस्था : खादी आणि ग्रामोद्योग आयोग, मुंबई
पद संख्या : 12 पदे
अर्ज करण्याची पद्धत ; ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2023
परीक्षा फी : 1000/- रुपये

भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. सहायक संचालक – I (ग्रामोद्योग):
शैक्षणिक पात्रता : (i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग/ बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी; किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून मास्टर ऑफ सायन्स, किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर ऑफ सायन्ससह मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन; आणि (ii) संबंधित क्षेत्रातील पाच वर्षांचा अनुभव.
2. सहाय्यक संचालक-I (प्रशासन आणि मानव संसाधन):
शैक्षणिक पात्रता : (i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदव्युत्तर पदवी; आणि (ii) संबंधित क्षेत्रातील पाच वर्षांचा अनुभव. (Government Job)
3. सहाय्यक संचालक-I (FBAA): (i) चार्टर्ड अकाउंटंट; किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (फायनान्स); किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून मास्टर ऑफ कॉमर्स; आणि (ii) संबंधित क्षेत्रातील तीन वर्षांचा अनुभव
4. सहायक संचालक-I (Ec.R):
शैक्षणिक पात्रता : (i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून अर्थशास्त्र/सांख्यिकी/वाणिज्य (विषय म्हणून सांख्यिकी आणि अर्थशास्त्रासह) पदव्युत्तर पदवी; आणि (ii) संबंधित क्षेत्रातील तीन वर्षांचा अनुभव.

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमाल 35 वर्षे असावे.
काही महत्वाच्या लिंक्स – (Government Job)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.kvic.gov.in
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com