MPSC Recruitment 2023 : PSI होण्याचे स्वप्न पूर्ण होणार!! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने काढली जाहिरात; एकूण 615 पदे

करिअरनामा ऑनलाईन । स्पर्धा परीक्षा देवून PSI होण्याचे (MPSC Recruitment 2023) स्वप्न बाळगणाऱ्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे.  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मोठी भरती जाहीर केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक (विभागीय) पदांसाठी भरती प्रक्रिया राबावली जात आहे. याद्वारे राज्यामध्ये 615 पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी लवकरच परीक्षाही घेतली जाणार आहे. या भरतीसाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 ऑक्टोबर 2023 आहे.

आयोग – महाराष्ट्र लोकसेवा आयोग
परीक्षेचे नाव – MPSC PSI मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2023
भरले जाणारे पद – पोलिस उपनिरीक्षक
पद संख्या – 615 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 ऑक्टोबर 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – महाराष्ट्र

अर्ज फी –
अमागास – रु. 844/-
मागासवर्गीय- रु. 544/-
वय मर्यादा –
खुल्या प्रवर्गासाठी – 35 वर्षे
मागासवर्गीय/ अनाथ – 40 वर्षे

काही महत्वाच्या तारखा – (MPSC Recruitment 2023)
MPSC PSI Date

आवश्यक शैक्षणिक पात्रता – 

पद  आवश्यक शैक्षणिक पात्रता
MPSC PSI मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2023 महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अखत्यारीतील सध्या कार्यरत सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक व पोलीस शिपाई या संवर्गातील कर्मचारीच प्रस्तुत परीक्षेस पात्र असतील

मिळणारे वेतन –

पद  मिणारे वेतन 
MPSC PSI मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2023 38,000/-  to 1,22,800/-

काही महत्वाच्या सूचना –
1. अर्ज फक्त आयोगाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे स्वीकारले जातिल.
2. अर्ज https://mpsconline.gov.in संकेतस्थळावर सादर करावे.
3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
4. परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतले जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स –
1. आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीवर नोंदणी करावी.
2. अर्ज सुरू होण्याची तारीख 11 सप्टेंबर 2023 आहे.
3. नोंदणी केल्यानंतर खाते तयार केलेले असल्याचे व ते अध्यायात करण्याची आवश्यकता असल्यास ते करावे.
4. विहित कालावधीत तसेच (MPSC Recruitment 2023) विहित पद्धतीने आवशक कागदतपत्रे अपलोड करून अर्ज सादर करावा.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 ऑक्टोबर 2023 आहे.
6. परीक्षा शुल्काचा भरणा विहित पद्धतीने करावा.

अशी होणार परीक्षा –
प्रस्तुत परीक्षा खालील तीन टप्यांमध्ये घेण्यात येईल:-
(१) पूर्व परीक्षा – १०० गुण
(२) मुख्य परीक्षा – ३०० गुण
(३) शारीरिक चाचणी – १०० गुण

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com