Home Blog Page 214

Job Alert : राज्यातील ‘या’ फायनान्स बँकेत नोकरीसाठी थेट द्या मुलाखत; पात्रता 10+2 आणि पदवीधर

Job Alert (79)

करिअरनामा ऑनलाईन । उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक अंतर्गत (Job Alert) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थी क्रेडिट अधिकारी, क्रेडिट अधिकारी, सहाय्यक, शाखा व्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. मुलाखतीची तारीख 04 नोव्हेंबर 2023 आहे.

बँक – उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक, अमरावती आणि यवतमाळ, महाराष्ट्र
भरले जाणारे पद – प्रशिक्षणार्थी क्रेडिट अधिकारी, क्रेडिट अधिकारी, सहाय्यक. शाखा व्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक
नोकरी करण्याचे ठिकाण – अमरावती, यवतमाळ
वय मर्यादा – 28 ते 35 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखती
मुलाखतीची तारीख – 04 नोव्हेंबर 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – 
1. प्रशिक्षणार्थी क्रेडिट अधिकारी – उमेदवाराने 10+2 शिक्षण घेतले असणे आवश्यक आहे.
2. क्रेडिट अधिकारी – उमेदवाराने 10+2 शिक्षण घेतले असणे आवश्यक आहे.
3. सहाय्यक शाखा व्यवस्थापक – उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे.
4. शाखा व्यवस्थापक – उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे.
निवड प्रक्रिया – (Job Alert)
1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे. (पत्त्यासाठी PDF पहा)
3. मुलाखतीची तारीख 04 नोव्हेंबर 2023 आहे.
4. अर्जदारांनी मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.utkarsh.bank/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

PCMC Recruitment 2023 : ITI पास असणाऱ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरीची संधी; 303 पदे रिक्त

PCMC Recruitment 2023 (4)

करिअरनामा ऑनलाईन । पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने (PCMC Recruitment 2023) भरती जाहिर केली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 नोव्हेंबर 2023 आहे, तर ऑफलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 09 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पद संख्या – 303 पदे
भरली जाणारी पदे –  प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस)
ट्रेड आणि पद संख्या पुढीलप्रमाणे –
1) कोपा (PASSA) – 100 पदे
2) वीजतंत्री – 59 पदे
3) तारतंत्री – 46 पदे
4) रेफ & AC मेकॅनिक – 26 पदे
5) प्लंबर – 24 पदे
6) डेस्कटॉप ऑपरेटिंग (DTP) – 16 पदे
7) पंप ऑपरेटर कम मेकॅनिक – 12 पदे
8) इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक – 10 पदे (PCMC Recruitment 2023)
9) आरेखक स्थापत्य – 04 पदे
10) भूमापक – 02 पदे
11) मेकॅनिक मोटर व्हेईकल – 02 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन/ऑफलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 नोव्हेंबर 2023
ऑफलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख – 09 नोव्हेंबर 2023
अर्ज पाठवण्याचा पत्ता – औद्योगिक प्रशिक्षण विभाग, मोरवाडी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

आवश्यक शैक्षणिक पात्रता – संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण
परीक्षा फी – फी नाही
मिळणारे वेतन – 7,700/- ते 8,050/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – पिंपरी-चिंचवड

काही महत्वाच्या लिंक्स – (PCMC Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Jalsampada Vibhag Bharti 2023 : महाराष्ट्रात होतेय मेगाभरती!! राज्याचा जलसंपदा विभाग देणार 4497 पदांवर नोकरी

Jalsampada Vibhag Bharti 2023

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधत असणाऱ्या (Jalsampada Vibhag Bharti 2023) राज्यातील तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शासनाच्या जलसंपदा विभागा अंतर्गत 4497 पदांवर मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून वरीष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट-ब, निम्नश्रेणी लघुलेखक, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, भूवैज्ञानिक सहाय्यक, आरेखक, सहाय्यक आरेखक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, अनुरेखक, दप्तर कारकुन, मोजणीदार, कालवा निरीक्षक, सहाय्यक भांडारपाल, कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक पदांच्या एकूण 4497 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन
भरले जाणारे पद – वरीष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट-ब, निम्नश्रेणी लघुलेखक, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, भूवैज्ञानिक सहाय्यक, आरेखक, सहाय्यक आरेखक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, अनुरेखक, दप्तर कारकुन, मोजणीदार, कालवा निरीक्षक, सहाय्यक भांडारपाल, कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक
पद संख्या – 4497 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 नोव्हेंबर 2023
निवड प्रक्रिया – संगणक आधारित चाचणी
आवश्यक शैक्षणिक पात्रता – पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. अधिक माहितीसाठी PDF जाहिरात पहावी.

भरतीचा तपशील – (Jalsampada Vibhag Bharti 2023)

पद पद संख्या 
वरीष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट-ब 04
निम्नश्रेणी लघुलेखक 19
कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक 14
भूवैज्ञानिक सहाय्यक 05
आरेखक 25
सहाय्यक आरेखक 60
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 1528
प्रयोगशाळा सहाय्यक 35
अनुरेखक 284
दप्तर कारकुन 430
मोजणीदार 758
कालवा निरीक्षक 1189
सहाय्यक भांडारपाल 138
कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक 08
एकूण पदसंख्या ४४९७


मिळणारे वेतन –

पद वेतनश्रेणी
वरीष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट-ब S-१६ : ४४९००-१४२४००
निम्नश्रेणी लघुलेखक S-१५ : ४१८००-१३२३००
कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक S-१५ : ४१८००-१३२३००
भूवैज्ञानिक सहाय्यक S-१४ : ३८६०० १२२८००
आरेखक S-१० : २९२०० ९२३००
सहाय्यक आरेखक S-८ : २५५००-८११००
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक S-6: २५५००-८११००
प्रयोगशाळा सहाय्यक S-७ : २१७००-६९१००
अनुरेखक S-७ : २१७००-६९१००
दप्तर कारकुन S-६ : १९९००-६३२००
मोजणीदार S-६ : १९९०० ६३२००
कालवा निरीक्षक S-६ : १९९०० ६३२००
सहाय्यक भांडारपाल S-६ : १९९००-६३२००
कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक S-६ : १९९००.६३२००

 

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी (Jalsampada Vibhag Bharti 2023) नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज  करायचे आहेत.
4. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2023 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – wrd.maharashtra.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job News : बेरोजगारीनं गाठला उच्चांक, ग्रामीण भागाला बसणार मोठा फटका; पहा आकडेवारी काय सांगते…

Job News (2)

करिअरनामा ऑनलाईन । खासगी संस्था असणाऱ्या CMIE नं दावा (Job News) केल्यानुसार ऑक्टोबर 2023 मध्ये भारतातील बेरोजगारीनं मागील दोन वर्षांमधील उच्चांक गाठला आहे. देशाच्या ग्रामीण भागांमध्ये हे प्रमाण शहरी भागांच्या तुलनेत सर्वाधिक असल्याचं पाहायला मिळत आहे. बेरोजगारीचा मोठा फटका ग्रामीण क्षेत्रांना बसताना दिसत असला तरीही त्याचा थेट परिणाम देशातील एकूण रोजगार निर्मितीवर होताना दिसत आहे.
दर दिवशी नोकरीच्या असंख्य संधी निर्माण होतात आणि या संधीचा फायदा घेण्यासाठी अनेकजण स्पर्धेत असतात. नोकरदार क्षेत्रांमध्ये हे असं चक्र गेल्या अनेक वर्षांपासून सुरुच आहे. पण, आता मात्र यातही मोठे बदल होताना दिसत असून, सरकारची आणि बहुविध संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चिंताही वाढली आहे.

एका प्रसिद्ध वृत्तसमुहाच्या आकडेवारीनुसार सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकोनॉमी लिमिटेडनं यासंबंधीची माहिती देत ही आकडेवारी समोर आणली. जिथं ऑक्टोबर महिन्यात (Job News) बेरोजगारी 10.05 टक्क्यांवर पोहोचल्याची बाब लक्षात आली. सप्टेंबर महिन्यात हा आकडा 7.09 टक्के इतका होता.
महत्त्वाची बाब म्हणजे मे 2021 मधील आकडेवारीनंतर सध्याच्या बेरोजगारीचा हा सर्वात मोठा आकडा ठरला आहे. तेव्हापासून ही आकडेवारी 6.20 टक्के ते 10.82 टक्के अशा फरकानं बदलली. शहरी भागांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध असल्यामुळं बेरोजगारीचा हा आकडा 8.44 टक्क्यांवर पोहोचला आहे.

सरकारची चिंता वाढली (Job News)
देशातील महत्त्वाच्या निवडणुकांपूर्वी रोजगार निर्मितीमध्ये येणाऱ्या अडचणी आणि बेरोजगारीच्या प्रमाणात होणारी ही वाढ पाहता केंद्र शासनाची चिंता वाढणार आहे. तज्ज्ञांच्या मते येत्या काळात भारताच्या GDP चा आकडा 6 टक्क्यांच्या दरानं पुढे जाण्याची शक्यता असली तरीही देशातील तरुण पिढीसाठी रोजगार निर्मिती मात्र अपेक्षित वेगानं होत नसल्यामुळं आगामी निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधण्यासाठी हा एक अतीव महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो.
देशातील माहिती- तंत्रज्ञान क्षेत्रात महत्त्वाचं काम करणाऱ्या विप्रो, इन्फोसिस आणि तत्सम कंपन्यांनी नव्यानं नोकरभरती करण्याची प्रक्रिया सध्या थांबवली आहे. अशा परिस्थितीत अभियांत्रिकीची पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या नवख्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी वणवण फिरावं लागू शकतं अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं येत्या काळात बेरोजगारी हा देशाच्या विकासातील मोठा अडथळा असेल हे नाकारता येत नाही.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career Success Story : कंपनीनं कामावरुन काढलं, पायलट तरुण Video बनवून झाला मालामाल; आज आहेत लाखो चाहते

Career Success Story of Gaurav Tneja

करिअरनामा ऑनलाईन । ‘माझं YouTube चॅनेल आहे; मी व्लॉगर आहे..’ असं (Career Success Story) आपण अनेकांकडून ऐकतो. YouTube ने लोकांमधील सुप्त गुणांना वाव देत कमाईचं महाद्वारच उघडून दिलं आहे. आपण पाहतोय, की या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून हजारो भारतीयांनी आतापर्यंत स्वत:ची लाईफ बनवली आहे. ते महिन्याकाठी लाखो रुपयांची कमाई करत आहेत. केवळ पैसाच नव्हे तर अनेकांना यूट्यूबनं वारेमाप प्रसिद्धीही मिळवून दिली आहे. एखाद्या अभिनेत्या प्रमाणे लोकप्रियता लाभलेल्या गौरव तनेजाचा प्रवास थक्क करणारा आहे. एका मुलाखतीत त्यानं आपल्या कमाईबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत गौरवनं आपल्या कमाईबाबत भाष्य केलं आहे. तो म्हणतो; “माझी कमाई सध्या एअर एशिया कंपनीच्या सीईओपेक्षा जास्त आहे.” गौरवनं एअर एशिया कंपनीचा उल्लेख करण्यामागेही एक कारण आहे. गौरव हा पायलट असून तो एअरएशिया कंपनीत नोकरीला होता. काही कारणामुळं कंपनीनं त्याला नोकरीवरून काढून टाकलं होतं. गौरव हा एक व्लॉगर असून फिटनेस इन्फ्लुएन्सर म्हणूनही तो प्रचंड लोकप्रिय आहे.

उच्च शिक्षित गौरव (Career Success Story)
गौरव तनेजानं दिल्ली विद्यापीठातून कायद्याचा अभ्यास केला आहे. तो खरगपूर आयआयटीचा माजी विद्यार्थी असून तिथून त्यानं सिव्हिल इंजिनीअरिंग केलं आहे. तो त्याची पत्नी आणि अन्य कुटुंबीयांसोबत व्लॉग आणि फिटनेसचे व्हिडिओ बनवतो.
एअर एशियामध्ये होता पायलट
गौरव तनेजा एअर एशियामध्ये पायलट होता. त्यानं 2020 साली त्याच्या व्हिडिओतून एअर एशियावर नियमांच्या उल्लंघनाचा आरोप केला होता. कंपनीच्या वैमानिकांना अनेक प्रकारच्या अडचणींना आणि दबावाला तोंड द्यावं लागतं, असा दावा त्यानं केला होता. या आरोपांनंतर कंपनीनं त्याच्यावर कारवाई करुन त्याला निलंबित केलं होतं. आता एअर एशिया कंपनीच्या सीईओपेक्षाही आपली कमाई जास्त असल्याचं त्यानं म्हटलं आहे.

YouTube चॅनेलचे लाखो चाहते
कोविडची साथ आली; त्यांनंतर लॉकडाऊन लागले (Career Success Story) आणि जनजीवन ठप्प झाले. या काळात गौरव तनेजानं पूर्णवेळ व्हिडिओ निर्मिती सुरू केली आणि अल्पावधीत नाव कमावलं. त्याच्या चॅनेलचे 86 लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत. इन्स्टाग्रामवर त्याचे 40 लाखांहून जास्त फॉलोअर्स आहेत. पत्नी रितू राठी सोबत तो 3 यूट्यूब चॅनेल चालवतो. त्यांची मुलगी देखील व्हिडिओ निर्मितीमध्ये आई-वडिलांसोबत सहभागी असते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SSC HSC Board Exam 2024 : महत्वाची अपडेट!! 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर

SSC HSC Board Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील दहावी व बारावीच्या (SSC HSC Board Exam 2024) विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पुढील वर्षी होणाऱ्या दहावी व बारावी बोर्ड परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना आणि विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या हेतूने बोर्डाच्या परीक्षांचे हे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पुढील वर्षी होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या अंतिम परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. अंतिम वेळापत्रकानुसार बारावी बोर्ड परीक्षा दि. २१ फेब्रुवारी ते १९ मार्च २०२४ दरम्यान होणार आहेत तर दहावी बोर्ड परीक्षा दि. १ मार्च ते २६ मार्च २०२४ दरम्यान घेतली जाणार आहे. परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक २ नोव्हेंबर २०२३ पासून मंडळाची अधिकृत वेबसाई www.mahasscboard.in वर उपलब्ध होणार आहे.

‘या’ तारखेला होणार परीक्षा (SSC HSC Board Exam 2024)
पुढील वर्षी फेब्रुवारी ते मार्च २०२४ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (१० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (१२ वी) लेखी परीक्षांचे वेळापत्रक देण्यात आले आहे. या आधी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना तसंच विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने बोर्डाने संभाव्य वेळापत्रक जाहीर केलं होतं. आज अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि अन्य विषयांचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आलं आहे.

इयत्ता १० वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शनिवार दिनांक १० फेब्रुवारी, २०२४ ते गुरुवार दिनांक २९ फेब्रुवारी, २०२४ व इयत्ता १२ वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व (SSC HSC Board Exam 2024) अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शुक्रवार दिनांक २ फेब्रुवारी, २०२४ ते मंगळवार दिनांक २० फेब्रुवारी २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे.

मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रक हे अंतिम असून, सर्व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना हे वेळापत्रक देण्यात आले आहे. मंडळाकडून देण्यात आलेल्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी,अशी माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे. शिवाय, इतर संकेतस्थळ, अन्य यंत्रणांवरील छापील वेळापत्रक किंवा व्हॉट्स अ‍ॅपच्या Whatsapp च्या माध्यमातून व्हायरल होणारे वेळापत्रक ग्राह्य धरु नये अशा सूचनाही राज्य शिक्षण मंडळाच्यावतीच्या वतीने देण्यात आल्या आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Maha RERA Recruitment 2023 : शिपाई पदावर नोकरीची संधी; महारेराने काढली भरतीची जाहिरात; पात्रता फक्त 12 वी पास

Maha RERA Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक (Maha RERA Recruitment 2023) प्राधिकरण अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शिपाई पदाच्या 9 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी  खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण
भरले जाणारे पद – शिपाई
पद संख्या – 9 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (Maha RERA Recruitment 2023)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 नोव्हेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाराष्ट्र रिअल इस्टेट अपील न्यायाधिकरण, पहिला मजला, वन फोर्ब्स बिल्डिंग, थापर हाऊस, डॉ. व्ही. बी. गांधी रोड, काळा घोडा, फोर्ट, मुंबई 400001

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
या भरतीसाठी इच्छुक उमेदवार उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (12 वी) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
मिळणारे वेतन – रुपये 25,000/- दरमहा.
असा करा अर्ज – (Maha RERA Recruitment 2023)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
4. अर्जासोबत संबंधित प्रमाणपत्र / कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडणे आवश्यक आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://maharera.maharashtra.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Mumbai Police Recruitment 2023 : वकिलांसाठी खुषखबर!! मुंबई पोलिसांत निघाली भरती; अर्जासाठी त्वरा करा 

Mumbai Police Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । मुंबई पोलीस विभाग अंतर्गत (Mumbai Police Recruitment 2023) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माहीमतून विधी अधिकारी पदांच्या एकूण 30 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – मुंबई पोलीस विभाग
भरले जाणारे पद – विधी अधिकारी
पद संख्या – 30 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 नोव्हेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – पोलीस आयुक्त मुंबई, डी.एन.रोड, क्रॉफर्ड मार्केट समोर, मुंबई ४००००१

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
निवड प्रक्रिया – मुलाखत
आवश्यक शैक्षणिक पात्रता – Degree in Law
मिळणारे वेतन – रु.20,000/- दरमहा

असा करा अर्ज – (Mumbai Police Recruitment 2023)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2023 आहे.
5. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.mahapolice.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Mahavitaran Recruitment 2023 : 10 वी/ITI पासना महावितरणमध्ये नोकरीची संधी; ही संधी सोडू नका

Mahavitaran Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (Mahavitaran Recruitment 2023) लिमिटेड, नांदेड अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शिकाऊ उमेदवार पदाच्या एकूण 34 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नांदेड
भरले जाणारे पद – शिकाऊ उमेदवार
1. इलेक्ट्रिकल अभियंता पदवी – 19 पदे
2. इलेक्ट्रिकल इंजिनियर डिप्लोमा – 9 पदे
पद संख्या – 28 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 नोव्हेंबर 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – 10th + ITI (Refer PDF)
नोकरी करण्याचे ठिकाण – नांदेड
वय मर्यादा – 18 ते 30 वर्षे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Mahavitaran Recruitment 2023)
उमेदवार 10 वी /आय.टी.आय. पास असणे आवश्यक आहे.

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या www.apprenticeshipindia.gov.in वेबसाईटवर नोंदणी करायची आहे.
2. नोंदणी केल्याची प्रत व आवश्यक कागदपत्रे दिलेल्या संबंधित पत्यावर पाठवावे.
3. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या (Mahavitaran Recruitment 2023) अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
4. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2023 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : अंबानींच्या अँटेलिया बाहेर कोणती स्फोटके ठेवली होती? हिमालय कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? गोंधळात टाकणारे प्रश्न

GK Updates 1 Nov.

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

1. अँटेलिया या प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर कोणती स्फोटके ठेवण्यात आली होती?
1) आरडीएक्स
2) जिलेटिन
3) पीईटिएन
4) टिएनटी
उत्तर:2) जिलेटिन
2. राजीव गांधी खेलरत्न अवॉर्डचे नाव बदलून काय ठेवण्यात आले?
1) द्रोणाचार्य खेलरत्न अवॉर्ड
2) मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड
3) राष्ट्रीय खेल पुरस्कार
4) यापैकी नाही
उत्तर: 2) मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड

3. महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोठे भरतो?
1) हरिद्वार
2) पंढरपूर
3) नाशिक
4) घृष्णेश्वर
उत्तर: 3) नाशिक (GK Updates)
4. महाराष्ट्रात पशु व मत्स्य विद्यापीठ कोठे आहे?
1) पुणे
2) नाशिक
3) मुंबई
4) नागपूर
उत्तर:4) नागपूर
5. घरचा पुरोहित हे पुस्तक कोणाचे आहे?
1) केशवराव जेधे
2) भास्करराव जाधव
3) गोपाळ हरि देशमुख
4) यापैकी नाही
उत्तर:2) भास्करराव जाधव

6. सामाजिक परिषदेची स्थापना खालीलपैकी कोणी केली?
1) न्यायमूर्ती रानडे
2) स्वातंत्र्यवीर सावरकर
3) अॅलन ह्युम
4) ग.वा. जोशी.
उत्तर:1) न्यायमूर्ती रानडे
7. सालबर्डी हा गरम पाण्याचा झरा कोणत्या जिल्ह्यात आहे?
1) जळगाव
2) ठाणे
3) यवतमाळ
4) अमरावती
उत्तर: 4) अमरावती

8. छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा टाकून कोणाची बोटे तोडली?
1) अफझलखान
2) मिर्झा राजे जयसिंग
3) शाहिस्तेखान (GK Updates)
4) अब्दाली
उत्तर:3) शाहिस्तेखान
9. हिमालय हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे?
1) अवशिष्ट पर्वत
2) वली पर्वत
3) ठोकळा पर्वत
4) ज्वालामुखी पर्वत
उत्तर:2) वली पर्वत
10. शिकान्सेन ही रेल्वे प्रणाली कुठल्या देशातील आहे?
1) उत्तर कोरीया
2) जपान
3) दक्षिण कोरीया
4) चीन
उत्तर: 2) जपान
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com