Jalsampada Vibhag Bharti 2023 : महाराष्ट्रात होतेय मेगाभरती!! राज्याचा जलसंपदा विभाग देणार 4497 पदांवर नोकरी

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधत असणाऱ्या (Jalsampada Vibhag Bharti 2023) राज्यातील तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शासनाच्या जलसंपदा विभागा अंतर्गत 4497 पदांवर मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून वरीष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट-ब, निम्नश्रेणी लघुलेखक, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, भूवैज्ञानिक सहाय्यक, आरेखक, सहाय्यक आरेखक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, अनुरेखक, दप्तर कारकुन, मोजणीदार, कालवा निरीक्षक, सहाय्यक भांडारपाल, कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक पदांच्या एकूण 4497 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन
भरले जाणारे पद – वरीष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट-ब, निम्नश्रेणी लघुलेखक, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, भूवैज्ञानिक सहाय्यक, आरेखक, सहाय्यक आरेखक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, अनुरेखक, दप्तर कारकुन, मोजणीदार, कालवा निरीक्षक, सहाय्यक भांडारपाल, कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक
पद संख्या – 4497 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 नोव्हेंबर 2023
निवड प्रक्रिया – संगणक आधारित चाचणी
आवश्यक शैक्षणिक पात्रता – पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. अधिक माहितीसाठी PDF जाहिरात पहावी.

भरतीचा तपशील – (Jalsampada Vibhag Bharti 2023)

पद पद संख्या 
वरीष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट-ब 04
निम्नश्रेणी लघुलेखक 19
कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक 14
भूवैज्ञानिक सहाय्यक 05
आरेखक 25
सहाय्यक आरेखक 60
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 1528
प्रयोगशाळा सहाय्यक 35
अनुरेखक 284
दप्तर कारकुन 430
मोजणीदार 758
कालवा निरीक्षक 1189
सहाय्यक भांडारपाल 138
कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक 08
एकूण पदसंख्या ४४९७


मिळणारे वेतन –

पद वेतनश्रेणी
वरीष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट-ब S-१६ : ४४९००-१४२४००
निम्नश्रेणी लघुलेखक S-१५ : ४१८००-१३२३००
कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक S-१५ : ४१८००-१३२३००
भूवैज्ञानिक सहाय्यक S-१४ : ३८६०० १२२८००
आरेखक S-१० : २९२०० ९२३००
सहाय्यक आरेखक S-८ : २५५००-८११००
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक S-6: २५५००-८११००
प्रयोगशाळा सहाय्यक S-७ : २१७००-६९१००
अनुरेखक S-७ : २१७००-६९१००
दप्तर कारकुन S-६ : १९९००-६३२००
मोजणीदार S-६ : १९९०० ६३२००
कालवा निरीक्षक S-६ : १९९०० ६३२००
सहाय्यक भांडारपाल S-६ : १९९००-६३२००
कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक S-६ : १९९००.६३२००

 

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी (Jalsampada Vibhag Bharti 2023) नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज  करायचे आहेत.
4. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2023 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – wrd.maharashtra.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com