Home Blog Page 213

Career News : राज्यातील महिला उद्योजकांसाठी शासनाच्या खास सवलती; महाराष्ट्र शासनाने घेतले नवे निर्णय

Career News (15)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (Career News) पर्यटन क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी एक पाऊल पुढं टाकलं आहे. राज्यातील महिला उद्योजकांना विशेष सवलत देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. त्याचप्रमाणे या क्षेत्रातील महिलांना केंद्र आणि राज्य शासनाच्या विमा योजनेतही सहभागी करून घेण्यात येणार आहे. यामुळे या क्षेत्रात महिलांचे प्रमाण वाढण्यास मदत होणार आहे.

बचत गटांना होणार फायदा
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या मालमत्तांच्या ठिकाणी, महिला बचत गटांना हस्तकला, कलाकृती, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ आदींच्या विक्रीसाठी स्टॉल, जागा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद्योजकता आणि नेतृत्व गुण विकसित करण्याच्या उद्देशाने महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. यामुळे या क्षेत्रातील संधीही वाढतील आणि महिला सक्षमीकरण होण्यासाठी मदत होणार आहे.

या उद्योगांना मिळणार संधी (Career News)
राज्यातील प्रत्येक तालुक्यामधील पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत महिलांच्या मालकीच्या व त्या चालवत असलेल्या दहा पर्यटन व्यवसायांना चालणा मिळणार आहे. जसं की होम स्टे, हॉटेल, रेस्टारंट, टूर ॲण्ड ट्रॅव्हल एजन्सी आदी उभारणीसाठी महिलांना प्रोत्साहन व सवलती दिल्या जाणार आहेत. नोंदणीकृत व्यवसायांमध्ये कार्यरत महिला सहल मार्गदर्शक, महिला वाहन चालक, महिला सहल संचालक व इतर महिला कर्मचाऱ्यांना यात सामील करून घेण्यात येईल. महिला पर्यटकांनाही आकर्षक सुविधा मिळतील. महामंडळाच्या टूर ऑपरेटरमार्फत आयोजित पर्यटन सर्किट, पॅकेजेसमध्ये महिला पर्यटकांना विविध सवलती देण्यात येत आहेत.

सर्व रिसॉर्ट्स, युनिट्समध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ठराविक कालावधीत फक्त ऑनलाईन बुकिंगमध्ये ५० टक्के सवलत दिली जाणार आहे. महामंडळाच्या रिसॉर्ट्समध्ये महिला पर्यटकांसाठी, अपंग किंवा वृद्ध महिलांकरिता लिफ्टजवळच्या खोल्या उपलब्ध करून देण्यास प्राधान्य, महिलांसाठी विशेष खेळ, मनोरंजन कार्यक्रमांचे आयोजन, महिला पर्यटकांच्या विविध गटांसाठी अनुभवात्मक टूर पॅकेजेस, ज्येष्ठ महिला नागरिकांसाठी सहल अशा विविध विशेष सेवासुविधा पुरविण्यात येतील.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : एक लक्ष, अब्ज, अरब, दहा अरब मध्ये किती शून्य असतात? शंख आणि महाशंखमध्ये असतात ‘इतके’ शून्य

GK Updates 5 Nov.

करिअरनामा ऑनलाईन । गणित हा विषय कुणाच्या आवडीचा (GK Updates) तर कुणाच्या नावडीचा. तुम्हाला आवडो आगर नावडो.. शिक्षण घेत असताना प्रत्येकाला गणिताची कसोटी पार करावीच लागते. आपण शिकलो आहे, की गणनामध्ये बेरीज आणि वजाबाकी वापरली जाते. त्याचप्रमाणे एकक, दहा, शेकडो, हजार हे देखील गणिताचे अविभाज्य भाग आहेत. हा गणिताचा आधार आहे असं म्हणणं उचित ठरेल. आपण दशक, शतक, सहस्त्र, लक्ष या गणनेमध्ये किती शून्य येतात हे सहज सांगू शकतो. पण दशलक्ष, अब्ज, ट्रिलियनमध्ये किती शून्य आहेत याचे उत्तर देताना अनेकवेळा गोंधळ उडतो. चला तर मग, आज या पप्रश्नाचं उत्तर पाहूया…

1. एकक, दहा आणि शेकडो यांचे गणित काय आहे?
कोणत्याही मोजणीमध्ये एककांची जागा नेहमी संख्येच्या उजव्या बाजूला असते. याचा अर्थ क्रमांकाच्या उजवीकडील पहिली गणना एक आहे. त्याचप्रमाणे दहाव्या स्थानानंतरची मोजणी आणि शतव्या स्थानानंतर तिसऱ्या क्रमांकाची मोजणी केली जाते.
उदाहरणार्थ- 5,13,215
या संख्येत सर्वात उजवीकडील संख्या 5 आहे. त्यामुळे एककांचा अंक 5 आहे. नऊ नंतर 1 दहापट, 2 शेकडो, 3 हजार आहेत.

दशलक्ष आणि अब्ज मध्ये किती शून्य असतात? (GK Updates)
दशलक्षला हिंदी मोजणी प्रणालीमध्ये 10 लाख (1,000,000) म्हणतात. म्हणजे दहा लाखात 6 शून्य असतात. त्याचप्रमाणे, अब्ज (1,000,000,000) मध्ये एकूण 9 शून्य असतात.

पाहूया कोणत्या गणनेमध्ये किती शून्य येतात….
1. युनिट 1
2. दहापट – 10
3. शंभर – 100
4. हजार – 1000
5. दहा हजार – 10,000
6. लाख – 100000
7. दहा लाख – 1000000
8. कोटी – 10000000 (GK Updates)
9. दहा कोटी – 100000000

10. अरब – 1000000000
11. दहा अरब – 10000000000
12. खरब 100000000000
13. दहा खरब 1000000000000
14. नील 10000000000000
15. दहा नील 100000000000000
16. पदम 1000000000000000
17. दहा पदम 10000000000000000
18. शंख 100000000000000000
19. दहा शंख 1000000000000000000
20. महाशंख 10000000000000000000
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Success Story : दिवसभर नोकरी अन् रात्री अभ्यास… इंजिनिअर तरुणीने पहिल्याच झटक्यात क्रॅक केली UPSC

UPSC Success Story of IAS Neha Banerjee

करिअरनामा ऑनलाईन । आज आपण बोलत आहोत (UPSC Success Story) नेहा बॅनर्जीबद्दल. विशेष म्हणजे नेहाने नोकरी करत असतानाच  UPSC परीक्षेची तयारी केली. 2019 मध्ये तिने पहिल्यांदाच परीक्षा दिली. नोकरी बरोबरच परीक्षेची तयारी करत असताना ती फक्त पास झाली नाही; तर तिने या परिक्षेत संपूर्ण भारतात 20 वी रँक मिळवली आहे. एका मुलाखतीत तिने सांगितले…

वडिलांच्या निधनानंतर आईने संगोपन केले
2011 मध्ये जेव्हा नेहाच्या वडिलांचे निधन झाले तेव्हा तिच्या आईने तिला एकल पालक म्हणून वाढवले. नेहा पहिल्यापासून अभ्यासात हुशार होती. 2018 मध्ये तिने IIT खरगपूरमधून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. अभियांत्रिकी नंतर, तिला नोएडामधील एका कंपनीत नोकरी मिळाली.
ती म्हणते की तिच्यासाठी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी राहणं महत्वाचं होतं, त्यामुळे तिने नोकरी सोडण्याचा विचार केला नाही. नोकरीसोबतच तिने UPSC परीक्षेची तयारी सुरु ठेवली. दिवसभर ऑफिसमध्ये काम करुन घरी आल्यानंतर ती अभ्यास करत असे. एकीकडे नोकरी आणि एकीकडे अभ्यास असा तिचा प्रवास सुरु होता.

पहिल्याच प्रयत्नात परिक्षेत मारली बाजी (UPSC Success Story)
ही परीक्षा देण्यासाठी नेहाने 2019 मध्ये पहिलाच प्रयत्न केला. एका मुलाखतीत तिने सांगितले होते की, “सुरुवातीला मी थोडी नर्व्हस होते. त्यामागचे कारण होते इंजिनिअरिंग पार्श्वभूमी. वर्तमानपत्र वाचून मी अभ्यासाची तयारी सुरू केली. मला  वर्तमानपत्रे वाचनाची आवड आणि सवय लागली. काही दिवसाने मला UPSC चा अभ्यासक्रम आणि तयारीची पद्धत लक्षात आली. हळुहळू इतिहास, भूगोल, जनरल स्टडी, राज्यशास्त्र इत्यादी नवीन विषय समजू लागल्याने थोड्याफार प्रमाणात माझी काळजी कमी होवू लागली. नोकरी करत असताना अभ्यासाचे केलेले योग्य नियोजन, आणि कठोर परिश्रम या सूत्रामुळे मला हे यश मिळवता आले.”

मुलाखतीच्या 15 दिवस आधी सोडली नोकरी 
नेहा सांगते की, पूर्व आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, मुलाखत हा तिच्यासाठी शेवटचा टप्पा होता. यासाठी तिने मुलाखतीच्या 15 दिवस आधी नोकरी सोडली आणि मुलाखतीच्या (UPSC Success Story) तयारीवर लक्ष केंद्रित केले. एका व्हिडिओ मुलाखतीत नेहाने सांगितले की, “मला मुलाखतीत पॅनेलने एक अवघड प्रश्न विचारला. तो प्रश्न असा होता, विज्ञान किंवा धर्मात कोण मोठे आहे? जेव्हा मी सांगितले की दोन्ही भिन्न क्षेत्रे आहेत, तेव्हा मुलाखत घेणार्‍याने सांगितले की विज्ञान तर्कावर आधारित आहे आणि धर्म तुमच्या श्रद्धेशी संबंधित आहे. तुम्ही कोणाला मोठे मानता?”

नेहा सांगते की, मुलाखतीत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या माध्यमातून तुमच्या व्यक्तिमत्त्वाची चाचणी घेतली जाते. यावेळी मी समतोल उत्तर देण्याचा प्रयत्न केला. विज्ञान आपल्याला वेगळ्या मार्गाने पुढे घेऊन जाते आणि धर्म आपल्याला वेगळ्या मार्गाने शक्ती देतो. हे मी दिलेले उत्तर पॅनेलला आवडले.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GAIL Recruitment 2023 : बॅचलर्ससाठी गेल इंडियाने जाहीर केली ‘या’ पदांवर भरती; मिळवा महिन्याचा 2,40,000 पगार

GAIL Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । गेल इंडिया लि. मार्फत भरतीची (GAIL Recruitment 2023) जाहिरात निघाली आहे. यासाठी पदानुसार पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – गेल इंडिया लि.
भरले जाणारे पद – मुख्य व्यवस्थापक (Chief Manager)
पद संख्या – 12 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (GAIL Recruitment 2023)
किमान बॅचलर पदवी 60% गुणांसह आणि कार्मिक व्यवस्थापन आणि औद्योगिक संबंध/मानवी सह संसाधने व्यवस्थापन मध्ये स्पेशलायझेशन 2 वर्षे एमबीए/ एमएसडब्ल्यू किमान 65% गुणांसह किंवा बॅचलर पदवी किमान 60% गुणांसह आणि 2 वर्षांची पदव्युत्तर पदवी/ 2 वर्षांची पीजी डिप्लोमा
वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या (GAIL Recruitment 2023) उमेदवाराचे वय 30 नोव्हेंबर 2023 रोजी 40 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी – 200/- रुपये [SC/ST/PWD – शुल्क नाही]
मिळणारे वेतन – 90,000/- ते 2,40,00/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – (महाराष्ट्र) संपूर्ण भारत

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://gailonline.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Job : सैन्यासाठी शस्त्रे बनवण्याच्या कारखान्यात नोकरीची संधी!! 119 जागांवर होणार भरती

Government Job (24)

करिअरनामा ऑनलाईन । खमरिया ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत (Government Job) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून DBW (डेंजर बिल्डिंग वर्कर) पदांच्या 119 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – ऑर्डनन्स फॅक्टरी, खमरिया
पद संख्या – 119 पदे
भरले जाणारे पद – कार्यकाळ आधारित DBW (डेंजर बिल्डिंग वर्कर)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – The General Manager, Ordnance Factory Khamaria District: Jabalpur Madhya Pradesh, Pin-482005
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 नोव्हेंबर 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – AOCP ट्रेड (NCTVT) चे माजी प्रशिक्षणार्थी ज्यांना ऑर्डनन्स फॅक्टरी प्रशिक्षण / लष्करी दारूगोळा आणि स्फोटकांच्या निर्मिती आणि हाताळणीचा अनुभव आहे. आणि पूर्वीच्या आयुध निर्माणी मंडळाच्या आयुध कारखान्यांमध्ये प्रशिक्षण घेतलेले AOCP ट्रेडचे एक्स-ट्रेड अप्रेंटिस.
परीक्षा फी – फी नाही
वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 ऑक्टोबर 2023 रोजी 18 ते 35 वर्षांपर्यंत असावे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
मिळणारे वेतन – निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 19,900/- रुपये पगार मिळेल + DA
नोकरी करण्याचे ठिकाण – जबलपूर, मध्य प्रदेश

काही महत्वाच्या लिंक्स – (Government Job)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.ddpdoo.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MPSC Engineering Services Recruitment 2023 : महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा पदभरती सुरु

MPSC Engineering Services Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी सेवेत भरती (MPSC Engineering Services Recruitment 2023) होण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी महत्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा पदाच्या एकूण 510 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात काढली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2023 आहे.

आयोग – महाराष्ट्र लोकसेवा आयोग, महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा- 2023
भरले जाणारे पद – महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा
पद संख्या – 510 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – 7 नोव्हेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 नोव्हेंबर 2023

नोकरी करण्याचे ठिकाण – महाराष्ट्र
अर्ज फी –
अमागास – रु. 544/-
मागासवर्गीय – रु. 344/-
मिळणारे वेतन –  गट-अ व गट-ब सुधारित वेतन मॅट्रीक्समधील वेतन स्तरानुसार,
भरतीचा तपशील – (MPSC Engineering Services Recruitment 2023)

पद पद संख्या 
महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी 15 पदे
 स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा 495 पदे

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी (१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत अभियांत्रिकीमधील पदवी किंवा महाराष्ट्र(शासनाने पदवी समतुल्य असल्याचे घोषित केलेली तत्सम अर्हता.
२) शासन निर्णय, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, क्रमांक संकिर्ण-२०१३ (४५/१३)/ भाग-१ /तांशि-२, दिनांक १८ ऑक्टोबर, २०१६ नुसार खालील अहंता
विद्युत अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाशी समतुल्य आहेत:-
(37) B.E./B. Tech.( (Electrical and Power)
(a) B.E./ B. Tech.( (Electronics and power)
(क) B.E. / B. Tech. ( ( Power System)
(ड) B.E./B. Tech. ( (Electrical and Electronics)
स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा (१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने त्या पदवीशी समतुल्य असल्याचे घोषित केलेली तत्सम अहंता.
(२) शासन निर्णय, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, क्रमांक संकिर्ण-२०१३ (४५/१३)/भाग-१/तांशि-२, दिनांक १८ ऑक्टोबर, २०१६ नुसार खालील शैक्षणिक अर्हता
स्थापत्य अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाशी समतुल्य आहेत:-
(अ) B.E. / B. Tech. (Civil and Water Management)
(क) B.E. / B. Tech. (Structural)
-.२ मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
(ब) B.E. / B. Tech. (Civil and Environmental)
(ड) B.E. / B. Tech. (Construction Engineering/Technology)
.३ पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील. परंतु मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी अर्हताप्राप्त ठरल्यास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक माहिती व परीक्षा शुल्क सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील. .
४ अंतर्वासिता किंवा कार्यशाळेतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवी धारकाने शैक्षणिक अर्हतेबाबतची अट मुख्य परीक्षेची माहिती/अर्ज स्वीकारण्याच्या विहित दिनांकापर्यंत पूर्ण केली असली पाहिजे.

 

आवश्यक वय मर्यादा –
MPSC Engineering Services Mains Exam Jobs 2023 – Age Criteria 

आवश्यक कागदपत्रे –

MPSC Engineering Services Bharti 2022

 

असा करा अर्ज –
1. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन अर्ज करता येतील.
2. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या https://mpsconline.gov.in तसेच https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. (MPSC Engineering Services Recruitment 2023)
3. आयोगास अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
4. अर्ज 18 नोव्हेंबर पासून सुरु होतील.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2023 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी – PDF
स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Indian Army Recruitment 2023 : भारतीय सैन्यात होणार जम्बो भरती!! तब्बल 1 लाख 10 हजार पदे भरली जाणार

Indian Army Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी (Indian Army Recruitment 2023) एक आनंदाची बातमी आहे. भारतीय सैन्य दलात करिअर करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. भारतीय सैन्य दलाच्या वेगवेगळ्या गटात तब्बल 1 लाख 10 हजार पदांची मेगाभरती करण्यात येणार आहे. 18 ते 23 वयोगटातील तरुणांना या संधीचा लाभ होणार आहे. त्यामुळे भारतीय सैन्य दलात करिअर करू इच्छिणाऱ्या दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांनी आता सज्ज व्हायची वेळ आली आहे.

संरक्षण दलातील नाेकऱ्या व तयारी याबाबत विदर्भात जनजागृती करणाऱ्या ‘लाइफ स्किल फाउंडेशन’च्या अध्यक्षा डाॅ. राजेश्वरी वानखडे यांनी संरक्षण दलाच्या वेबसाइटच्या आधारे मेगाभरतीची माहिती दिली. या माध्यमातून ‘एसएससी जीडी’ या पदाच्या ८४,८६६ जागांसाठी भरती घेण्यात येत आहे. यासह सीआरपीएफ काॅन्स्टेबल पदाच्या ३० हजार जागांची भरती होत आहे. २४ नाेव्हेंबरपासून या दाेन्ही भरतींसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू हाेणार असून, २८ डिसेंबर अंतिम मुदत देण्यात आली आहे.

या भरतीसाठी इच्छूक आणि पात्र विद्यार्थी या दोन्ही (Indian Army Recruitment 2023) गटांच्या वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. फेब्रुवारी ते मार्च दरम्यान या पदांच्या परीक्षा होणार आहेत. या दोन्ही पदांसाठी मुला- मुलींची उंची व शारीरिक फिटनेस महत्त्वाचा आहे. लेखी परीक्षेनंतर शारीरिक चाचणी उत्तीर्ण करावी लागेल. लेखी परीक्षेत बुद्धिमत्ता चाचणी, सामान्य ज्ञान, गणित आणि इंग्रजी विषयाची तयारी विद्यार्थ्यांना करावी लागते. निवड झालेल्या उमेदवाराला 40 ते 45 हजारांपर्यंत पगार मिळू शकतो.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CTET Exam 2024 : केंद्रीय माध्यमिक शिक्षक पात्रता परीक्षा ‘या’ तारखेला होणार; ऑनलाईन अर्ज सुरु

CTET Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय माध्यमिक शिक्षण (CTET Exam 2024) मंडळातर्फे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ साठी ३ नोव्हेंबरपासून नोंदणी सुरू झाली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाईटवरुन ctet.nic.in. ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. दि. २१ जानेवारी २०२४ रोजी ही परीक्षा होणार आहे.

देशातील १३५ शहरांत 20 भाषांत या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. या परीक्षेत दोन प्रश्नपत्रिका असणार आहेत. पेपर 1 हा पहिली ते पाचवीसाठी शिक्षक होवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी तर पेपर दोन हा इयत्ता सहावी ते आठवीसाठी शिक्षक होवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी असतो. ही परीक्षा MCQ पद्धतीने म्हणजेच बहुपर्यायी पद्धतीने घेतली जाते. यामध्ये प्रत्येक उत्तराला एक गुण मिळतो. प्रश्नांना निगेटिव्ह मार्किंग नसते. पात्र उमेदवारांना २३ नोव्हेंबर २०२३ पर्यंत अर्ज
करण्याची मुदत आहे.
jagran josh

काही महत्वाच्या तारखा – (CTET Exam 2024)
1. अर्ज प्रक्रिया सुरु – 3 नोव्हेंबर 2023
2. अर्जाची अंतिम तारीख – 23 नोव्हेंबर 2023
3. परीक्षा फी भरण्याची तारीख – 23 नोव्हेंबर 2023
4. परीक्षेची तारीख – 21 जानेवारी 2024

परीक्षेसंदर्भात काही महत्वाच्या लिंक्स –
1. फॉर्म भरण्यासाठी येथे CLICK करा – CLICK
2. माहिती पुस्तिका – CLICK
3. परिपत्रक पाहण्यासाठी येथे CLICK करा – CLICK
4. अधिकृत वेबसाईट – https://ctet.nic.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career Success Story : हिने तर कमालच केली!! ISRO मध्ये दोन जागांसाठी झालेल्या मुलाखतीत मराठी मुलीने मारली बाजी

Career Success Story of Shivani Deshmukh

करिअरनामा ऑनलाईन । लहानपणापासूनच बुद्धीने तल्लख (Career Success Story) आणि अभ्यासात हुशार असलेल्या शिवानीची कठोर प्रयत्नानंतर इस्रो (ISRO) संशोधन संस्थेत तिची निवड झाली आहे. अंतराळ संशोधन कार्यात नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या इस्रो या संशोधन संस्थेत ज्युनिअर रिसर्च फेलो (JRF) म्हणून शिवानी राजीव देशमुख हीची निवड झाली आहे. केवळ दोन पदांसाठी हैदराबाद येथे झालेल्या मुलाखतीमध्ये शिवानीने हे यश मिळवले असून ते यश मिळवणारी ती एकमेव मराठी मुलगी ठरली आहे.

शिवानी देशमुख ही मूळची बुलडाणा जिल्ह्यातील कंधारा (ता. खामगाव) येथील रहिवासी आहे. शिवानीचे वडील राजीव ऊर्फ निळकंठराव हिंमतराव देशमुख हे आर्वी (जि. वर्धा) येथे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतात. त्यामुळे तिचे शिक्षणही तिथेच झाले.  शाळा महाविद्यालयातील शिक्षकांचे आणि आई-वडिलांचे मार्गदर्शन मिळाल्यामुळे आपल्याला इस्रोपर्यंत पोहोचता आल्याच्या भावना शिवानीने व्यक्त केल्या आहेत.

प्राध्यापक म्हणून केली नोकरी (Career Success Story)
तिचे बारावीपर्यंतचे शिक्षण आर्वी येथेच झाले. B.Sc. चे पदवी पर्यंतचे शिक्षण तिने अमरावतीच्या शिवाजी कॉलेजमधून घेतले; तर M. Sc. नागपूरच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्‍स कॉलेजमधून पूर्ण केले. एवढंच नव्हे तर शिवानीने नेट, सेट या दोन्‍ही परीक्षाही पास केल्या आहेत. या नंतर ती अमरावतीच्या शिवाजी विद्यालयात सहाय्यक अधिव्याख्याता म्‍हणून रुजू झाली.

गावाचे नांव पोहचले राष्ट्रीय पातळीवर
शिवानीच्या मूळ गावात, कंझारा येथे तिच्‍या नातेवाइकांनी (Career Success Story) तिच्या या यशाचा आनंदोत्‍सव साजरा केला. शिवानीच्या या कामगिरीने खामगाव तालुका, बुलडाणा जिल्ह्याचे, तसेच आर्वीचे नाव राष्ट्रीय पातळीवर उंचावले गेले आहे.
पालक आणि शिक्षकांमुळे मिळाले यश
या कामगिरीविषयी बोलताना शिवानी म्हणते;  “मला ईस्रोपर्यंत पोहोचता आले, याचा मला आनंद आहे. शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन अतिशय महत्त्वाचे होते. माझे आई-वडिल माझ्यामागे ठामपणे उभे राहिले. त्यांनी केलेले संस्कार व मार्गदर्शन यामुळेच मला इस्रोमध्ये पोहचता आले आहे.”

“शिवानी ही लहानपणापासूनच अभ्यासात हुशार आहे. तिला संशोधनात गोडी असल्‍याने तिने विज्ञान विषयात शिक्षण घेतले. श्रीशिवाजी विद्यालयात अध्यापन करीत असताना इस्रोच्या वतीने मिळालेल्‍या संधीचे तिने सोने केल्‍याचा आम्हाला  सार्थ अभिमान आहे. तिच्‍या या यशाने आपल्‍या महाराष्ट्राचे नाव संशोधन संस्‍थेत पोहचले आहे; ही खूप मोठी बाब आहे.” असे शिवानीचे वडील राजीव देशमुख म्हणाले.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SCI Recruitment 2023 : मुंबई मध्ये नोकरी!! महिन्याचा 2,20,000 पगार; शिपिंग कॉर्पोरेशनने जाहीर केली ‘या’ पदांवर भरती 

SCI Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ (SCI Recruitment 2023) इंडिया लिमिटेड, मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मास्टर मरिनर / मुख्य अभियंता पदांच्या एकूण 43 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई
भरले जाणारे पद – मास्टर मरिनर / मुख्य अभियंता
पद संख्या – 43 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 06 नोव्हेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 नोव्हेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – द शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, २४५, मादाम कामा रोड, नरिमन पॉइंट, मुंबई, पिन कोड – 400021

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – 45 वर्षे
अर्ज फी – Rs. 500/-
SC/ST/PWBD/EXSM उमेदवारांना – Rs. 100/-
निवड प्रक्रिया – मुलाखत
मिळणारे वेतन – Rs.80,000/- to Rs. 2,20,000/- दरमहा

भरतीचा तपशील – (SCI Recruitment 2023)

पद पद संख्या 
मास्टर मरिनर 17 पदे
मुख्य अभियंता 26 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. Candidates should have completed minimum 3 years sea time after obtaining Masters FG COC/MEO Class I COC, out of which at least 2 years sea-time must be in the substantive rank of Master or Chief Engineer. Certificate of Competency must be issued by the Govt. of India
2. Desirable qualification –
The candidate should have a valid Certificate of Competency (COC).

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. अर्जासोबत आवशक (SCI Recruitment 2023) कागदपत्राची प्रत जोडवी.
4. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवायचा आहे.
5. अर्ज 06 नोव्हेंबर 2023 पासून सुरु होतील.
6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2023 आहे.

काही महत्वाच्या तारखा –
SCI Mumbai Bharti 2023

काही महत्वाच्या लिंक्स – (SCI Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.shipindia.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com