Home Blog Page 212

Government Job : कृषी विभागात नोकरीची मोठी संधी; ‘या’ पदावर भरती सुरु; ग्रॅज्युएट करु शकतात अर्ज

Government Job

करिअरनामा ऑनलाईन । कृषी विभाग, गोवा अंतर्गत नोकरीची संधी (Government Job) निर्माण झाली आहे. या माध्यमातून ब्लॉक टेक्नोलॉजी मॅनेजर (बीटीएम), सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक पदांच्या एकूण 6 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – कृषी विभाग, गोवा
भरले जाणारे पद – ब्लॉक टेक्नोलॉजी मॅनेजर (बीटीएम), सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक
पद संख्या – 6 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 नोव्हेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – राज्य नोडल अधिकारी (एटीएमए) / कृषी संचालक यांचे कार्यालय, कृषी संचालनालय, कृषी भवन, टोंक, करंझाळे-गोवा
नोकरीचे ठिकाण – गोवा
वय मर्यादा – 18 ते 45 वर्षे

भरतीचा तपशील –

पदाचे नाव पद संख्या 
ब्लॉक टेक्नोलॉजी मॅनेजर (बीटीएम) ०३
सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक ०३

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
ब्लॉक टेक्नोलॉजी मॅनेजर (बीटीएम) आयसीएआर मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाकडून एम.एस्सी. (ॲग्री/हॉर्टी) किंवा आयसीएआर मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाकडून बी.एस्सी. (ॲग्री/हॉर्टी)
सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक बी.एस्सी

 

मिळणारे वेतन –

पद मिळणारे वेतनश्रेणी
ब्लॉक टेक्नोलॉजी मॅनेजर (बीटीएम) Rs. 30,000/-
सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक Rs. 25,000/-

 

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी (Government Job) उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे सोबत जोडणे आवश्यक आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2023 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – 
PDF
अधिकृत वेबसाईट – www.agri.goa.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Income Tax Department Recruitment 2023 : डिग्री धारकांसाठी आयकर विभागात भरती सुरु; महिन्याला  81,100 रुपये पगार मिळवा 

Income Tax Department Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । आयकर विभाग अंतर्गत (Income Tax Department Recruitment 2023) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कर सहाय्यक, हवालदार पदांच्या एकूण 29 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – आयकर विभाग
भरले जाणारे पद –
1. कर सहाय्यक – 18 पदे
2. हवालदार – 11 पदे
पद संख्या – 29 पदे
वय मर्यादा – १८ ते २७ वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कस्टम्स, कार्मिक आणि आस्थापना विभागाचे सहाय्यक/ उपायुक्त, 8वा मजला, नवीन कस्टम हाउस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई- 400001

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Income Tax Department Recruitment 2023)

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
कर सहाय्यक
  • Degree from a recognized University or equivalent.
  • Should have basic knowledge in the use of computer applications.
  • Should possess a speed of not less than 8000 key depressions per hour for data entry work.
हवालदार Matriculation or equivalent from any recognized Board.

मिळणारे वेतन –

पद मिळणारे वेतन 
कर सहाय्यक (Pay Matrix L-4) Pay Scale Rs. 25,500/- to 81,100/- as per 7th CPC
हवालदार (Pay Matrix L-1) Pay Scale Rs.18,000- to 56,900/- as per 7th CPC

 

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर अर्ज सादर करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी (Income Tax Department Recruitment 2023) उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
4. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – 
PDF
अधिकृत वेबसाईट – https://incometaxmumbai.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career Success Story : सरकारी शाळेत शिकला.. 35 कंपन्यांनी रिजेक्ट केलं; तरीही मिळवलं करोडोचं पॅकेज

Career Success Story of manu Agarwal

करिअरनामा ऑनलाईन । काम करत असताना देखील (Career Success Story) तुम्हाला तुमचं ध्येय गाठता येतं; असं अनेकांनी आपल्या कर्तृत्वातून सिध्द केलं आहे. मनू अग्रवाल ही त्यापैकीच एक आहे. तो उत्तर प्रदेशच्या झाशीचा रहिवासी आहे. त्याने काम करत असतानाही यश मिळवून दाखवलं आहे. त्याचे सुरुवातीचे शिक्षण हिंदी माध्यमाच्या शाळेत झाले. 10 हजार  रुपयांपासून त्याने नोकरीला सुरुवात केली. चांगल्या संधींचा शोध घेत, 1 कोटींहून अधिक पगाराचे पॅकेज मिळवण्यात तो यशस्वी झाला. तो ट्यूटोर्ट अकादमीचा सह-संस्थापक देखील आहे. ही अकादमी डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा स्ट्रक्चर आणि फुल स्टॅकमधील मास्टर कोर्ससाठी ओळखली जाते. आज आपण मनू अग्रवाल या तरुणाचा प्रवास पाहणार आहोत….

सरकारी शाळेत शिकला
मनू अग्रवाल हा एक सामान्य कुटुंबातील तरुण आहे. त्याचे शिक्षण हिंदी माध्यमाच्या सरकारी शाळेत झाले. शिकत असताना त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. गणित विषय त्याच्यासाठी अवघड होता. पण तो हरला नाही. त्याने आपल्यातील कमकुवतपणाचा धैर्याने सामना करण्याचा निर्धार केला. AIEEE परीक्षेत त्याने उत्कृष्ट रँक मिळवली. यामुळे त्याला BCA (Bachelor of Computer Application) करण्याचा मार्ग मोकळा झाला.

35 कंपन्यांनी नाकारलं
घरातील आर्थिक अडचणीचा सामना करत मनूचा प्रवास सुरु होता.  2016 मध्ये त्याला 10,000 रुपयांची पेड इंटर्नशिप मिळाली. बीसीएनंतर एमसीए करत असताना अनेक कंपन्यांमध्ये त्याने नोकरीसाठी अर्ज केला. पण दुर्दैव पाठ सोडत नव्हते. त्याला एकामागोमाग एक सुमारे 35 कंपन्यांनी नाकारले होते. पण तो खचला नाही. नोकरी मिळवायची आणि ती ही चांगल्या पगाराच्या पॅकेजचीच; असा मणूने निर्धार केला होता. नोकरी शोधतच राहणार यावर मनू ठाम होता. आपल्याला भारतात यश मिळाले नाही; तर परदेशात नोकरी शोधण्यासाठी जायचं; असा त्याने मनाशी ठाम निश्चय केला.  त्याने परदेशात नोकरीसाठी अर्जही करण्यास सुरुवात केली.

कोटीत मिळाले पॅकेज
मनू अग्रवालकडे अपवादात्मक कोडिंग कौशल्य होते. याचा (Career Success Story) त्याला फायदा झाला. त्याला मायक्रोसॉफ्टमध्ये इंटर्नशिप मिळाली. त्यानंतर त्याला नोकरीची ऑफरही देण्यात आली. मायक्रोसॉफ्टने त्याला अमेरिकेतील सिएटल येथे १.९ कोटी रुपये पगाराचे पॅकेज देऊ केले. त्यानंतर तो तिथे काम करू लागला.
कोरोना काळात मायदेशी परतला (Career Success Story)
कोरोना काळात सगळीकडेच लॉकडाऊन होते. मनू परदेशी होता; पण कुटुंबाच्या आरोग्याच्या चिंतेमुळे त्याला  भारतात परतावे लागले. इथे आल्यानंतर त्याचे प्राधान्यक्रम बदलले. कोविड-19 महामारीच्या काळात त्याने आपल्या कुटुंबासोबत रहावे; अशी त्याच्या कुटुंबाची इच्छा होती. भारतात परतल्यानंतर तो सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून गुगलमध्ये रुजू झाला.  मग त्याचा मित्र अभिषेक गुप्तासोबत ट्यूटोर्ट अकादमीमध्ये सह-संस्थापक म्हणून सामील होण्याचा निर्णय त्याने घेतला. ही अकादमी डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा स्ट्रक्चर आणि फुल स्टॅकमधील मास्टर कोर्ससाठी ओळखली जाते.

काय करते ट्यूटोर्ट अकादमी
मनु अग्रवालच्या देखरेखीखाली, ट्यूटोर्ट अकादमी करिअरच्या वाढीसाठी कौशल्य विकासाचे महत्त्व ओळखत आहे.  करिअरमधील प्रगती असो किंवा  व्यवसायाचा (Career Success Story) विस्तार असो, चांगले सामुदायिक शिक्षण असो किंवा विकसित तंत्रज्ञानाची गतिशीलता समजून घेणे असो, त्यांचे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना योग्य मार्ग दाखवतात.
अकादमीच्या कार्यक्रमात उद्योग तज्ञांचे प्रशिक्षण, वैयक्तिक मार्गदर्शन, प्रोफाइल पुनरावलोकन, प्लेसमेंट सहाय्य, यासह  दोन वर्षांचा पास आणि सानुकूल पेमेंट पर्याय यांचा समावेश आहे. लाइव्ह-ऑनलाइन क्लासेसचा अवलंब करून, Tutort Academy विद्यार्थ्यांना त्यांच्या गतीने नोकरीसाठी तयार कौशल्ये आत्मसात करण्यास सक्षम करते, ज्यामुळे त्यांचे शिक्षण सोयीस्कर होते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : येणाऱ्या कोणत्या वर्षी पहिला भारतीय चंद्रावर पोहचण्याचे उद्दिष्टय आहे? पहा जनरल नॉलेज वाढवणारे प्रश्न

GK Updates 6 Nov.

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

1. इस्रो चे कोणत्या सालापर्यंत भारतीय अवकाश स्थानक उभरण्याचे लक्ष्य आहे?
(A) २०२८
(B) २०३०
(C) २०३५
(D) २०४०
उत्तर -(C) २०३५
2. कोणत्या वर्षापर्यंत पहिला भारतीय चंद्रावर जाण्याचे इस्रो ला उद्दिष्ट ठेवण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केलें आहे?
(A) २०३५
(B) २०४०
(C) २०४५
(D) २०५०
उत्तर -(B) २०४०

3. कोणत्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने समलिंगी विवाहाला मान्यता देण्यास नकार दिला आहे?
(A) पाकिस्तान
(B) मलेशिया
(C) श्रीलंका
(D) भारत
उत्तर -(D) भारत (GK Updates)
4. भारतात प्रथमच कोठे व्होलीबॉल वर्ल्ड बीच प्रो टूर स्पर्धा होत आहे?
(A) गोवा
(B) मुंबई
(C) दिल्ली
(D) कोलकत्ता
उत्तर -(A) गोवा

5. तिसरी जागतिक सागरी परिषद २०२३ कोठे होत आहे?
(A) चेन्नई
(B) केरळ
(C) मुंबई
(D) विशाखापट्टनम
उत्तर -(C) मुंबई
6. मुंबई येथे तिसऱ्या जागतिक सागरी परिषदेचे उदघाट्न कोणाच्या हस्ते झाले?
(A) सर्वांनंद सोनोवाल
(B) रमेश बैस
(C) प्रमोद सावंत
(D) नरेंद्र मोदी (GK Updates)
उत्तर -(D) नरेंद्र मोदी
7. महाराष्ट्र राज्यात किती ग्रामपंचायतीत कौशल्य विकास केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत?
(A) ४००
(B) ४५०
(C) ५००
(D) ५५०
उत्तर -(C) ५००
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Diwali Business Ideas : दिवाळी धुमधडाक्यात करायचीय?? सणासुदीच्या काळात ‘हे’ व्यवसाय करा… गुंतवणूकही आहे कमी

Diwali Business Ideas (1)

करिअरनामा ऑनलाईन । सध्या सगळीकडेच सणांची (Diwali Business Ideas) धामधूम सुरु आहे. दिवाळीसारखा सण म्हटला की मोठ्या प्रमाणात खरेदी होते. वर्षातून एकदा येणारा सण सगळेजण दणकून साजरा करतात. पण पैसा हातात असेल तरच तुम्ही या उत्सवाचा मनमुराद आनंद घेवू शकता. कमी भांडवलात कोणता व्यवसाय सुरू करता येईल असा विचार अनेकांच्या  मनात घोळत असेल. यासाठीच आजचा लेख आहे. आज आम्ही तुम्हाला कमी भांडवलामध्ये कोणता व्यवसाय सुरु करता येईल; याविषयी मार्गदर्शन करणार आहोत.

सणासुदीच्या काळात अनेक दुकानं आणि ई-कॉमर्स वेबसाईट्स ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी निरनिराळ्या ऑफर्स, डिस्काउंट, कॅशबॅक जाहीर करत आहेत. सणासुदीच्या काळात लोकांचा खरेदीकडे कल वाढतो. तसंच या काळात बरेचजण भेटवस्तूंची मोठ्या प्रमाणावर देवाण-घेवाण करतात. या संधीचा फायदा घेत अल्प भांडवलावर एखादा छोटा व्यवसाय करण्याची ही उत्तम संधी असते. या काळात तुम्ही अल्पावधीत चांगला नफा मिळवू शकता.

रांगोळी विक्री (Diwali Business Ideas)
दिवाळी म्हणलं की अंगणभर रांगोळी काढणं आलंच. अनेकजण हाताने आकर्षक रांगोळी रेखाटतात शिवाय अनेकजण  हातानं रांगोळी काढण्याऐवजी रांगोळीचे नक्षीदार स्टिकर्स दारात आणि उंबरठ्यावर चिटकवण्यास प्राधान्य देत आहेत. अशास्थितीत तुम्ही पांढरी रांगोळी, रंगीत रांगोळी, रांगोळीचे छाप, संस्कार भारती रांगोळीचे कलर्स; स्टीकर्स याचा व्यवसाय नक्कीच करू शकता. यामध्ये कमी गुंतवणुकीत तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. रांगोळीच्या वैविध्यपूर्ण डिझाइन्स काढून त्याची यादी तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर टाकू शकता. तुमचं दुकान असेल तर तिथंदेखील तुम्ही रांगोळीचं साहित्य, स्टिकर्स विक्रीसाठी ठेवू शकता.

सजावटीसाठी लाईटच्या माळा, तोरणांचा व्यवसाय
दिवाळी म्हणलं की, घर, ऑफीस, दुकानांची सजावट आलीच. तुम्ही अल्प भांडवलावर व्यवसाय करू इच्छित असाल तर दिवाळीच्या काळात विविध प्रकारची तोरणे, लाईटच्या माळा विकू शकता. अनेक जण घराच्या, ऑफिसच्या तसेच दुकानांच्या  सजावटीसाठी वेगवेगळ्या प्रकारची तोरणं, लाईटच्या (Diwali Business Ideas) माळा खरेदी करतात; मात्र लाईटच्या माळांचा व्यवसाय करण्यापूर्वी तुमचे टार्गेट कस्टमर्स कोण आहेत, याचा शोध घ्या. अशा कस्टमर्सच्या मागणीनुसार लाईटच्या माळांमध्ये गुंतवणूक करून त्यांची विक्री करा. अभ्यास न करता व्यवसाय सुरू केला तर तुमचं नुकसान होऊ शकतं.

मातीच्या खेळण्यांचा व्यवसाय
दिवाळीच्या काळात शाळांना सुट्टी असल्यामुळे मुले मातीचा किल्ला आवर्जून बनवतात. या किल्यावर मांडण्यासाठी मातीच्या खेळण्यांची आवश्यकता असते. शिवाजी महाराज, मावळे, तोफा, विविध प्रकारचे प्राणी यांना या काळात मोठी मागणी असते. आपल्या मुलांसाठी किंवा दुसऱ्या मुलांना भेट देण्यासाठी खेळणी खरेदी केली जातात. घराच्या सजावटीसाठी देखील मातीच्या पणत्यांची खरेदी होते. त्यामुळे तुम्ही खेळणी आणि पणती विक्रीचा व्यवसाय सुरू करू शकता. यासाठी तुम्ही सुरुवातीला ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा देखील वापर करू शकता.

फटाक्यांचा व्यवसाय 
दिवाळीत अबाल वृध्दांमध्ये फटाक्यांचं मोठं आकर्षण असतं. या काळात मोठ्या प्रमाणात फटाके खरेदी होते. त्यामुळे  तुम्ही फटाके विक्रीचा व्यवसाय सुरु करू शकता. फटाक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नफा मिळतो. तुम्ही हा व्यवसाय केला तर तुम्हाला चांगले पैसे कमावता येतील. फटाके विक्रीसंदर्भात प्रत्येक राज्यात वेगवेगळे नियम आणि कायदे आहेत. त्यामुळे हा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या राज्यातले नियम आणि कायद्यांविषयी माहिती अवश्य घ्या; जेणेकरुन तुमचं नुकसान होणार नाही.

वॉल पेंटिंग (Diwali Business Ideas)
वॉल पेंटिंगचा व्यवसाय सुरू केला, तर त्यातून तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. तुम्हाला स्वतःला पेंटिंग्जची आवड असेल तर तुम्ही एक्सक्लुसिव्ह पेंटिंग्ज विकू शकता. सणासुदीच्या काळात घराच्या सजावटीसाठी वॉल पेंटिंग्ज खरेदी केली जातात. विशेष म्हणजे या व्यवसायासाठी तुम्हाला दुकानाची गरज नाही. तुम्ही घरबसल्या हा व्यवसाय करू शकता. तसंच फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉनसारख्या वेबसाईट्सवर तुम्ही स्वतः एक विक्रेता म्हणून रजिस्टर करून वस्तूंची विक्री करू शकता. तुमचं दुकान असेल तर तिथं किंवा एखाद्या मित्राच्या दुकानात तुम्ही पेंटिंग्ज विक्रीला ठेवू शकता. यामुळे तुमचं उत्पन्न नक्कीच वाढेल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : बुलडाणा अर्बन को ऑप बँकेत पदवीधारकांसाठी नोकरीची संधी; मिळवा भरघोस पगार आणि इतर सवलती

Job Alert (80)

करिअरनामा ऑनलाईन । बुलडाणा अर्बन को ऑप. सोसायटी, बुलडाणा (Job Alert) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शाखा व्यवस्थापक, सहाय्यक. शाखा व्यवस्थापक पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2023 आहे.

बँक – बुलडाणा अर्बन को ऑप. सोसायटी, बुलडाणा
भरले जाणारे पद –
1. शाखा व्यवस्थापक – 05 पदे
2. सहाय्यक. शाखा व्यवस्थापक – 05 पदे
पद संख्या – 10 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 नोव्हेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – बुलडाणा अर्बन को. ऑप. क्रेडीट सोसायटी लि. बुलडाणा र.नं. २६७ मुख्य कार्यालय : सहकार सेतु, हुतात्मा गोरेपथ, बुलडाणा, ता. जि. बुलडाणा
नोकरी करण्याचे ठिकाण – बुलडाणा

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Alert)
1. शाखा व्यवस्थापक – B.A., B.Com., B.Sc., M.B.A. मध्ये पदवी प्राप्त व कोणत्याही सहकारी बँकेत काम केल्याचा किमान ५ ते ६ वर्षांचा अनुभव किंवा नागरी सहकारी पतसंस्थेत काम केल्याचा १० वर्षाचा अनुभव
2. सहाय्यक. शाखा व्यवस्थापक – B.A., B.Com., B.Sc., M.B.A. मध्ये पदवी प्राप्त व कोणत्याही सहकारी बँकेत काम केल्याचा किमान २ ते ३ वर्षांचा अनुभव किंवा नागरी सहकारी पतसंस्थेत काम केल्याचा ५ वर्षाचा अनुभव.
मिळणारे वेतन – निवड झाल्यानंतर उमेदवारास आकर्षक वेतन व सर्व सेवा सवलती मिळतील
असा करा अर्ज –
1. इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2023 आहे.
4. अर्ज दिलेल्या मुदती अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवायचा आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://buldanaurban.org/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : राज्यातील ‘या’ महानगरपालिकेत होतेय नवीन भरती; महिन्याचा 80 हजार पगार

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । मीरा भाईंदर महानगरपालिका (Job Notification) येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी परिचारिका आणि MPW पदांच्या एकूण 45 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 08 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – मीरा भाईंदर महानगरपालिका
भरली जाणारी पदे –
1. वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ) – 15 पदे
2. परिचारिका – 15 पदे
3. MPW (पुरुष) – 15 पदे  (Job Notification)
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 नोव्हेंबर 2023
अर्ज करण्याचा पत्ता – सार्वजनिक आरोग्य विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, नगरभवन, मांडली तलाव, तळ मजला, भाईंदर (प.), ता. जि. ठाणे – 401101

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Notification)
1. वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) – MBBS + MIC/ MMC रेजिस्ट्रेशन.
2. परिचारिका – B.Sc (नर्सिंग)/ GNM + MNC रेजिस्ट्रेशन.
3. MPW (पुरुष) – 12 वी विज्ञान + पॅरामेडिकल बेसिक ट्रैनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स.
नोकरी करण्याचे  ठिकाण – मीरा-भाईंदर

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.mbmc.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Central Bank of India Recruitment 2023 : सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ऑफिसर पदावर भरती सुरु; ग्रॅज्युएट करू शकतात अर्ज 

Central Bank of India Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India Recruitment 2023) अंतर्गत अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 192 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2023 आहे.

बँक – सेंट्रल बँक ऑफ इंडिया
भरले जाणारे पद – अधिकारी
पद संख्या – 192 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 नोव्हेंबर 2023
अर्ज फी – (Central Bank of India Recruitment 2023)
1. अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/पीडब्ल्यूबीडी उमेदवार/ महिला उमेदवार – Rs.175/-+GST
2. इतर सर्व उमेदवार – Rs. 850/-+GST

Central Bank of India Bharti 2023 Notification

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे.
मिळणारे वेतन –

central bank bharti 2023 - salary

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज शेवटच्या तारखे (Central Bank of India Recruitment 2023) अगोदर करायचा आहे.
3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2023 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.centralbankofindia.co.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ITBP Recruitment 2023 : 10वी पास उमेदवारांसाठी ITBP अंतर्गत कॉन्स्टेबल होण्याची संधी; पटापट करा अर्ज 

ITBP Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी सेवेत सामील होण्याची इच्छा (ITBP Recruitment 2023) असणाऱ्या तरुणांसाठी महत्वाची अपडेट आहे. इंडो-तिबेटन सीमा पोलीस दल अंतर्गत कॉन्स्टेबल पदाच्या 248 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – इंडो तिबेटन बॉर्डर पोलिस (ITBP)
भरले जाणारे पद – कॉन्स्टेबल (सामान्य कर्तव्य)
पद संख्या – 248 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ITBP Recruitment 2023)
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 13 नोव्हेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 नोव्हेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जाहिरात पहा

अर्ज फी – Rs. 100/-
वय मर्यादा – 21 ते 23 वर्षे

itbp vacancy 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. कॉन्स्टेबल (सामान्य कर्तव्य) i) Matriculation or 10th pass from a recognized Board or Institution or equivalent.
मिणारे वेतन – (Level-3 in the Pay Matrix) Rs. 21700–69100 (as per 7th CPC).

असा करा अर्ज – (ITBP Recruitment 2023)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. नोंदणीसाठी उमेदवाराने रीतसर भरलेला अर्ज (अ‍ॅनेक्‍चर-I), अॅडमिट कार्ड (अ‍ॅनेक्‍चर-II) आणि रजिस्ट्रेशन स्लिप (अ‍ॅनेक्‍चर-VI) सोबत आणणे आवश्‍यक आहे.
3. या फॉर्मच्या प्रती ITBP भर्ती वेबसाइटवर देखील उपलब्ध आहेत.
4. उमेदवाराने योग्यरित्या भरलेला फॉर्म एकदा सबमिट केल्यावर त्याला/तिला एक तारीख आणि वेळ दिली जाईल ज्या दिवशी त्याने/तिने PET/PST आणि कागदपत्रांसाठी संबंधित ITBP भर्ती केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक असेल.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2023 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – recruitment.itbpolice.nic.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MUCBF Recruitment 2023 : लिपिक पदावर भरती सुरु; महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत ऑनलाईन करा अर्ज

MUCBF Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह (MUCBF Recruitment 2023) बँक्स फेडरेशन लि. अंतर्गत भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ लिपिक पदांच्या 19 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि.
भरले जाणारे पद – कनिष्ठ लिपिक
पद संख्या – 19 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 नोव्हेंबर 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे. MS-CIT कोर्स पूर्ण केला असावा.

वय मर्यादा – उमेदवाराचे वय 01 नोव्हेंबर 2023 रोजी 22 ते 35 वर्षापर्यंत असावे.
परीक्षा फी : ₹944/-
नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर जिल्हा
परीक्षेचे ठिकाण – नागपूर

मिळणारे वेतन – (MUCBF Recruitment 2023)
1. प्रथम सहा महिन्याकरिता : 15,000/- रुपये दरमहा
2. बारा महिन्याकरिता : 19,000/- रुपये दरमहा
3. सेवेत कायम केल्यांनतर सुरुवातीचे वेतन : 32,000/- रुपये दरमहा

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – mucbf.com
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com