Home Blog Page 194

Job Alert : क्लर्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर पदावर नोकरी; ‘या’ जिल्ह्यातील क्रीडा अधिकारी कार्यालयात निघाली भरती

Job Alert (92)

करिअरनामा ऑनलाईन । जिल्हा क्रीडा परिषद, कोल्हापूर अंतर्गत (Job Alert) जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे क्लर्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.  या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर
भरले जाणारे पद – क्लर्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर
पद संख्या – 02 पदे (Job Alert)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 डिसेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, छत्रपती शिवाजी स्टेडियम, खसबाग मैदान कोल्हापूर
नोकरी करण्याचे ठिकाण – कोल्हापूर

असा करा अर्ज – (Job Alert)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2023 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – 
PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.zpkolhapur.info/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : प्राध्यापकांसाठी खुषखबर!! कोल्हापूरच्या ‘या’ महाविद्यालयात मिळणार नोकरीची संधी

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, कोल्हापूर (Job Notification) अंतर्गत भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, कोल्हापूर
भरले जाणारे पद – सहायक प्राध्यापक
पद संख्या – 06 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-Mail)
E-Mail ID – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 डिसेंबर 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – कोल्हापूर

असा करा अर्ज – (Job Notification)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
3. अर्ज दिलेल्या संबंधित E-Mail आयडीवर सादर करावा.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 डिसेंबर 2023 आहे.
5. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा; उशिरा आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – 
PDF
अधिकृत वेबसाईट – https://coakolhapur.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Mahavitaran Recruitment 2023 : महावितरणमध्ये नोकरीची संधी; 10+2/ITI/COPA पास करु शकतात अर्ज

Mahavitaran Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । अधिक्षक अभियंता मंडळ (Mahavitaran Recruitment 2023) कार्यालय, अमरावती अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – महावितरण, अमरावती
भरले जाणारे पद – शिकाऊ उमेदवार
पद संख्या – 11 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 डिसेंबर 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – अमरावती

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Mahavitaran Recruitment 2023)

  • 10+2 Pass
  • ITI in Electrician/Lineman, COPA Trade pass required.

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाईट वर ऑनलाईन नोंदणी करायची आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
3. ऑनलाईन नोंदणी (Mahavitaran Recruitment 2023) करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2023 आहे.
4. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – 
PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BOB Recruitment 2023 : ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी मोठी संधी!! बँक ऑफ बडोदामध्ये 250 पदांवर भरती सुरु

BOB Recruitment 2023 (7)

करिअरनामा ऑनलाईन । तुम्हाला जर बँकेत नोकरी (BOB Recruitment 2023) करायची इच्छा असेल तर ही महत्वाची अपडेट आहे. बँक ऑफ बडोदा अंतर्गत वरिष्ठ व्यवस्थापक पदांच्या एकूण 250 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2023 आहे.

बँक – बँक ऑफ बडोदा
भरले जाणारे पद – वरिष्ठ व्यवस्थापक
पद संख्या – 250 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन/ ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 डिसेंबर 2023
वय मर्यादा – 28 ते 37 वर्षे

अर्ज फी – (BOB Recruitment 2023)
1. Rs.600/- + Applicable Taxes + Payment Gateway Charges for General, EWS & OBC candidates
2. Rs.100/- + Applicable Taxes + Payment Gateway Charges for SC, ST, PWD & Women
निवड प्रक्रिया – मुलाखत
आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद शैक्षणिक पात्रता
वरिष्ठ व्यवस्थापक
  • Graduate in any discipline with minimum 60% marks in all semesters/years
  • Post Graduate / MBA (Marketing & Finance) or equivalent professional qualification

 

मिळणारे वेतन – Rs. 63840 x 1990 (5) – 73790 x 2220 (2) – 78230
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 26 डिसेंबर 2023 आहे.
3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण (BOB Recruitment 2023) असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
4. दिलेल्या मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
5. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.
6. अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकचा वापर करा.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – 
PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.bankofbaroda.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : कोणता देश मुलीचं लग्न झाल्यावर सरकारी नोकरी देतो? कोणत्या देशात एकही नदी नाही? सामान्य ज्ञानात भर घालणारे प्रश्न

GK Updates 6 Dec.

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

1. पृथ्वीवरील कोणत्या देशात एकही रेल्वे ट्रॅक नाही?
उत्तर- भूतान, सायप्रस, आइसलँड इत्यादी असे देश आहेत की जिथं एकही रेल्वे ट्रॅक नाही.
2. ताजमहालची निर्मिती मुमताजच्या मृत्यूच्या आधी झाली की नंतर?
उत्तर- मुमताज यांचं निधन (GK Updates) बुरहानपूर येथे १७ जून १६३१ रोजी झालं होतं. त्यानंतर ताजमहालची निर्मिती झाली ज्याचं काम १६३४ साली पूर्ण झालं.

3. कोणत्या देशात सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे फ्री आहे?
उत्तर- लक्झमबर्ग
4. कोणत्या देशात एकही नदी नाही?
उत्तर- सौदी अरेबिया

5. (GK Updates) असा कोणता देश आहे जिथं मुलीचं लग्न झाल्यावर सरकारी नोकरी मिळते?
उत्तर- आइसलँड
6. कोणत्या प्राण्याचं रक्त निळं असतं?
उत्तर- गोगलगाय, कोळी आणि ऑक्टोपस
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UGC NET Study Tips : UGC NET परिक्षेत चांगले गुण मिळवायचे आहेत? फॉलो करा ‘या’ टिप्स 

UGC NET Study Tips

करिअरनामा ऑनलाईन । UGC NET ही करिअरच्या मार्गातील (UGC NET Study Tips) महत्त्वाच्या परीक्षांपैकी एक परीक्षा आहे. देशभरातील विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये सहाय्यक प्राध्यापक होण्याचे किंवा ज्युनियर रिसर्च फेलोशिप (JRF)  मिळविण्याचे स्वप्न पाहणारे उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करतात. जर तुम्हीही विद्यापीठ अनुदान आयोगाच्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेला बसणार असाल, तर तुमच्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स आम्ही संगत आहोत. या टिप्समुळे तुम्हाला परीक्षेत चांगले गुण मिळू शकतात. चला तर पाहूया..

1. ऐनवेळी नवीन वाचू नका 
महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही परीक्षेत यश मिळवण्यासाठी परीक्षेच्या शेवटच्या क्षणी नवीन काहीही वाचू नका. आत्तापर्यंत जे काही वाचले आहे त्याची उजळणी करा. शेवटच्या क्षणी नवीन काहीही वाचून, तुम्ही जुन्या प्रकरणावर किंवा विषयावर लक्ष केंद्रित करू शकणार नाही; लक्षात ठेवा.
2. मॉक टेस्टवर लक्ष केंद्रित करा (UGC NET Study Tips)
परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी तुमच्या गतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही भरपूर सराव करणं गरजेचं आहे. तथापि, वेग राखण्यासाठी, प्रश्न अर्धवट वाचू नका. संपूर्ण प्रश्नपत्रिका वाचा आणि मगच उत्तर द्या. फक्त कोणताही प्रश्न न चुकवण्याचा प्रयत्न करा.यावेळी विद्यार्थ्यांना केवळ मॉक टेस्टवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शक्य तितक्या मॉक टेस्ट द्या. तसेच, मागील वर्षांमध्ये विचारलेले प्रश्न सोडवा, ज्यामुळे त्यांना चांगली तयारी करण्यास मदत होईल.

3. वेग वाढवणं महत्वाचं
परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी तुमच्या लिखानाच्या (UGC NET Study Tips) वेगाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. वेग वाढवण्यासाठी तुम्ही भरपूर सराव करणं गरजेचं आहे. तथापि, वेग राखण्यासाठी, प्रश्न अर्धवट वाचू नका. संपूर्ण प्रश्नपत्रिका वाचा आणि मगच उत्तर द्या. फक्त कोणताही प्रश्न चुकणार नाही हा प्रयत्न करा.
4. चिंताग्रस्त होऊ नका
परीक्षेत यश तेव्हाच मिळते जेव्हा उमेदवार शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या तंदुरुस्त असतो. म्हणून, आपण स्वत: दमनार नाही याची काळजी घ्या. चिंताग्रस्त होऊ नका. फक्त तुमच्या तयारीवर विश्वास ठेवा आणि शांत मनाने परीक्षा द्या.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Success Story : ती एकेकाळी डेटा एंट्री ऑपरेटरची नोकरी करायची; न थकता तीने UPSC दिली आणि आज IAS झाली 

UPSC Success Story of IAS Ramya CS

करिअरनामा ऑनलाईन । UPSC किंवा MPSC मध्ये यश मिळवण्याचे (UPSC Success Story) स्वप्न जवळजवळ प्रत्येक उमेदवार पाहतो आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी कठोर प्रयत्न करतो. पण प्रत्येकाला पहिल्याच प्रयत्नात यश मिळेल असं होत नाही. काहीजण पहिल्या प्रयत्नात; काही दुसऱ्या प्रयत्नात तर काहींना परीक्षेच्या शेवटच्या प्रयत्नाची वाट पहावी लागते. IAS अधिकारी रम्या यापैकीच एक आहे. रम्याने 2021 मध्ये घेतलेल्या नागरी सेवा परिक्षेत संपूर्ण भारतात 46 वा क्रमांक पटकावला आहे. हा प्रवास तिच्यासाठी सोपा नव्हता. रम्याला तिचे ध्येय गाठण्यासाठी कोणत्या कसोट्या पार कराव्या लागल्या ते पाहूया…

कठीण परिस्थितीत आईने संगोपन केलं
रम्या मूळची कोईम्बतूरची रहिवासी आहे. तिच्या आयुष्यात (UPSC Success Story) अनेक चढ-उतार आले. शिक्षण घेण्यासाठी तिला लहानपणापासून खूप संघर्ष करावा लागला. रम्याची घरची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. कठीण परिस्थितीत तिला तिच्या आईने लहानाचे मोठे केले. आपल्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या भक्कम करण्यासाठी राम्याने लवकरात लवकर आपल्या पायावर उभे राहण्याचं ठरवलं आणि तिने नोकरी करण्याचा निर्णय घेतला. घरची आर्थिक स्थिती सामान्य करण्यासाठी तिने डेटा एन्ट्री ऑपरेटरची नोकरी केली. तिने 10 वीच्या परीक्षेनंतर पॉलिटेक्निक डिप्लोमाला प्रवेश घेतला. डिप्लोमाचा अभ्यास करत असताना तिला जाणवले की केवळ चांगले शिक्षणच आपली परिस्थिती बदलू शकतो.

UPSC च्या अभ्यासासाठी नोकरी सोडली
डिप्लोमा सुरु असतानाच तिला तिच्या प्राध्यापकांनी सांगितले की, सध्या तुझ्यासाठी नोकरी मिळणे सोपे आहे पण नोकरी करत असताना पुढील शिक्षणावर लक्ष केंद्रित करणे फार कठीण आहे. रम्या प्राध्यापकांच्या बोलण्याने खूप प्रभावीत झाली आणि डिप्लोमा करत असताना मिळालेल्या चांगल्या गुणांच्या (UPSC Success Story) जोरावर तिने कोईम्बतूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश घेतला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिला नोकरी लागली आणि बघता बघता प्रमोशनही मिळाले. यानंतर तिने इग्नूमधून MBA चे शिक्षण पूर्ण केले. पण नोकरी करुनही राम्याला जी शांतता हवी होती ती मिळत नव्हती. 2017 मध्ये तिने नोकरी सोडून दिली आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरु केली.

पूर्व परिक्षेत सलग 5 वेळा आले अपयश
रम्याचा यूपीएससीचा प्रवासही खाच खळग्यांनी भरलेला होता. तिने अनेक वेळा परीक्षेचा फॉर्म भरला आणि तयारी केली. पहिल्या पाच प्रयत्नांपैकी एकाही प्रयत्नात ती पूर्वपरीक्षा (UPSC Success Story) पास करु शकली नाही. रम्याने अपयशानंतरही हार मानली नाही. तिला आलेल्या आपयशातून तिने बोध घेतला. ती म्हणते की तिच्या UPSCच्या प्रवासात तिची आई नेहमीच तिच्यासोबत राहिली. परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी रम्या म्हणते की, “तुम्ही स्वतःला कधीही कमकुवत समजू नका, जरी अपयश आले तरी ते पचवून पुढे जाण्याची तयारी ठेवा. एकना एक दिवस यश नक्कीच तुमच्या हातात असेल.”
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Job : मराठी भाषा संचालनालयात ग्रंथपाल, शिपाई पदावर भरती सुरु; दरमहा 69,100 रुपये पगार

Government Job (35)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र शासन, मराठी भाषा विभागाच्या (Government Job) अधिनस्त असलेल्या भाषा संचालनालय, मुंबई व विभागीय कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथील कार्यालय अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ ग्रंथपाल, शिपाई पदांच्या एकूण 3 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – भाषा संचालनालय, महाराष्ट्र शासन
भरले जाणारे पद – कनिष्ठ ग्रंथपाल, शिपाई
पद संख्या – 03 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 डिसेंबर 2023
निवड प्रक्रिया – मुलाखती

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – १८ वर्षे
खुल्या प्रवर्गासाठी – ४० वर्षे
मागासवर्गीयांसाठी – ४५ वर्षे
परीक्षा फी – (Government Job)
1. अमागास – रु. १०००/-
2. मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग : रु. ९००/-
(परीक्षा शुल्का व्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच देय कर अतिरिक्त असतील.)

भरतीचा तपशील –

पद पद संख्या 
कनिष्ठ ग्रंथपाल 01
शिपाई 02

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ ग्रंथपाल
  • उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
  • ग्रंथालय शास्त्र या विषयातील पदविका किंवा पदवी धारण केलेली असावी.
शिपाई उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक.

 

मिळणारे वेतन –

पद मिळणारे वेतन
कनिष्ठ ग्रंथपाल २१७००-६९१०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते (सातव्या वेतन आयोगानुसार)
शिपाई १५०००-४७६०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते (सातव्या वेतन आयोगानुसार

 

आवश्यक कागदपत्रे –
1. अर्जातील नावाचा पुरावा (एस.एस.सी अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता)
2. वयाचा पुरावा (Government Job)
3. शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
4. सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा
5. अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
6. पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा
7. एस. एस. सी. नावात बदल झाल्याचा पुरावा
8. अराखीव, महिला, मागासवर्गीय, आ.दु.घ., आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र.
9. मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा
10. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र
11. अनुभव प्रमाणपत्र (Government Job)

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवरुन अर्ज सादर करावेत.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – 
PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://directorate.marathi.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ECIL Recruitment 2023 : ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!! इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये 363 पदांवर भरती सुरु

ECIL Recruitment 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (ECIL Recruitment 2023) लिमिटेड अंतर्गत विवध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून पदवीधर अभियांत्रिकी शिकाऊ उमेदवार आणि डिप्लोमा/तंत्रज्ञ शिकाऊ उमेदवार पदांच्या एकूण 363 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड
भरले जाणारे पद – पदवीधर अभियांत्रिकी शिकाऊ उमेदवार आणि डिप्लोमा/तंत्रज्ञ शिकाऊ उमेदवार
पद संख्या – 363 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 डिसेंबर 2023
नोकरीचे ठिकाण – हैद्राबाद
वय मर्यादा – 25 वर्षे

भरतीचा तपशील – (ECIL Recruitment 2023)

पद पद संख्या 
पदवीधर अभियांत्रिकी शिकाऊ उमेदवार 250 पदे
डिप्लोमा/तंत्रज्ञ शिकाऊ उमेदवार 113 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद शैक्षणिक पात्रता
पदवीधर अभियांत्रिकी शिकाऊ उमेदवार Graduate
डिप्लोमा/तंत्रज्ञ शिकाऊ उमेदवार Graduate

 

मिळणारे वेतन –

पद वेतन (दरमहा)
पदवीधर अभियांत्रिकी शिकाऊ उमेदवार Rs.9000/
डिप्लोमा/तंत्रज्ञ शिकाऊ उमेदवार Rs.8000/

असा करा अर्ज –
1. या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज खाली दिलेल्या लिंक वरुन सादर करायचा आहे.
3. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर (ECIL Recruitment 2023) सादर करावा; उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2023 आहे.
5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – 
PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.ecil.co.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Indian Navy Recruitment 2023 : 10वी पास उमेदवारांसाठी देशसेवेची संधी!! भारतीय नौदलात ‘या’ पदांवर होणार नवीन भरती

Indian Navy Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । तरुणांसाठी सरकारी नोकरीची मोठी (Indian Navy Recruitment 2023) संधी चालून आली आहे. भारतीय नौदल अकादमी अंतर्गत फायर इंजिन ड्रायव्हर आणि फायरमन पदांच्या एकूण 129 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – भारतीय नौदल अकादमी
भरले जाणारे पद – फायर इंजिन ड्रायव्हर आणि फायरमन
पद संख्या – 129 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 डिसेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (SO ‘CRC’ साठी) मुख्यालय ईस्टर्न नेव्हल कमांड, न्यू अॅनेक्सी बिल्डिंग, D2-ब्लॉक (दुसरा मजला), नेव्हल बेस विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश-530014.

भरतीचा तपशील – (Indian Navy Recruitment 2023)

पद पद संख्या 
फायर इंजिन ड्रायव्हर ०७ पदे
फायरमन १२२ पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद शैक्षणिक पात्रता
फायर इंजिन ड्रायव्हर 10th
फायरमन 10th

 

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी (Indian Navy Recruitment 2023) नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी दिलेल्या मुदतीपूर्वी अर्ज करावेत; उशीरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – 
PDF
अधिकृत वेबसाईट – www.joinindiannavy.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com