Government Job : मराठी भाषा संचालनालयात ग्रंथपाल, शिपाई पदावर भरती सुरु; दरमहा 69,100 रुपये पगार

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र शासन, मराठी भाषा विभागाच्या (Government Job) अधिनस्त असलेल्या भाषा संचालनालय, मुंबई व विभागीय कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथील कार्यालय अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ ग्रंथपाल, शिपाई पदांच्या एकूण 3 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – भाषा संचालनालय, महाराष्ट्र शासन
भरले जाणारे पद – कनिष्ठ ग्रंथपाल, शिपाई
पद संख्या – 03 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 डिसेंबर 2023
निवड प्रक्रिया – मुलाखती

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – १८ वर्षे
खुल्या प्रवर्गासाठी – ४० वर्षे
मागासवर्गीयांसाठी – ४५ वर्षे
परीक्षा फी – (Government Job)
1. अमागास – रु. १०००/-
2. मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग : रु. ९००/-
(परीक्षा शुल्का व्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच देय कर अतिरिक्त असतील.)

भरतीचा तपशील –

पद पद संख्या 
कनिष्ठ ग्रंथपाल 01
शिपाई 02

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ ग्रंथपाल
  • उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
  • ग्रंथालय शास्त्र या विषयातील पदविका किंवा पदवी धारण केलेली असावी.
शिपाई उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक.

 

मिळणारे वेतन –

पद मिळणारे वेतन
कनिष्ठ ग्रंथपाल २१७००-६९१०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते (सातव्या वेतन आयोगानुसार)
शिपाई १५०००-४७६०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते (सातव्या वेतन आयोगानुसार

 

आवश्यक कागदपत्रे –
1. अर्जातील नावाचा पुरावा (एस.एस.सी अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता)
2. वयाचा पुरावा (Government Job)
3. शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
4. सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा
5. अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
6. पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा
7. एस. एस. सी. नावात बदल झाल्याचा पुरावा
8. अराखीव, महिला, मागासवर्गीय, आ.दु.घ., आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र.
9. मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा
10. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र
11. अनुभव प्रमाणपत्र (Government Job)

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवरुन अर्ज सादर करावेत.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – 
PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://directorate.marathi.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com