Home Blog Page 169

Career Success Story : घरोघरी पेपर वाटले… शिकवणया घेतल्या; अथक प्रयत्न करुन सुमित अवघ्या 24 व्या वर्षी बनला CA

Career Success Story of CA Sumit Kumar

करिअरनामा ऑनलाईन । जर तुम्ही काही करण्याचा निर्धार केलात तर (Career Success Story) तुम्हाला तुमचे ध्येय गाठण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. सुमित कुमारने हे सिद्ध केले आहे. परिस्थिती कशीही असो. सर्व अडथळ्यांना तोंड देत तिसऱ्या प्रयत्नात सीए फायनलची परीक्षा तो पास झाला आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुमित एक उत्तम उदाहरण आहे.

घरोघरी पेपर वाटले; मुलांना शिकवणी दिली
अगदी सामान्य कुटुंबातून आलेल्या सुमितचा आयुष्यातील प्रवास सोपा नव्हता. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी त्याला अभ्यासाव्यतिरिक्त जीवनात येणाऱ्या असंख्य वादळांशी सतत संघर्ष करावा लागला. घरची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन सुमितने लहान वयातच स्वावलंबनाचा मार्ग (Career Success Story) निवडला आणि 2013 ते 2016 पर्यंत वृत्तपत्र वितरक म्हणून त्याने काम केले. दरम्यान, 2017 मध्ये त्याने इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात प्रवेश घेतला आणि आर्थिक खर्चाला हातभार लावण्यासाठी लहान मुलांना शिकवणी द्यायलाही सुरुवात केली.
B.Com करत असताना आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी सुमितने घरोघरी जावून मुलांना शिकवणी द्यायला सुरुवात केली. यासोबतच त्याची CA ची तयारीही सुरु होती. यामध्ये सुरुवातीला त्याला यश आले नाही; पण सुमितने हार मानली नाही. ग्रॅज्युएशनसोबतच त्याने पोस्ट ग्रॅज्युएशनही पूर्ण केले

12वीत मिळाले फक्त 53 टक्के मार्क (Career Success Story)
सुमितने अभ्यासात फार हुशार नव्हता. तो सांगतो सतत शिकण्यात आणि झालेल्या चुका सुधारण्यावर त्याचा विश्वास आहे. त्याला 10वी मध्ये 7.2 CGPA आणि 12वी मध्ये फक्त 53 टक्के मार्क मिळाले होते. कमी मार्क मिळाले तरी तो खचला नाही.
वयाच्या 24 व्या वर्षी झाला CA
सुमितला 12 वीत कमी मार्क मिळाले. त्याच्या बरोबर शिकणाऱ्या मित्रांना त्याच्यापेक्षा जास्त मार्क मिळाले तरी तो खचला नाही. तो त्याच्या ध्येयावर ठाम राहिला. त्याला सीए (CA) व्हायचे होते आणि वयाच्या 24 व्या वर्षी तो CA झाला. सुमितचे वडील प्रमोद कुमार मूळचे बिहारमधील बेगुसराय येथील आहेत. ते एका खासगी कंपनीत काम करतात. सुमितने सांगितले की, ” घरची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. तरी वडिलांनी माझ्या शिक्षणात कधीही खंड पडू दिला नाही. मी  नेहमी अभ्यासाला प्राधान्य द्यायचो. वडिलांवर खर्चाचा बोजा पडेल आणि कुटुंबाच्या गरजांवर त्याचा परिणाम होईल; असं मला वाटायचं; त्यामुळे मी माझ्या शालेय जीवनापासूनच काम करण्यास सुरुवात केली आणि वडिलांना हातभार लावला.” आयुष्यात हार मानलेल्या; छोट्या मोठ्या अपयशाने खचून जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुमित एक उत्तम उदाहरण आहे. त्याच्या कर्तृत्वाने निश्चितच प्रेरणा घेता येईल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : मुलाखतीत विचारले जातील असे प्रश्न… प्रभू श्री राम लंकेत किती दिवस राहिले? जाणून घ्या…

GK Updates 12 Jan.

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.
आज आपण ‘रामायण’ या विषयाशी संबंधित काही प्रश्न पाहणार आहोत.

प्रश्‍न 1 – लक्ष्मणाने सुग्रीवाला सुख सोहळ्यासाठी दोषी ठरवले, तेव्हा सुग्रीवाला श्रीरामाला दिलेल्या वचनाची आठवण कोणी करून दिली? (GK Updates )
उत्तर – लक्ष्मणाने जेव्हा सुग्रीवावर सुख भोगण्याबद्दल टीका केली, तेव्हा सुग्रीवाला ‘पलक्ष’ आणि ‘प्रभाव’ यांनी श्री रामाला दिलेल्या वचनाची आठवण करुन दिली.
प्रश्न 2 – (GK Updates ) ‘वाल्मिकी रामायण’ नुसार, श्री राम आणि लक्ष्मण कोणत्या महिन्यात पंपा सरोवरात पोहोचले होते?
उत्तर – वास्तविक वाल्मिकी रामायणानुसार श्री राम आणि लक्ष्मण चैत्र महिन्यात पंपा सरोवरात पोहोचले होते.

प्रश्न 3 – भगवान श्रीराम लंकेत किती दिवस राहिले?
उत्तर – वास्तविक पाहता भगवान श्रीराम लंकेत 111 दिवस राहिले.
प्रश्न 4 – ब्रह्महत्येचे पाप कोणाचे होते ते सांगता येईल का?
उत्तर  – ब्रह्महत्येच्या पापासाठी श्री राम दोषी होते, कारण त्यांनी रावणाचा वध केला होता.
प्रश्न 5 – महर्षि वाल्मिकी यांचा (GK Updates ) आश्रम कोणत्या नदीच्या काठावर होता?
उत्तर  – महर्षि वाल्मिकी यांचा आश्रम तमसा नदीच्या काठावर होता.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CET Exam 2024 : ‘सेट’ परीक्षेची अर्ज प्रक्रिया सुरु; पहा महत्वाच्या तारखा

CET Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र आणि गोवा राज्यासाठी (CET Exam 2024) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्‍या सेट विभागातर्फे अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्‍यानुसार शुक्रवार (दि. 12) पासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याच्‍या प्रक्रियेला सुरवात झाली आहे. 39 व्‍या महाराष्ट्र सेट परीक्षेची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. दि. 7 एप्रिल 2024 ला महाराष्ट्रासह गोव्‍यातही ही परीक्षा घेतली जाणार आहे. लेखी स्वरुपातील म्हणजेच ऑफलाईन पद्धतीने घेतली जाणारी ही शेवटची परीक्षा असणार आहे. यानंतरच्या सेट परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने घेतल्‍या जाणार आहेत.

SET परीक्षेविषयी
1. पात्रता –
पदव्युत्तर पदवीच्या शेवटच्या वर्षाचे किंवा ती उत्तीर्ण झालेले विद्यार्थी
2. परीक्षेचे स्वरूप – परीक्षेत वस्‍तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्‍न विचारले जातील.
3. पेपर क्रमांक एक हा गणित, सामान्‍यज्ञानासह इतर विषयांवरील प्रश्‍नांवर आधारित असेल. तर पेपर क्रमांक दोन विद्यार्थ्यांनी निवडलेल्‍या विशेष विषयाचा (CET Exam 2024) असणार आहे.
4. परीक्षा फी – परीक्षेच्‍या नोंदणीसाठी खुल्‍या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आठशे रुपये तर राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना साडेसहाशे रुपये इतके शुल्‍क आहे.

काही महत्त्वाच्‍या तारखा – (CET Exam 2024)
1. परीक्षा शुल्‍कासह अर्ज भरण्याची मुदत – 12 जानेवारी ते 31  जानेवारी 2024
2. विलंब शुल्‍कासह अर्ज भरण्याची मुदत- दि. 1 ते 7 फेब्रुवारी 2024
3. ऑनलाइन अर्जात दुरुस्‍तीची मुदत-  दि. 8 ते 10 फेब्रुवारी 2024
4. प्रवेशपत्र उपलब्‍धतेची संभाव्‍य तारीख – दि. 28 मार्च 2024
5. परीक्षेचे आयोजन – दि. 7 एप्रिल 2024
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Bombay High Court Recruitment 2024 : मुंबई उच्च न्यायालयात ‘या’ पदावर भरती सुरु

Bombay High Court Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत (Bombay High Court Recruitment 2024) जिल्हा न्यायाधीश पदांच्या एकूण 19 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2024 आहे.

संस्था – मुंबई उच्च न्यायालय
भरले जाणारे पद – जिल्हा न्यायाधीश
पद संख्या – 19 पदे (Bombay High Court Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जानेवारी 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – 35 ते 48 वर्षे

मिळणारे वेतन – Rs.1, 44,840/- ते Rs. 1,94,660/-
असा करा अर्ज – (Bombay High Court Recruitment 2024)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. मुदती नंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
4. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://bombayhighcourt.nic.in/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Job : नॉर्दन कोलफील्ड येथे निवड झाल्यास मिळेल 47,330 एवढा पगार; पात्रता फक्त डिप्लोमा

Government Job (44)

करिअरनामा ऑनलाईन । नॉर्दर्न कोलफिल्ड्स लिमिटेड अंतर्गत (Government Job) असिस्टंट फोरमन पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 150 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2024 आहे.

संस्था – नॉर्दर्न कोलफिल्ड्स लिमिटेड
भरले जाणारे पद – असिस्टंट फोरमन
पद संख्या – 150 पदे (Government Job)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 फेब्रुवारी 2024
वय मर्यादा – 18 ते 30 वर्षे

अर्ज फी – (Government Job)
1. Unreserved (UR) /OBC- Non Creamy Layer / EWS – Rs. 1,000.00/
2. SC/ ST/ ESM / PwBD/ Departmental Candidates – Nil
आवश्यक शैक्षणिक पात्रता – Diploma in Electronics/Mechanical/Electrical Engineering
मिळणारे वेतन – Rs 47,330/- दरमहा

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://nclcil.in/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : ग्रॅज्युएट असाल तर ‘इथे’ मिळेल नोकरी; थेट होणार मुलाखत!!

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । जन शिक्षण संस्थान, नंदुरबार अंतर्गत विविध (Job Alert) रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीच्या माध्यमातून कार्यक्रम अधिकारी, संगणक चालक, कार्यक्रम सहाय्यक पदांच्या एकूण 03 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 16 जानेवारी 2024 आहे.

संस्था – जन शिक्षण संस्थान, नंदुरबार
भरले जाणारे पद – कार्यक्रम अधिकारी, संगणक चालक, कार्यक्रम सहाय्यक
पद संख्या – 03 पदे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 16 जानेवारी 2024
मुलाखतीचा पत्ता – डॉ. हेडगेवार सेवा समिती कार्यालय, प्लॉट नं. ११०, गिरीविहार हौसिंग सोसायटी, इंदिरा मंगल कार्यालयासमोर, नंदुरबार- ४२५४१२
नोकरी करण्याचे ठिकाण – नंदुरबार

भरतीचा तपशील – (Job Alert)

पद पद संख्या 
कार्यक्रम अधिकारी 01
संगणक चालक 01
कार्यक्रम सहाय्यक 01

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
कार्यक्रम अधिकारी BSW/MSW Preferred/ Any Graduate & Computer Operating & Typing Skills
संगणक चालक BCA/Any Graduate, Computer Operating & Typing Skills
कार्यक्रम सहाय्यक Any Graduate/ Computer Operating & Typing Skills

 

निवड प्रक्रिया –
1. या पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
2. उमेदवारांनी PDF नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी मुलाखतीकरिता (Job Alert) जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर रहायचे आहे.
4. सदर पदांकरिता मुलाखत 16 जानेवारी 2024 ला घेण्यात येणार आहे.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://jss.gov.in/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SAI Recruitment 2024 : भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत ‘क्रीडा प्रशिक्षक’ पदावर भरती सुरु

SAI Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत भरतीची (SAI Recruitment 2024) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक प्रशिक्षक, प्रशिक्षक, वरिष्ठ प्रशिक्षक, उच्च-कार्यक्षमता प्रशिक्षक पदांच्या एकूण 214 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 15 जानेवारी 2024 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2024 आहे.

संस्था – भारतीय क्रीडा प्राधिकरण
भरली जाणारी पदे – सहाय्यक प्रशिक्षक, प्रशिक्षक, वरिष्ठ प्रशिक्षक, उच्च-कार्यक्षमता प्रशिक्षक
पद संख्या – 214 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 15 जानेवारी 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जानेवारी 2024

वय मर्यादा –
1. सहाय्यक प्रशिक्षक – 40 वर्षे
2. प्रशिक्षक – 45 वर्षे
3. वरिष्ठ प्रशिक्षक – 50 वर्षे
4. उच्च-कार्यक्षमता प्रशिक्षक – 60 वर्षे

भरतीचा तपशील – (SAI Recruitment 2024)

पद पद संख्या 
सहाय्यक प्रशिक्षक 117 पदे
प्रशिक्षक 43 पदे
वरिष्ठ प्रशिक्षक 45 पदे
उच्च-कार्यक्षमता प्रशिक्षक 09 पदे

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सहाय्यक प्रशिक्षक
  • Diploma or equivalent in Coaching from SAI, NS NIS, or from any other recognized Indian/Foreign University, OR
  • Olympics/Para Olympics/ International participation (As defined by SAI), OR
  • Dronacharya Awardee
प्रशिक्षक
  • Diploma or equivalent in Coaching from SAI, NS NIS, or from any other recognized Indian/Foreign University, OR
  • Medal winner in Olympics/Para Olympics/World Championship or Twice Olympics Participation, OR
  • Olympics/Para Olympics/ International participation (As defined by SAI), OR
  • Dronacharya Awardee
वरिष्ठ प्रशिक्षक
  • Diploma or equivalent in Coaching from SAI, NS NIS, or from any other recognized Indian/Foreign University, OR
  • Medal winner in Olympics/Para Olympics/World Championship or Twice Olympics Participation, OR
  • Olympics/Para Olympics/ International participation (As defined by SAI), OR
  • Dronacharya Awardee
उच्च-कार्यक्षमता प्रशिक्षक
  • Diploma or equivalent in Coaching from SAI, NS NIS, or from any other recognized Indian/Foreign University, OR
  • Medal winner in Olympics/Para Olympics/World Championship or Twice Olympics Participation, OR
  • Dronacharya Awardee (SAI Recruitment 2024)

 

मिळणारे वेतन – (SAI Recruitment 2024)

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना sportsauthorityofindia.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
4. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खाली दिलेल्या लिंक वर सादर करायचे आहेत.
5. अर्ज प्रक्रिया 15 जानेवारी 2024 पासून सुरु होणार आहे.
6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2024 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://sportsauthorityofindia.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UGC NET Result : प्रतिक्षा संपली!! UGC NET परीक्षेचा निकाल ‘या’ दिवशी होणार जाहीर

UGC NET Result (1)

करिअरनामा ऑनलाईन । UGC NET परीक्षेच्या निकालासंदर्भात (UGC NET Result) महत्वाची बातमी आहे. UGC NET परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. 6 डिसेंबर ते 19 डिसेंबर 2023 या कालावधीत देशभरातील 292 शहरांमध्ये राष्ट्रीय पात्रता परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर उमेदवार निकाल जाहीर होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता एनटीएने निकालाशी संबंधित अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार UGC NET परीक्षेचा निकाल 17 जानेवारी 2024 रोजी NTA च्या अधिकृत वेबसाइटवर घोषित केला जाणार आहे.

एनटीएने दिलेल्या माहितीनुसार देशभरातील नैसर्गिक आपत्ती; जसं की मिचॉन्ग चक्री वादळामुळे चेन्नई आणि आंध्र प्रदेशमधील काही विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नव्हती. त्यांच्यासाठी पुन्हा परीक्षा घेण्यात आली होती. त्यामुळे नियोजित तारखेला निकाल जाहीर होणार नसून आता दि. 17 जानेवारी 2024 रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे.

असा पहा निकाल – (UGC NET Result)
1. UGC NET निकाल पाहण्यासाठी उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in ला भेट द्यावी.
2. निकाल जाहीर होताच वेबसाइटच्या होम पेजवर निकालाची लिंक सक्रिय होईल, त्यावर क्लिक करा.
3. पुढे तुम्ही नवीन पेजवर अर्ज क्रमांक, जन्मतारीख आणि सिक्युरिटी पिन यासारखी लॉगिन माहिती भरून सबमिट करायची आहे.
4. ही माहिती सबमिट करताच निकाल स्क्रीनवर उघडेल जिथून तुम्ही तो डाउनलोड करू शकता आणि प्रिंटआउट घेऊ शकता. (UGC NET Result)
राष्ट्रीय पात्रता परीक्षेशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. याशिवाय उमेदवार हेल्प डेस्क क्रमांक 011-40759000/011- 69227700 वर संपर्क साधू शकतात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career Success Story : प्रसंगी उपाशी राहिला… वाढप्याचं कामही केलं.. इंग्रजीला घाबरणारा तरुण जिद्दीने बनला PSI

Career Success Story of Raosaheb Jadhav PSI

करिअरनामा ऑनलाईन । “मला लहानपणापासून (Career Success Story) वर्दीचं प्रचंड आकर्षणं होतं. मी चित्रपटात पोलिसाची भूमिका   बघताना स्वतःला त्या कलाकारात बघायचो. या वेडापाई मी साऊथचे अनेक ऍक्शन चित्रपट खूपवेळा पाहिले आहेत. भाषा समजत नसली तरी भावना समजून घेत पोलिसांचे अनेक चित्रपट बघितले आहेत. आयुष्यात टार्गेट फक्त आणि फक्त पीएसआय व्हायचं एवढंच होतं. हे माझं वेड मला पोलिस अधिकारी होण्याकडे घेवून गेलं.” ही कहाणी आहे रावसाहेब जाधव यांची.

उपाशी दिस काढले.. वाढप्याचं कामही केलं…
रावसाहेब जाधव हे इंदापूरच्या नीरा-नरसिंगपुर जवळच्या टनु या गावचे रहिवासी आहेत. त्यांचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला. पोलिस अधिकारी व्हायचं हे स्वप्न त्यांनी लहानपणी पाहिलं होतं. अभ्यास करताना समोर टार्गेट फक्त PSI व्हायचं होतं. पुणे विद्यापीठाच्या जयकर अभ्यासिकेत ते अभ्यास करायचे. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने प्रसंगी उपाशी राहून त्यांनी दिवस काढले. अधिकारी (Career Success Story) होण्याचा त्यांचा प्रवास सोपा नव्हता. प्रचंड संघर्षातून उभा राहिलेला हा संघर्ष योद्धा अनेकांसाठी प्रेरणास्थान बनला आहे.
घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. अशा परिस्थितीत उच्च शिक्षण घेणं झेपणारं नव्हतं. त्यामुळे त्यांनी वेळ प्रसंगी केटरींगच्या कामात वाढपी म्हणूनही काम केलं; पण परिस्थितीसमोर कधीच हार मानली नाही.

इंग्रजी कळत नव्हतं
रावसाहेब जाधव सांगतात; ” माझं पहिली ते दहावी पर्यंतच शिक्षण गावातच झालं. दहावीला ८६ टक्के गुण मिळाले म्हणुन अकरावीला सायन्स विषय घेतला घेतलं. पण शिकवणारे सर इंग्रजीत काय बोलतात ते कळत नव्हतं. पण शिक्षणाची गाडी तशीच पुढे ढकलली. 12 वी चा निकाल समाधानकारक लागला नाही. त्यावेळी केवळ ५६ टक्के गुण मिळाले.

वर्दी खुणावत होती (Career Success Story)
ते सांगतात; “आयपीएस विश्वास नांगरे – पाटील यांचा खूप प्रभाव माझ्यावर पडला होता. त्यामुळे एक वैचारिक मांड आणि भविष्यातील योजना मनात पक्की झाली होती. इंग्रजीतलं सायन्स जमत नव्हतं म्हणून इंदापुरला बी. ए. ला प्रवेश घेतला. तिकडंही खूप पोषक वातावरण नव्हतं. पण अर्थशास्त्र विषयातून बी. ए. झालो. आता बी.ए. झालो म्हणून एम. ए. करायचं या उद्देशाने पुण्यात आलो. विद्यापीठांत प्रवेश घेतला. वर्दीचं आकर्षण प्रचंड खुणावत होतं. म्हणून झोकून देऊन एमपीएससीचा अभ्यास केला.”

नापास झालो म्हणून लोकांनी टिंगल केली
आपल्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीविषयी बोलताना ते सांगतात; “MPSC ची परीक्षा देत असताना पहिल्या प्रयत्नात पूर्व परीक्षेत दोन मार्कांनी संधी हुकली. अनेकांनी टिंगल – टवाळी केली. त्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही. जोमाने अभ्यास सुरु ठेवला. पुन्हा परीक्षेच्या दुसऱ्या प्रयत्नात पूर्व परीक्षेत पास आणि मुख्य परीक्षेत नापास झालो. शेवटी तिसरा आणि शेवटचा प्रयत्न केला. यावेळी अभ्यास एवढा सखोल आणि प्रखर (Career Success Story) झाला होता की त्यावेळी मुख्य परीक्षेत कायदा या घटकावर ६० पैकी ६० गुण घेतले. घेतलेल्या कष्टाचं चीज झालं होतं. आणि मी ही परीक्षा पास झालो. पीएसआय फॅक्टरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रयत प्रबोधिनीच्या मॉक इंटरव्ह्यूमध्ये मला उमेश कुदळे सरांनी एक रिमार्क दिला होता की “तुमचा जन्म हा फौजदार होण्यासाठी झाला आहे”. बस त्याच बळावर पुढे गेलो आणि आज अधिकारी झालो.”
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Layoff : एका नोटीसीनं हालवून सोडलं; एका नामवंत IT कंपनीतून कर्मचाऱ्यांना मिळतोय डच्चू; कारण?

Layoff (3)

करिअरनामा ऑनलाईन । नवीन वर्षात जागतिक आर्थिक मंदीच्या (Layoff) झळा नोकरदार वर्गाला बसत असून, अनेकांना या वर्षातही नोकरीला मुकावं लागण्याची स्थिती निर्माण झाली आहे. काही कंपन्यांमध्ये कर्मचारी कपातीला सुरुवातही झाली आहे. अनेक आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या फरकानं कमी करण्याचा निर्णय घेतला असून, यामध्ये आता Google सुद्धा सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे.

कोरोनामुळे आलेल्या लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या कामाचं स्वरुप बदललं तर, अनेकांच्या पगारावरही परिणाम झाला. काही कंपन्यांनी मानवी योगदानाला कमी महत्त्व देत Automatic पद्धतीनं होणाऱ्या कामाला प्राधान्य दिलं. परिणामी कंपनीने कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याचं सत्र सुरु झालं. 2022 आणि 2023 मध्ये जगभरातून अनेक मोठ्या कंपन्यांनी टप्या टप्याने कर्मचारी कपात करण्यास सुरुवात केली.

कोणत्या कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार?
हार्डवेअर डिव्हिजनमधील कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात करणार (Layoff) असल्याचे संकेत गुगलने दिले आहेत. यामध्ये डिजिटल असिस्टंट आणि इंजिनिअरिंग टीम्सचा समावेश आहे. व्हॉईस बेस्ड गुगल असिस्टंड आणि रिअॅलिटी हार्डवेअर टीमवर ही नोकरकपात परिणाम करणार आहे. त्याशिवाय कंपनीच्या मध्यवर्ती इंजिनिअरिंग टीममध्ये काम करणाऱ्या इंजिनिअर्सवरही याचा परिणाम होणार आहे.
‘DSPA मधील शेकडो पदं आणि 1P AR Hardware team मधील शेकडो पदांवर येत्या काळात फरक पडणार आहे. सध्या कंपनीकडून 1P AR Hardware team मध्ये काही बदल केले जात असून, गुगल येत्या काळात AR initiatives वर जास्त भर देणार आहे. ज्यामध्ये प्रोडक्ट आणि प्रोडक्ट पार्टनरशिपचा समावेश असेल’, असं कंपनीच्या पत्रकामध्ये म्हटलं गेलं आहे.

गुगलवर ही वेळ का आली?
मायक्रोसॉफ्ट आणि OpenAI यांच्याकडून सध्या गुगलला आर्टिफिशिअर इंटेलिजन्स क्षेत्रामध्ये टक्कर दिली जात आहे. सध्या या दोन्ही कंपन्या ChatGPT आणि Co-Pilot या सेवांना आणि इतर एआय (AI) सुविधांना सर्व स्तरावर प्रसिद्धीझोतात आणत असून, गुगलच्या main search business वर याचा थेट आणि विपरित परिणाम होताना दिसत आहे. परिणामी संस्थेतील वरिष्ठ पदावर असणारी मंडळी सध्या उत्पादन शुल्क कमी करून हे अर्थसहाय्य कंपनीच्या ध्येय्यप्राप्तीकडे वळवण्याच्या दृष्टीनं कामं करत आहेत.

किती कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागणार?
Fitbit चे सहसंस्थापक जेम्स पार्क, एरिक फेडमन आणि इतर (Layoff) महत्त्वाच्या व्यक्ती कंपनीतून बाहेर पडल्यानंतर या नोकरकपातीनं डोकं वर काढलं आहे. ज्यानंतर गुगलनं पिक्सल, नेस्ट आणि फिटबिट हार्डवेअरवर काम करणाऱ्या टीमची नव्यानं बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. तेव्हा या नोकरकपातीच्या लाटेमध्ये आता नेमके किती कर्मचारी बळी पडतात हे पाहणं महत्त्वाचं असेल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com