Home Blog Page 170

Job Notification : B.Comची पदवी घेतली असेल तर ‘इथे’ आहे नोकरीची संधी!! थेट द्या मुलाखत

Job Notification

job in puneकरिअरनामा ऑनलाईन । अजित नागरी सहकारी (Job Notification) पतसंस्था मर्यादित, पुणे अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मार्केटींग ऑफीसर, शाखा व्यवस्थापक, उपशाखा व्यवस्थापक, क्लार्क / कॅशिअर पदांच्या एकूण 30 जागा भरल्या जाणार आहेत. वरील पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 12 आणि 13 जानेवारी 2024 आहे.

संस्था – अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, पुणे
भरले जाणारे पद – मार्केटींग ऑफीसर, शाखा व्यवस्थापक, उपशाखा व्यवस्थापक, क्लार्क / कॅशिअर
पद संख्या – 30 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – मुख्य कार्यालय, हाडको रोड, पालखी तळाजवळ, सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे
मुलाखतीची तारीख – 12 आणि 13 जानेवारी 2024

भरतीचा तपशील – (Job Notification)

पद पद संख्या 
मार्केटींग ऑफीसर 05 पदे
शाखा व्यवस्थापक 10 पदे
उपशाखा व्यवस्थापक 10 पदे
क्लार्क / कॅशिअर 05 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
मार्केटींग ऑफीसर बी. कॉम
शाखा व्यवस्थापक बी. कॉम
उपशाखा व्यवस्थापक बी. कॉम
क्लार्क / कॅशिअर बी. कॉम

 

निवड प्रक्रिया –
1. या भरतीसाठी निवड प्रकिया मुलाखतीद्वारे घेण्यात येणार आहे.
2. इच्छुक उमेदवारांनी (Job Notification) दिलेली तारीख आणि वेळेवर मुलाखतीसाठी हजर राहावे.
3. मुलाखतीची तारीख 12 आणि 13 जानेवारी 2024 आहे.
4. उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखतीकरिता स्व खर्चाने हजर राहावे.
5. मुलाखतीला येण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – http://ajitgroup.in/ajitnagari/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

 SAMEER Recruitment 2024 : डिग्री आणि डिप्लोमाधारक इंजिनियर्ससाठी SAMEER अंतर्गत नोकरीची संधी

 SAMEER Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह ( SAMEER Recruitment 2024) इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च, मुंबई येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून पदवीधर आणि डिप्लोमा अभियंता शिकाऊ प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 24 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 17 आणि 18 जानेवारी 2024 आहे.

संस्था – सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च, मुंबई
भरले जाणारे पद – पदवीधर आणि डिप्लोमा अभियंता शिकाऊ प्रशिक्षणार्थी
पद संख्या – 24 पदे
वय मर्यादा – 25 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखत (SAMEER Recruitment 2024)
मुलाखतीचा पत्ता – समीर, आयआयटी कॅम्पस, हिल साइड, पवई, मुंबई 400076
मुलाखतीची तारीख – 17 आणि 18 जानेवारी 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
BE / B. Tech in Electronics /Mechanical/ Electronics & Communication Engineering/Computer Engineering / Information Technology with Minimum 55% Marks
Three years Diploma in Electronics / Electronics & Communication with Minimum 55% Marks
मिळणारे वेतन –

पद वेतन
पदवीधर आणि डिप्लोमा अभियंता शिकाऊ प्रशिक्षणार्थी
  • Graduate – Rs 10, 500/- Per month
  • Diploma – Rs 8,500/ month

 

आवश्यक कागदपत्रे –
1. 10वी/12वी मार्कशिट
2. पात्रता परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र
3. सर्व वर्षांसाठी पात्रता परीक्षा गुण
4. अनुभवाचे प्रमाणपत्र असल्यास
5. जन्मतारीख पुरावा
5. उमेदवाराचे पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
अशी होणार निवड – (SAMEER Recruitment 2024)
1. या भरतीसाठी निवड प्रकिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. इच्छुक उमेदवारांनी दिलेली तारीख आणि वेळेवर मुलाखतीसाठी हजर रहावे.
3. मुलाखतीची तारीख 17 आणि 18 जानेवारी 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://sameer.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MUCBF Recruitment 2024 : महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत ज्युनिअर क्लर्क पदावर नोकरीची संधी!!

MUCBF Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स (MUCBF Recruitment 2024) फेडरेशन लि. अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ लिपिक ग्रेड – २ पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 आहे.

बँक – महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि.
भरले जाणारे पद – कनिष्ठ लिपिक ग्रेड – २
पद संख्या – 15 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 जानेवारी 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – नांदेड, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, लातूर, पुणे व औरंगाबाद

वय मर्यादा – २२ ते३५ वर्षे
परीक्षा फी – रु. १,०००/- + १८% जी.एस.टी. = रु. १,१८०/-
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी असावी.
मिळणारे वेतन – १५,०००/- रुपये दरमहा

असा करा अर्ज – (MUCBF Recruitment 2024)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 आहे. मुदतीनंतर आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
निवड प्रक्रिया –
1. ऑफलाईन परीक्षा
2. कागदपत्रके पडताळणी
3. मुलाखत (MUCBF Recruitment 2024)

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.mucbf.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career Success Story : नवऱ्याच्या पाठिंब्यामुळे शक्य झालं; ‘ती’ बनली उप जिल्हाधिकारी; वाचा सिम्मी यादवची गोष्ट

Career Success Story of Simmi Yadav

करिअरनामा ऑनलाईन । कोणत्याही स्त्रीसाठी घर सांभाळत (Career Success Story) अभ्यास करणे सोपे नाही. परंतु काही लोक असे आहेत की त्यांच्या मार्गावर कोणतीही समस्या आली तरी ते त्यांचे ध्येय सोडून लांब पळत नाहीत. आज आम्ही त्या महिला अधिकाऱ्याबद्दल बोलत आहोत, जिची सलग दोनवेळा उपजिल्हाधिकारी पदावर निवड झाली आहे. 31 वर्षीय सिम्मी यादव यांची कहाणी तुम्हाला हेच शिकवेल की तुम्हाला हवे असेल तर तुम्ही कोणतीही गोष्ट साध्य करु शकता.

संसार सांभाळत दिली स्पर्धा परीक्षा
सिम्मी यादव मध्य प्रदेश राज्यातील इंदूरच्या रहिवासी आहेत. 2019 मध्ये झालेल्या स्पर्धा परीक्षेत त्यांनी यश मिळवलं आहे. त्यांचा लग्नानंतर खडतर (Career Success Story) प्रवास सुरु झाला. लग्नानंतर त्यांनी घर सांभाळण्यासोबतच नागरी सेवा परीक्षेची तयारी केली. मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाची एमपीपीएससी (MPPSC) परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांची उपजिल्हाधिकारी पदावर निवड झाली आहे. सिम्मी यांनी एका मुलाखतीत सांगितले की, “माझे 2016 मध्ये लग्न झाले. माझ्या लग्नाच्या एका वर्षानंतर मी राज्य सेवा परीक्षेची तयारी सुरू केली आणि सर्व कौटुंबिक आव्हानांना न जुमानता माझे पती राहुल यादव यांनी मला यामध्ये पूर्ण पाठिंबा दिला. त्यांच्यामुळे मला हे यश मिळाले.”

पतीच्या पाठिंब्यामुळं यश मिळवता आलं (Career Success Story)
सिम्मी यांनी कॉम्प्युटर सायन्समध्ये एमएस्सी पदवी घेतली आहे. नागरी सेवा परीक्षेत मिळवलेल्या यशाचे श्रेय देताना त्या  सांगतात; “लग्नानंतर माझ्या पतीने मला सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची तयारी करण्यास नकार दिला असता, तर मी त्यांचा सल्ला मान्य केला असता, कारण माझ्यासाठी कौटुंबिक मूल्यांपेक्षा महत्त्वाचे काहीही नाही. पण मी स्पर्धा परीक्षा देवून करिअर करावं अशी माझ्या पतीची इच्छा होती. परीक्षेच्या तयारीदरम्यान असे अनेक प्रसंग आले की पतीने मला अगदी स्वयंपाकात देखील मदत केली आहे. त्यांच्याच सहकार्यामुळे मला इथपर्यंत पोहचता आलं आहे.”

“…सिम्मीने कलेक्टर व्हावं”
सिम्मीचे पती राहुल यादव चेन्नई येथील एका आयटी (Career Success Story) कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. ते म्हणाले, “माझ्या पत्नीची उपजिल्हाधिकारी पदासाठी निवड होईल; असा मला विश्वास होता. आता एक दिवस तिनेही जिल्हाधिकारी व्हावे; अशी माझी मनापासून इच्छा आहे.”
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

How to Become Marcos Commando : यांच्या नावाने शत्रूचाही उडतो थरकाप!! कसं व्हायचं ‘मार्कोस कमांडो’? पहा संपूर्ण माहिती 

How to Become Marcos Commando

करिअरनामा ऑनलाईन । खरं तर, काही दिवसांपूर्वी (How to Become Marcos Commando) मार्कोस कमांडोंनी उत्तर अरबी समुद्रात एका मोठ्या जहाजातून 15 भारतीयांसह 21 क्रू मेंबर्सची प्राण पणाला लावून सुटका केली होती. अशा परिस्थितीत हे मरीन फोर्स कमांडो पुन्हा चर्चेत आले आहेत. या पार्श्वभूमीवर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, की हे मार्कोस कमांडो कोण आहेत; ज्यांच्या नावाने शत्रूचा थरकाप उडतो….
आपल्या देशाची तिन्ही सैन्य दले शत्रूचा सुपडा साफ करण्यासाठी पुरेशी आहेत. गेल्या काही वर्षांत भारतीय लष्कराचे वेगळे रूप जगाने पाहिले आहे. लष्कराच्या विशेष कमांडोबाबत या ना त्या कारणाने चर्चा रंगत असतात. अशातच गेल्या काही दिवसांपासून भारतीय नौदलाचे मरीन म्हणजेच मार्कोस कमांडोज चर्चेत आले आहेत.

सर्वात शक्तिशाली कमांडोज
मार्कोस कमांडोची रचना अमेरिकन नेव्ही सील्सच्या धर्तीवर करण्यात आली आहे. भारतीय नौदलाच्या या विशेष युनिटची स्थापना फेब्रुवारी 1987 मध्ये झाली. हे कमांडो नॅशनल (How to Become Marcos Commando) सिक्युरिटी गार्ड, गरुड, पॅरा कमांडो, फोर्स वनचे भाग आहेत. भारतीय नौदलाच्या मरीन कमांडो फोर्समध्ये सर्वात धाडसी सैनिक असतात, जे नेहमी द्रुत आणि गुप्त प्रतिक्रियेसाठी तयार असतात, जे सागरी ऑपरेशन्स आणि दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी नेहमीच तयार असतात.

The Few, The Fearless
“The Few, The Fearless” हे मार्कोस कमांडोचे ब्रीद वाक्य आहे, जे त्यांच्या लढाऊ कौशल्यासाठी आणि शौर्यासाठी प्रसिद्ध आहे. भारतीय नौदलाचे हे विशेष युनिट अमेरिकन नेव्ही सील आणि ब्रिटीश स्पेशल बोट सर्व्हिस (एसबीएस) च्या धर्तीवर विकसित केले गेले आहे, जे अग्नि, वायु, पाणी आणि जमीन याद्वारे कोणतेही ऑपरेशन यशस्वी करण्यात पटाईत असतात. त्यांच्या व्यावसायिकतेसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखले जाणारे हे मरीन कमांडो सैनिक मार्कोस म्हणूनही ओळखले जातात.

मार्कोस कमांडो होण्यासाठी काय करावं लागतं?
मार्कोस कमांडो फोर्समध्ये सामील होवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मार्कोस कमांडो हे कुशल आणि गुप्त कमांडो (How to Become Marcos Commando) म्हणून ओळखले जातात, ज्यांचे प्रशिक्षण अत्यंत आव्हानात्मक असते. केवळ काही उमेदवारच पात्रतेची अंतिम फेरी गाठू शकतात.

आवश्यक पात्रता आणि वय मर्यादा (How to Become Marcos Commando)
मार्कोस कमांडोसाठी अर्ज करणारे उमेदवार नौदलातील नाविक किंवा अधिकारी असणे आवश्यक आहे, ज्यांचे वय 20 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
किती मिळतो पगार?
– मरीन कमांडोचा पगार 7 व्या केंद्रीय वेतन आयोगाद्वारे (CPC) ठरवला जातो.
– मूळ वेतन दरमहा रु 25,000/- असू शकते.
– शिप ड्रायव्हिंग भत्ता – रु 8,500/- ते रु. 10,000/-
– मार्कोस भत्ता – रु 25,000/-

वेगवेगळ्या पोस्टिंग क्षेत्रांसाठी इतका मिळतो भत्ता
1. अवघड भागात त्यांच्या मूळ वेतनाच्या अतिरिक्त 20 टक्के रक्कम दिली जाते.
2. तसेच अत्यंत सक्रिय क्षेत्रात पोस्टिंगवर भत्ता उपलब्ध आहे – रु. 16,900/-
3. फील्ड एरिया (How to Become Marcos Commando) कर्मचार्‍यांना फील्ड एरिया भत्ता मिळतो – रु. 10,500/-
4. शांतता क्षेत्र भत्ता – रु. 35,500/-
5. फील्ड एरिया भत्ता – रु. 16,900/-
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Paper Leak : पुन्हा पेपर फुटला; सारथी, बार्टी, महाज्योती CET परीक्षेत गोंधळ; विद्यार्थ्यांना ठेवलं डांबून

Army Recruitment 2024 (1)

करिअरनामा ऑनलाईन । पुणे येथील श्रीमती काशीबाई नवले अभियांत्रिकी (Paper Leak) महाविद्यालय, वडगाव येथील परीक्षा केंद्रावर आज (दि. 10) मोठा गोंधळ पहायला मिळाला. सारथी, बार्टी, महाज्योती संशोधन संस्थांसाठी घेण्यात येत असलेल्या पात्रता (CET) परीक्षेत परीक्षार्थींना झेरॉक्स प्रश्नपत्रिका देण्यात आल्या तर प्रश्न पत्रिकेतील सी आणि डी प्रश्न पत्रिकेला सील नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या परीक्षेवर सार्वत्रिकरित्या बहिष्कार टाकत निषेध नोंदवला. शिवाय संतप्त उमेदवारांनी परीक्षेवर बहिष्कार टाकला आहे.

परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना बंद करुन ठेवल्याचा (Paper Leak) आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. या परीक्षेत गोंधळ होण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी दि. 24 डिसेंबरला परीक्षा झाली होती. त्यावेळी सेटचा (SET) 2019 मध्ये घेण्यात आलेला  पेपर जसाच्या तसा आला होता. त्यामुळे 24 तारखेची परीक्षा रद्द करण्यात आली होती. या घटनेला अजून 15 दवसही झाले नाहीत तोपर्यंत या परिक्षेत पुन्हा गोंधळ पाहायला मिळाला. याप्रकारामुळे परीक्षा पद्धतीवरील पारदर्शकतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Army Recruitment 2024 : सैन्यात भरती होण्याची मोठी संधी!! आर्मी NCC भरती सुरु; ताबडतोब करा अर्ज

Army Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । ज्या तरुण उमेदवारांना भारतीय सैन्यात (Army Recruitment 2024) भरती व्हायचे आहे; त्यांच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. भारतीय सैन्य अंतर्गत 56 एनसीसी विशेष प्रवेश योजना पदांच्या एकूण 55 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 फेब्रुवारी 2024 आहे.

संस्था – भारतीय सैन्य अंतर्गत 56 एनसीसी विशेष प्रवेश योजना
भरले जाणारे पद – 56 एनसीसी विशेष प्रवेश योजना
पद संख्या – 55 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 फेब्रुवारी 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Army Recruitment 2024)

पद शैक्षणिक पात्रता
56 एनसीसी विशेष प्रवेश योजना Degree of a recognized University or equivalent with aggregate of minimum 50% marks taking into account marks of all the years. Those studying in final year are also allowed to apply provided they have secured minimum 50% aggregate marks in the first two/three years of three/four years degree course respectively

मिळणारे वेतन –
 Indian Army NCC Recruitment 2024

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी PDF नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 फेब्रुवारी 2024 आहे.
4. उशिरा आलेले अर्ज (Army Recruitment 2024) स्विकारले जाणार नाहीत.
5. अर्ज करताना आवश्यक माहिती द्या; अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://joinindianarmy.nic.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : ‘सहायक प्राध्यापक’ भरती सुरु; ‘इथे’ करा अर्ज; महिन्याला फिक्स मिळणार 45 हजार एवढा पगार

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी (Job Notification) कृषी विद्या संकुल, नाशिक अंतर्गत सहायक प्राध्यापक पद भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 46 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जानेवारी 2024 आहे.

संस्था – महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी कृषी विद्या संकुल, नाशिक
भरले जाणारे पद – सहायक प्राध्यापक
पद संख्या – 46 पदे (Job Notification)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 जानेवारी 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रमुख, कृषी विद्या संकुल, टेक्निकल स्कूल कॅम्पस, समोर. आयकर. कार्यालय, मालेगाव कॅम्प, मालेगाव -423 105 जि. नाशिक
नोकरी करण्याचे ठिकाण – नाशिक

आवश्यक शैक्षणिक पात्रता – Ph.D. OR M.Sc.
मिळणारे वेतन – Fix pay of Rs. 45000/- per month OR Rs. 25000/- per months
असा करा अर्ज – (Job Notification)
1. वरील पदांकरीता उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज सादर करावे.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जानेवारी 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://mpkv.ac.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

TMC Recruitment 2024 : 12वी पास ते ग्रॅज्युएट्ससाठी ठाण्यात नोकरीची संधी; 118 जागा भरणार; पगारही उत्तम!!

TMC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती (TMC Recruitment 2024) शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापने अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध पदांच्या एकूण 118 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांची निवड थेट मुलाखतीने केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 15, 16, 18, 19 जानेवारी 2024 आहे.

संस्था – ठाणे महानगरपालिका
(छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय)
भरली जाणारी पदे – पल्मोनरी लॅब टेक्निशियन, ईसीजी टेक्निशियन, ऑडिओमेट्री टेक्निशियन, वॉर्ड क्लर्क, अल्ट्रा सोनोग्राफी / सीटी. स्कॅन तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, सहायक क्ष-किरण तंत्रज्ञ, मशीन तंत्रज्ञ, दंत तंत्रज्ञ, ज्युनिअर टेक्निशियन, सिनिअर टेक्निशियन, ई.ई.जी. टेक्निशियन, ब्लड बैंक टेक्निशियन, प्रोस्टेटिक व ऑयोटिक टेक्निशियन, एंडोस्कोपी टेक्निशियन, ऑडीओकिन्युजल टेक्निशियन
पद संख्या – 118 पदे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 15, 16, 18, 19 जानेवारी 2024
मुलाखतीचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर (PDF पहा)
नोकरी करण्याचे ठिकाण – ठाणे

भरतीचा तपशील – (TMC Recruitment 2024)

पद पद संख्या 
पल्मोनरी लॅब टेक्निशियन 01
ईसीजी टेक्निशियन 14
ऑडिओमेट्री टेक्निशियन 01
वॉर्ड क्लर्क 12
अल्ट्रा सोनोग्राफी / सीटी. स्कॅन तंत्रज्ञ 01
क्ष-किरण तंत्रज्ञ 12
सहायक क्ष-किरण तंत्रज्ञ 05
मशीन तंत्रज्ञ 01
दंत तंत्रज्ञ 03
ज्युनिअर टेक्निशियन 41
सिनिअर टेक्निशियन 11
ई.ई.जी. टेक्निशियन 01
ब्लड बैंक टेक्निशियन 10
प्रोस्टेटिक व ऑयोटिक टेक्निशियन 01
एंडोस्कोपी टेक्निशियन 02
ऑडीओकिन्युजल टेक्निशियन 02

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
पल्मोनरी लॅब टेक्निशियन मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी
ईसीजी टेक्निशियन मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी
ऑडिओमेट्री टेक्निशियन मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी
वॉर्ड क्लर्क मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी
अल्ट्रा सोनोग्राफी / सीटी. स्कॅन तंत्रज्ञ मान्यता प्राप्त विद्यापिठाची भौतिकशास्व/इलेक्ट्रानिक्स विषयासह विज्ञान शाखेची पदवी
क्ष-किरण तंत्रज्ञ मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील रेडियोग्राफी मधील (बी.एम. आर.टी.) पदवी
सहायक क्ष-किरण तंत्रज्ञ मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील रेडियोग्राफी मधील (बी.एम. आर.टी.) पदवी.
मशीन तंत्रज्ञ शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडील मशीन ऑपरेटर अभ्यासक्रम पूर्ण व तद्नंतर एन.सी.टी.व्ही.टी. चे प्रमाणपत्र आवश्यक
दंत तंत्रज्ञ महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण (विज्ञान शाखेसह)
ज्युनिअर टेक्निशियन मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी (TMC Recruitment 2024)
सिनिअर टेक्निशियन मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी
ई.ई.जी. टेक्निशियन मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी (BSC) च ईईजी टेक्निशियन पदवी
ब्लड बैंक टेक्निशियन मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी (BSC).
प्रोस्टेटिक व ऑयोटिक टेक्निशियन मान्यताप्राप्त विद्यार्थी विज्ञान शाखेतील पदवी (प्रोस्थेटिक व आयोटिक टेक्नीशियन
एंडोस्कोपी टेक्निशियन मान्यताप्राप्त विद्यापीठाची एन्डोस्कोपी टेक्निशियन विषयातील पदवी
ऑडीओकिन्युजल टेक्निशियन महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची, उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण (HSC)

 

मिळणारे वेतन –

पद वेतन
पल्मोनरी लॅब टेक्निशियन रु. २५,०००/-
ईसीजी टेक्निशियन रु. २५,०००/-
ऑडिओमेट्री टेक्निशियन रु. २५,०००/-
वॉर्ड क्लर्क रु. २५,०००/-
अल्ट्रा सोनोग्राफी / सीटी. स्कॅन तंत्रज्ञ रु. २५,०००/-
क्ष-किरण तंत्रज्ञ रु. २५,०००/-
सहायक क्ष-किरण तंत्रज्ञ रु. २५,०००/-
मशीन तंत्रज्ञ रु. २५,०००/-
दंत तंत्रज्ञ रु. २५,०००/-
ज्युनिअर टेक्निशियन रु. २५,०००/-
सिनिअर टेक्निशियन रु. २५,०००/-
ई.ई.जी. टेक्निशियन रु. २५,०००/-
ब्लड बैंक टेक्निशियन रु. २५,०००/-
प्रोस्टेटिक व ऑयोटिक टेक्निशियन रु. २५,०००/-
एंडोस्कोपी टेक्निशियन रु. २५,०००/-
ऑडीओकिन्युजल टेक्निशियन रु. २५,०००/-

 

अशी होणार निवड – (TMC Recruitment 2024)
1. या भरतीसाठी निवड प्रक्रिया मुलाखतीने होणार आहे.
2. मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
4. उमेदवारांनी स्वखर्चाने मुलाखतीला हजर रहायचे आहे.
5. या पदांकरीता मुलाखत 15, 16, 18, 19 जानेवारी 2024 रोजी घेण्यात येणार आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://thanecity.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career Success Story : मंगळावर जाणार पहिला मानव!! कोण आहे एलिसा कार्सन? नासानेच केली तिची निवड

Career Success Story of Alyssa Carson

करिअरनामा ऑनलाईन । मंगळ ग्रहावर मानवाला पाठवण्याच्या (Career Success Story) मोहिमेच्या तयारीत नासा चांगलीच प्रगती करत आहे. नासाने अ‍ॅलिसा कार्सन नावाच्या एका तरुणीची त्यांच्या मंगळावरील मोहिमेचा एक भाग म्हणून निवड केली आहे आणि ही तरुणी मंगळावर जाणारी पहिली मानव ठरणार आहे.

अवघ्या 22 वर्षाची आहे एलिसा
एलिसा कार्सनचा जन्म 10 मार्च 2001 रोजी हॅमंड, लुईझियाना येथे झाला. सध्या ती अवघ्या 22 वर्षाची आहे. ती एक अमेरिकन अंतराळ उत्साही आणि डॉक्टरेट विद्यार्थीनी आहे जिने अनेक अंतराळ शिबिरांमध्ये भाग घेतला आहे.

Career Success Story of Alyssa Carson

नासाच्या प्रत्येक स्पेस कॅम्पमध्ये सहभागी झालेली एकमेव व्यक्ती
एलिसाने वयाच्या 7 व्या वर्षी हंट्सविले, अलाबामा येथे तिच्या पहिल्या स्पेस कॅम्पला हजेरी लावली आणि त्यानंतर आणखी सहा शिबिरांना तिने हजेरी लावली. जगभरातील नासाच्या प्रत्येक स्पेस कॅम्पमध्ये सहभागी झालेली ती एकमेव व्यक्ती आहे.

Career Success Story of Alyssa Carson

18 व्या वर्षी मिळवला पायलटचा परवाना (Career Success Story)
2013 मध्ये तिने NASA च्या चौदा अभ्यागत केंद्रांना भेट देऊन ‘NASA पासपोर्ट प्रोग्राम’ पूर्ण करणारी ती पहिली व्यक्ती ठरली. वयाच्या 18 व्या वर्षी, एलिसाने पायलटचा परवाना मिळवला ज्यामध्ये पाणी जगण्याचे प्रशिक्षण, बल प्रशिक्षण, मायक्रोग्रॅविटी फ्लाइट, स्कूबा प्रमाणपत्र मिळवणे आणि डीकंप्रेशन प्रशिक्षण याचा समावेश होता.
2023 पर्यंत, तिने फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून अॅस्ट्रोबायोलॉजीमध्ये पदवी मिळवली. ती सध्या आर्कान्सा विद्यापीठातून अवकाश आणि ग्रह विज्ञान या विषयात पीएचडी करत आहे. अनौपचारिक अंतराळवीर-इन-प्रशिक्षण म्हणून, तिला असंख्य वृत्त आउटलेट्स, सार्वजनिक स्वारस्य प्रकाशने आणि मुलाखत कार्यक्रमांनी प्रसिध्दी दिली आहे.

Career Success Story of Alyssa Carson

मंगळावर जाणारा पहिला मानव
मंगळ ग्रहावर मानवाला पाठवण्याच्या मोहिमेच्या (Career Success Story) तयारीत असणाऱ्या नासाने अ‍ॅलिसा कार्सन नावाच्या एका तरुणीची त्यांच्या मंगळावरील मोहिमेचा एक भाग म्हणून निवड केली आहे आणि ही तरुणी मंगळावर जाणारी पहिली मानव ठरणार आहे. ही बाब निश्चितच अभिमानास्पद आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com