Career Success Story : घरोघरी पेपर वाटले… शिकवणया घेतल्या; अथक प्रयत्न करुन सुमित अवघ्या 24 व्या वर्षी बनला CA

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । जर तुम्ही काही करण्याचा निर्धार केलात तर (Career Success Story) तुम्हाला तुमचे ध्येय गाठण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. सुमित कुमारने हे सिद्ध केले आहे. परिस्थिती कशीही असो. सर्व अडथळ्यांना तोंड देत तिसऱ्या प्रयत्नात सीए फायनलची परीक्षा तो पास झाला आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुमित एक उत्तम उदाहरण आहे.

घरोघरी पेपर वाटले; मुलांना शिकवणी दिली
अगदी सामान्य कुटुंबातून आलेल्या सुमितचा आयुष्यातील प्रवास सोपा नव्हता. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी त्याला अभ्यासाव्यतिरिक्त जीवनात येणाऱ्या असंख्य वादळांशी सतत संघर्ष करावा लागला. घरची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन सुमितने लहान वयातच स्वावलंबनाचा मार्ग (Career Success Story) निवडला आणि 2013 ते 2016 पर्यंत वृत्तपत्र वितरक म्हणून त्याने काम केले. दरम्यान, 2017 मध्ये त्याने इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात प्रवेश घेतला आणि आर्थिक खर्चाला हातभार लावण्यासाठी लहान मुलांना शिकवणी द्यायलाही सुरुवात केली.
B.Com करत असताना आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी सुमितने घरोघरी जावून मुलांना शिकवणी द्यायला सुरुवात केली. यासोबतच त्याची CA ची तयारीही सुरु होती. यामध्ये सुरुवातीला त्याला यश आले नाही; पण सुमितने हार मानली नाही. ग्रॅज्युएशनसोबतच त्याने पोस्ट ग्रॅज्युएशनही पूर्ण केले

12वीत मिळाले फक्त 53 टक्के मार्क (Career Success Story)
सुमितने अभ्यासात फार हुशार नव्हता. तो सांगतो सतत शिकण्यात आणि झालेल्या चुका सुधारण्यावर त्याचा विश्वास आहे. त्याला 10वी मध्ये 7.2 CGPA आणि 12वी मध्ये फक्त 53 टक्के मार्क मिळाले होते. कमी मार्क मिळाले तरी तो खचला नाही.
वयाच्या 24 व्या वर्षी झाला CA
सुमितला 12 वीत कमी मार्क मिळाले. त्याच्या बरोबर शिकणाऱ्या मित्रांना त्याच्यापेक्षा जास्त मार्क मिळाले तरी तो खचला नाही. तो त्याच्या ध्येयावर ठाम राहिला. त्याला सीए (CA) व्हायचे होते आणि वयाच्या 24 व्या वर्षी तो CA झाला. सुमितचे वडील प्रमोद कुमार मूळचे बिहारमधील बेगुसराय येथील आहेत. ते एका खासगी कंपनीत काम करतात. सुमितने सांगितले की, ” घरची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. तरी वडिलांनी माझ्या शिक्षणात कधीही खंड पडू दिला नाही. मी  नेहमी अभ्यासाला प्राधान्य द्यायचो. वडिलांवर खर्चाचा बोजा पडेल आणि कुटुंबाच्या गरजांवर त्याचा परिणाम होईल; असं मला वाटायचं; त्यामुळे मी माझ्या शालेय जीवनापासूनच काम करण्यास सुरुवात केली आणि वडिलांना हातभार लावला.” आयुष्यात हार मानलेल्या; छोट्या मोठ्या अपयशाने खचून जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुमित एक उत्तम उदाहरण आहे. त्याच्या कर्तृत्वाने निश्चितच प्रेरणा घेता येईल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com