GK Updates : मुलाखतीत विचारले जातील असे प्रश्न… प्रभू श्री राम लंकेत किती दिवस राहिले? जाणून घ्या…

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.
आज आपण ‘रामायण’ या विषयाशी संबंधित काही प्रश्न पाहणार आहोत.

प्रश्‍न 1 – लक्ष्मणाने सुग्रीवाला सुख सोहळ्यासाठी दोषी ठरवले, तेव्हा सुग्रीवाला श्रीरामाला दिलेल्या वचनाची आठवण कोणी करून दिली? (GK Updates )
उत्तर – लक्ष्मणाने जेव्हा सुग्रीवावर सुख भोगण्याबद्दल टीका केली, तेव्हा सुग्रीवाला ‘पलक्ष’ आणि ‘प्रभाव’ यांनी श्री रामाला दिलेल्या वचनाची आठवण करुन दिली.
प्रश्न 2 – (GK Updates ) ‘वाल्मिकी रामायण’ नुसार, श्री राम आणि लक्ष्मण कोणत्या महिन्यात पंपा सरोवरात पोहोचले होते?
उत्तर – वास्तविक वाल्मिकी रामायणानुसार श्री राम आणि लक्ष्मण चैत्र महिन्यात पंपा सरोवरात पोहोचले होते.

प्रश्न 3 – भगवान श्रीराम लंकेत किती दिवस राहिले?
उत्तर – वास्तविक पाहता भगवान श्रीराम लंकेत 111 दिवस राहिले.
प्रश्न 4 – ब्रह्महत्येचे पाप कोणाचे होते ते सांगता येईल का?
उत्तर  – ब्रह्महत्येच्या पापासाठी श्री राम दोषी होते, कारण त्यांनी रावणाचा वध केला होता.
प्रश्न 5 – महर्षि वाल्मिकी यांचा (GK Updates ) आश्रम कोणत्या नदीच्या काठावर होता?
उत्तर  – महर्षि वाल्मिकी यांचा आश्रम तमसा नदीच्या काठावर होता.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com