Home Blog Page 168

Mahapareshan Recruitment 2024 : खुषखबर!! महापारेषण अंतर्गत 10 वी पास उमेदवारांना नोकरी

Mahapareshan Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । 10 वी पास उमेदवारांसाठी एक (Mahapareshan Recruitment 2024) महत्वाची अपडेट आहे. महापारेषण, रत्नागिरी येथे रिक्त पदांच्या 22 जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 फेब्रुवारी 2024 आहे.

संस्था – महापारेषण, रत्नागिरी
भरले जाणारे पद – विजतंत्री (Electrician)
पद संख्या – 22 पदे (Mahapareshan Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 फेब्रुवारी 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. उमेदवार किमान दहावी पास असणे आवश्यक आहे.
2. उमेदवार NCVT मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून Electrician ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असावा.
वय मर्यादा – (Mahapareshan Recruitment 2024)
1. किमान 18 ते कमाल 30 वर्षे
2. मागासवर्गीय उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट राहील
अर्ज फी – फी नाही
नोकरी करण्याचे ठिकाण – रत्नागिरी

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.mahatransco.in/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

 

UPSC Success Story : स्वप्न होतं IAS बनण्याचं; स्वित्झर्लंडच्या नोकरीला केला गुडबाय; अशी होती अभ्यासाची स्ट्रॅटेजी

UPSC Success Story of IAS Ambika Raina

करिअरनामा ऑनलाईन । अंबिका रैना.. जम्मू आणि काश्मीरमधील (UPSC Success Story) रहिवासी. तिने UPSC मध्ये करिअर करण्यासाठी बड्या नोकरीची ऑफर नाकारली आणि आपलं स्वप्न पूर्ण केलं. तिचे वडील भारतीय सैन्यात मेजर जनरल होते. त्यांच्यामुळे अंबिकामध्ये शिस्त आणि दृढनिश्चयाची भावना निर्माण झाली. तिने आयुष्यात उल्लेखनीय कामगिरी करुन दाखवली आहे. आज आपण अंबिका रैनाच्या जीवन प्रवासाविषयी जाणून घेणार आहोत. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी इथे तिने अभ्यासाविषयी मार्गदर्शन केले आहे. या टिप्स निश्चितच तुम्हाला उपयुक्त ठरतील.

स्वित्झर्लंडमधील नोकरीची ऑफर नाकारली
अंबिकाचे वडील भारतीय सैन्यात मेजर जनरल होते. नोकरीमुळे तिच्या वडिलांची सतत बदली होत असल्याने या गोष्टीचा  तिच्या आयुषयवर खूप प्रभाव पडला, त्यामुळे तिला भारतातील विविध राज्यांमध्ये तिला शिक्षण घेण्याची संधी मिळाली. अहमदाबाद, गुजरात येथील CEPT विद्यापीठातून तिने आर्किटेक्चरमध्ये पदवी मिळवली आहे. यानंतर तिला अनेक कंपन्यांकडून नोकरीच्या ऑफर तसेच झुरिच, स्वित्झर्लंडमधील कंपनीकडून इंटर्नशिपची ऑफर मिळाली होती. पण या आकर्षक संधी मिळूनही अंबिकाने यूपीएससी (UPSC) नागरी सेवा परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला.

अंबिका सांगते.. ‘अशी करा नागरी सेवा परीक्षांची तयारी’
एका मुलाखतीत अंबिकाने तिच्या UPSC स्ट्रॅटेजीबद्दल माहिती दिली. ती सांगते; “परीक्षेच्या पहिल्या दोन प्रयत्नात ती पास होऊ शकली नाही तरीही मी माझ्या निर्णयावर ठाम राहिले. मी अपयशाची कारणे शोधली. त्या मागील कारणांचे विश्लेषण केले. मॉक टेस्ट पेपर्सचे महत्त्व समजून घेवून अभ्यासाच्या रणनीतीत बदल केले. माझा मॉक टेस्ट देण्यावर भर होता. कारण यामुळे उमेदवार परीक्षेच्या तयारीचे मूल्यांकन करु शकतात. परीक्षेची तयारी प्रभावीपणे करण्याचा एक प्रभावी मार्ग म्हणजे; मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवण्यावर विद्यार्थ्यांनी भर दिला पाहिजे.”

ही पुस्तके वाचा (UPSC Success Story)
एम. लक्ष्मीकांत यांचे राज्यशास्त्रासाठीचे पुस्तक, स्पेक्ट्रम बुक्स प्रायव्हेट लिमिटेडचे ​​आधुनिक इतिहासाचे पुस्तक, भूगोलासाठी एनसीईआरटीची पुस्तके, पर्यावरण अभ्यासासाठी शंकर यांचे पुस्तक, आयएएस अकादमीचे पुस्तक, नितीन सिंघानिया यांचे कला आणि संस्कृतीवरील पुस्तक यासारखी विशेष पुस्तके वाचण्याचा सल्ला अंबिका देते

इंटरनेटवरील संसाधनांचा वापर करा
अंबिका म्हणाली की, यूपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी इंटरनेट हे तिच्यासाठी एक मौल्यवान स्त्रोत आहे. तिच्या मते येथे उपलब्ध असलेल्या ज्ञानावर लक्ष केंद्रित करून त्याचा प्रभावीपणे वापर करता आला पाहिजे. उमेदवारांनी ऑनलाइन उपलब्ध अभ्यास संसाधने फिल्टर करणे आणि वापरणे शिकले पाहिजे.

टॉपर्सचे व्हिडिओ देतील प्रेरणा
अंबिकाला तिच्या तयारीदरम्यान विविध आव्हानांचा (UPSC Success Story) सामना करावा लागला, विशेषत: तिच्या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे. तिने कला शाखेतून शिक्षण न घेतल्याने सुरुवातीला तिच्या आत्मविश्वासावर मोठा परिणाम झाला. यावर मात करण्यासाठी तिने 100 हून अधिक UPSC टॉपर्सच्या मुलाखती पाहिल्या आणि त्यावर सखोल संशोधन करून अभ्यासाची रणनीती तयार केली. अंबिकाने UPSC च्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका आणि मागील टॉपर्सच्या उत्तर प्रतींवर देखील लक्ष केंद्रित केले.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Education : ‘या’ विद्यार्थ्यांना अकॅडमिक क्रेडिटसह मिळणार विमा आणि स्टायपेंडही; UGC चा मोठा निर्णय

Education (13)

करिअरनामा ऑनलाईन । शैक्षणिक विभागाने विद्यार्थी हिताचे (Education) काही निर्णय घेतले आहेत. या धर्तीवर काही महत्त्वपूर्ण बदल घडवण्यात आले असून आता केंद्राकडून ठराविक विद्यार्थ्यांसाठी काही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. याबाबत देशातील अनेक विद्यापीठं आणि उच्च शिक्षण संस्थांना कळवलं जात आहे. यामुळे रिसर्च इंटर्नशिप संदर्भातील विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.

पदवीच्या विद्यार्थ्यांना मिळणार स्टायपेंड
रिसर्च इंटर्नशिपचा थेट फायदा आता विद्यार्थ्यांना मिळणार असून, जे विद्यार्थी पदवी शिक्षण घेत आहेत आणि विविध संस्थांमध्ये इंटर्नशिप करत आहेत त्यांना निर्धारित रक्कम स्टायपेंड स्वरुपात दिली जाणार आहे. याशिवाय विद्यार्थ्यांसाठी विम्याचीही तरतूद केली जाणार आहे.
UGC च्या वतीनं वरील तरतुदींसाठीच्या मसुद्यावर गुंतवणूकदारांकडून त्यांची मतं मागवण्यात आली त्यानंतर यासंदर्भातील निर्णय घेण्यात आले. रिसर्च इंटर्नशिप निर्धारित करण्यासाठी सदरील शिक्षण संस्थांच्या माध्यमातून स्थानिक बाजारपेठांच्या गरजा लक्षात घेत एक सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. ज्या आधारे इंटर्नशिप प्रोग्रामही आखले जाणार आहेत. युजीसीच्या मते विद्यापीठ स्तरावर जॉईंट रिसर्च प्रोजेक्टलाही दुजोरा मिळणं अपेक्षित असून, विद्यार्थ्यांसाठी करिअर काऊंन्सेलिंग सेल असणंही अपेक्षित आहे.

युजीसीच्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार रिसर्च इंटर्नशिपसाठी उच्च शिक्षण संस्थामध्ये एका नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करावी लागणार आहे. या संस्थांकडून रिसर्च इंटर्नशिपसाठी विविध कंपन्यांसमवेत करार केले जाणार आहेत. 4 वर्षीय पदवी शिक्षण कार्यक्रमादरम्यान चौथ्या वर्षासाठी रिसर्चची व्यवस्था असून, उच्च शिक्षण संस्थांकडून प्रत्येक पात्र विद्यार्थ्यासाठी इंटर्नशिप सुपरवायर नेमण्यात येणार आहे. त्यांच्याकडून निर्धारित वेळेत इंटर्नशिप पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत होणार आहे.

विद्यार्थ्यांना असा होणार फायदा (Education)
युजीसीच्या (UGC) मते पदवी शिक्षणादरम्यान इंटर्नशिप केल्यामुळं विद्यार्थ्यांना नव्या शिक्षण आयोगानुसार अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये समाधानकारक गुण मिळवता येतील. शिवाय संबंधिक कंपनीच्या शिफारसीनंतर विद्यार्थ्यांचा इंटर्नशिप कालावधी वाढवलाही जाऊ शकतो. इथं फक्त इंटर्नशिप प्रोजेक्ट विद्यार्थ्यांच्या स्किल डेवलपमेंट कोर्सशी लिंक करणं अपेक्षित असेल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Job : तगड्या पगाराची सरकारी नोकरी!! ‘इथे’ होतेय नवीन भरती; ही संधी सोडू नका

Government Job (45)

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात (Government Job) असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेडकडून नवीन भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे चालून आली आहे. ही ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड केंद्र शासनाची नवरत्न कंपनी आहे. तुम्ही या भरतीसाठी इच्छुक असाल ते अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

भरतीचा तपशील –
ही भरती प्रक्रिया बारा रिक्त जागांसाठी सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. इच्छुकांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करायचा आहे. ही भरती प्रक्रिया करारावर आधारित असणार आहे. ही भरती प्रक्रिया कनिष्ठ सल्लागार आणि सहयोगी सल्लागार या पदांसाठी सुरू आहे.

आवश्यक वयमर्यादा – (Government Job)
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. कनिष्ठ सल्लागार आणि सहयोगी सल्लागार या दोन्ही पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 35 पेक्षा अधिक नसावे. विशेष म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना तगडा पगार देखील मिळणार आहे.

अशी होईल निवड –
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची एक लिस्ट तयार केली जाईल. त्यानंतर ईमेलव्दारे उमेदवारांशी संपर्क साधला जाईल. त्यानंतर उमेदवारांच्या परीक्षा आणि (Government Job) मुलाखती घेतल्या जातील. परीक्षा आणि मुलाखतीच्या माध्यमातूनच उमेदवाराची निवड केली जाईल. मुलाखत आणि परीक्षा दोन्ही टप्पे महत्वाचे असणार आहेt. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना अगोदर आपला अर्ज भरावा लागेल.

असा करा अर्ज –
उमेदवारांनी आपला अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे [email protected] या मेलवर पाठवायचे आहेत. तसेच उमेदवारांनी अर्ज आणि कागदपत्रेही खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे. कागदपत्रे आणि अर्ज पाठवण्याचा पत्ता – दुसरा मजला खोली क्रमांक 40 केडीएम भवन, मेहसाणा असा आहे. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. यामुळे उमेदवारांनी या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे आणि शेवटच्या तारखेच्या अगोदर आपला अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठीअधिकृत वेबसाईट – https://ongcindia.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : प्राध्यापकांसह विविध पदावर भरती सुरु; ‘या’ संस्थेत थेट द्या मुलाखत 

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । सन्मार्ग शिक्षण संस्था, नागपूर (Job Alert) अंतर्गत विविध पदावर भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रिन्सिपल, प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर/व्याख्याता या पदांच्या एकूण 25 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 22 जानेवारी 2024 आहे.

संस्था – सन्मार्ग शिक्षण संस्था, नागपूर
भरले जाणारे पद – प्रिन्सिपल, प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर. / व्याख्याता
पद संख्या – 25 पदे (Job Alert)
नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – E-2/F-3, नवीन नंदनवन, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर-9
मुलाखतीची तारीख – 22 जानेवारी 2024

भरतीचा तपशील – (Job Alert)

पद पद संख्या 
प्रिन्सिपल 01
प्रोफेसर 03
असोसिएट प्रोफेसर 08
असिस्टंट प्रोफेसर. / व्याख्याता 13

निवड प्रक्रिया –
1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. उमेदवाराने दिलेल्या (Job Alert) तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.
3. मुलाखतीची तारीख 22 जानेवारी 2024 आहे.
4. उमेदवारांनी मुळखतीस येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

KVK Recruitment 2024 : कृषी विज्ञान केंद्र येथे 10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी

KVK Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । कृषी विज्ञान केंद्र, बारामती जि. पुणे अंतर्गत (KVK Recruitment 2024) कुशल सहाय्यक कर्मचारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 फेब्रुवारी 2024 आहे.

संस्था – कृषी विज्ञान केंद्र, बारामती
भरले जाणारे पद – कुशल सहाय्यक कर्मचारी
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (KVK Recruitment 2024)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 फेब्रुवारी 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – अध्यक्ष, कृषी विकास ट्रस्ट, शारदानगर, मालेगाव खुर्द, बारामती, जि. पुणे, पिन – ४१३११५, महाराष्ट्र
वय मर्यादा – 25 वर्षे
नोकरी करण्याचे ठिकाण – बारामती, पुणे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10 वी पास असणे आवश्यक आहे.
मिळणारे वेतन – Rs. 18000/- दरमहा
असा करा अर्ज – (KVK Recruitment 2024)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी वर दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज करायचे आहेत.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 फेब्रुवारी 2024 आहे. मुदतीनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
5. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडा.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.kvkbaramati.com/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

TMC Recruitment 2024 : टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत विविध पदांवर भरती सुरु; पटापट करा अर्ज

TMC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । टाटा मेमोरियल सेंटर (TMC) अंतर्गत (TMC Recruitment 2024) वैद्यकीय अधिकारी ‘जी’, वैद्यकीय अधिकारी एफ, वैद्यकीय अधिकारी ‘ई’, वैद्यकीय अधिकारी ‘डी’, वैद्यकीय अधिकारी ‘सी’, वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ ‘ई’, वैज्ञानिक अधिकारी ‘ई’, वैज्ञानिक ‘वैद्यकीय अधिकारी’ ‘, वैज्ञानिक अधिकारी ‘एसबी’, कनिष्ठ अभियंता, वैज्ञानिक सहाय्यक ‘सी’, वैज्ञानिक सहाय्यक ‘बी’, सहाय्यक वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, तंत्रज्ञ ‘एनटीसीअन’, ‘अभियंता’ ईएनटी, नर्स ‘सी’, नर्स ‘बी’, नर्स ‘ए’, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (खरेदी आणि दुकाने, सहाय्यक, स्वयंपाकी ‘ए’, परिचर” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 122 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2024 आहे.

संस्था – टाटा मेमोरियल सेंटर
भरले जणारे पद – वैद्यकीय अधिकारी ‘G’, वैद्यकीय अधिकारी F, वैद्यकीय अधिकारी ‘E’, वैद्यकीय अधिकारी ‘D’, वैद्यकीय अधिकारी ‘C’, वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ E’, वैज्ञानिक अधिकारी ‘E’, वैज्ञानिक ‘वैद्यकीय अधिकारी’ ‘, वैज्ञानिक अधिकारी ‘SB’, कनिष्ठ अभियंता, वैज्ञानिक सहाय्यक ‘C’, वैज्ञानिक सहाय्यक ‘B’, सहाय्यक वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, तंत्रज्ञ ‘एनटीसीअन’, ‘अभियंता’ ईएनटी, नर्स ‘C’, नर्स ‘B’, नर्स ‘A’, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (खरेदी आणि दुकाने, सहाय्यक, स्वयंपाकी ‘A’, परिचर
पद संख्या – 122 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जानेवारी 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – 27 ते 45 वर्षे
अर्ज फी – Rs.300/

भरतीचा तपशील – (TMC Recruitment 2024)

पद पद संख्या 
MEDICAL OFFICER ‘G 02
MEDICAL OFFICER F 01
MEDICAL OFFICER ‘E’ 06
MEDICAL OFFICER ‘D’ 01
MEDICAL OFFICER ‘C’ 01
MEDICAL PHYSICIST ‘E’ 01
SCIENTIFIC OFFICER ‘E’ 01
SCIENTIFIC OFFICER ‘D’ 01
MEDICAL PHYSICIST ‘C’ 02
SCIENTIFIC OFFICER ‘SB’ 05
JUNIOR ENGINEER 02
SCIENTIFIC ASSISTANT ‘C’ 02
SCIENTIFIC ASSISTANT ‘B’ 07
ASSISTANT MEDICAL SOCIAL WORKER 01
CLINICAL PSYCHOLOGIST 01
TECHNICIAN ‘C’ 12
TECHNICIAN ‘A’ 05
ASSISTANT NURSING SUPERINTENDENT 02
NURSE ‘C’ 46
NURSE ‘B’ 08
NURSE ‘A’ 08
ASSISTANT ADMINISTRATIVE OFFICER (PURCHASE & STORES) 01
ASSISTANT 01
 COOK ‘A’ 04
ATTENDANT 01

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद शैक्षणिक पात्रता
MEDICAL OFFICER ‘G D.M. / D.N.B. (Medical Oncology) or equivalent postgraduate degree recognized by National Medical Commission with minimum 9 years’ post D.M. / D.N.B. experience in
Medical Oncology.
MEDICAL OFFICER F M.Ch. (Surgical Oncology) or equivalent postgraduate degree recognized by
National Medical Commission with 5 years’ post M.Ch experience.
MEDICAL OFFICER ‘E’ M.Ch. / D.N.B. (Head & Neck Oncology/ Surgical Oncology) or Equivalent
postgraduate degree recognized by National Medical Commission with minimum 1
year experience in Head & Neck Surgery either during M.Ch training or Post M.Ch.
MEDICAL OFFICER ‘D’ MD/ DNB (General Medicine/ Internal Medicine) or equivalent post graduate degree
recognized by National Medical Commission with minimum 01 year experience in a
large general hospital providing comprehensive general medicine care to staff.
MEDICAL OFFICER ‘C’ M.B.B.S. degree recognized by National Medical Commission with 03 years
experience in Medical Oncology
MEDICAL PHYSICIST ‘E’ M.Sc. (Physics) and Diploma in Radiological Physics conducted by BARC OR
equivalent AERB approved qualifications with 10 years experience in advanced
computerized treatment planning systems and other state-of-the-art technology
SCIENTIFIC OFFICER ‘E’ M.D./Ph.D. in Applied Biology/Biotechnology/Life Sciences / Biochemistry / Zoology /
Microbiology or related field from a recognized University with Minimum 03 years
experience after M.D./Ph.D, in Cancer Cytogenetic area.
SCIENTIFIC OFFICER ‘D’ Ph.D. in Molecular Genetics/Applied Biology or Life Sciences or in a related field / Molecular Biology / Biochemistry / Microbiology with Minimum 01 year Postdoctoral relevant Laboratory experience in a Hospital or Research Institute will be
essential. (TMC Recruitment 2024)
MEDICAL PHYSICIST ‘C’ M.Sc. (Physics) and Diploma in Radiological Physics or Equivalent AERB approved
qualifications. Certification of Radiological Safety Officer from AERB.
SCIENTIFIC OFFICER ‘SB’ MSc (Radiological Imaging Technology) from a recognized University with
minimum 01 year Internship/ experience from a large hospital with experience in
CT and MRI.
JUNIOR ENGINEER First Class Diploma in Civil/Mechanical Engineering
SCIENTIFIC ASSISTANT ‘C’ B.Sc. (Physics/ Chemistry/ Biology/ Nuclear Medicine or equivalent) with DFIT /
DMRIT and passed RSO Level-Il (Nuclear Medicine) examination conducted by
RPAD/ AERB with minimum 01 year experience post qualification is required in
the relevant field.
SCIENTIFIC ASSISTANT ‘B’ B.Sc. (Physics) with minimum 50% marks and Post Graduate Diploma in
Radiotherapy Technology from recognized institute / university approved by AERB
with minimum 01 year experience in modern Radiotherapy Technology.
ASSISTANT MEDICAL SOCIAL WORKER Post Graduate Degree in Social Sciences (MSW) from a recognized University
with minimum one year experience after MSW preferably in the field of Medical
Social work.
CLINICAL PSYCHOLOGIST M.A. (Clinical Psychology) or equivalent from a recognized University with
minimum 03 years’ experience in psychometric testing and interpretation,
including neuropsychological tests and counselling and therapy
TECHNICIAN ‘C’ Diploma in Electronics I Computer Engineering or Graduate in Computer Science
OR any other graduate with atleast 01 year certificate course in Computer
Technology from a reputed institute and having professional CCNA certification.
Diploma or Graduation should be from a Government Recognized Board /
University
TECHNICIAN ‘A’ 12th Std. in any stream or equivalent and should have Degree / Diploma of One
year / 03 years in Hotel Management from any reputed institute with 01 year
experience in relevant field.
ASSISTANT NURSING SUPERINTENDENT M.Sc. (Nursing) OR B.Sc. (Nursing) / Post Basic B.Sc (Nursing) OR General
Nursing & Midwifery plus Diploma in Oncology Nursing with minimum 15 years’
experience out of which 10 years should be Clinical experience in a 100 bedded
hospital
NURSE ‘C’ General Nursing & Midwifery plus Diploma in Oncology Nursing with minimum
12 years clinical experience in a 100 bedded hospital OR B.Sc.(Nursing) or Post
Basic B.Sc.(Nursing) with minimum 12 years clinical experience in a 100 bedded
hospital
NURSE ‘B’ General Nursing & Midwifery plus Diploma in Oncology Nursing with minimum
06 years clinical experience in a 100 bedded hospital OR B.Sc.(Nursing) or Post
Basic B.Sc.(Nursing) with minimum 06 years clinical experience in a 100 bedded
hospital
NURSE ‘A’ General Nursing & Midwifery plus Diploma in Oncology Nursing with 01 year clinical
experience in a 50 bedded hospital OR Basic or Post Basic B.Sc.(Nursing) with 01
year clinical experience in minimum 50 bedded hospital.
ASSISTANT ADMINISTRATIVE OFFICER (PURCHASE & STORES) Graduate from a recognized University with Degree or Diploma in Material Management
from a reputed Institution.
ASSISTANT Graduate from a recognized University. Knowledge of Microsoft Office
 COOK ‘A’ 10TH Std. plus compulsory certified craft course in Food Production, Bakery or
Cookery.
ATTENDANT Matriculation or equivalent pass from recognized board.
Candidate should have minimum one year experience in Filing, Record Keeping,
Dispatch Work, Operating Photocopy machine, helping in office work, Dusting
and Cleaning etc.

 

मिळणारे वेतन – (TMC Recruitment 2024)

पद वेतनश्रेणी
MEDICAL OFFICER ‘G Rs. 1,31,100/-
MEDICAL OFFICER F Rs.1,23,100/-
MEDICAL OFFICER ‘E’ Rs. 78,800/-
MEDICAL OFFICER ‘D’ Rs.67,700/-
MEDICAL OFFICER ‘C’ Rs. 56,100/-
MEDICAL PHYSICIST ‘E’ Rs.78800/-
SCIENTIFIC OFFICER ‘E’ Rs.78800/-
SCIENTIFIC OFFICER ‘D’ Rs. 67,700/-
MEDICAL PHYSICIST ‘C’ Rs. 56,100/-
SCIENTIFIC OFFICER ‘SB’ Rs. 47,600/-
JUNIOR ENGINEER Rs. 44,900/-
SCIENTIFIC ASSISTANT ‘C’ Rs. 44,900/-
SCIENTIFIC ASSISTANT ‘B’ Rs. 35,400/-
ASSISTANT MEDICAL SOCIAL WORKER Rs.35,400/-
CLINICAL PSYCHOLOGIST Rs. 35,400/
TECHNICIAN ‘C’ Rs. 25,500/-
TECHNICIAN ‘A’ Rs. 19,900/-
ASSISTANT NURSING SUPERINTENDENT Rs. 56,100/-
NURSE ‘C’ Rs.53100/-
NURSE ‘B’ Rs.47600/-
NURSE ‘A’ Rs.44900/-
ASSISTANT ADMINISTRATIVE OFFICER (PURCHASE & STORES) Rs. 44,900/-
ASSISTANT Rs. 35,400/-
 COOK ‘A’ Rs.19900/-
ATTENDANT Rs. 18000/

 

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://tmc.gov.in/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

D. Y. Patil University Recruitment 2024 : डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात ‘या’ उमेदवारांना नोकरीची संधी!!

D. Y. Patil University Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे (D. Y. Patil University Recruitment 2024) अंतर्गत विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीच्या माध्यमातून संचालक (विद्यार्थी कल्याण), मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ), डेप्युटी सीईओ पदांच्या विविध रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन/ ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2024 आहे.

संस्था – डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे (D. Y. Patil University Recruitment 2024)
भरले जाणारे पद – संचालक (विद्यार्थी कल्याण), मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ), डेप्युटी सीईओ
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-Mail)/ ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जानेवारी 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कुलसचिव, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, संत तुकाराम नगर, पिंपरी, पुणे – 411 018
E-Mail ID – [email protected]
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद शैक्षणिक पात्रता
संचालक (विद्यार्थी कल्याण)
  • Ph.D. degree with consistent good academic record and
  • Master’s Degree with at least 55% of the marks or an equivalent grade in a point scale, wherever grading system is followed.
मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ)
  • Ph.D. degree with consistent good academic record and
  • Master’s Degree with at least 55% of the marks or an equivalent grade in a point scale, wherever grading system is followed.
डेप्युटी सीईओ
  • Ph.D. degree with consistent good academic record and
  • Candidate must hold Engineering Degree and Master Degree in Management or its equivalent/ Master Degree in Health Sciences from a recognized Institution with at least 55% of the marks or an equivalent grade in a point scale, wherever grading system is followed.

 

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन (E-Mail)/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज करण्याची (D. Y. Patil University Recruitment 2024) शेवटची तारीख 27 जानेवारी 2024 आहे.
4. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://dpu.edu.in/ 

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : सरकारी नोकरीची तयारी करताय? ‘या’ प्रश्नांची उत्तरे सांगतील तुमची तयारी किती झाली

GK Updates 14 Jan (1)

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न 1: कोणत्या फुलाला फुलांची राणी म्हणतात?
उत्तर. चमेलीचे फूल
प्रश्न 2: तिरंग्यावर अशोक चक्र कोणी स्थापित केले?
उत्तर. विनायक दामोदर सावरकर
प्रश्न 3: असा कोणता प्राणी आहे जो कधीही मरत नाही?
उत्तर. जेलीफिश

प्रश्न 4: मानवी मेंदूचे वजन अंदाजे किती किलोग्रॅम असते?
उत्तर. (GK Updates) सुमारे 1.5 किलो
प्रश्न 5: दुधात कोणते जीवनसत्व आढळत नाही?
उत्तर. व्हिटॅमिन सी
प्रश्न 6: दिल्लीत असलेली ‘शांतिवन’ समाधी कोणाची आहे?
उत्तर. जवाहरलाल नेहरु

प्रश्न 7: लोसांग सण देशातील कोणत्या राज्यात साजरा केला जातो?
उत्तर. सिक्कीम
प्रश्न 8: गिरनार टेकड्या कोठे आहेत?
उत्तर. गुजरात (GK Updates)
प्रश्न 9: गौतम बुद्धांचे खरे नाव काय होते?
उत्तर. सिद्धार्थ
प्रश्न 10: बिरजू महाराज हे कोणत्या क्षेत्रातील प्रसिद्ध कलाकार होते?
उत्तर. कथ्थक नृत्य
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career Tips : नवीन स्किल्स शिकण्यासाठी ‘या’ टिप्स ठरतील उपयुक्त

Career Tips (14)

करिअरनामा ऑनलाईन । कोणतेही नवीन कौशल्य शिकायचे (Career Tips) असेल तर त्यासाठी संयम ठेवावा लागतो. सतत नवनवीन कौशल्ये शिकून तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगती करण्याच्या अधिकाधिक संधी मिळतात. चला जाणून घेऊया नवीन कौशल्ये शिकण्यासाठी कोणत्या प्रकारची यशस्वी तंत्रे अवलंबली पाहिजेत याविषयी…

1. लक्ष विचलित होवू देवू नका
कोणतेही कौशल्य शिकायचे असेल तर त्यासाठी आपल्या आजूबाजूचे वातावरण अनुकूल ठेवावे लागते. यासाठी, प्रथम सर्व प्रकारच्या विचलित करणाऱ्या गोष्टींना दूर ठेवा; जेणेकरुन तुम्हाला शिकताना त्रास होणार नाही.
2. शिकत असताना ब्रेक घ्या
जास्त वेळ एकाच ठिकाणी बसून कौशल्यावर काम करणे हा अजिबात चांगला मार्ग नाही. असे केल्याने मेंदूवर दबाव वाढतो, ज्यामुळे कौशल्य शिकण्यात काही अडचण येते. म्हणून, जर तुम्ही कोणतेही काम करत असाल किंवा कौशल्ये शिकत असाल तर त्यादरम्यान तुम्हाला 20 ते 30 मिनिटे काम करावे लागेल आणि ब्रेक देखील घ्यावा लागेल.

3. शिकण्याचे ध्येय सेट करा (Career Tips)
कोणतीही नवीन गोष्ट शिकण्याची पहिली पायरी म्हणजे त्यासाठी ध्येय निश्चित करणे. या संदर्भात, आपण शिकत असलेल्या नवीन कौशल्यांमध्ये आपल्याला काय साध्य करायचे आहे हे माहित असले पाहिजे. तरच तुम्ही ते चांगले शिकू शकाल.
4. हळूहळू शिका
तुम्हाला जे काही नवीन कौशल्य शिकायचे आहे, ते लहान भागांमध्ये विभागून घ्या जेणेकरून ते शिकणे सोपे होईल. असे केल्याने तुमचे मन पूर्णपणे स्वच्छ राहते आणि कौशल्य शिकण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल हे जास्त चांगले कळते.

5. स्वतःला रेकॉर्ड करा
तुम्ही कोणतेही कौशल्य किती चांगले शिकत आहात (Career Tips) आणि ते शिकण्याची तुमची इच्छा किती तीव्र आहे? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला स्वतःकडे पहावे लागेल आणि शिकत असताना तुम्ही कुठे चुका करत आहात याचे विश्लेषण करावे लागेल. सोबत कुठे सुधारणा करणे आवश्यक आहे; हे देखील जाणून घेणे महत्वाचे आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com