Career Tips : नवीन स्किल्स शिकण्यासाठी ‘या’ टिप्स ठरतील उपयुक्त

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । कोणतेही नवीन कौशल्य शिकायचे (Career Tips) असेल तर त्यासाठी संयम ठेवावा लागतो. सतत नवनवीन कौशल्ये शिकून तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगती करण्याच्या अधिकाधिक संधी मिळतात. चला जाणून घेऊया नवीन कौशल्ये शिकण्यासाठी कोणत्या प्रकारची यशस्वी तंत्रे अवलंबली पाहिजेत याविषयी…

1. लक्ष विचलित होवू देवू नका
कोणतेही कौशल्य शिकायचे असेल तर त्यासाठी आपल्या आजूबाजूचे वातावरण अनुकूल ठेवावे लागते. यासाठी, प्रथम सर्व प्रकारच्या विचलित करणाऱ्या गोष्टींना दूर ठेवा; जेणेकरुन तुम्हाला शिकताना त्रास होणार नाही.
2. शिकत असताना ब्रेक घ्या
जास्त वेळ एकाच ठिकाणी बसून कौशल्यावर काम करणे हा अजिबात चांगला मार्ग नाही. असे केल्याने मेंदूवर दबाव वाढतो, ज्यामुळे कौशल्य शिकण्यात काही अडचण येते. म्हणून, जर तुम्ही कोणतेही काम करत असाल किंवा कौशल्ये शिकत असाल तर त्यादरम्यान तुम्हाला 20 ते 30 मिनिटे काम करावे लागेल आणि ब्रेक देखील घ्यावा लागेल.

3. शिकण्याचे ध्येय सेट करा (Career Tips)
कोणतीही नवीन गोष्ट शिकण्याची पहिली पायरी म्हणजे त्यासाठी ध्येय निश्चित करणे. या संदर्भात, आपण शिकत असलेल्या नवीन कौशल्यांमध्ये आपल्याला काय साध्य करायचे आहे हे माहित असले पाहिजे. तरच तुम्ही ते चांगले शिकू शकाल.
4. हळूहळू शिका
तुम्हाला जे काही नवीन कौशल्य शिकायचे आहे, ते लहान भागांमध्ये विभागून घ्या जेणेकरून ते शिकणे सोपे होईल. असे केल्याने तुमचे मन पूर्णपणे स्वच्छ राहते आणि कौशल्य शिकण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल हे जास्त चांगले कळते.

5. स्वतःला रेकॉर्ड करा
तुम्ही कोणतेही कौशल्य किती चांगले शिकत आहात (Career Tips) आणि ते शिकण्याची तुमची इच्छा किती तीव्र आहे? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला स्वतःकडे पहावे लागेल आणि शिकत असताना तुम्ही कुठे चुका करत आहात याचे विश्लेषण करावे लागेल. सोबत कुठे सुधारणा करणे आवश्यक आहे; हे देखील जाणून घेणे महत्वाचे आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com