Home Blog Page 156

Income Tax Department Recruitment 2024 : सर्वात मोठी बातमी!! आयकर विभागात 12 हजार पदांवर होणार जम्बो भरती

Income Tax Department Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही जर सरकारी नोकरीच्या (Income Tax Department Recruitment 2024) शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. आयकर विभागात नोकरी करण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे तब्बल 10 ते 12 हजार पदे या भरती प्रक्रियेतून भरली जाणार आहेत. ही भरती प्रक्रिया लवकरच सुरु होईल; अशी माहिती आहे. या भरती प्रक्रियेची अधिसूचना पुढील काही दिवसांमध्ये प्रसिद्ध केली जाऊ शकते; अशी माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष नितीन गुप्ता यांनी दिली आहे.

या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. लवकरच या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर मिळेल. या भरती प्रक्रियेतून तब्बल 10 ते 12 हजार पदे भरली जाणार आहेत; त्यामुळे आयकर विभागाकडून राबवण्यात येणारी ही भरती प्रक्रिया बंपर भरती समजली जाते. त्यामुळे नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही एक मोठी पर्वणी म्हणावी लागेल.

करदात्यांना एक लाखापर्यंत दिलासा
नुकत्याच सादर केलेल्या केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रलंबित करदावे निकाली काढण्याची घोषणा केली. २००९-२०१० पर्यंतच्या काळातील २५ हजार रुपयांची बाकी आणि २०१०-११ ते २०१४-१५ या काळातील १० हजारांच्या बाकीसंबंधी सर्व नोटिसा मागे घेतल्या जाणार (Income Tax Department Recruitment 2024) आहेत. यामध्ये १९६२ पासून प्रलंबित असलेली १.११ कोटी प्रकरणे आहेत. या प्रकरणांतील एकूण रक्कम ३,५०० ते ३,६०० कोटींच्या घरात आहे. सरकारच्या या निर्णयामुळे ८० लाखांहून अधिक करदात्यांना लाभ होणार आहे. याबाबत गुप्ता यांनी सांगितले की, २५ हजारांपर्यंतची थकबाकी मागे घेण्याची घोषणा केल्याने करदात्यांना एक लाखापर्यंत दिलासा मिळू शकतो.

निवडणूक काळात रोकड जप्तीच्या प्रमाणात वाढ होते (Income Tax Department Recruitment 2024)
नितीन गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार निवडणुकीदरम्यान रोकड जप्तीचे प्रमाण वाढले आहे. गेल्या वर्षी झालेल्या मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोराम या राज्यांच्या निवडणुकांमध्ये १,७६० कोटी रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले, जे मागील निवडणुकीपेक्षा ७ पट जास्त होते. २०१७ च्या तुलनेत २०२२ मध्ये निवडणुकीदरम्यान जप्तीचे प्रमाण ६ पटीने वाढल्याचे आयकर विभागाने म्हटले आहे.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Job : ग्रॅज्युएट्ससाठी मोठी संधी!! उच्च विस्फोटक निर्माणी खडकी अंतर्गत ‘या’ पदावर भरती सुरु

Government Job (48)

करिअरनामा ऑनलाईन । उच्च विस्फोटक निर्मणी खडकी, पुणे येथे विविध (Government Job) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शिकाऊ उमेदवार पदांच्या एकूण 46 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2024 आहे.

संस्था – उच्च विस्फोटक निर्मणी खडकी, पुणे
भरले जाणारे पद – शिकाऊ उमेदवार (पदवीधर)
पद संख्या – 46 पदे (Government Job)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 फेब्रुवारी 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक, उच्च स्फोटक कारखाना, खडकी, पुणे – ४११००३ (महाराष्ट्र)

आवश्यक शैक्षणिक पात्रता – अभियांत्रिकी/तंत्रज्ञानातील पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी
मिळणारे वेतन – (Government Job)
शिकाऊ उमेदवार (पदवीधर) -9000/- रुपये दरमहा
शिकाऊ उमेदवार (तंत्रज्ञ) -8000/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – खडकी, पुणे

काही महत्वाच्या लिंक्स –
 अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट –
munitionsindia.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career Success Story : UPSC क्रॅक करण्यासाठी बड्या पगाराची परदेशातील नोकरी सोडली; आधी IPS अन् नंतर झाला IAS

Career Success Story of IAS Abhishek Surana

करिअरनामा ऑनलाईन । IIT दिल्लीतून शिक्षण पूर्ण करताच (Career Success Story) अभिषेक यांना थेट परदेशात नोकरी मिळाली. सिंगापूरमधील बार्कलेज इन्व्हेस्टमेंट बँकेत त्यांनी बड्या पगारावर नोकरी केली आहे. त्यानंतर काही काळ लंडनमधील बँकेतही नोकरी केली. त्यानंतर त्यांनी आपला स्टार्टअप सुरू केला, ज्यासाठी ते दक्षिण अमेरिकेत राहत होते. तिथे काम करत असताना त्यांना आपल्या आयुष्यात काहीतरी कमतरता असल्याची जाणीव झाली आणि त्यांनी मायदेशी परत येण्याचं ठरवलं. त्यांनी अमेरिका सोडली आणि ते 2014 मध्ये मायदेशी परतले. इथूनपुढे सुरु झाली स्वप्न पूर्ण करण्याची धडपड… आम्ही बोलत आहोत अभिषेक सुराणा यांच्याबद्दल….

सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा
ही एका सामान्य कुटुंबातील मुलाची कथा आहे. 12वी नंतर जेईई (JEE) परीक्षा उत्तीर्ण होऊन अभिषेक यांनी आयआयटी (IIT) दिल्लीत प्रवेश मिळवला. या गुणवत्तेवर त्यांना सिंगापूर आणि लंडनमध्ये मोठ्या पॅकेजच्या नोकऱ्या मिळाल्या. पण तेथे त्यांचे मन रमले नाही. त्यांना समाजाची सेवा करायची होती यासाठी त्यांनी भारताच्या नागरी सेवेत सामील होण्याचा निर्णय घेतला आणि संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा फॉर्म भरला.

वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवली (Career Success Story)
अभिषेक सुराणा हे राजस्थानमधील भिलवाडा येथील रहिवासी आहेत. त्यांनी लहानपणापासून आपल्या वडिलांना खूप कष्ट करताना पाहिले आहे त्यामुळे त्यांनी कधीच अभ्यासाकडे दुर्लक्ष केले नाही. अभ्यासासोबतच ते इतर उपक्रमांमध्येही खूप सक्रिय होते. अशा गुणी मुलाची शाळेत असताना हेड बॉय या पदावर निवड झाली होती. 12वी बोर्डाच्या परिक्षेत चांगले मार्क मिळवल्यानंतर त्यांनी JEE परीक्षा दिली. त्यानंतर त्यांनी आयआयटी दिल्लीतील इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग शाखेत प्रवेश घेतला आणि बी.टेकची पदवी मिळवली.

‘…म्हणून भारतात परत येण्याचं ठरवलं’
लाखो कोटींचे पॅकेज असूनसुध्दा अनेकजण परदेशातील नोकऱ्या सोडून भारतात परततात; हे आपल्या मायभुमितील सरकारी नोकरीविषयी असणारे आकर्षण म्हणावं लागेल. अभिषेक यांच्याबाबतही असंच काहीसं घडलं. दक्षिण अमेरिकेत राहून नोकरी करत असताना त्यांना आपल्या आयुष्यात काहीतरी कमी असल्याची जाणीव झाली आणि त्यांनी भारतात परत येण्याचं ठरवलं. नागरी सेवेत सामील होण्यासाठी त्यांनी UPSC परीक्षा दिली. या प्रवासात त्यांना अपयश आलं खरं पण त्यांनी हार मानली नाही. जिद्दीच्या जोरावर त्यांची आपल्या ध्येयाकडे वाटचाल सुरु होती.

UPSC परिक्षेत टॉपर ठरले आणि बनले IAS
यूपीएससी परीक्षेत दोन वेळा अपयशी ठरल्यानंतरही अभिषेक यांनी हार मानली नाही. त्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात ते 250 वी रँक मिळवून आयपीएस (IPS) अधिकारी बनले. पण त्यांचे (Career Success Story) ध्येय स्पष्ट होते. त्यांना आयएएस (IAS) अधिकारीच व्हायचे होते. त्यामुळे पोलीस प्रशिक्षणासोबतच त्यांनी यूपीएससीची चौथ्या वेळेस परीक्षा दिली. 2018 मध्ये झालेल्या परिक्षेत त्यांनी संपूर्ण भारतातून 10 वी रॅंक मिळवली आणि ते या परिक्षेत टॉपर ठरले. या रॅंकमुळे ते IAS अधिकारी बनले आणि त्यांचे नागरी सेवेत सामील होण्याचे स्वप्न पूर्ण झाले.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Indian Coast Guard Recruitment 2024 : 12 वी पास उमेदवारांसाठी खुषखबर!! भारतीय तटरक्षक दलात 260 पदांवर भरती सुरु

Indian Coast Guard Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय तटरक्षक दलाने नवीन भरती (Indian Coast Guard Recruitment 2024) जाहीर केली आहे. या भरतीच्या माध्यमातून नाविक (जनरल ड्युटी-GD) पदाच्या एकूण 260 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 13 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 आहे.

संस्था – भारतीय तटरक्षक दल
भरले जाणारे पद – नाविक (जनरल ड्युटी-GD)
पद संख्या – 260 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 13 फेब्रुवारी 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 फेब्रुवारी 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता – 12वी उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र)

वय मर्यादा – (Indian Coast Guard Recruitment 2024)
1. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म 01 सप्टेंबर 2002 ते 30 ऑगस्ट 2006 च्या दरम्यान झालेला असावा
2. SC/ST – 05 वर्षे सूट
3. OBC – 03 वर्षे सूट
परीक्षा फी –
जनरल/ओबीसी/- रु. 300/-
SC/ST – फी नाही

आवश्यक शारीरिक पात्रता –
उंची –
किमान 157 से.मी.
छाती – फुगवून 5 से.मी. जास्त.
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

काही महत्वाच्या लिंक्स – (Indian Coast Guard Recruitment 2024)
 अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.indiancoastguard.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Police Bharti 2024 : कधी सुरु होणार पोलिस भरती? जाणून घ्या भरती प्रक्रियेविषयी….

Police Bharti 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात तब्बल 17 हजार 441 जागांसाठी (Police Bharti 2024) पोलीस भरती होणार आहे. वित्त विभागाने ही रिक्त पदे भरण्यास मंजुरी दिली आहे. पोलीस शिपाई पदासाठी ही भरती होत आहे. गेल्या वर्षी पोलीस भरती न झाल्याने तरुण उमेदवार चिंतेत होते. मात्र यंदा 17 हजार 441 जागांसाठी भरती प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. ही पोलीस भरती कधी होणार? फॉर्म कुठे आणि कसा भरायचा? या भरतीसाठी तयारी कशी करायची? याबाबत आम्ही इथे माहिती देत आहोत.

पोलीस भरती कधी होणार? (Police Bharti 2024)
जेव्हा पोलीस किंवा अन्य कोणत्याही खात्यातील पदाधिकारी निवृत्त होतात तेव्हा त्या ठिकाणी नवीन लोकांची नियुक्ती केली जाते. पण ही भरती दरवर्षी केलीच जाईल, असं नाही. पण सद्यपरिस्थितीत पोलीस भरती रखडलेलीच पाहायला मिळत आहे. मात्र यंदा राज्य सरकारने 17 हजार 441 जागांच्या भरतीसाठी मान्यता दिली आहे. पण या परीक्षेचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालं नाही. जेव्हा वेळापत्रक येईल तेव्हा ही भरती प्रक्रिया सुरु होईल. भरती प्रक्रियेत आधी लेखी परीक्षा आणि नंत मैदानी परीक्षा होते.

भरती प्रक्रियेविषयी….
भरतीसाठी अर्ज करताना तुम्हाला काही अटींची पूर्तता करावी लागते. उमेदवारांना शैक्षणिक गुणपत्रिका, रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र, ओळख पुरावा, ना हरकत प्रमाणपत्र, छायाचित्र अशी कागदपत्रे सादर करावी लागतात. पेपरमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर काही कालावधी आखून दिला जातो या कालावधीतच अर्ज भरावा लागतो. त्यानंतर पुढील भरती प्रक्रिया सुरु होते.
सरकारकडून भरतीची घोषणा झाली की, पोलीस भरतीच्या प्रक्रियेला सरुवात होते. याबाबत वृत्तपत्रांमध्ये जाहीरात प्रसिद्ध केली जते. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा (Police Bharti 2024) लागतो. अर्जाची छानणी झाल्यानंतर आधी शारीरिक चाचणी होते आणि त्यानंतर लेखी परीक्षा घेतली जाते. यामध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध होते. त्यानंतर पात्र उमेदवारांना महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण केंद्रावर प्रशिक्षण दिलं जातं आणि नंतर पात्र उमेदवारांची राज्याच्या पोलिस दलात पोलिस पदावर नियुक्ती होते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Railway Recruitment 2024 : मोठी बातमी!! रेल्वे भरती परीक्षेचे वार्षिक कॅलेंडर जाहीर

Railway Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । मुंबई-रेल्वे भर्ती मंडळाने या वर्षीच्या रेल्वे भरती (Railway Recruitment 2024) परीक्षांचे वार्षिक कॅलेंडर प्रसिद्ध केले आहे. रेल्वेने एसएससी (SSC) आणि यूपीएससी (UPSC) प्रमाणे वार्षिक भरती कॅलेंडर जाहीर करावे; अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वेकडे होत होती. त्यानुसार रेल्वेने हे कॅलेंडर प्रसिद्ध केले आहे. यामध्ये वर्षभरात घेण्यात येणाऱ्या रेल्वेच्या परीक्षांची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
त्यांच्या घोषणेमुळे रेल्वे भरती प्रक्रियेला गती मिळेल आणि विहित प्रवर्गासाठी विहित मुदतीत परीक्षा घेता येईल; जेणेकरून रेल्वे भरती परीक्षेत सहभागी होवू इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांना पूर्व नियोजनासाठी आणि परीक्षेच्या अभ्यास करण्यासाठी वेळ मिळणार आहे.

कोणत्या महिन्यात कोणत्या परीक्षा होणार (Railway Recruitment 2024)
नव्या वार्षिक कॅलेंडरनुसार, टेक्निशियनची भरती एप्रिलमध्ये, एनटीपीसी भरती जूनमध्ये आणि लेव्हल-१ भरती ऑक्टोबरमध्ये होणार आहे. एप्रिलमध्ये निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते म्हणून यंदा तंत्रज्ञांची भरती फेब्रुवारीमध्ये केली असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.
असिस्टंट लोको पायलटची भरती जानेवारी-मार्च दरम्यान घेतली जाणार आहे. एप्रिल ते जून या कालावधीत तंत्रज्ञ पदांसाठी भरती होणार आहे. यानंतर, जुलै-सप्टेंबरमध्ये, नॉन-टेक्निकल लोकप्रिय श्रेणी एनटीपीसी पदवी स्तर 4,5,6 साठी भरती होईल. या कालावधीत, रेल्वे कनिष्ठ अभियंता आणि पॅरामेडिकल श्रेणीसाठी देखील भरती केली जाईल. तसेच रेल्वे श्रेणी -१(ग्रुप डी भरती) आणि मंत्री आणि पृथक श्रेणीची भरती ऑक्टोबर-डिसेंबर महिन्यात होणार आहे.

वार्षिक कॅलेंडरमुळे उमेदवारांना होणारे फायदे
1. जर उमेदवार पहिल्या संधीत भरतीस पात्र ठरला नाही तर भविष्यात त्याच्यासाठी अधिक संधी असणार
2. प्रत्येक वर्षी पात्र ठरलेल्या (Railway Recruitment 2024) उमेदवारांना समान संधी असतील.
3. निवड प्रक्रिया, प्रशिक्षण आणि नियुक्त्या जलद केल्या जातील.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Central Bank of India Recruitment 2024 : 7 वी पास ते पदवीधारकांसाठी सेंट्रल बँकेत नोकरी; पटापट करा अर्ज

Central Bank of India Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत (Central Bank of India Recruitment 2024) प्राध्यापक, वॉचमन/माळी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2024 आहे.

बँक – सेंट्रल बँक ऑफ इंडिया
भरले जाणारे पद – प्राध्यापक, वॉचमन/माळी
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 फेब्रुवारी 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रादेशिक व्यवस्थापक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, क्षेत्रीय कार्यालय, प्लॉट क्रमांक 08, आदर्श नगर, उपनगर जवळ. आरटीओ कार्यालय, जळगाव-425001
नोकरीचे ठिकाण – जळगाव (Central Bank of India Recruitment 2024)
वय मर्यादा – 22 ते 40 वर्षे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Central Bank of India Recruitment 2024)

पदशैक्षणिक पात्रता
प्राध्यापकGraduate / Post Graduate viz. MSW/MA in rural Development/ MA in Sociology/Psychology/Bsc.(Veterinary), B.Sc.(Agri), B.Sc.(Agri. Marketing)/B.A. with B.Ed. etc.
वॉचमन/माळीPassed 7th Standard


मिळणारे वेतन –

पदवेतन
प्राध्यापकRs. 20,000/-
वॉचमन/माळीRs. 6,000/-

काही महत्वाच्या लिंक्स – (Central Bank of India Recruitment 2024)
 अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
PDF 1
PDF 2
अधिकृत वेबसाईट –
https://www.centralbankofindia.co.in/en
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Update : भूकंपाच्या वेळी कोणता वायू बाहेर पडतो?सरकारी भरती परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न पहाच…

GK Update 4 Feb.


करिअरनामा ऑनलाईन ।
अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

1. कोणत्या देशात फक्त 40 मिनिटे रात्र असते?
2. कोणत्या जीवनसत्त्वाच्या (GK Update) कमतरतेमुळे त्वचा कोरडी पडते?
3. मुलीचे नाव आणि शृंगार हे दोन्ही काय आहे?
4. कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे त्वचेवर दाद होतात?

5. शरीराच्या कोणत्या भागात रक्त नाही?
6. जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे?
7. जगातील सर्वात लहान महिला कोणत्या देशात आहे?
8. कोणत्या देशाला सापांचा देश म्हणतात?

9. भारतात किती राज्ये आहेत?
10. भूकंपाच्या वेळी कोणता वायू बाहेर पडतो?
11. टीव्हीचा शोध कोणी लावला?

वरील प्रश्नांची उत्तरे अनुक्रमे (GK Update) –

  1. नॉर्वे
  2. विटामिन-D
  3. पायल
  4. विटामिन-डी
  5. कॉर्निया
  6. नील नदी, लांबी 6650 किलोमीटर
  7. भारत (GK Update)
  8. ब्राजील
  9. 28
  10. रेडॉन
  11. जे एल बेयर्ड

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Punjab National Bank Recruitment 2024 : पंजाब नॅशनल बँकेत ऑफिसरसह मॅनेजर पदावर नोकरीची संधी; तब्बल 1025 जागा भरणार

Punjab National Bank Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी (Punjab National Bank Recruitment 2024) महत्वाची अपडेट हाती आली आहे. या भरतीच्या माध्यमातून तुम्हाला बँकेत नोकरी करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. पंजाब नॅशनल बँकेत विविध पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 07 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2024 आहे.

बँक – पंजाब नॅशनल बँक
पद संख्या – 1025 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 फेब्रुवारी 2024
परीक्षा (Online) – मार्च/एप्रिल 2024

भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1) ऑफिसर-क्रेडिट JMGS I – 1000 पदे (Punjab National Bank Recruitment 2024)
शैक्षणिक पात्रता – CA/CMA (ICWA) किंवा CFA किंवा MBA किंवा मॅनेजमेंट मध्ये PG डिप्लोमा किंवा समतुल्य शिक्षण.
2) मॅनेजर-फॉरेक्स MMGS II – 15 पदे
शैक्षणिक पात्रता : MBA किंवा मॅनेजमेंट मध्ये PG डिप्लोमा किंवा समतुल्य शिक्षण
3) मॅनेजर-सायबर सिक्योरिटी MMGS II – 05 पदे
60% गुणांसह B.E./B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन) किंवा MCA
4) सिनियर मॅनेजर-सायबर सिक्योरिटी MMGS III – 05 पदे
60% गुणांसह B.E./B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन) किंवा MCA

वय मर्यादा – (Punjab National Bank Recruitment 2024)
01 जानेवारी 2024 रोजी, 28 ते 38 वर्षे
SC/ST: 05 वर्षे सूट (Punjab National Bank Recruitment 2024)
OBC: 03 वर्षे सूट
परीक्षा फी – जनरल/ओबीसी/ ₹1180/- [SC/ST/PWD: ₹59/-]
मिळणारे वेतन –
1. ऑफिसर-क्रेडिट JMGS I – 36,000/- ते 63,840/- रुपये दरमहा
2. मॅनेजर-फॉरेक्स MMGS II – 48,170/- ते 69,810/- रुपये दरमहा
3. मॅनेजर-सायबर सिक्योरिटी MMGS II – 48,170/- ते 69,810/- रुपये दरमहा
4. सिनियर मॅनेजर-सायबर सिक्योरिटी – 63,840/- ते 78,230 रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.pnbindia.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ICMR Recruitment 2024 : ICMR अंतर्गत मुंबई येथे विविध पदांवर भरती सुरु; ग्रॅज्युएट करु शकतात अर्ज

ICMR Recruitment 2024 (1)

करिअरनामा ऑनलाईन । आईसीएमआर–राष्ट्रीय प्रजनन एवं (ICMR Recruitment 2024) बाल स्वास्थ्य अनुसंधान संस्थान, मुंबई अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रकल्प वैज्ञानिक-I, वैज्ञानिक प्रशासकीय सहाय्यक पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे.

संस्था – आईसीएमआर–राष्ट्रीय प्रजनन एवं बाल स्वास्थ्य अनुसंधान संस्थान, मुंबई
भरले जाणारे पद – प्रकल्प वैज्ञानिक-I, वैज्ञानिक प्रशासकीय सहाय्यक
पद संख्या – 02 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 फेब्रुवारी 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – (ICMR Recruitment 2024)
1. प्रकल्प वैज्ञानिक-I – 35 वर्षे
2. वैज्ञानिक प्रशासकीय सहाय्यक – 28 वर्षे

भरतीचा तपशील –

पदपद संख्या 
प्रकल्प वैज्ञानिक-I01
वैज्ञानिक प्रशासकीय सहाय्यक01

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. प्रकल्प वैज्ञानिक-I– Doctoral Degree in Science or Master’s degree in Engineering or Technology from a recognized University or equivalent in subjects related to Life Sciences / Biotechnology /Microbiology / Bioinformatics /Biochemistry/ Biological Sciences/
Computer Science / Information Technology / Data Science / Artificial Intelligence / Machine Learning / Deep Learning (ICMR Recruitment 2024)
2. वैज्ञानिक प्रशासकीय सहाय्यक – Graduate degree in subjects related to Life Science OR Data Analysis

मिळणारे वेतन –

पदवेतन (दरमहा)
प्रकल्प वैज्ञानिक-IRs.56,000/- + 24% HRA
वैज्ञानिक प्रशासकीय सहाय्यकRs.18000/- + 24% HRA

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी PDF नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज करण्याची शेवटची (ICMR Recruitment 2024) तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे.
4. मुदती नंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://nirrch.res.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com