Home Blog Page 155

DIAT Recruitment 2024 : 42 हजार पगाराच्या नोकरीसाठी आजच अर्ज करा; जाणून घ्या पद, पात्रता, अर्ज प्रक्रिया

DIAT Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी, पुणे येथे (DIAT Recruitment 2024) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध पदांच्या एकूण 7 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2024 आहे.

संस्था – डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी, पुणे
पद संख्या – 07 पदे
भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1.
ज्युनियर रिसर्च फेलो – 03 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – बी.ई./बी. टेक सह प्रथम श्रेणी सह NET/GATE किंवा प्रथम श्रेणीत एम.ई./एम. टेक.
2. सीनियर रिसर्च फेलो – 03 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – बी.ई./बी. टेक सह प्रथम श्रेणी सह NET/GATE किंवा प्रथम श्रेणीत एम.ई./एम. टेक.
3. प्रकल्प सहाय्यक – 01 पद (DIAT Recruitment 2024)
आवश्यक शैक्षणिक पात्रता – बी.एस्सी /एम.एस्सी /डिप्लोमा (इलेक्ट्रॉनिक्स) (किंवा) बी.ए./एम.ए. (इंग्रजी) ,इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीचे मूलभूत ज्ञान, इंग्रजीमध्ये चांगले लेखन आणि बोलण्याचे कौशल्य.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-Mail)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 फेब्रुवारी 2024
अर्ज करण्यसाठी E-Mail ID – [email protected]
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे (महाराष्ट्र)

वय मर्यादा – (DIAT Recruitment 2024)
1. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 फेब्रुवारी 2024 रोजी, 28 ते 30 वर्षापर्यंत
2. SC/ST – 05 वर्षे सूट
3. OBC – 03 वर्षे सूट
मिळणारे वेतन –
1. ज्युनियर रिसर्च फेलो – 37,000/- ते 42,000/- रुपये दरमहा
2. सीनियर रिसर्च फेलो – 42,000/- रुपये दरमहा
3. प्रकल्प सहाय्यक – 20,000/- रुपये दरमहा

काही महत्वाच्या लिंक्स –
 अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.diat.ac.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Success Story : अवघ्या 22 व्या वर्षी क्रॅक केली UPSC; अशी होती अभ्यासाची स्ट्रॅटेजी

UPSC Success Story of IAS Chandrajyoti Singh

करिअरनामा ऑनलाईन । तरुण महिला अधिकारी चंद्रज्योती सिंह यांनी अवघ्या 22 व्या वर्षी IAS अधिकारी होवून कमी वयात मोठी कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे केवळ सेल्फ स्टडीच्या जोरावर त्यांनी देशातील ही कठीण परीक्षा पास केली आहे. 2019 मध्ये झालेल्या UPSC परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात त्यांनी 28 वी रॅंक मिळवून हे यश मिळवलं आहे. अभ्यासातील योग्य रणनितीमुळे हे यश मिळवता आलं असल्याचं चंद्रज्योती यांचं म्हणणं आहे. त्यांच्या आई-वडिलांनी आर्मीमध्ये सेवा बजावली आहे त्यामुळे देशसेवेचं बाळकडू त्यांना घरातूनच मिळालं. म्हणूनच चंद्रज्योती (IAS Chandrajyoti Singh) यांनी शालेय जिवनापासूनच सरकारी सेवेत सामील होण्याचं ठरवलं . आज आपण त्यांच्या IAS होण्याच्या प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत.

अवघ्या 22 व्या वर्षी पास केली परीक्षा
सर्वांनाच माहीत आहे की, UPSC कडून घेतली जाणारी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी इच्छुक उमेदवार रात्रंदिवस मेहनत करत असतात. मात्र यामध्ये लवकर यश मिळवणे हे प्रत्येकाच्या आवाक्यात नसते. काही लोकांना वर्षानुवर्षे अनेक प्रयत्न करून मार्ग बदलावा लागतो, तर काही लोक या सर्व गोष्टींच्या पलीकडे जाऊन पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होतात. IAS अधिकारी चंद्रज्योती सिंह यापैकीच एक आहेत. त्यांनी वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी ही परीक्षा पास केली आहे.

कोचिंग क्लास न लावता केला सेल्फ स्टडी
चंद्रज्योती यांचे वडील दलबारा सिंग हे निवृत्त आर्मी रेडिओलॉजिस्ट आहेत आणि त्यांची आई मीना सिंग यांनी देखील सैन्यात सेवा केली आहे. पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर चंद्रज्योती (IAS Chandrajyoti Singh) यांनी एक वर्षाचा ब्रेक घेतला आणि यूपीएससी (UPSC) सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची तयारी सुरू केली. यासाठी कोणतेही प्रशिक्षण न घेता त्यांनी फक्त स्वतःवर विश्वास ठेवला आणि सेल्फ स्टडीच्या जोरावर त्या फक्त पास झाल्या नाहीत; तर त्यांनी संपूर्ण देशात 28 वा क्रमांक मिळवून आश्चर्यकारक कामगिरी केली आहे.

दररोज 10 तासापेक्षा जास्त अभ्यास
चंद्रज्योती सुरवातीला दररोज 6 ते 8 तास परीक्षेच्या (UPSC Success Story) तयारीसाठी देत ​​असे. परीक्षेची वेळ जसजशी जवळ आली, तसतसे त्यांनी 10 तास किंवा त्याहून अधिक तास अभ्यासासाठी दिले. यासोबतच चंद्रज्योती दररोज न चुकता वर्तमानपत्र वाचायच्या. यामुळे त्यांची चालू घडामोडींची तयारी उत्तम झाली. वर्तमानपत्र वाचण्याच्या या सवयीमुळे त्यांना परीक्षा पास करणे खूप सोपे झाले.

काय आहे यशाचा मंत्र (UPSC Success Story)
UPSC इच्छुकांना सल्ला देताना IAS चंद्रज्योती सिंह म्हणतात की कोणत्याही परीक्षेत यश मिळवण्यासाठी योग्य रणनीती बनवणे आणि त्यानुसार तयारी करणे महत्त्वाचे आहे. त्यांनी आखलेल्या रणनीतीनुसार उमेदवारांनी तयारी केली, तर यश नक्कीचमिळेल, असे त्यांचे म्हणणे आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

10th and 12th Board Exam 2024 : 10वी, 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट, शिक्षण मंडळाने घेतला मोठा निर्णय

10th and 12th Board Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । दहावी-बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेत होणारे (10th and 12th Board Exam 2024) गैरप्रकार रोखण्यासाठी आता लेखी परीक्षेप्रमाणे प्रात्यक्षिक परीक्षांनाही शिक्षण मंडळाच्या भरारी पथकांकडून अचानक भेटी दिल्या जाणार आहेत. यावर्षीपासून ही मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती लातूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या 12 वीच्या परीक्षांना 21 फेब्रुवारीपासून 10 वी च्या परीक्षांना 1 मार्चपासून सुरुवात होत आहे. लवकरच दहावीचीही प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होईल. लेखी परीक्षेप्रमाणे या परीक्षांनाही भरारी पथकांकडून अचानक भेटी देण्यात येणार आहेत.

7 भरारी पथकांची स्थापना
परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी मंडळाने 7 भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा दक्षता समितीकडूनही त्या त्या जिल्ह्यात बैठ्या व भरारी पथकांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. या स्थितीत यंदा प्रात्यक्षिक परीक्षेवरही कडक नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. भरारी पथकांना या परीक्षांनाही भेटी देण्याचे आदेश दिल्याचे तेलंग यांनी सांगितले.

10 मिनिटांचा वेळ वाढवला (10th and 12th Board Exam 2024)
कोरोना काळानंतरही विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव अद्यापही कमी असल्याने राज्य मंडळाने यावर्षी दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी अतिरिक्त दहा मिनिटे वेळ वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे.

गैरप्रकार आढळल्यास महाविद्यालयावर कारवाई
दहावी, बारावी प्रात्यक्षिक परीक्षा फेब्रुवारी महिन्यापासून सुरू होत आहेत. विज्ञानाचे प्रयोग न घेता अनेक ठिकाणी तुकड्या बंद पडू नयेत, यासाठी दाखले गोळा करून कॅटलॉगवर विद्यार्थीसंख्या दाखविली जाते, अशा तक्रारी आहेत. प्रात्यक्षिक परीक्षेत गैरप्रकार आढळल्यास राज्य मंडळाकडून महाविद्यालयास जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे; मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

10 वी परीक्षेसाठी 408 परीक्षा केंद्रे
दहावी परीक्षेसाठी ४०८ परीक्षा केंद्रे असून यावर्षी त्यात नव्या १३ केंद्रांची भर पडली आहे. यात लातूर जिल्ह्यात १५१, धाराशिव – ८९ तर नांदेड जिल्ह्यात १६८ केंद्रे असतील. दहावी (10th and 12th Board Exam 2024) परीक्षेसाठी तीन जिल्ह्यांतील मिळून एक लाख सात हजार ५२३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. विद्यार्थ्यांची जवळच्या केंद्रावर सोय करण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Agniveer Recruitment 2024 : 12वी पास तरुणांसाठी हवाई दलात भरती होण्याची मोठी संधी!!

Agniveer Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय संरक्षण दल अंतर्गत अग्निवीर वायु (Agniveer Recruitment 2024) पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 फेब्रुवारी 2024 आहे.

संस्था – भारतीय संरक्षण दल
भरले जाणारे पद – अग्निवीर वायु
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 फेब्रुवारी 2024
वय मर्यादा – 21 वर्षे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Agniveer Recruitment 2024)

नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
अग्निवीर वायुCandidates should have passed Intermediate/10+2/ Equivalent examination with Mathematics, Physics and English from Education Boards recognized by Central, State and UT with minimum 50% marks in aggregate and 50% marks in EnglishPassed Three years Diploma Course in Engineering (Mechanical / Electrical / Electronics / Automobile / Computer Science
Instrumentation Technology / Information Technology) from Central, State and UT recognized Polytechnic institute with 50% marks in aggregate and 50% marks in English in Diploma Course (or in Intermediate/Matriculation, if English is not a subject in Diploma Course)Passed Two years Vocational Course with non-vocational subject viz. Physics and Mathematics from Education Boards recognized by Central, State and UT with 50% marks in aggregate and 50% marks in English in Vocational Course (or in Intermediate / Matriculation, if English is not a subject in Vocational Course)

मिळणारे वेतन – Rs. 30000/- दरमहा
काही महत्वाच्या लिंक्स – (Agniveer Recruitment 2024)
अधिकृत वेबसाईट – https://indianairforce.nic.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Police Prashikshan Kendra Recruitment 2024 : कायदा पदवीधारकांसाठी पोलीस प्रशिक्षण केंद्र अंतर्गत भरती सुरु

Police Prashikshan Kendra Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । पोलीस प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र अंतर्गत (Police Prashikshan Kendra Recruitment 2024) विधी निदेशक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 27 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2024 आहे.

संस्था – पोलीस प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र
भरले जाणारे पद – विधी निदेशक
पद संख्या – 27 पदे (Police Prashikshan Kendra Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 फेब्रुवारी 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय, जुने विधानभवन, शहीद भगतसिंग मार्ग, कुलाबा, मुंबई ४००००१

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापिठाची कायद्याची पदवी असावी. उमेदवार सनदधारक असावा.
मिळणारे वेतन – रु.२३,०००/- दरमहा
असा करा अर्ज – (Police Prashikshan Kendra Recruitment 2024)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवायचा आहे.
3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
 अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.mahapolice.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

AIIMS Recruitment 2024 : महिन्याला 2 लाखाच्यावर पगार; इथे होतेय प्राध्यापकांची भरती

AIIMS Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपूर (AIIMS Recruitment 2024) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राध्यापकांच्या विविध 49 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2024 आहे. तसेच अर्ज दिलेल्या पत्त्यावर सादर करण्याची शेवटची तारीख 06 मार्च 2024 आहे.

संस्था – अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपूर
भरली जाणारी पदे –
1. प्राध्यापक – 11 पदे (AIIMS Recruitment 2024)
2. अतिरिक्त प्राध्यापक – 09 पदे
3. सहयोगी प्राध्यापक – 15 पदे
4. सहायक प्राध्यापक -14 पदे
पद संख्या – 49 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन/ ऑफलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 फेब्रुवारी 2024
अर्जाची प्रत पाठविण्याची शेवटची तारीख – 06 मार्च 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी संचालक, एम्स नागपूर, प्रशासकीय ब्लॉक, भूखंड क्रमांक 2, सेक्टर-20, मिहान, नागपूर – 441108

वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 50 ते 58 वर्षे
परीक्षा फी – (AIIMS Recruitment 2024)
जनरल/ओबीसी/EWS – रु. 2,000/-
एससी/एसटी – रु. 500/-
मिळणारे वेतन –
1. प्राध्यापक -1,68,900/- ते 2,20,400/- रुपये दरमहा
2. अतिरिक्त प्राध्यापक -1,48,200/- ते 2,11,400/- रुपये दरमहा
3. सहयोगी प्राध्यापक -1,38,300/- ते 2,09,200/- रुपये दरमहा
4. सहायक प्राध्यापक- 1,01,500/- ते 1,67,400/- रुपये दरमहा

काही महत्वाच्या लिंक्स –
 अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – aiimsnagpur.edu.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CDAC Recruitment 2024 : CDAC अंतर्गत 325 पदांवर मेगाभरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!

CDAC Recruitment 2024 (1)

करिअरनामा ऑनलाईन । प्रगत संगणक विकास केंद्र (CDAC Recruitment 2024) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रोजेक्ट असोसिएट / ज्युनियर फील्ड ॲप्लिकेशन इंजिनीअर, प्रोजेक्ट इंजिनीअर (अनुभवी) / फील्ड ॲप्लिकेशन इंजिनीअर (अनुभवी) अशा विविध पदांच्या एकूण 325 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2024 आहे.

संस्था – प्रगत संगणक विकास केंद्र (CDAC)
भरले जाणारे पद – प्रोजेक्ट असोसिएट / ज्युनियर फील्ड ॲप्लिकेशन इंजिनीअर, प्रोजेक्ट इंजिनीअर (अनुभवी) / फील्ड ॲप्लिकेशन इंजिनीअर (अनुभवी), प्रोजेक्ट इंजिनीअर (फ्रेशर) / फील्ड ॲप्लिकेशन इंजिनिअर (फ्रेशर), प्रोजेक्ट मॅनेजर / प्रोग्राम मॅनेजर / प्रोग्राम डिलिव्हरी मॅनेजर / नॉलेज पार्टनर/प्रॉड. सेवा आणि आउटरीच (PS&O) व्यवस्थापक, प्रकल्प अधिकारी (ISEA), प्रकल्प अधिकारी (वित्त), प्रकल्प अधिकारी (आउटरीच आणि प्लेसमेंट), प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (आतिथ्य), प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (HRD), प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (लॉजिस्टिक्स आणि इन्व्हेंटरी) , प्रकल्प सहाय्य कर्मचारी (प्रशासक), प्रकल्प सहाय्य कर्मचारी (वित्त), प्रकल्प तंत्रज्ञ, वरिष्ठ प्रकल्प अभियंता/मॉड्युल लीड/प्रोजेक्ट लीड/प्रॉड. सेवा आणि पोहोच (PS&O) अधिकारी
पद संख्या – 325 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (CDAC Recruitment 2024)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 फेब्रुवारी 2024

काही महत्वाच्या तारखा –

ACommencement of on-line Registration of application by candidatesFeb 1, 2024, 0:00 hrs
BLast date for on-line registration of application by candidatesFeb 20, 2024, 18:00 hrs
CInterview dateWill be communicated by email only

भरतीचा तपशील –

पदपद संख्या 
प्रोजेक्ट असोसिएट / ज्युनियर फील्ड ॲप्लिकेशन इंजिनीअर45
प्रोजेक्ट इंजिनीअर (अनुभवी) / फील्ड ॲप्लिकेशन इंजिनीअर (अनुभवी)75
प्रोजेक्ट इंजिनीअर (फ्रेशर) / फील्ड ॲप्लिकेशन इंजिनिअर (फ्रेशर)75
प्रोजेक्ट मॅनेजर / प्रोग्राम मॅनेजर / प्रोग्राम डिलिव्हरी मॅनेजर / नॉलेज पार्टनर/प्रॉड. सेवा आणि आउटरीच (PS&O) व्यवस्थापक15
प्रकल्प अधिकारी (ISEA)03
प्रकल्प अधिकारी (वित्त)01
प्रकल्प अधिकारी (आउटरीच आणि प्लेसमेंट)01
प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (आतिथ्य)01
प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (HRD)01
प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (लॉजिस्टिक्स आणि इन्व्हेंटरी)01
प्रकल्प सहाय्य कर्मचारी (प्रशासक)02
प्रकल्प सहाय्य कर्मचारी (वित्त)04
प्रकल्प तंत्रज्ञ01
वरिष्ठ प्रकल्प अभियंता/मॉड्युल लीड/प्रोजेक्ट लीड/प्रॉड. सेवा आणि पोहोच (PS&O) अधिकारी100

असा करा अर्ज – (CDAC Recruitment 2024)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. परीक्षा फी भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
 अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://cdac.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Business Success Story : मोलकरणीकडून मिळाली आयडिया अन् उभी राहिली 2 हजार कोटींची कंपनी

Business Success Story of Arjun Ahluwalia

करिअरनामा ऑनलाईन । अर्जुन अहलुवालिया न्यूयॉर्कमधील एका (Business Success Story) आघाडीच्या प्रायव्हेट इक्विटी फर्ममध्ये काम करत होता. त्याला चांगला पगारही मिळत होता. ऑफिसमध्ये तो चांगल्या पोझिशनवर काम करत होता. असे असतानाही अर्जुनने नोकरी सोडण्याचा धाडसी निर्णय घेतला. सहा वर्षांपूर्वी तो भारतात परतला आणि त्याने महाराष्ट्रातील एका गावात सुमारे सहा महिने वास्तव्य केले. या काळात त्याने शेतकऱ्यांच्या गरजांचा बारकाईने अभ्यास केला. हा प्रवास एकट्याने सुरू करण्याऐवजी अर्जुनने त्याच्या एका कॉलेजमधील मित्रालाही सोबत घेतले आणि भारतीय बाजारपेठेत व्यवसाय सुरू करण्याच्या आणि शेतकऱ्यांची मदत करण्याच्या त्याच्या प्रवासाला सुरुवात झाली.

मोलकरणीकडून मिळाली बिझनेस आयडिया
अपयश हीच यशाची पहिली पायरी समजली जाते. यशाचा प्रवास खडतर मार्गावरून सुरु होतो. अर्जुन अहलुवालिया या तरुणाचा प्रवासही असाच आहे. तो सध्या 2,000 कोटी रुपयांच्या स्टार्टअप कंपनीचा संस्थापक आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की घरी काम करण्यासाठी आलेल्या मोलकरणीकडून त्याला हा बिझनेस सुरु करण्याची कल्पना मिळाली. ही मोलकरीण मुंबईतील धारावी येथे राहत होती. धारावी जगातील (Business Success Story) सर्वात मोठ्या झोपडपट्ट्यांपैकी एक आहे. जेव्हा त्याला कळले की त्याच्या मोलकरणीने एका खाजगी वित्तीय सेवा कंपनीकडून मोबाईल फोन घेण्यासाठी कर्ज घेतले आहे; तेव्हा या नव्या व्यवसायाची कल्पना अर्जुनच्या मनात आली. देशात अशा अनेक गरजू व्यक्ती आहेत ज्यांना छोट्या मोठ्या कारणासाठी कर्ज घ्यावं लागतं आणि ते फेडताना अनेकजण सावकारी पाशात अडकतात. म्हणून त्यानं ठरवलं की आशा गरजू लोकांसाठी योगदान द्यायचं.

शेतकऱ्यांना सावकारी पाशातून मुक्त करायचं होतं (Business Success Story)
तेव्हा अर्जुन अहलुवालिया 27 वर्षांचा होता. त्याने टेक्सास ए अँड एम विद्यापीठातून फायनान्सची पदवी घेतली होती; त्यामुळे त्याच्याकडे अर्थशास्त्राचे उत्तम ज्ञान आहे. त्याने यापूर्वी न्यूयॉर्कमधील अबराज ग्रुपसाठीही काम केले होते. आयुष्याबाबत वेगळा दृष्टिकोन समोर ठेवून तो भारतात परत आला. त्याचा मुख्य हेतू असा होता, की भारतीय शेतकऱ्यांना सावकारांच्या फंदात न पडता कर्ज मिळू शकेल; यासाठी त्याला स्वतःच काहीतरी करायचं होतं. यासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये आठ महिन्यांच्या यशस्वी पायलट प्रकल्पानंतर त्याने ऍग्री फिनटेक फर्म ‘जय किसान’ सुरू केली. या फर्मच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना अगदी सहज अर्थसहाय्य मिळत आहे.

फर्मवर अनेकांनी दाखवला विश्वास
अर्जुनच्या कंपनीला A सिरीजमध्ये $30 दशलक्ष निधी आणि B सिरीजमध्ये अतिरिक्त $50 दशलक्ष (रु. 398 कोटी) एवढा निधी मिळाला आहे. त्याच्या फर्मचे मूल्यांकन $20-24 कोटी (सुमारे 2,000 कोटी रुपये) पर्यंत वाढले. Mirae Asset, Bloom Ventures आणि Arkam Ventures, Yara GMO Venture Partners आणि DG Daiwa Ventures यांसारख्या प्रमुख गुंतवणूकदारांसह, फंडिंग फेरीत सहभागी होऊन अर्जुनच्या उपक्रमावर विश्वास व्यक्त केलाआहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Shikshak Bharti 2024 : महाराष्ट्र सरकार 21,678 जागांवर शिक्षक भरती करणार; जाहिरात प्रसिध्द

Shikshak Bharti 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील हजारो उमेदवार प्रतीक्षेत (Shikshak Bharti 2024) असलेल्या शिक्षक भरतीची जाहिरात पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तब्बल २१ हजार ६७८ पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामध्ये सर्वाधिक पदे जिल्हा परिषद शाळांतील असून, खासगी अनुदानित, महापालिका, नगरपालिका, नगर परिषद शाळांचा देखील यामध्ये समावेश आहे. शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

सरकारी आणि खासगी शाळेत होणार नवीन भरती (Shikshak Bharti 2024)
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी अनुदानित शाळांतील इयत्ता 1ली ते 12वीच्या शिक्षक पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. एकूण रिक्त जागांच्या ८० टक्के जागांवर भरती प्रक्रिया करण्याचे नियोजित आहे. शिक्षक पदांसाठीची बिंदूनामावली जून ते नोव्हेंबर या कालावधीत तपासणी करण्यात आली. मात्र बिंदूनामावलीबाबत विधीमंडळात प्रश्न उपस्थित करण्यात आल्याने जिल्हा परिषदांच्या १० टक्के जागा राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांतील ७० टक्के पदांवर पदभरती केली जाणार आहे. त्या जागांबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेतला जाणार आहे. शासन निर्णय आणि शासनाचे विविध विषयांवरील धोरण याचे तंतोतंत पालन करून भरतीप्रक्रिया राबवली जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

अशी आहे गटनिहाय पद संख्या –
इयत्ता 1ली ते 5वी – 10,240 पदे
इयत्ता 6वी ते 8वी – 8,127 पदे
इयत्ता 9वी ते 10वी – 2,176 पदे
इयत्ता 11वी ते 12वी – 1,135 पदे

रिक्त पदांचा तपशील
पवित्र संकेतस्थळावर जाहिरातीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ३४ जिल्हा परिषदांतील १२ हजार ५२२ पदे, १८ महापालिकांतील २ हजार ९५१ पदे, नगरपालिकांतील ४७७, नगरपरिषदांतील (Shikshak Bharti 2024) १ हजार १२३, खासगी अनुदानित ५ हजार ७२८ जागांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यात मुलाखतीशिवाय १६ हजार ७९९ जागांवर, तर मुलाखतीसह ४ हजार ८७९ जागांवर भरती केली जाणार आहे.

भरती प्रक्रियेविषयी महत्वाचे.. (Shikshak Bharti 2024)
उमेदवारांना पसंतीक्रम नमूद करण्याची सुविधा दि. ८ फेब्रुवारीपासून उपलब्ध करून दिली जाणार आहे. उमेदवारांनी पदनिहाय पसंतीक्रम नमूद करून ९ फेब्रुवारीपर्यंत निश्चित करणे आवश्यक आहे. पद भरतीसाठी उमेदवारांची प्राधान्यक्रमाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. याबाबत वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध केले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Big News : महाराष्ट्रातील ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वयात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

Big News (3)

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या (Big News) बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या सेवेत असणाऱ्या काही कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयामध्ये (Retirement Age) वाढ करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसे पाहायला गेले तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे आहे. त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या देखील सेवानिवृत्तीच्या वयात वाढ करण्यात यावी अशी मागणी होत होती. याच मागणीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.

कोणत्या कर्मचाऱ्यांच्या सेवा निवृत्ती वयात वाढ झाली?
राज्य सरकारने मंत्री मंडळाच्या बैठकीमध्ये कृषी विद्यापीठाअंतर्गत शिक्षकांचे (Teachers) सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. म्हणजेच राज्य सरकारने शासनातील सर्वच कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे केलेले नाही. मात्र कृषी विद्यापीठ अंतर्गत काम करणाऱ्या शिक्षकांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करण्यात आले आहे. त्यामुळे या सर्व शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या अनेक (Big News) दिवसांपासून कृषी शिक्षक सेवानिवृत्तीचे वय वाढवण्यासंदर्भात सरकारकडे मागणी करत होते. आता राज्य सरकारने त्यांची ही मागणी पूर्ण केली आहे.

अ, ब, क संवर्गातील कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 58 वर्षेच (Big News)
महाराष्ट्रातील ड संवर्गातील राज्य कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय देखील 60 वर्षे करण्यात आले आहे. परंतु यामध्ये राज्यातील
अ, ब आणि क संवर्गात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय 58 वर्ष इतकेच आहे. हे कर्मचारी देखील सेवानिवृत्तीचे वय वाढवण्यासाठी सरकारकडे मागणी करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला केंद्रीय कर्मचाऱ्यांचे (Central Government Employee) निवृत्तीचे वय जास्त असताना राज्यशास्त्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय देखील वाढवण्यात यावे; अशी मागणी होत आहे. त्यामुळे आता याबाबत सरकार कोणत्या निर्णय घेईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com