Business Success Story : मोलकरणीकडून मिळाली आयडिया अन् उभी राहिली 2 हजार कोटींची कंपनी

करिअरनामा ऑनलाईन । अर्जुन अहलुवालिया न्यूयॉर्कमधील एका (Business Success Story) आघाडीच्या प्रायव्हेट इक्विटी फर्ममध्ये काम करत होता. त्याला चांगला पगारही मिळत होता. ऑफिसमध्ये तो चांगल्या पोझिशनवर काम करत होता. असे असतानाही अर्जुनने नोकरी सोडण्याचा धाडसी निर्णय घेतला. सहा वर्षांपूर्वी तो भारतात परतला आणि त्याने महाराष्ट्रातील एका गावात सुमारे सहा महिने वास्तव्य केले. या काळात त्याने शेतकऱ्यांच्या गरजांचा बारकाईने अभ्यास केला. हा प्रवास एकट्याने सुरू करण्याऐवजी अर्जुनने त्याच्या एका कॉलेजमधील मित्रालाही सोबत घेतले आणि भारतीय बाजारपेठेत व्यवसाय सुरू करण्याच्या आणि शेतकऱ्यांची मदत करण्याच्या त्याच्या प्रवासाला सुरुवात झाली.

मोलकरणीकडून मिळाली बिझनेस आयडिया
अपयश हीच यशाची पहिली पायरी समजली जाते. यशाचा प्रवास खडतर मार्गावरून सुरु होतो. अर्जुन अहलुवालिया या तरुणाचा प्रवासही असाच आहे. तो सध्या 2,000 कोटी रुपयांच्या स्टार्टअप कंपनीचा संस्थापक आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की घरी काम करण्यासाठी आलेल्या मोलकरणीकडून त्याला हा बिझनेस सुरु करण्याची कल्पना मिळाली. ही मोलकरीण मुंबईतील धारावी येथे राहत होती. धारावी जगातील (Business Success Story) सर्वात मोठ्या झोपडपट्ट्यांपैकी एक आहे. जेव्हा त्याला कळले की त्याच्या मोलकरणीने एका खाजगी वित्तीय सेवा कंपनीकडून मोबाईल फोन घेण्यासाठी कर्ज घेतले आहे; तेव्हा या नव्या व्यवसायाची कल्पना अर्जुनच्या मनात आली. देशात अशा अनेक गरजू व्यक्ती आहेत ज्यांना छोट्या मोठ्या कारणासाठी कर्ज घ्यावं लागतं आणि ते फेडताना अनेकजण सावकारी पाशात अडकतात. म्हणून त्यानं ठरवलं की आशा गरजू लोकांसाठी योगदान द्यायचं.

शेतकऱ्यांना सावकारी पाशातून मुक्त करायचं होतं (Business Success Story)
तेव्हा अर्जुन अहलुवालिया 27 वर्षांचा होता. त्याने टेक्सास ए अँड एम विद्यापीठातून फायनान्सची पदवी घेतली होती; त्यामुळे त्याच्याकडे अर्थशास्त्राचे उत्तम ज्ञान आहे. त्याने यापूर्वी न्यूयॉर्कमधील अबराज ग्रुपसाठीही काम केले होते. आयुष्याबाबत वेगळा दृष्टिकोन समोर ठेवून तो भारतात परत आला. त्याचा मुख्य हेतू असा होता, की भारतीय शेतकऱ्यांना सावकारांच्या फंदात न पडता कर्ज मिळू शकेल; यासाठी त्याला स्वतःच काहीतरी करायचं होतं. यासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये आठ महिन्यांच्या यशस्वी पायलट प्रकल्पानंतर त्याने ऍग्री फिनटेक फर्म ‘जय किसान’ सुरू केली. या फर्मच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना अगदी सहज अर्थसहाय्य मिळत आहे.

फर्मवर अनेकांनी दाखवला विश्वास
अर्जुनच्या कंपनीला A सिरीजमध्ये $30 दशलक्ष निधी आणि B सिरीजमध्ये अतिरिक्त $50 दशलक्ष (रु. 398 कोटी) एवढा निधी मिळाला आहे. त्याच्या फर्मचे मूल्यांकन $20-24 कोटी (सुमारे 2,000 कोटी रुपये) पर्यंत वाढले. Mirae Asset, Bloom Ventures आणि Arkam Ventures, Yara GMO Venture Partners आणि DG Daiwa Ventures यांसारख्या प्रमुख गुंतवणूकदारांसह, फंडिंग फेरीत सहभागी होऊन अर्जुनच्या उपक्रमावर विश्वास व्यक्त केलाआहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com