Home Blog Page 157

Big News : महाराष्ट्रात 13 हजार मिनी अंगणवाड्यांचा प्रश्न मार्गी; केंद्राची मान्यता

Big News (2)

करिअरनामा ऑनलाईन । साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी (Big News) लोकसभा अधिवेशनात अंगणवाडीबाबतचा प्रश्न उपस्थित केला. त्यावर महाराष्ट्रातील 13,011 मिनी अंगणवाड्यांना संपूर्ण अंगणवाडी केंद्र म्हणून राज्याला मान्यता देण्यात आल्याची माहिती केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी दिली. राज्यातील अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू होते. त्यांच्या विविध मागण्या केंद्र सरकारपर्यंत पोचविण्यात याव्यात, यासाठी अंगणवाडी कर्मचारी, सेविका यांनी खासदार पाटील यांना निवेदन दिले होते. त्याची दखल घेत खासदार श्रीनिवास पाटील (Shriniwas Patil) यांनी लोकसभेच्या अंदाजपत्रकीय अधिवेशनामध्ये अंगणवाडी सेविकांच्या मानधनाबाबत आणि विविध सोयीसुविधांबाबत प्रश्न मांडला.

या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री इराणी म्हणाल्या, ‘मिशन पोषण २.०’ देशभरातील अंगणवाडी केंद्रांची संख्या तर्कसंगत करण्यासाठी नोंदणीकृत लाभार्थी, मिनी अंगणवाडी केंद्रांचे अंगणवाडी केंद्रात अपग्रेड करण्यात येतील. महाराष्ट्रातील 13,011 मिनी अंगणवाड्यांच्या संपूर्ण अंगणवाडी (Anganwadi) केंद्र म्हणून महाराष्ट्र (Maharashtra) राज्याला मान्यता देण्यात आली आहे. मिशन सक्षम (Big News) अंगणवाडी आणि पोषण २.० अंतर्गत, ५० हजार अंगणवाडी इमारत पाच वर्षांच्या कालावधीत प्रत्येक वर्षी दहा हजारप्रमाणे बांधण्यात येणार आहेत. अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ व्हावी आणि त्यांना सरकारकडून चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सरकार तत्पर आहे, असेही त्या म्हणाल्या.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career Success Story : देशाच्या आर्थिक सेवेत जायचं म्हणून 25 लाख पगाराची नोकरी सोडली; हा तरुण देशात ठरला टॉपर

Career Success Story of IES Nishchal Mittal

करिअरनामा ऑनलाईन । माणसाने एकदा निश्चय केला तर (Career Success Story) त्याच्यासाठी अशक्यही गोष्ट शक्य होते. निश्चल मित्तलनेही असेच काही करुन दाखवले आहे. भरतपूर जिल्ह्यातील बयाना येथील निश्चलने भारतीय अर्थशास्त्र सेवेत (IES) संपूर्ण भारतात प्रथम क्रमांक पटकावून नावलौकिक मिळवला आहे. कठोर मेहनत घेऊन आयईएस होण्याचे हे स्वप्न त्याने पूर्ण केले आहे. यासाठी त्याने स्विस बँक मुंबईतील महिना 25 लाख रुपये पगार देणारी नोकरीही सोडली; कारण तो या नोकरीत समाधानी नव्हता. यूपीएससी (UPSC) परीक्षेत यश मिळवण्याचं त्याचं पहिल्यापासून स्वप्न होतं आणि मेहनतीच्या जोरावरत्यांनी हे स्वप्न पूर्ण केलं. यापरिक्षेत निश्चल यांनी संपूर्ण भारतात प्रथम क्रमांक पटकावून ते देशात टॉपर विद्यार्थी ठरले आहेत.

इतकं झालं आहे शिक्षण
निश्चल मित्तल यांनी बायणा येथील आदर्श विद्या मंदिर शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी जयपूरच्या महाराजा कॉलेजमधून बी. एस. सी. केले आणि त्यानंतर दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पोस्ट ग्रॅज्युएटची पदवी घेतली. येथून कॅम्पस प्लेसमेंटद्वारे त्यांना स्विस बँकेत अधिकृत अधिकारी पदावर नियुक्ती मिळाली. त्यानंतर निश्चलने ठरवले की आपल्याला भारतीय अर्थशास्त्र सेवेत सामील होण्यासाठी अभ्यासाची तयारी करायची आहे.

आठ महिन्याची कठोर मेहनत (Career Success Story)
निश्चलने पूर्णवेळ नोकरी करत असताना या परीक्षेची तयारी केली आणि यामध्ये त्याने यश मिळवले आहे. ते तरुणांना असा सल्ला देतात की, “मेहनतीला घाबरू नका, वेळेचे योग्य व्यवस्थापन करा.” निश्चलचे वडील शशी मित्तल मुळबद्दल बोलताना सांगतात की, “निश्चलने 10 वी बोर्डाच्या परीक्षेतही गुणवत्ता यादीत स्थान पटकावले होते. यानंतर त्याने जयपूरच्या महाराजा कॉलेजमधून बीएस्सी केले, मात्र रसायनशास्त्रासोबत गणित, भौतिकशास्त्र घेण्याऐवजी त्याने बीएस्सीमध्ये अर्थशास्त्र विषय निवडला. त्याने अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवीही मिळवली आहे. त्यानंतर त्याने UPSC परीक्षेचा फॉर्म भरला. या मुख्य परीक्षेसाठी त्याने दरमहा 25 लाख रुपये देणारी नोकरी सोडली. यानंतर आठ महिने एका बंद खोलीत बसून या परीक्षेची कसून तयारी केली आणि अखेर त्याला या कठोर मेहनतीचे फळ मिळाले आणि तो IES अधिकारी झाला.

आयईएस परिक्षेत संपूर्ण भारतात प्रथम
निश्चलचे वडील शशी मित्तल हे इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान चालवतात तर त्यांची आई गृहिणी आहे. निश्चल हा मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुण. त्यांची मुंबई येथे आरबीआय बँकेत (Career Success Story) व्यवस्थापक पदावर निवड झाली होती. मात्र त्यांना आयईएस अधिकारीच व्हायचे होते.
निश्चलचे वडील शशी मित्तल आणि बहीण चित्रिका मित्तल यांच्या म्हणण्यानुसार, 12वीनंतर निश्चल आयआयटीचे कोचिंग घेण्यासाठी कोटा येथे गेला होता. मात्र तेथे त्याची निवड होऊ शकली नाही. पण बीएस्सीमध्ये अर्थशास्त्र विषय घेणे हा त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा निर्णय ठरला. यामुळेच निश्चलने आयईएस परिक्षेत संपूर्ण भारतात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

ग्रुप स्टडी, कठोर परिश्रम आणि वेळेचे व्यवस्थापन
निश्चलने मिळवलेले यश कठोर परिश्रम आणि वेळेच्या व्यवस्थापनाचे फळ आहे. दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून इकॉनॉमिक्स विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन (Career Success Story) केल्यानंतर निश्चलने NET-JRF मध्ये पात्रता मिळवली होती. नोकरी करत असताना त्याने परीक्षेची तयारी केली. यासाठी वेळेचे व्यवस्थापन सर्वात महत्त्वाची बाब ठरली. निश्चल सांगतात की, “मला सुरुवातीपासूनच अर्थशास्त्रात विशेष रस आहे. म्हणूनच मी आयईएस होण्याचे स्वप्न पाहिले. परीक्षेच्या तयारीसाठी मी ग्रुप स्टडी केला आणि ऑनलाइन कंटेंटनेही मला खूप मदत केली”; असं ते सांगतात
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IIT Sports Quota : आता खेळाडूंना ‘स्पोर्ट्स कोट्या’तून IIT मध्ये घेता येणार प्रवेश; केवळ ‘ही’ पात्रता आवश्यक

IIT Sports Quota

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास ने (IIT Sports Quota) आपल्या पदवीधर कार्यक्रमांमध्ये प्रवेशासाठी ‘क्रीडा कोटा’ जाहीर केला आहे. त्यामुळे आयआयटीमध्ये क्रीडा-संबंधित पदवीपूर्व कार्यक्रमांमध्ये प्रवेश मिळवणं आता सोपं होणार आहे. यासाठी 2024-2025 या शैक्षणिक वर्षापासून ‘स्पोर्ट्स एक्सलन्स ॲडमिशन’ (SEA) सुरू होईल. या अंतर्गत IIT मद्रास भारतीय नागरिकांसाठी प्रत्येक पदवी अभ्यासक्रमात दोन अतिरिक्त जागा उपलब्ध करून देईल. यापैकी एक जागा केवळ महिला विद्यार्थ्यांसाठी असेल.

जरी SEA द्वारे प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्याने JEE Advanced साठी पात्र असणे आवश्यक असले तरी ते जॉइंट सीट ऍलोकेशन अथॉरिटी (JoSAA) पोर्टलद्वारे होणार नाही. त्यांचे प्रवेश स्पोर्ट्स कोट्याअंतर्गत IIT मद्रास द्वारे संचालित jeeadv.iitm.ac.in/sea या स्वतंत्र पोर्टलद्वारे केले जातील.

असे केले जाईल जागा वाटप (IIT Sports Quota)
या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रवेश घेण्यासाठी उमेदवारांनी JEE Advanced मध्ये कॉमन रँक लिस्ट किंवा श्रेणीनुसार रँक लिस्टमध्ये स्थान मिळवणे आवश्यक आहे. तसेच कोणत्याही राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळात किमान एक पदक जिंकणे आवश्यक आहे. खेळांच्या विशिष्ट यादीतील त्यांच्या कामगिरीच्या आधारे उमेदवारांनी मिळवलेल्या एकूण गुणांवर आधारित एक वेगळी ‘स्पोर्ट्स रँक लिस्ट’ तयार केली जाईल; ज्याच्या च्या आधारे जागावाटप केले जाईल.

स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स सुरू करणार
हाती आलेल्या माहितीनुसार, IIT मद्रासचे डायरेक्टर व्ही. कामकोटी (IIT Sports Quota) यांनी सांगितले आहे की, आयआयटी मद्रास प्रगत उपकरणांसह एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स देखील सुरू करणार आहे. IIT मद्रास स्पोर्ट्स कोटा सुरू करण्याचा हा उपक्रम खेळात प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना ओळखण्यासाठी आणि त्यांना पुरस्कृत करण्यासाठी घेण्यात आला आहे. हा कार्यक्रम पात्र विद्यार्थ्यांना त्यांच्या खेळात उत्कृष्ट कामगिरी करत असताना यासोबत उच्च शिक्षण घेण्यास प्रोत्साहित करण्यास मदत करणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Education in France for Indian Students : फ्रान्समध्ये शिक्षण घेणं झालं सोप्पं; पैसे नसले तरी फक्त मेरिटवर मिळेल व्हिसा

Education in France for Indian Students

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय विद्यार्थ्यांना फ्रान्समध्ये (Education in France for Indian Students) शिक्षणासाठी केवळ मेरिट आणि प्रोत्साहन याच गोष्टी महत्वाच्या आहेत. विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती कशी आहे, हे त्यांना व्हिसा मिळवण्यासाठी महत्वाचं नाही; अशी महत्वाची माहिती फ्रान्सचे काऊन्सिल जनरल जीन मार्क सेरे चार्टेल यांनी दिली आहे. ते पुण्यात बोलत होते. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना फ्रान्समध्ये शिक्षण घेणं सोप्पं झालं आहे.

फ्रान्समध्ये कर्जाच्या ओझ्याशिवाय नोकऱ्या आहेत सहज उपलब्ध
चार्टेल पुढे म्हणाले; जगभरातील अनेक आघाडीची विद्यापीठे फ्रान्समध्ये आहेत. तिथल्या सरकारनं शिक्षणावर दिलेल्या अनुदानीत व्यवस्थेमुळं विद्यार्थ्यांना कुठल्याही मोठ्या कर्जाच्या ओझ्याशिवाय नोकऱ्याही सहज उपलब्ध होत आहेत. अशी शैक्षणिक कर्जे घेऊन त्यांना आयुष्यभर ती फेडत बसण्याची गरज नाही.

३०,००० विद्यार्थी फ्रान्समध्ये शिक्षणासाठी येतील (Education in France for Indian Students)
चार्टेल यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांनी केलेल्या विधानाचा पुनरुच्चार करताना म्हटलं आहे की, २०३० पर्यंत ३०,००० विद्यार्थी फ्रान्समध्ये शिक्षणासाठी येतील अशी अपेक्षा आहे. सध्या विद्यार्थ्यांची ही संख्या ८००० इतकी आहे. फ्रान्स सरकार सध्या विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशीप्स आणि एक्स्चेंज प्रोग्रामवर काम करत आहे; असंही त्यांनी सांगितलं.

फ्रेन्च बोलता येत नसेल तरी चालेल
२० वर्षांपूर्वी फ्रान्समध्ये इंग्रजीचं पुरेस ज्ञान नव्हतं. आता फ्रान्समधील प्राध्यापक आणि कर्मचारी स्वतःला फ्रेन्चऐवजी इंग्रजी भाषेत चांगल्याप्रकारे व्यक्त होत आहेत. फ्रान्समध्ये (Education in France for Indian Students) आता इंग्रजी शिकवणं हे खूपच सामान्य झालं आहे. त्यामुळं भारतीयांना आता फ्रेन्च भाषा येत नसेल तरी ते फ्रान्समध्ये चांगल्याप्रकारे संवाद साधू शकतात.

‘मल्टिपल एन्ट्री शॉर्ट स्टे व्हिसा’
फ्रान्समध्ये सध्या कोणत्याही परदेशी विद्यार्थ्यासाठी पाच वर्षांसाठी ‘मल्टिपल एन्ट्री शॉर्ट स्टे व्हिसा’ दिला जातो. या विद्यार्थ्यांना फक्त कमीत कमी एका सेमिस्टरची फी (बॅचलर किंवा मास्टर्स) भरावी लागेल. एक्स्चेंज प्रोग्रामासाठीही हा नियम लागू आहे, असंही काऊन्सिल जनरल चार्टेल यांनी सांगितलं.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Union Bank of India Recruitment 2024 : युनियन बँक ऑफ इंडियामध्ये व्यवस्थापक पदाच्या 606 जागांवर मोठी भरती सुरु; ही संधी सोडू नका

Union Bank of India Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । ज्यांना बँकेत नोकरी करायची आहे (Union Bank of India Recruitment 2024) अशा तरुणांसाठी महत्वाची अपडेट आहे. युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत मुख्य व्यवस्थापक-आयटी, वरिष्ठ व्यवस्थापक-आयटी, व्यवस्थापक-आयटी, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक पदांच्या तब्बल 606 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2024 आहे.

बँक – युनियन बँक ऑफ इंडिया
भरली जाणारी पदे – मुख्य व्यवस्थापक-आयटी, वरिष्ठ व्यवस्थापक-आयटी, व्यवस्थापक-आयटी, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक
पद संख्या – 606 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 फेब्रुवारी 2024
वय मर्यादा –30 ते 45 वर्ष

अर्ज फी – (Union Bank of India Recruitment 2024)
1. GEN/EWS/OBC – Rs. 850/- (Inclusive of GST)
2. For SC/ST/PwBD Candidates – Rs. 175/- (Inclusive of GST)
भरतीचा तपशील –

पदपद संख्या 
मुख्य व्यवस्थापक-आयटी05 पदे
वरिष्ठ व्यवस्थापक-आयटी42 पदे
व्यवस्थापक-आयटी04 पदे
व्यवस्थापक447 पदे
सहायक व्यवस्थापक108 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
मुख्य व्यवस्थापक-आयटीB.Sc./B.E./B.Tech. Degree
वरिष्ठ व्यवस्थापक-आयटीB.Sc./B.E./B.Tech. Degree
व्यवस्थापक-आयटीB.Sc./B.E./B.Tech. Degree
व्यवस्थापकGraduate in any discipline from a University/Institution recognized by Govt. of India/approved by Govt. Regulatory bodies
सहायक व्यवस्थापकB.E./B.Tech.

मिळणारे वेतन –

पदवेतन (दरमहा)
मुख्य व्यवस्थापक-आयटी76010-2220/4-84890-2500/2-89890
वरिष्ठ व्यवस्थापक-आयटी63840-1990/5-73790-2220/2-78230
व्यवस्थापक-आयटी48170-1740/1-49910-1990/10-69810
व्यवस्थापक48170-1740/1-49910-1990/10-69810
सहायक व्यवस्थापक36000-1490/7-46430-1740/2-49910-1990/7-63840

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करताना आवश्यक माहिती द्या; अन्यथा कोणतेही कारण न देता अपूर्ण अर्ज फेटाळले जातील.
3. अर्जासोबत आवश्यक (Union Bank of India Recruitment 2024) कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2024 आहे.
5. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स – (Union Bank of India Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.unionbankofindia.co.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Talathi Bharti : तलाठी भरतीसाठी उमेदवारांना कागदपत्रे व बायोमॅट्रिक तपासणीसाठी उपस्थित राहण्याचं आवाहन

Talathi Bharti (6)

करिअरनामा ऑनलाईन । सातारा जिल्हयातील (Talathi Bharti) तलाठी पदभरती 2023 साठी टि.सी.एस. कंपनीमार्फत घेतलेल्या ऑनलाईन परिक्षेतील गुणवत्तेनुसार जिल्हा निवड समितीने निवड केलेल्या उमेदवारांची प्रवर्गनिहाय निवड व प्रतिक्षा यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या www.satara.gov.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आली आहे. या निवड व प्रतिक्षा यादीतील उमेदवारांची जिल्हाधिकारी कार्यालयमार्फत कागदपत्रे तपासणी व टी.सी.एस. कंपनीमार्फत बायोमेट्रीक तपासणी करण्यात येणार आहे. सदर तपासणी प्रक्रियेसाठी निश्चित केलेल्या दिनांक, वेळ व ठिकाण, इ. बाबतचा तपशिल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कागदपत्रे तपासणी प्रक्रियेसाठी निश्चित केलेले दिनांक, वेळ व ठिकाण, इ. बाबतचा तपशिल प्रसिध्द करण्यात आली आहे; अशी माहिती उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी दिली आहे.

यावेळी उपजिल्हाधिकारी पाटील म्हणाले कि, दि. 5 फेब्रुवारी 2024- सामाजिक प्रवर्ग- अराखीव, निवड यादी – अ.क्र. 1 ते 48, एकूण उमेदवारांची संख्या – 48, दि. 6 फेब्रुवारी 2024- सामाजिक प्रवर्ग- अराखीव, प्रतिक्षा यादी अ.क्र. 1 ते 40, एकूण उमेदवारांची संख्या – 40, दि. 7 फेब्रुवारी 2024- सामाजिक प्रवर्ग- अनुसूचित जाती- निवड यादी – अ.क्र. 1 ते 20- एकूण उमेदवारांची संख्या-20, प्रतिक्षा यादी – अ.क्र. 1 ते 17- एकूण उमेदवारांची संख्या-17, सामाजिक प्रवर्ग- अनुसूचित जमाती – निवड यादी – अ.क्र. 1 ते 10- एकूण उमेदवारांची संख्या-10, दि. 8 फेब्रुवारी 2024- सामाजिक प्रवर्ग -अनुसूचित जमाती- प्रतिक्षा यादी अ.क्र. 1 ते 9- एकूण उमेदवारांची संख्या-9, सामाजिक प्रवर्ग -वि.जा.अ.- निवड यादी – अ.क्र. 1 ते 7- एकूण उमेदवारांची संख्या-7-प्रतिक्षा यादी – अ.क्र. 1 ते 9- एकूण उमेदवारांची संख्या-9, – सामाजिक प्रवर्ग – भ.ज.ब.- निवड यादी अ.क्र. 1 ते 7- एकूण उमेदवारांची संख्या-7,

प्रतिक्षा यादी – अ.क्र. 1 ते 8, – एकूण उमेदवारांची संख्या-8, दि. 9 फेब्रुवारी 2024- सामाजिक (Talathi Bharti) प्रवर्ग -भ.ज.क- निवड यादी अ.क्र. 1 ते 9, एकूण उमेदवारांची संख्या-9, प्रतिक्षा यादी – अ.क्र. 1 ते 11- एकूण उमेदवारांची संख्या-11, सामाजिक प्रवर्ग – भ.ज.ड.- निवड यादी अ.क्र. 1 ते 3- एकूण उमेदवारांची संख्या-3, प्रतिक्षा यादी – अ.क्र. 1 ते 6, – एकूण उमेदवारांची संख्या-6, सामाजिक प्रवर्ग -वि.मा.प्र.- निवड यादी अ.क्र. 1 ते 2- एकूण उमेदवारांची संख्या-2, प्रतिक्षा यादी – अ.क्र. 1 ते 3, – एकूण उमेदवारांची संख्या-3,

दि.12 फेब्रुवारी 2024- सामाजिक प्रवर्ग -इ.डब्ल्यू.एस.- निवड यादी अ.क्र. 1 ते 12, एकूण उमेदवारांची संख्या-12, प्रतिक्षा यादी – अ.क्र. 1 ते 10- एकूण उमेदवारांची संख्या-10, सामाजिक प्रवर्ग -इ.मा.व- प्रतिक्षा यादी – अ.क्र. 1 ते 22- एकूण उमेदवारांची संख्या-22, दि. 13 फेब्रुवारी 2024- सामाजिक प्रवर्ग -इ.मा.व- निवड यादी अ.क्र. 1 ते 37- एकूण उमेदवारांची संख्या-37 कागदपत्रे तपासणीचे ठिकाण व वेळ- जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन, सकाळी 11.00 वा
टी.सी.एस. कंपनीमार्फत करणेत येणाऱ्या बायोमेट्रीक तपासणी प्रक्रियेसाठी निश्चित केलेले दि. 7 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 10 वाजता भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC), विभागीय कार्यालय सातारा, कँटीन हॉल, तळ मजला. (जिल्हाधिकारी कार्यालय साताराचे समोर) येथे करण्यात येणार आहे.

यामध्ये संख्या-निवड यादी-155, प्रतिक्षा यादी-135, एकुण-290 अशा उमेदवारांची बायोमेट्रीक तपासणी करण्यात येणार आहे. तरी जिल्हाधिकारी कार्यालय सातारा चे www.satara.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर दि. 23 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यायील निवड व प्रतिक्षा यादीतील सर्व उमेदवारांनी जिल्हाधिकारी (Talathi Bharti) कार्यालय सातारा यांचेमार्फत करणेत येणाऱ्या कागदपत्रे तपासणीसाठी व टि. सी. एस. कंपनीमार्फत करणेत येणाऱ्या बायोमेट्रीक तपासणीसाठी वरील नमूद दिनांक, वेळी व ठिकाणी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह बिनचूकपणे उपस्थित रहावे, असे आवाहन पाटील यांनी ‘हॅलो महाराष्ट्र्र’शी बोलताना केले.

सातारा जिल्ह्यात तलाठी पदभरती 2023 साठी TCS कंपनीमार्फत घेतलेल्या ऑनलाईन परिक्षेतील गुणवत्तेनुसार जिल्हा निवड समिती, सातारा यांनी निवड केलेल्या उमेदवारांची प्रवर्गनिहाय निवड व प्रतिक्षा यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर निवड व प्रतिक्षा यादीतील उमेदवारांची जिल्हाधिकारी कार्यालयमार्फत कागदपत्रे तपासणी व टी.सी.एस. कंपनीमार्फत बायोमेट्रीक तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे; असे आवाहन उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CA Foundation Exam 2024 : CA फाउंडेशन, इंटर आणि फाइनल परीक्षेसाठी नोंदणी सुरु; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

CA Foundation Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । सीए फाउंडेशन, इंटर आणि फाइनल परीक्षेसाठी (CA Foundation Exam 2024) नोंदणी प्रक्रिया सुरु झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या सीए फाउंडेशन (CA Foundation) इंटर आणि फायनल विद्यार्थ्यांना मे सत्र परीक्षांचे नोंदणी अर्ज अधिकृत वेबसाईट icai.org वर जाऊन भरता येणार आहेत. इन्सिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (ICAI) द्वारे मे २०२४ च्या सत्रासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या सीए परीक्षांसाठी (CA Exams) नोंदणी प्रक्रिया सुध्दा सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी दि. २३ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा लागणार आहे. त्यानंतर फाॅर्म जमा करण्यासाठी ३ ते ९ मार्चपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. तसेच दि. ३ ते ९ या मार्च (CA Foundation Exam 2024) दरम्यान परिक्षार्थिंना परिक्षेचे शहर, परीक्षेचे माध्यम निवडण्याचा व बदलण्यचा पर्याय उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे संकेतस्थळाला वेळोवेळी भेट देवून काही बदल नोंदवण्यात आले आहे का? हे पाहाणे विद्यार्थ्यांसाठी आवश्यक आहे.

काही महत्वाच्या तारखा (CA Foundation Exam 2024)
सीए मे-जून फाउंडेशन कोर्सच्या परीक्षा २०, २२, २४ आणि २६ जून २०२४ रोजी घेतल्या जाणार आहेत. सीए गट १ साठी इंटरमिजिएट अभ्यासक्रमाची परीक्षा ३,५ आणि ७ मे २०२४ रोजी घेतली जाईल. तर गट २ च्या परीक्षा ९, ११ आणि १३ मे २०२४ रोजी घेण्यात येतील. या व्यतिरिक्त सीए अंतिम गट १ च्या अंतिम परीक्षा २, ४ आणि ६ मे २०२४ रोरजी आणि गट २ च्या परीक्षा ८, १० आणि १२ मे २०२४ रोजी आयोजित केल्या जातील.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

TMC Recruitment 2024 : टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये सल्लागार पदावर निघाली भरती; महिन्याचा 1,20,000 पगार

TMC Recruitment 2024 (2)

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी (TMC Recruitment 2024) आनंदाची बातमी आहे. टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई येथे सल्लागार पदावर भरती निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखत दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रोजी होणार आहे.

संस्था – टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई
भरले जाणारे पद – सल्लागार (सामान्य औषध)
निवड प्रक्रिया – मुलाखत (TMC Recruitment 2024)
मुलाखतीचे ठिकाण – एच.आर.डी. विभाग, दुसरा मजला, सर्व्हिस बिल्डिंग, टाटा मेमोरियल हॉस्पिटल, परळ, मुंबई – 400 012
मुलाखतीची तारीख – 15 फेब्रुवारी 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे मान्यताप्राप्त राष्ट्रीय औषध आयोगाची M.D. / D.N.B. (इंटर्नल मेडिसिन) किंवा समकक्ष पदव्युत्तर पदवी असावी.
वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 45 वर्षे असावे.
मिळणारे वेतन – 1,01,000/- रुपये ते 1,20,000/- रुपये दरमहा

काही महत्वाच्या लिंक्स – (TMC Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.tmc.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BEL Recruitment 2024 : BEL अंतर्गत इंजिनियर्सना नोकरीची संधी; 55 हजारपर्यंत मिळेल पगार

BEL Recruitment 2024 (1)

करिअरनामा ऑनलाईन । भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. मध्ये विविध रिक्त (BEL Recruitment 2024) पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थी अभियंता, प्रकल्प अभियंता पदांच्या एकूण 55 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2024 आहे.

संस्था – भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड
भरले जाणारे पद –
1. प्रशिक्षणार्थी अभियंता-I – 33 पदे
2. प्रकल्प अभियंता-I – 22 पदे
पद संख्या – 55 पदे (BEL Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 फेब्रुवारी 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – व्यवस्थापक (HR), उत्पादन विकास आणि नवोपक्रम केंद्र (PDIC), भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, प्रो. यूआर राव रोड, नागालँड सर्कल जवळ, जलाहल्ली पोस्ट, बेंगळुरू – ५६० ०१३, भारत

वय मर्यादा –
1. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2024 रोजी, 28 ते 32 वर्षे
2. SC/ST – 05 वर्षे सूट
3. OBC – 03 वर्षे सूट
परीक्षा फी –
1. SC/ST – फी नाही (BEL Recruitment 2024)
2. प्रशिक्षणार्थी अभियंता-I – 150/- रुपये + 18% GST
3. प्रकल्प अभियंता-I – 400/- रुपये + 18% GST
नोकरी करण्याचे ठिकाण – बेंगळुरू

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (BEL Recruitment 2024)

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
प्रशिक्षणार्थी अभियंता-IB.E/ B.Tech/ B.Sc. Engineering Degree
 प्रकल्प अभियंता-IB.E/ B.Tech/ B.Sc. Engineering Degree


मिळणारे वेतन –

पदवेतन
प्रशिक्षणार्थी अभियंता-I1st year – Rs. 30,000/-2nd year – Rs. 35,000/-3rd year – Rs. 40,000/-
प्रकल्प अभियंता-I1st year – Rs. 40,000/-2nd year – Rs. 45,000/-3rd year – Rs. 50,000/-4th year – Rs. 55,000/-

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.bel-india.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठात ‘या’ पदांसाठी भरती सुरु; पात्रता 10 वी पास ते ग्रॅज्युएट

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । कवयित्री बहिणाबाई चौधरी (Job Alert) उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 8 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 फेब्रुवारी 2024 आहे.

संस्था – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
भरली जाणारी पदे –
1) Cillage कार्यक्रम कार्यकारी – 01 पद
2) प्रोजेक्ट फेलो- 02 पदे
3) आकृती समन्वयक – 01 पद
4) तांत्रिक सहाय्यक – 02 पदे
5) प्रकल्प सहाय्यक – 01 पद
6) चालक – 01 पद (Job Alert)
पद संख्या – 08 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 फेब्रुवारी 2024

मिळणारे वेतन – (Job Alert)
1. Cillage प्रोग्राम एक्झिक्युटिव्ह – Rs.60,000/- दरमहा
2. प्रोजेक्ट फेलो – Rs.25,000/- दरमहा
3. आकृती समन्वयक – Rs.20,000/- दरमहा
4. तांत्रिक सहाय्यक – Rs.12,000/- दरमहा
5. प्रकल्प सहाय्यक – Rs.18,000/- दरमहा
6. चालक – Rs.12,000/- दरमहा

नोकरी करण्याचे ठिकाण – जळगाव, नंदुरबार (महाराष्ट्र)
निवड प्रक्रिया – मुलाखत (Job Alert)
मुलाखतीचा पत्ता – खोली क्र. 401, प्रशासकीय इमारत (मुख्य इमारत) काव्ययत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.nmu.ac.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com