Big News : महाराष्ट्रात 13 हजार मिनी अंगणवाड्यांचा प्रश्न मार्गी; केंद्राची मान्यता

करिअरनामा ऑनलाईन । साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी (Big News) लोकसभा अधिवेशनात अंगणवाडीबाबतचा प्रश्न उपस्थित केला. त्यावर महाराष्ट्रातील 13,011 मिनी अंगणवाड्यांना संपूर्ण अंगणवाडी केंद्र म्हणून राज्याला मान्यता देण्यात आल्याची माहिती केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी दिली. राज्यातील अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू होते. त्यांच्या विविध मागण्या केंद्र सरकारपर्यंत पोचविण्यात याव्यात, यासाठी अंगणवाडी कर्मचारी, सेविका यांनी खासदार पाटील यांना निवेदन दिले होते. त्याची दखल घेत खासदार श्रीनिवास पाटील (Shriniwas Patil) यांनी लोकसभेच्या अंदाजपत्रकीय अधिवेशनामध्ये अंगणवाडी सेविकांच्या मानधनाबाबत आणि विविध सोयीसुविधांबाबत प्रश्न मांडला.

या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री इराणी म्हणाल्या, ‘मिशन पोषण २.०’ देशभरातील अंगणवाडी केंद्रांची संख्या तर्कसंगत करण्यासाठी नोंदणीकृत लाभार्थी, मिनी अंगणवाडी केंद्रांचे अंगणवाडी केंद्रात अपग्रेड करण्यात येतील. महाराष्ट्रातील 13,011 मिनी अंगणवाड्यांच्या संपूर्ण अंगणवाडी (Anganwadi) केंद्र म्हणून महाराष्ट्र (Maharashtra) राज्याला मान्यता देण्यात आली आहे. मिशन सक्षम (Big News) अंगणवाडी आणि पोषण २.० अंतर्गत, ५० हजार अंगणवाडी इमारत पाच वर्षांच्या कालावधीत प्रत्येक वर्षी दहा हजारप्रमाणे बांधण्यात येणार आहेत. अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ व्हावी आणि त्यांना सरकारकडून चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सरकार तत्पर आहे, असेही त्या म्हणाल्या.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com