Home Blog Page 140

Job Alert : ‘या’ महापालिकेत परीक्षा न देता थेट भरतीची संधी; उद्या होणार मुलाखत

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । ठाणे महानगरपालिका राष्ट्रीय आरोग्य अभियान (Job Alert) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून चिकित्सक, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञ, त्वचारोगतज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, कान नाक घसा विशेषज्ञ पदांच्या एकूण 57 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 07 मार्च 2024 आहे.

संस्था – ठाणे महानगरपालिका, राष्ट्रीय आरोग्य अभियान
भरली जाणारी पदे – चिकित्सक, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञ, त्वचारोगतज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, कान नाक घसा विशेषज्ञ
पद संख्या – 57 पदे
निवड प्रक्रिया – मुलाखत (Job Alert)
मुलाखतीची तारीख – 07 मार्च 2024
मुलाखतीचा पत्ता – सार्वजनिक आरोग्य विभाग, चौथा मजला, ठाणे महानगरपालिका भवन सरसेनानी जनरल अरूणकुमार वैद्य मार्ग चंदनवाडी, पांचपाखडी, ठाणे
नोकरी करण्याचे ठिकाण – ठाणे

भरतीचा तपशील –

पदपद संख्या 
चिकित्सक09
स्त्रीरोगतज्ज्ञ07
बालरोगतज्ञ09
नेत्ररोगतज्ज्ञ05
त्वचारोगतज्ञ09
मानसोपचारतज्ज्ञ09
कान नाक घसा विशेषज्ञ09

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Alert)

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
चिकित्सकMD Medicine, DNB
स्त्रीरोगतज्ज्ञMD/MS Gyn/DGO/DNB
बालरोगतज्ञMD Paed/DCH/DNB
नेत्ररोगतज्ज्ञMS Ophthalmologist/DOMS
त्वचारोगतज्ञMD(Skin/VD)DVD,DNB
मानसोपचारतज्ज्ञMS Psychiatrist / DPM/DNB
कान नाक घसा विशेषज्ञMS ENT/DORL/DNB

मिळणारे वेतन –

पदवेतन
चिकित्सक, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञ, त्वचारोगतज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, कान नाक घसा विशेषज्ञRate Fixed by Govt : Per Visit @2000/- (fixed amount)Cheking Charges @100/- per patient (maximum amount Rs.5000/- visit)

अशी होईल निवड –
1. या पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. उमेदवाराने दिलेल्या तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित रहावे.
3. मुलाखतीची तारीख 07 मार्च 2024 आहे. (Job Alert)
4. अर्जदारांनी मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://thanecity.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Success Story : नामांकित बॅंकेची नोकरी सोडून आईसोबत इडली विकायला केली सुरुवात, पगारापेक्षाही अधिक पटीने कमावतो…

Success Story of Krishnan Mahadevan

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षण पूर्ण झाले… त्यानंतर जगातील (Success Story) मोठ्या जुन्या गोल्डमन सच ग्रुपच्या बॅंकेत त्याला चांगल्या पदावर मनासारखी नोकरी मिळाली. अगदी गलेलठ्ठ पगार देणारी नोकरी त्याला मिळाली. तो अगदी आरामात राहू शकेल इतकी रक्कम दर महिन्याला त्याच्या बॅंक खात्यात जमा होत होती. पण कृष्णनचे (Krishnan Mahadevan) स्वप्न काहीतरी वेगळे होते. त्याचे फार काल नोकरीत मन रमले नाही. पाहिलेले स्वप्न त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्याने नोकरी सोडली आणि छोट्याशा दुकानातून इडली विकायला सुरुवात केली. बंगळुरच्या विग्याननगरमध्ये त्याचा इडलीचा स्टॉल आहे.

अनेक लोकं आयुष्यात यशस्वी होण्याची स्वप्न पाहतात. पण खूप कमीजण ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करतात. चांगले शिक्षण घेतले… चांगली नोकरी मिळाली की आपण (Success Story) आयुष्यात यशस्वी झालो असे अनेकांना वाटते. पण आपल्याला आवडीचे काम करायला मिळणे यातच खरे समाधान असल्याचे या तरुणाला वाटू लागले. मग काय? त्याने बॅंकेच्या नोकरीला सलाम केला आणि छोट्या दुकानातून त्याने आपल्या इडली व्यवसायाला सुरुवात केली.

घरचा व्यवसाय (Success Story)
इडली-सांबार विकणे हा कृष्णनचा घरचा व्यवसाय आहे. 2001 साली त्याच्या वडिलांनी अय्यर इडली या नावाने व्यवसायाला सुरुवात केली होती. गरमागरम आणि चवदार इडली सांबारसाठी हे दुकान परिसरात ओळखलं जायचं. सर्व वयोगटातील ग्राहक इथे इडली खाण्यासाठी येत असतात. गेल्या 23 वर्षात कृष्णन कुटुंबाच्या या व्यवसायाने परिसरात चांगली ओळख निर्माण केली आहे.

वडिलांच्या निधनानंतर आईवर आली जबाबदारी (Success Story)
2009 मध्ये कृष्णनच्या वडिलांचे निधन झाले. तेव्हा दुकान संभाळण्याची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या आई उमा यांच्यावर आली. यावेळी कृष्णन कॉलेजमध्ये शिकत होते. आईला हातभार लावण्यासाठी ते दुकानात काम करायचे आणि नंतर कॉलेजला जायचे. शिक्षण पूर्ण होवून नोकरी लागल्या नंतरही हा दिनक्रम त्याच्यासाठी कायम होता.

स्वप्न पूर्ण करण्यासाठी सोडली नोकरी
कृष्णन मोठ्या बँकेत चांगल्या पगाराची नोकरी करत होते. पण घरच्या व्यवसायाची जबाबदारी आणि पाहिलेले स्वप्न त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. अय्यर इडली हा घरचा इडलीचा व्यवसाय सांभाळण्यासाठी त्यांनी बॅंकेच्या नोकरीवर पाणी सोडले. त्याने आपल्या आईसोबत काम करण्यास सुरवात केली.

20 बाय 10 फूट जागेत आहे दुकान
तसं पाहायला गेलं तर अय्यर यांचं दुकानात फक्त 20 बाय 10 फूट जागेत आहे. एवढ्या कमी जागेतून अय्यर इडलीने आपले विश्व निर्माण केले आहे. आता अय्यर परिवार दर महिन्याला या दुकानात 50,000 हून अधिक इडल्या विकत आहे. यामध्ये कृष्णनदेखील आपल्या कौशल्याचा वापर करत आहे. खाद्यपदार्थाची उच्च गुणवत्ता राखल्यामुळे हे शक्य झाले आहे. कृष्णन यांचे दुकान अत्यंत साधे आहे. ते दुकानाच्या फॅन्सी इंटीरियरकडे लक्ष देत नाहीत. ते फक्त इडलीची गुणवत्ता, स्वच्छता आणि चव यावर लक्ष केंद्रित करतात.

फ्लफी इडलीसाठी प्रसिध्द
जवळपास 9 वर्षे कृष्णनचे वडिल नारळाच्या चटणीसोबत इडल्या विकत होते. त्यांच्या चटणीची चव हजारो जणांच्या जिभेवर रेंगाळत होती. त्यामुळे त्यांच्या दुकानाच्या जवळपास अनेक रेस्टॉरंट्स असूनही, अय्यर इडली आजही त्यांच्या अनोख्या, फ्लफी आणि मऊ इडलीसाठी लोकप्रिय आहे.

या पदार्थांचा केला समावेश
कृष्णनने व्यवसाय हाती घेतला आणि त्यात (Success Story) चांगले बदल केले. इडलीची गुणवत्ता, ताजेपणा, स्वच्छता आणि चव यालाच प्राधान्य राहील, याची काळजी त्याने घेतली. सध्या कृष्णनने मेनूमध्ये वडा, केसरी भात (रवा, तूप, केशर आणि साखर घालून बनवलेले दक्षिण भारतीय मिष्टान्न) आणि खरा भात याचा समावेश केला आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CUET UG 2024 : ‘या’ आहेत देशातील टॉप 10 युनिव्हर्सिटीज; CUET UG पास झाल्यानंतर इथे मिळेल प्रवेश; पहा यादी….

CUET UG 2024

करिअरनामा ऑनलाईन । 12वी बोर्डाची परीक्षा पास झाल्यानंतर (CUET UG 2024) प्रत्येक विद्यार्थी देशातील आघाडीच्या विद्यापीठांमध्ये प्रवेशाच्या शर्यतीत सामील होतात. यावर्षी, भारतातील सर्वोच्च विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यासाठी CUET UG परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. या परीक्षेसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइट exams.nta.ac.in/CUET-UG वर CUET UG 2024 परीक्षेसाठी नोंदणी (CUET UG 2024 Registration) करू शकता. CUET UG 2024 या परीक्षेची तारीख लवकरच जाहीर केली जाईल.

केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाकडून दरवर्षी NIRF रँकिंग (NIRF Ranking) जाहिर केले जाते. या क्रमवारीतून उच्च शिक्षणासाठी कोणत्याही विद्यापीठात प्रवेश घेणे या यादीमुळे सोपे होते. जर तुम्ही CUET UG 2024 परीक्षेची तयारी करत असाल आणि या परिक्षेत तुम्ही चांगले गुण मिळवण्यात यशस्वी झालात, तर तुम्ही भारतातील टॉप 10 पैकी 6 विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यास पात्र ठरू शकता.

26 मार्चपर्यंत करा अर्ज (CUET UG 2024)
तुम्ही CUET UG 2024 परीक्षेसाठी 26 मार्च 2024 पर्यंत exams.nta.ac.in/CUET-UG वर नोंदणी करू शकता. CUET UG परीक्षा यापूर्वी 15 मे ते 31 मे 2024 या कालावधीत होणार होती. पण २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमुळे हे वेळापत्रक सध्या रद्द करण्यात आले आहे. यूजीसी अध्यक्षांनी सोशल मीडिया आणि नोटीसद्वारे ही माहिती दिली होती. कॉमन युनिव्हर्सिटी प्रवेश परीक्षा, CUET UG 2024 परीक्षेचे वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध केले जाईल.

भारतातील सर्वोच्च विद्यापीठांमध्ये प्रवेश (CUET UG 2024) मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये मोठी शर्यत पहायला मिळते. आता बहुतेक विद्यापीठांमध्ये प्रवेश CUET UG 2024 परीक्षेच्या निकालाद्वारे उपलब्ध होईल. पुढे उल्लेख केलेल्या विद्यापीठांना NIRF रँकिंग 2023 मध्ये सर्वोच्च दर्जा देण्यात आला आहे.

1- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc बेंगळुरू)
2- जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU)
3- जामिया मिलिया इस्लामिया (JMI)
4- जाधवपूर विद्यापीठ (CUET UG 2024)
5- बनारस हिंदू विद्यापीठ (BHU)

6- मणिपाल विद्यापीठ
7- अमृता विश्व विद्यापीठम
8- वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (VIT)
9- अलीगढ मुस्लिम विद्यापीठ (AMU)
10- हैदराबाद विद्यापीठ

कुठे मिळेल प्रवेश?
CUET UG परीक्षा द्वारे देशातील शीर्ष 10 पैकी 6 विद्यापीठांमध्ये (CUET UG 2024) प्रवेश उपलब्ध होईल. यातील प्रवेशासाठी, तुम्हाला CUET UG नोंदणी फॉर्म भरताना या विद्यापीठांचा पर्याय निवडावा लागेल. JNU (JHU), जामिया मिलिया इस्लामिया, जादवपूर विद्यापीठ, अलीगढ मुस्लिम विद्यापीठ (AMU), हैदराबाद विद्यापीठ आणि बनारस हिंदू विद्यापीठ (BHU) ही ती 6 विद्यापीठे आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Indian Bank Recruitment 2024 : बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी!! इंडियन बँकेत ‘या’ पदांवर भरती सुरु

Indian Bank Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन बँकेत विविध रिक्त पदे (Indian Bank Recruitment 2024) भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राध्यापक, कार्यालयीन सहाय्यक पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मार्च 2024 आहे.

संस्था – इंडियन बँक
पद संख्या – 02 पदे
भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. प्राध्यापक – 01 पद
पात्रता – पदवीधर / पदव्युत्तर/ MSW/ MA ग्रामीण विकासात/ MA समाजशास्त्र/ मानसशास्त्र/ B.Sc. (पशुवैद्यकीय), बी.एस्सी. (हॉर्टिकल्चर), बी.एस्सी. (Agri.), B.Sc. (कृषी. विपणन)/ बी.ए. B.Ed इ. शिकवण्याची क्षमता असावी आणि उमेदवाराकडे संगणकाचे उत्तम ज्ञान असावे
2. कार्यालयीन सहाय्यक – 01 पद
पात्रता – ग्रॅज्युएट/ (BSW/ BA/B.com/ कॉम्प्युटर ज्ञानासह.) बेसिक अकाउंटिंगचे ज्ञान असावे.

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन (Indian Bank Recruitment 2024)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 मार्च 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Director, Indian Bank RSETI, Vill- PaschimBeguni, PO- Chakshyampur, PS- Debra, Dist- Paschim Mediaipur, PIN- 721124, West Bengal.

वय मर्यादा – 22 वर्षे ते 40 वर्षापर्यंत
परीक्षा फी – फी नाही
मिळणारे वेतन – 12,000/- रुपये ते 20,000/- रुपये दरमहा

काही महत्वाच्या लिंक्स – (Indian Bank Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अर्ज फॉर्मसाठी येथे CLICK करा – Form
अधिकृत वेबसाईट – www.indianbank.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

RTE Act : विद्यार्थ्यांनो… तुम्हाला 5 वी आणि 8 वीची परीक्षा पास होणे बंधनकारक; नाहीतर पुढच्या वर्गात प्रवेश नाही

RTE Act

करिअरनामा ऑनलाईन । पहिली ते आठवीपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला (RTE Act) नापास करायचे नाही; असं धोरण 2010 पासून ‘आरटीई’अंतर्गत (RTE) राबवण्यात येत आहे. पण आता इयत्ता 5वी व 8वीतील विद्यार्थ्यांची दरवर्षी परीक्षा होणार आहे. दरवर्षी शाळा स्तरावर परीक्षा होतेच, पण आता त्यात बदल करण्यात येणार असून पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षा पास व्हावीच लागेल, आणि जे विद्यार्थी नापास होतील त्यांना पुन्हा त्याच वर्गात बसावे लागणार आहे.

राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने ‘आरटीई’ ॲक्ट लागू करताना पहिली ते आठवीतील सर्वच विद्यार्थ्यांना पास करण्याचे धोरण स्वीकारले. त्यामुळे 2010 पासून आतापर्यंत पहिली ते आठवीतील एकही विद्यार्थी नापास झाला नाही. याचा परिणाम म्हणून पुढे जाऊन अनेक विद्यार्थी इयत्ता 10वी, 12 वीच्या अभ्यासक्रमात (RTE Act) पिछाडीवर राहिले. परिक्षेत आलेल्या अपयशामुळे अनेकांना मधूनच शाळा देखील सोडावी लागल्याची उदाहरणे समोर आली आहेत. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी, त्यांना इंग्रजी, गणित, विज्ञान असे विषय विस्तृतपणे समजावेत या हेतूने आता इयत्ता 5वी व 8वीतील विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाईल; असा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.

नापास विद्यार्थ्याला मागे थांबावे लागणार (RTE Act)
२०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 5 वी आणि 8 वीतील विद्यार्थ्यांना शाळेच्या परीक्षेत पास व्हावेच लागणार आहे. नापास झालेल्या विद्यार्थ्याला आता यापुढे पुढच्या वर्गात जाता येणार नाही. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून प्रश्नपत्रिकांचा नमुना तयार करण्यात आला आहे. त्या धर्तीवर शाळांना प्रश्नपत्रिका काढाव्या लागणार आहेत.

नापास झाल्यास 30 दिवसांत मिळणार दुसरी संधी
इयत्ता पाचवी व आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा पार पडल्यानंतर यामध्ये जे विद्यार्थी नापास होतील त्यांना परीक्षेची पुन्हा एकदा संधी मिळणार आहे. एक महिन्यानंतर (RTE Act) त्यांची पुन्हा एकदा शाळास्तरावर परीक्षा होईल. त्यावेळी जे विद्यार्थी उत्तीर्ण होतील, त्यांना नव्या शैक्षणिक वर्षापासून पुढील वर्गात बसण्याची संधी मिळणार आहे. नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र पुन्हा त्याच वर्गात बसावे लागणार आहे.

आगामी शैक्षणिक वर्षापासून नवीन बदलानुसार इयत्ता 5वी व 8वीतील विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तीर्ण होणे आवश्यक राहील. दुसरी संधी देऊनही अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होईपर्यंत त्याच वर्गात बसावे लागेल. आता या दोन वर्गातील विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याची पद्धत बंद केली जाणार आहे; अशी माहिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या सहसंचालक शोभा खंदारे; यांनी दिली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career Success Story : सोशल मिडीयापासून दूर राहून पुस्तकांशी केली मैत्री; या तरुणीने सलग 5 सरकारी परीक्षा केल्या पास

Career Success Story

करिअरनामा ऑनलाईन । आपण पाहतो की, सरकारी नोकरी (Career Success Story) मिळवण्यासाठी तरुण-तरुणी दिवसाचा रात्र अन् रात्रीचा दिवस करुन अभ्यास करत असतात. सरकारी नोकरी मिळवणं हा विषय प्रतिष्ठेचासमजला जातो; त्यामुळे अनेकांना या परीक्षा पास करुन आपलं करिअर घडवायचं असतं. या स्पर्धेत आघाडी घेतली आहे बिहारमधील एका तरुणीने. तिने सरकारी नोकरी मिळवण्यासाठी एक-दोन नाही तर सलग 5 सरकारी परीक्षा पास केल्या आहेत. टीनू सिंह असं या तरुणीचं नाव आहे.

आईचं अपूर्ण स्वप्न पूर्ण केलं
टीनू सिंह (Tinu Singh) हिच्या आईने अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र, कौटुंबिक जबाबदारी, बेताची आर्थिक परिस्थिती यामुळे टीनूची आई पिंकी सिंह यांना आपले स्वप्न पूर्ण करता (Tinu Singh) आले नाही. पिंकी यांनी इंग्रजी विषयात एम.ए पूर्ण केले होते. याशिवाय त्यांनी बी. एड. ची (B.ed) पदवीही प्राप्त केली होती. पुढे आणखी अभ्यास करुन त्यांचे अधिकारी बनण्याचे स्वप्न होते. पण घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना अधिकारी बनता आले नाही. त्यामुळे त्या गृहिणीच राहिल्या. मात्र भविष्यात आईचे स्वप्न मुलीने पूर्ण केले आहे.

टीनूने परिक्षा पास करण्याचा धडाकाच लावला
टीनू सिंहने (Tinu Singh) एकापाठोपाठ एक अशा 5 सरकारी परिक्षेत यश मिळवले. तिच्या या कामगिरीचा कुटुंबियांनाही अभिमान वाटतो. तिचा मित्र परिवार आणि घरा शेजारील लोक तिच्या या यशामुळे फार आनंदी आहेत. एवढे यश मिळवूनही तिने अद्याप तिचे स्वप्न पूर्ण झाले नसल्याचे म्हटले आहे. तिला आणखी अभ्यास करुन सनदी अधिकारी बनायचे होते.

या परिक्षेत झाली पास (Career Success Story)
टीनू सिंह (Tinu Singh) हिने एका आठवड्यात 5 परिक्षांमध्ये यश मिळवलं. 22 डिसेंबरला तिची कंप्यूटर ऑपरेटरपदी निवड झाली होती. त्यानंतर त्याच्या पुढील दिवशी म्हणजे 23 डिसेंबरला बिहारच्या एसएससी सीजीएल (SSC CGL) परिक्षेत तिला यश मिळाले. त्यानंतर सहाय्यक शाखा पदाधिकारी या सरकारी पदासाठीही तिची निवड झाली होती.

BPSC परिक्षा पास करुन रचला विक्रम
वरिल 3 परिक्षांशिवाय बीपीएसच्या (BPS) शिक्षक भरती परिक्षेतही टीनूला 6-8 च्या कॅडरमध्ये यश मिळाले. याशिवाय बीपीएससी च्या शिक्षक भरतीमध्ये तिला 9 वी ते 10 वी आणि उच्च माध्यमिकच्या 11 वी ते 12 वी कॅडरमध्येही तिला यश मिळाले. टीनू तिच्या यशाचे सर्व श्रेय आपल्या आई -वडिलांना देते.

सोशल मीडियापासून दूर राहून पुस्तकांशी केली मैत्री
तरुण पिढी सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. दिवसातील (Career Success Story) तासन तास ते सोशल मीडियावर फुकट घालवतात. मात्र, टीनू या सोशल मीडियापासून दूर राहिली. कोणत्याच सोशल मीडियावरती तिचे अकाऊंट देखील नाही. तिने पुस्तकांशीच मैत्री केली. पुस्तकचं आपले चांगले मित्र असतात. शिवाय मी सातत्याने अभ्यास केला त्यामुळेच मला यश मिळाले, असा टीनू नेहमी सांगते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Police Bharti 2024 : 17 हजार पदांच्या बहुप्रतिक्षीत पोलीस भरतीसाठी अर्ज प्रक्रिया झाली सुरु

Police Bharti 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी राज्यात 17 हजार (Police Bharti 2024) पोलिस शिपाई पदांची भरती करण्याची घोषणा केली होती. परंतु प्रत्यक्षात भरती जाहीर होत नसल्याने पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या युवक वर्गातून चिंता व्यक्त केली जात होती. अखेर सरकारने बहुप्रतीक्षित पोलिस भरती जाहीर केली असून राज्यभरात पोलिस शिपाई पदासाठीची अर्ज प्रक्रिया आज मंगळवार (दि. 5) पासून सुरू होत आहे.

या भरतीसाठी इच्छूक उमेदवारांनी policerecruitment2024.mahait.org आणि http://www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर भरती संदर्भात माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. याठिकाणीच ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा देखील उपलब्ध करुन (Police Bharti 2024) देण्यात आली आहे. उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी अंतिम मुदत 31 मार्च 2024 पर्यंत देण्यात आली आहे.

भरल्या जाणाऱ्या पदांचा तपशील – (Police Bharti 2024)

पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक आणि कारागृह कॉन्स्टेबल पदावर भरती
पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक आणि कारागृह कॉन्स्टेबल (Police Bharti 2024) या पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळातून दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सर्वसाधारण श्रेणीसाठी वयोमर्यादा 18 ते 28 वर्षे आहे. खुल्या प्रवर्गासाठी 450 रुपये शुल्क भरावे लागेल. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 350 रुपये शुल्क भरावे लागेल.

उमेदवारांना या प्रक्रियेतून जावे लागणार
या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवाराची पहिल्यांदा शारीरिक चाचणी (Police Bharti 2024) घेण्यात येईल. शारीरिक योग्यता चाचणीमध्ये किमान 50 टक्के गुण मिळवणाऱ्या उमेदवारांमधून प्रवर्गामधील रिक्त पदाच्या 1:10 प्रमाणात निवड करून त्यांची 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. लेखी परीक्षेत किमान 40 टक्के गुण मिळविणे अनिवार्य आहे. त्यापेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र ठरवले जातील.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BMC Recruitment 2024 : मुंबई महापालिकेत ‘या’ पदावर नोकरीची संधी; त्वरा करा

BMC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । मुंबईत नोकरी करण्याची अनेकांची (BMC Recruitment 2024) इच्छा असते. मुंबई महानगरपालिकेतील नोकरी प्रतिष्ठेची नोकरी समजली जाते. जर तुम्ही मुंबईमध्ये नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे.

मुंबई महापालिका अंतर्गत ‘मानव संसाधन समन्वयक’ पदांच्या एकूण 38 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2024 आहे.

संस्था – बृहन्मुंबई महानगरपालिका
भरले जाणारे पद – मानव संसाधन समन्वयक
पद संख्या – 38 पदे (BMC Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मार्च 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – किमान १८ वर्षे व कमाल ३८ वर्षे

अर्ज फी – (BMC Recruitment 2024)
खुला प्रवर्ग – रु. १०००/-
मागासवर्गीय प्रवर्ग – ९००/-
आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
मानव संसाधन समन्वयकउमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा प्रथम प्रयत्नात ४५% गुणांसह उतीर्ण असणे आवश्यक आहे.
किंवाउमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या अभियांत्रिकी मधील कोणत्याही शाखेतील पदविका परीक्षा प्रथम प्रयत्नात ४५% गुणांसह उतीर्ण असणे आवश्यक आहे.

मिळणारे वेतन –

मानव संसाधन समन्वयकरु. २५,५००/- ते रु.८१,१००/-

असा करा अर्ज – (BMC Recruitment 2024)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
3. अर्ज दिलेल्या लिंकवरुन सादर करायचा आहे. (BMC Recruitment 2024)
4. अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
5. अर्ज 24 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होतील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.mcgm.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

RFCL Recruitment 2024 : परीक्षा न देता थेट नोकरी मिळविण्याची संधी; इथे ऑनलाईन करा अर्ज

RFCL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । रामागुंडम फर्टिलायझर्स अँड केमिकल्स (RFCL Recruitment 2024) लिमिटेडने विविध पदे भरण्यासाठी जाहिरात काढली आहे. अधिसूचना जारी केली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे.

या भरतीच्या माध्यमातून अभियंता, वरिष्ठ रसायनशास्त्रज्ञ, लेखाधिकारी, वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण 27 जागा भरल्या जाणार आहेत. जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल (RFCL Recruitment 2024) तर ही अपडेट तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे. ही भरती सरकारी नोकरीचा उत्तम पर्याय ठरू शकते. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ताबडतोब अर्ज करुन या संधीचा फायदा घ्यायचा आहे.

संस्था – रामागुंडम फर्टिलायझर्स अँड केमिकल्स लिमिटेड
पद संख्या – 27 पदे
भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणीक पात्रता –
1. अभियंता (Engineer)- 19 पदे
पात्रता – B.E. / B.Tech./ B.Sc.(Engg.)
2. वरिष्ठ रसायनशास्त्रज्ञ (Senior Chemist) – 02 पदे
पात्रता – (RFCL Recruitment 2024) एम.एस्सी. (रसायनशास्त्र)
3. लेखाधिकारी (Accounts Officer) – 05 पदे
पात्रता – CA किंवा CMA किंवा फायनान्समधील स्पेशलायझेशनसह दोन वर्षांचे एमबीए (ड्युअल स्पेशलायझेशन किंवा जनरल एमबीए असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र नसतील.
4. वैद्यकीय अधिकारी (Medical Officer )- 1 पद
पात्रता – MBBS

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2024

काही महत्वाच्या लिंक्स – (RFCL Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.rfcl.co.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MAFSU Recruitment 2024 : सहयोगी प्राध्यापक पदावर भरती सुरु; महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठात करा अर्ज

MAFSU Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरने (MAFSU Recruitment 2024) रिक्त पदांच्या भरतीची जाहिरात काढली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहयोगी प्राध्यापक आणि समकक्ष पदाच्या एकूण 67 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024 आहे.

संस्था – महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर (MAFSU Recruitment 2024)
भरले जाणारे पद – सहयोगी प्राध्यापक आणि समकक्ष
पद संख्या – 67 पदे (MAFSU Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 मार्च 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Registrar, Maharashtra Animal and Fishery Sciences University, Futala Lake Road, Nagpur- 440 001 (M.S.).

आवश्यक शैक्षणिक पात्रता – पदव्युत्तर पदवी
वय मर्यादा – (MAFSU Recruitment 2024)
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 40 वर्षे
मागासवर्गीय – 05 वर्षे सूट
परीक्षा फी – 2000/- रुपये
राखीव प्रवर्ग – 1000/- रुपये (MAFSU Recruitment 2024)
मिळणारे वेतन – 1,31,400/- रुपये ते 2,17,100 रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर (महाराष्ट्र)

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.mafsu.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com