Success Story : नामांकित बॅंकेची नोकरी सोडून आईसोबत इडली विकायला केली सुरुवात, पगारापेक्षाही अधिक पटीने कमावतो…

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षण पूर्ण झाले… त्यानंतर जगातील (Success Story) मोठ्या जुन्या गोल्डमन सच ग्रुपच्या बॅंकेत त्याला चांगल्या पदावर मनासारखी नोकरी मिळाली. अगदी गलेलठ्ठ पगार देणारी नोकरी त्याला मिळाली. तो अगदी आरामात राहू शकेल इतकी रक्कम दर महिन्याला त्याच्या बॅंक खात्यात जमा होत होती. पण कृष्णनचे (Krishnan Mahadevan) स्वप्न काहीतरी वेगळे होते. त्याचे फार काल नोकरीत मन रमले नाही. पाहिलेले स्वप्न त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्याने नोकरी सोडली आणि छोट्याशा दुकानातून इडली विकायला सुरुवात केली. बंगळुरच्या विग्याननगरमध्ये त्याचा इडलीचा स्टॉल आहे.

अनेक लोकं आयुष्यात यशस्वी होण्याची स्वप्न पाहतात. पण खूप कमीजण ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करतात. चांगले शिक्षण घेतले… चांगली नोकरी मिळाली की आपण (Success Story) आयुष्यात यशस्वी झालो असे अनेकांना वाटते. पण आपल्याला आवडीचे काम करायला मिळणे यातच खरे समाधान असल्याचे या तरुणाला वाटू लागले. मग काय? त्याने बॅंकेच्या नोकरीला सलाम केला आणि छोट्या दुकानातून त्याने आपल्या इडली व्यवसायाला सुरुवात केली.

घरचा व्यवसाय (Success Story)
इडली-सांबार विकणे हा कृष्णनचा घरचा व्यवसाय आहे. 2001 साली त्याच्या वडिलांनी अय्यर इडली या नावाने व्यवसायाला सुरुवात केली होती. गरमागरम आणि चवदार इडली सांबारसाठी हे दुकान परिसरात ओळखलं जायचं. सर्व वयोगटातील ग्राहक इथे इडली खाण्यासाठी येत असतात. गेल्या 23 वर्षात कृष्णन कुटुंबाच्या या व्यवसायाने परिसरात चांगली ओळख निर्माण केली आहे.

वडिलांच्या निधनानंतर आईवर आली जबाबदारी (Success Story)
2009 मध्ये कृष्णनच्या वडिलांचे निधन झाले. तेव्हा दुकान संभाळण्याची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या आई उमा यांच्यावर आली. यावेळी कृष्णन कॉलेजमध्ये शिकत होते. आईला हातभार लावण्यासाठी ते दुकानात काम करायचे आणि नंतर कॉलेजला जायचे. शिक्षण पूर्ण होवून नोकरी लागल्या नंतरही हा दिनक्रम त्याच्यासाठी कायम होता.

स्वप्न पूर्ण करण्यासाठी सोडली नोकरी
कृष्णन मोठ्या बँकेत चांगल्या पगाराची नोकरी करत होते. पण घरच्या व्यवसायाची जबाबदारी आणि पाहिलेले स्वप्न त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. अय्यर इडली हा घरचा इडलीचा व्यवसाय सांभाळण्यासाठी त्यांनी बॅंकेच्या नोकरीवर पाणी सोडले. त्याने आपल्या आईसोबत काम करण्यास सुरवात केली.

20 बाय 10 फूट जागेत आहे दुकान
तसं पाहायला गेलं तर अय्यर यांचं दुकानात फक्त 20 बाय 10 फूट जागेत आहे. एवढ्या कमी जागेतून अय्यर इडलीने आपले विश्व निर्माण केले आहे. आता अय्यर परिवार दर महिन्याला या दुकानात 50,000 हून अधिक इडल्या विकत आहे. यामध्ये कृष्णनदेखील आपल्या कौशल्याचा वापर करत आहे. खाद्यपदार्थाची उच्च गुणवत्ता राखल्यामुळे हे शक्य झाले आहे. कृष्णन यांचे दुकान अत्यंत साधे आहे. ते दुकानाच्या फॅन्सी इंटीरियरकडे लक्ष देत नाहीत. ते फक्त इडलीची गुणवत्ता, स्वच्छता आणि चव यावर लक्ष केंद्रित करतात.

फ्लफी इडलीसाठी प्रसिध्द
जवळपास 9 वर्षे कृष्णनचे वडिल नारळाच्या चटणीसोबत इडल्या विकत होते. त्यांच्या चटणीची चव हजारो जणांच्या जिभेवर रेंगाळत होती. त्यामुळे त्यांच्या दुकानाच्या जवळपास अनेक रेस्टॉरंट्स असूनही, अय्यर इडली आजही त्यांच्या अनोख्या, फ्लफी आणि मऊ इडलीसाठी लोकप्रिय आहे.

या पदार्थांचा केला समावेश
कृष्णनने व्यवसाय हाती घेतला आणि त्यात (Success Story) चांगले बदल केले. इडलीची गुणवत्ता, ताजेपणा, स्वच्छता आणि चव यालाच प्राधान्य राहील, याची काळजी त्याने घेतली. सध्या कृष्णनने मेनूमध्ये वडा, केसरी भात (रवा, तूप, केशर आणि साखर घालून बनवलेले दक्षिण भारतीय मिष्टान्न) आणि खरा भात याचा समावेश केला आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com