Career Success Story : सोशल मिडीयापासून दूर राहून पुस्तकांशी केली मैत्री; या तरुणीने सलग 5 सरकारी परीक्षा केल्या पास

करिअरनामा ऑनलाईन । आपण पाहतो की, सरकारी नोकरी (Career Success Story) मिळवण्यासाठी तरुण-तरुणी दिवसाचा रात्र अन् रात्रीचा दिवस करुन अभ्यास करत असतात. सरकारी नोकरी मिळवणं हा विषय प्रतिष्ठेचासमजला जातो; त्यामुळे अनेकांना या परीक्षा पास करुन आपलं करिअर घडवायचं असतं. या स्पर्धेत आघाडी घेतली आहे बिहारमधील एका तरुणीने. तिने सरकारी नोकरी मिळवण्यासाठी एक-दोन नाही तर सलग 5 सरकारी परीक्षा पास केल्या आहेत. टीनू सिंह असं या तरुणीचं नाव आहे.

आईचं अपूर्ण स्वप्न पूर्ण केलं
टीनू सिंह (Tinu Singh) हिच्या आईने अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र, कौटुंबिक जबाबदारी, बेताची आर्थिक परिस्थिती यामुळे टीनूची आई पिंकी सिंह यांना आपले स्वप्न पूर्ण करता (Tinu Singh) आले नाही. पिंकी यांनी इंग्रजी विषयात एम.ए पूर्ण केले होते. याशिवाय त्यांनी बी. एड. ची (B.ed) पदवीही प्राप्त केली होती. पुढे आणखी अभ्यास करुन त्यांचे अधिकारी बनण्याचे स्वप्न होते. पण घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना अधिकारी बनता आले नाही. त्यामुळे त्या गृहिणीच राहिल्या. मात्र भविष्यात आईचे स्वप्न मुलीने पूर्ण केले आहे.

टीनूने परिक्षा पास करण्याचा धडाकाच लावला
टीनू सिंहने (Tinu Singh) एकापाठोपाठ एक अशा 5 सरकारी परिक्षेत यश मिळवले. तिच्या या कामगिरीचा कुटुंबियांनाही अभिमान वाटतो. तिचा मित्र परिवार आणि घरा शेजारील लोक तिच्या या यशामुळे फार आनंदी आहेत. एवढे यश मिळवूनही तिने अद्याप तिचे स्वप्न पूर्ण झाले नसल्याचे म्हटले आहे. तिला आणखी अभ्यास करुन सनदी अधिकारी बनायचे होते.

या परिक्षेत झाली पास (Career Success Story)
टीनू सिंह (Tinu Singh) हिने एका आठवड्यात 5 परिक्षांमध्ये यश मिळवलं. 22 डिसेंबरला तिची कंप्यूटर ऑपरेटरपदी निवड झाली होती. त्यानंतर त्याच्या पुढील दिवशी म्हणजे 23 डिसेंबरला बिहारच्या एसएससी सीजीएल (SSC CGL) परिक्षेत तिला यश मिळाले. त्यानंतर सहाय्यक शाखा पदाधिकारी या सरकारी पदासाठीही तिची निवड झाली होती.

BPSC परिक्षा पास करुन रचला विक्रम
वरिल 3 परिक्षांशिवाय बीपीएसच्या (BPS) शिक्षक भरती परिक्षेतही टीनूला 6-8 च्या कॅडरमध्ये यश मिळाले. याशिवाय बीपीएससी च्या शिक्षक भरतीमध्ये तिला 9 वी ते 10 वी आणि उच्च माध्यमिकच्या 11 वी ते 12 वी कॅडरमध्येही तिला यश मिळाले. टीनू तिच्या यशाचे सर्व श्रेय आपल्या आई -वडिलांना देते.

सोशल मीडियापासून दूर राहून पुस्तकांशी केली मैत्री
तरुण पिढी सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. दिवसातील (Career Success Story) तासन तास ते सोशल मीडियावर फुकट घालवतात. मात्र, टीनू या सोशल मीडियापासून दूर राहिली. कोणत्याच सोशल मीडियावरती तिचे अकाऊंट देखील नाही. तिने पुस्तकांशीच मैत्री केली. पुस्तकचं आपले चांगले मित्र असतात. शिवाय मी सातत्याने अभ्यास केला त्यामुळेच मला यश मिळाले, असा टीनू नेहमी सांगते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com