Home Blog Page 138

CTET Exam 2024 : शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरु; 7 जुलैला होणाऱ्या परीक्षेसाठी ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

CTET Exam 2024 (1)

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (CBSE) घेतली (CTET Exam 2024) जाणारी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेसाठी उमेदवारांना दि. 2 एप्रिलपर्यंत अर्ज भरता येणार आहे. ही परीक्षा दि. 7 जुलै रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी उमेदवारांची अर्ज नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

CBSEने यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक काढून माहिती दिली आहे. उमेदवारांना २ एप्रिलपर्यंत अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आली आहे; असे CBSEने स्पष्ट केले आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी राष्ट्रीय (CTET Exam 2024) शिक्षक शिक्षण परिषदेच्या (NCRE) निर्णयानुसार पहिली ते आठवीच्या वर्गांना शिकवण्यासाठी TET परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.

केंद्रीय स्तरावर CBSE कडून CTET परीक्षा आयोजित केली जाते. त्यानुसार येत्या 7 जुलैला होणारी CTET ही 19 वी परीक्षा आहे. देशभरातील 136 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. उमेदवारांना परीक्षा देण्यासाठी 20 भाषांचे पर्याय उपलब्ध आहेत.

अशी आहे पेपरची वेळ (CTET Exam 2024)
पेपर क्रमांक 1 सकाळी 09:30 ते 12;00 तर पेपर क्रमांक 2 दुपारी 04:30 या वेळेत होणार आहे. परीक्षेचा अभ्यासक्रम, भाषा, पात्रता, परीक्षा शुल्क, परीक्षा घेण्यात येणाऱ्या शहरांची नावे, महत्त्वाच्या तारखा असा संपूर्ण तपशील CTET च्या https://ctet.nic.in/ या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. या वेबसाईटवरुन उमेदवारांना परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज देखील करता येणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NBCC Recruitment 2024 : NBCC इंडिया लिमिटेड येथे ‘अनुवादक’ पदावर काम करण्याची संधी; दरमहा 77,000 पगार

NBCC Recruitment 2024 (1)

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन (NBCC Recruitment 2024) इंडिया लिमिटेड अंतर्गत भरतीची जाहिरात निघाली आहे. या माध्यमातून अनुवादक (अधिकृत भाषा) Gd. IV पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज प्रक्रिया अर्ज 18 मार्च 2024 पासून सुरु होईल आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 एप्रिल 2024 असणार आहे.

संस्था – नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड
भरले जाणारे पद – अनुवादक (Translator)
पद संख्या – 06 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 18 मार्च 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 एप्रिल 2024
वय मर्यादा – 30 वर्षे
अर्ज फी – Rs. 500/- plus GST on Rs. 500/ plus

मिळणारे वेतन – Rs. 22, 000/- ते 77,000/- दरमहा
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (NBCC Recruitment 2024)

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
अनुवादक (अधिकृत भाषा) Gd. IVPost Graduate or its equivalent in Hindi with English as one of the subjects at Degree level OR Post Graduate or its equivalent in English with Hindi as one of the subjects at Degree level from a recognized University with minimum 55%* marks (Desirable 60%) along with Degree or Diploma in Translation from English to Hindi or from Hindi to English from a recognized University/Institution. Knowledge of any one language other than Hindi included in the 8th Schedule of Constitution of India which should have been passed at the Matriculation or its equivalent examination from a recognized Board of Examination. Knowledge of computer in Hindi/English and MS Office.


असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. आवश्यक माहिती भरा; अपूर्ण अर्ज सरसकट नाकारला जाईल.
3. अर्ज शेवटच्या तारखे (NBCC Recruitment 2024) आगोदर सादर करावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 एप्रिल 2024 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.nbccindia.com
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ICMR NIMS Recruitment 2024 : सरकारी नोकरी!! महिन्याचा 70 हजार एवढा पगार; जाणून घ्या पात्रता

ICMR NIMS Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल स्टॅटिस्टिक्स (ICMR NIMS Recruitment 2024) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सल्लागार (वैद्यकीय), तंत्रज्ञ-III पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 18 मार्च 2024 आहे.

संस्था – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल स्टॅटिस्टिक्स
भरले जाणारे पद – सल्लागार (वैद्यकीय), तंत्रज्ञ-III
पद संख्या – 05 पदे
वय मर्यादा –
1. सल्लागार (वैद्यकीय) –70 वर्षे
2. तंत्रज्ञ-III – 30 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 18 मार्च 2024
मुलाखतीचा पत्ता – ICMR-NIMS, अन्सारी नगर, नवी दिल्ली-110029

भरतीचा तपशील – (ICMR NIMS Recruitment 2024)

पदपद संख्या 
सल्लागार (वैद्यकीय)01
तंत्रज्ञ-III04

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
सल्लागार (वैद्यकीय)Professionals having MBBS, BAMS, BHMS with six months R&D experience and published papersORRetired Government employees drawing pay in the Pay Band Rs. 15600-39100 + Grade Pay of Rs.5400/- at the time of retirement and having at least 20 years experience in the required domain/field (ICMR NIMS Recruitment 2024)
तंत्रज्ञ-III12th pass in science subjects and two years diploma in Medical Laboratory Technician or PMW or radiology/radiography or related subject or one year DMLT plus one year required experience in a recognized organisation or One year field/laboratory experience in Govt. Recognized organisation.*B.Sc degree shall be treated as 3-years’ experience

मिळणारे वेतन –

पदवेतन
सल्लागार (वैद्यकीय)Rs. 70,000/- Per Month (Consolidated)
तंत्रज्ञ-IIIRs. 18,000/- Per Month

निवड प्रक्रिया –
1. या भरतीसाठी निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. मुलाखतीस येताना उमेदवारांनी मूळ कागदपत्रे सोबत येताना आणणे बंधनकारक राहील.
3. केवळ इच्छुक आणि पात्र (ICMR NIMS Recruitment 2024) उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे.
4. मुलाखतीची तारीख 18 मार्च 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://main.icmr.nic.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Mumbai Prison Police Bharti 2024 : मुंबई कारागृह विभागात ‘पोलीस शिपाई’ पदांच्या 717 पदांवर भरती; त्वरा करा

Mumbai Prison Police Bharti 2024

करिअरनामा ऑनलाईन । मुंबई कारागृह पोलीस (Mumbai Prison Police Bharti 2024) विभाग अंतर्गत भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून पोलीस शिपाई पदांच्या एकूण 717 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे .

उमेदवारांनी हे लक्षात घ्यायचे आहे, की उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतो. 12 वी पास उमेदवार या भरती प्रक्रियेत पात्र ठरू शकतात. पोलिस (Mumbai Prison Police Bharti 2024) दलातील भरती ही शहरी तसेच ग्रामीण भागातील तरुणांसाठी महत्वाची ठरते. राज्यातील तरुण-तरुणी पोलिस दलातील भरतीची आतुरतेने वाट पाहत असतात. अशातच मुंबई कारागृह पोलीस विभाग अंतर्गत भरती जाहीर झाल्याने अनेक तरुणांच्या हाताला रोजगार मिळणार आहे. पाहूया भरती प्रक्रियेविषयी सविस्तर…

विभाग – मुंबई कारागृह पोलीस विभाग
भरले जाणारे पद – पोलीस शिपाई
पद संख्या – 717 पदे (Mumbai Prison Police Bharti 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2024

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा –
1. खुला वर्ग – 18 ते 28 वर्षे
2. मागासवर्गीय -18 ते 33 वर्षे
अर्ज फी –
1. खुला प्रवर्ग – रु. 450 /-
2. मागास प्रवर्ग – रु. 350 /-

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 12 वी पास असणे आवश्यक आहे.
आवश्यक शारीरिक पात्रता – (Mumbai Prison Police Bharti 2024)

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत अपलोड करावी.
4. दिलेल्या तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे.
निवड प्रक्रिया –
1. शारीरिक चाचणी
2. लेखी परीक्षा (Mumbai Prison Police Bharti 2024)
3. चारित्र्य प्रमाणपत्राची पडताळणी
4. वैद्यकीय चाचणी इ.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – mahaprisons.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career After 12th : 12 वी नंतर मेडिकल, इंजिनिअरिंग सोडून ‘या’ क्षेत्रातही करता येईल उत्तम करिअर

Career After 12th (7)

करिअरनामा ऑनलाईन । 12 वी नंतर काय करायचं? या प्रश्नाचे उतर (Career After 12th) शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. विज्ञान विषय घेऊन 12 वी पास झालाय; पण तुम्हाला डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हायचे नसेल, तर तुमच्यासाठी करिअरच्या मार्केटमध्ये अनेक ऑफबीट कोर्सेस उपलब्ध आहेत. 12वी सायन्स पूर्ण केल्यानंतर, तुम्ही UG PG डिप्लोमा/सर्टिफिकेट कोर्स करून डॉक्टर किंवा इंजिनियर होण्याशिवाय एका वेगळ्या क्षेत्रात चांगले करिअर बनवू शकता.

बहुतांश तरुणांना डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हायचं असतं. परंतु काही असे असतात ज्यांना या क्षेत्राकडे वळायचे नाही. सध्या असे अनेक कोर्सेस आहेत जिथे 12 वी सायन्स उत्तीर्ण झाल्यावर प्रवेश (Career After 12th) घेता येतो. हे कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही या क्षेत्रात चांगले करिअरही घडवू शकता. जाणून घेवूया असे पर्याय आणि यातील करिअरच्या संधीविषयी….

1. विज्ञान शिक्षक (Science Teacher)
सायन्स मधून 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही अध्यापनाशी संबंधित पदवी किंवा डिप्लोमा करू शकता. हे शिक्षण घेतल्यानंतर तुम्ही प्राथमिक शिक्षक स्तरापासून ते प्राध्यापक स्तरापर्यंत शिकवण्यासाठी सक्षम होऊ शकता. अध्यापन हे क्षेत्र हे सर्वोत्तम मानले जाते आणि यामहीए उत्तम पगारही मिळतो.

2. डेटा वैज्ञानिक (Data Scientist)
गेल्या काही वर्षांत डेटा सायन्स सायंटिस्ट आपल्या देशात खूप लोकप्रिय झाले आहेत. तुम्ही 12 वीनंतर गणित, सांख्यिकी किंवा अभियांत्रिकी या विषयात पदवी मिळवू शकता. यानंतर तुम्ही संबंधित प्रोग्रामिंग भाषा आणि संबंधित कौशल्ये शिकू शकता. यानंतर तुम्हाला यामध्ये प्रमाणपत्र/डिप्लोमा मिळवता येईल. एकदा तुम्ही डेटा सायंटिस्ट झालात की तुम्हाला लाखोत पगार मिळू शकतो.

3. वास्तुविशारद (Architect) (Career After 12th)
वर सांगितलेल्या पर्याया व्यतिरिक्त, जर तुम्ही तुमच्या पीसीएम विषयांसह इंटर पास केले असेल तर तुम्ही आर्किटेक्ट देखील होऊ शकता. या क्षेत्रात UG आणि PG असे दोन्ही अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. हे अभ्यासक्रम पूर्ण करून तुम्ही आर्किटेक्ट म्हणून काम करून लाखोमध्ये कमाई करू शकता.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

5th and 8th Annual Exam : इयत्ता 5 वी आणि वीची वार्षिक परीक्षा ‘या’ तारखेपासून; नापास झाला तर….

5th and 8th Annual Exam

करिअरनामा ऑनलाईन । यंदा इयत्ता 5वी आणि 8वीतील विद्यार्थ्यांना (5th and 8th Annual Exam) वार्षिक परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागणार आहे, जर हे विद्यार्थी या परिक्षेत नापास झाले तर त्यांना पुढच्या वर्गात जाताच येणार नाही. सुमारे 14 वर्षांनी RTE च्या नियमात बदल करण्यात आला आहे. या बदलप्रमाणे या दोन वर्गातील विद्यार्थ्यांना सरसकट पुढच्या वर्गात पाठविण्याचा प्रकार आता कायमचा बंद होणार आहे. इयत्ता 5 वी आणि 8 वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा दि. 2 एप्रिलपासून सुरू होणार आहे.

पास व्हावेच लागणार (5th and 8th Annual Exam)
RTE च्या धोरणानुसार इयत्ता 1ली ते 8 वीपर्यंतच्या मुलांना सरसकट उत्तीर्ण करण्याची पद्धत २०१० पासून सुरू झाली होती. या पद्धतीला अनेकांनी विरोध केला, तरीपण ही पद्धत राज्यभर लागू झाली. विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याच्या या पद्धतीमुळे इयत्ता दहावीतून शाळा सोडणाऱ्यांची आणि बारावीपर्यंतच शिक्षण घेणाऱ्यांची संख्या वाढू लागली. पाचवी व आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना किमान इंग्रजी, गणित, विज्ञान हे विषय व्यवस्थित समजणे गरजेचे आहे; जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेणे फार कठीण जाणार नाही; असे शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे. मुलांच्या भविष्याचा विचार करता त्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारावी या दृष्टिकोनातून आता पाचवी व आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा घेतली जाणार आहे. यामध्ये त्या विद्यार्थ्यांना पास व्हावेच लागणार आहे.

नापास झाल्यास मे महिन्यात मिळणार दुसरी संधी
नव्या नियमानुसार पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांना वार्षिक (5th and 8th Annual Exam) परीक्षा पास व्हावीच लागणार आहे. या परीक्षेत नापास झाल्यास त्या विद्यार्थ्यांना मे महिन्यात परीक्षा पास होण्याची संधी दिली जाणार आहे. यावेळी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांनाच पुढच्या वर्गात प्रवेश मिळेल.

प्रश्नपत्रिकेचा नमुना तयार
राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून 5वी व 8वीच्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका नमुना स्वरुपात तयार करण्यात आल्या आहेत. या धर्तीवर सर्व शाळांनी (5th and 8th Annual Exam) आपल्याकडील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक विषयांच्या प्रश्नपत्रिका तयार करायच्या आहेत. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा होणार असल्याने शाळांनी त्यादृष्टीने तयारी करावी; अशा सूचना ‘एसईआरटी’ने दिल्या आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : मायक्रोसॉफ्टची स्थापना केव्हा झाली? Botany हा शब्द कोणत्या भाषेतून घेतला? सरकारी परिक्षेत विचारले जाणारे प्रश्न

GK Updates 7 Mar

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न 1 – (GK Updates) 1919 मध्ये अखिल भारतीय खिलाफत परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती?
उत्तर –
1919 मध्ये दिल्लीत अखिल भारतीय खिलाफत परिषद आयोजित करण्यात आली होती.प्रश्न 2 – भारतातील कोणत्या प्रश्न 2 – शहरात सर्वाधिक चामड्याचे उत्पादन होते हे तुम्हाला माहिती आहे का?
उत्तर –
भारतातील उत्तर प्रदेश राज्यातील आग्रा शहरात सर्वात जास्त चामड्याचे उत्पादन केले जाते.

प्रश्न 3 – Botany हा शब्द कोणत्या भाषेतून घेतला आहे?
उत्तर –
Botany हा शब्द लॅटिन भाषेतून घेतला गेला आहे, ज्याला लॅटिनमध्ये Botane म्हणतात.
प्रश्न 4 – आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10,000 धावा करणारा पहिला फलंदाज कोण होता?
उत्तर – सुनील गावस्कर हा पहिला (GK Updates) फलंदाज आहे ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10,000 धावा केल्या आहेत.

प्रश्न 5 – ‘यादविंद्र कप’ कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
उत्तर –
यादवींद्र चषक हॉकीशी संबंधित आहे.
प्रश्न 6 – मायक्रोसॉफ्टची स्थापना केव्हा झाली?
उत्तर –
मायक्रोसॉफ्टची (GK Updates) स्थापना 1975 साली झाली.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

PG CET 2024 : कृषी विद्यापीठांमध्ये PG CET प्रवेश परीक्षेचा अर्ज करण्यासाठी मुदत वाढवली

PG CET 2024 (1)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र कृषी विद्यापीठे परीक्षा (PG CET 2024 ) मंडळे यांच्या वतीने पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षेकरिता अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना आता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दि. 20 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

परीक्षा मंडळाच्या वतीने राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध विद्याशाखांमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा घेण्यात येते. या सीईटी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी यापूर्वी २९ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. या मुदतीत वाढ केल्याने आता उमेदवारांना 20 मार्चपर्यंत अर्ज करता येणार आहे. ही सीईटी (CET) परीक्षा दि. 31 मे ते 2 जून 2024 या कालावधीत होणार आहे.

22 तारखेपर्यंत भरता येणार अर्ज फी
ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर परीक्षा शुल्क भरण्यासाठी दि. 22 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आह. या परिक्षेसंदर्भात अधिक माहितीसाठी https://www.mcaer.org या संकेतस्थळावर भेट द्यावी; असे आवाहन परीक्षा मंडळाचे नियंत्रक डॉ. अमोल देठे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Railtel Recruitment 2024 : रेलटेल अंतर्गत व्यवस्थापक पदावर नोकरीची संधी; थेट मुलाखतीने होणार निवड

Railtel Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत (Railtel Recruitment 2024) सरकारी नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून जिल्हा व्यवस्थापक पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 27 मार्च 2024 आहे.

संस्था – रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया
भरले जाणारे पद – जिल्हा व्यवस्थापक
पद संख्या – 05 पदे
निवड प्रक्रिया – मुलाखत
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 मार्च 2024
मुलाखतीचा पत्ता – रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड रेलल मायक्रोवेव्ह कॉम्प्लेक्स, रेल्वे टेलिफोन एक्सचेंज, रेल्वे स्टेशन चंदीगड- १६०० ००२
वय मर्यादा – २१ ते ५० वर्षे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Railtel Recruitment 2024)

जिल्हा व्यवस्थापकB.Tech/Diploma in Electronics & MCA/BCA/M.Sc. IT

निवड प्रक्रिया –
1. इच्छुक उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे.
2. उमेदवारानेदिलेल्या (Railtel Recruitment 2024) तारखेला मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे.
3. मुलाखतीची तारीख 27 मार्च 2024 आहे.
4. उमेदवारांनी मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://railtel.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Mahavitaran Recruitment 2024 : ग्रॅज्युएट उमेदवारांना नोकरीची मोठी संधी!! महावितरणमध्ये ‘या’ पदावर भरती सुरु

Mahavitaran Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । पदवीधारक उमेदवारांसाठी नोकरीची उत्तम (Mahavitaran Recruitment 2024) संधी निर्माण झाली आहे. महावितरण चंद्रपूर अंतर्गत पदविधारक, पदविकाधारक पदांच्या एकूण 61 रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मार्च 2024 आहे.

संस्था – महावितरण चंद्रपूर
भरले जाणारे पद – पदविधारक, पदविकाधारक
पद संख्या – 61 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 मार्च 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – चंद्रपूर

भरतीचा तपशील – (Mahavitaran Recruitment 2024)

पदपद संख्या 
पदविधारक40 posts
पदविकाधारक 21 posts

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
पदविधारकGraduation
पदविकाधारक Post Graduation

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी PDF काळजीपूर्वक वाचावे. (Mahavitaran Recruitment 2024)
3. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावा.
4. दिलेल्या मुदती अगोदर अर्ज सादर करा; उशिरा आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मार्च 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://chanda.nic.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com