Home Blog Page 137

UPSC Success Story : रिझर्व्ह बँकेची नोकरी सोडून तरुणीचा UPSC मध्ये डंका; पहिल्याच प्रयत्नात पास होवून IAS बनली

UPSC Success Story of IAS Ananya Das

करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवारांना UPSC नागरी सेवा परीक्षा (UPSC Success Story) पास होण्यासाठी 2 ते 3 किंवा त्यापेक्षा जास्त प्रयत्न करावे लागतात. अनेक जण अगदी शेवटच्या प्रयत्नातही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकत नाहीत. शेवटी त्यांना दूसरा पर्याय शोधावा लागतो. पण आज आपण IAS अधिकारी अनन्या दास यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी अगदी पहिल्याच प्रयत्नात UPSCची नागरी सेवा परीक्षा पास केली आहे. त्यांनी 2015 मध्ये ही परीक्षा पास केली आणि अधिकारी बनल्या. आज त्या तरुण पिढीसाठी प्रेरणास्थान बनल्या आहेत.

IAS अनन्या दास (IAS Ananya Das) यांनी IIT बॉम्बे मधून कॉम्प्युटर सायन्स मध्ये अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली आहे. अभियांत्रिकी केल्यानंतर, त्यांनी UPSC नागरी सेवा परीक्षेची तयारी केली आणि संपूर्ण भारतात 16 वा क्रमांक मिळवून त्या पहिल्याच प्रयत्नात IAS अधिकारी बनल्या आहेत.

मूळची ओडिशाची रहिवासी (UPSC Success Story)
अनन्या या मूळच्या ओडिशा येथील रहिवासी आहेत. त्यांचा जन्म 15 मे 1992 रोजी झाला. त्यांचे वडील बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करत होते; आणि सध्या ते सेवानिवृत्त आहेत. अनन्या नेहमीच अभ्यासात हुशार राहिल्या आहेत. भारतीय तंत्रज्ञान संस्था, बॉम्बे (IIT Bombay) मधून त्यांनी संगणक विज्ञान विषयात B.Tech ची पदवी प्राप्त केली आहे. नंतर त्यांनी बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ऑफ सायन्स, पिलानी (BITS Pilani) येथून अर्थशास्त्र विषयात M.Sc. पर्यंतच शिक्षण पूर्ण केलं.

उच्च शिक्षण घेवून केली नोकरी
बी.टेक पूर्ण केल्यानंतर काही काळ त्या एका बहुराष्ट्रीय कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून नोकरी करत होत्या. त्यानंतर, त्यांनी जयपूर येथे भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) मध्ये एक्झिक्युटिव्ह इंटर्न म्हणून 3 महिने काम केले आहे.

UPSCसाठी नोकरी सोडली
9 ते 5 च्या नोकरीत कामाचं समाधान मिळत नव्हतं. यानंतर त्या नागरी सेवा परीक्षेकडे वळल्या. अनन्या UPSC अभ्यासासाठी नेहमीच प्रेरित राहिल्या. नागरी सेवा परीक्षेच्या तयारीसाठी (UPSC Success Story) त्यांनी नोकरी सोडली. नोकरी सोडून अनन्या यांनी नागरी सेवा परीक्षेची इतकी कसून तयारी केली की पहिल्याच प्रयत्नात त्यांनी या परीक्षेत 16 वा क्रमांक पटकावला.

घटस्फोट आणि दुसरं लग्न
अनन्या सध्या संबलपूरच्या जिल्हाधिकारी म्हणून धुरा सांभाळत आहेत. अनन्या यांनी 2014 मध्ये आयएएस अधिकारी चंचल राणासोबत (IAS Chanchal Rana) लग्न केले. त्यांचे पहिले लग्न आयएएस अब्दुल अख्तर (IAS Abdul Akhtar) यांच्याशी झाले होते, परंतु लवकरच त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर त्यांनी दुसऱ्या लग्नाचा विचार केला.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NEET Exam 2024 : भावी डॉक्टरांनो… NEET परीक्षेस अर्ज करण्याची मुदत वाढली; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

NEET Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । वैद्यकीय अभ्यासक्रमाच्‍या प्रवेशासाठी (NEET Exam 2024) अनिवार्य असलेल्या राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षेस (NEET) अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. आता विद्यार्थ्यांना दि. 16 मार्चपर्यंत अर्ज करता येणार आहे. यावर्षी दि. 5 मे रोजी ही परीक्षा होणार आहे.

राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणातर्फे वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी (NEET Exam 2024) परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेस अर्ज करण्यासाठी 9 मार्च पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र काही कारणास्तव अद्यापही काही विद्यार्थी अर्ज भरू शकले नाहीत. काहींचे अर्ज अपुरे असल्याने अर्ज करण्यास मुदतवाढ देण्याची मागणी होत होती. त्‍यानंतर एनटीएने (NTA) मुदतवाढ देत विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे.

14 जूनला जाहीर होणार निकाल (NEET Exam 2024)
देशस्‍तरावरील होणारी नीट ही प्रवेश परीक्षा दि. 5 मे रोजी होणार असून या परीक्षेचा निकाल दि. 14 जूनला जाहीर होणार आहे. मराठी भाषेसह देशातील एकूण १३ भाषांमध्ये ही परीक्षा देता येते. परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम, शुल्‍क याबाबतची सविस्‍तर माहिती एनटीएच्‍या संकेतस्‍थळावर उपलब्ध आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : मधाची चव कशामुळे गोड लागते? तुमचं सामान्य ज्ञान वाढवणारे प्रश्न पहाच

GK Updates 10 Mar.

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न – मधामध्ये असे काय आढळते ज्यामुळे त्याची चव गोड लागते?
उत्तर – फ्रक्टोज नावाचा पदार्थ मधामध्ये आढळतो, ज्यामुळे त्याची चव गोड होते.
प्रश्न – मानवी शरीरात गुणसूत्रांच्या किती जोड्या आढळतात?
उत्तर – (GK Updates) मानवी शरीरात गुणसूत्रांच्या 23 जोड्या आढळतात.

प्रश्न – नारळाचा खाण्यायोग्य भाग काय म्हणून ओळखला जातो?
उत्तर – नारळाचा खाण्यायोग्य भाग एंडोस्पर्म म्हणून ओळखला जातो.
प्रश्न – कावीळ नावाच्या आजाराने (GK Updates) आपल्या शरीराचा कोणता भाग प्रभावित होतो?
उत्तर – काविळीमुळे आपल्या यकृतावर परिणाम होतो.

प्रश्न – आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात लांब षटकार मारण्याचा विक्रम कोणत्या फलंदाजाच्या नावावर आहे?
उत्तर – आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात लांब षटकार मारण्याचा विक्रम माजी पाकिस्तानी फलंदाज शाहिद आफ्रिदीच्या नावावर आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 158 मीटरमध्ये षटकार मारला होता आणि आजपर्यंत त्याचा विक्रम कोणीही मोडू शकले नाही. (GK Updates)
प्रश्न – ब्लीचिंग पावडर पाण्यात का मिसळली जाते हे माहिती आहे का?
उत्तर – पाणी स्वच्छ करण्यासाठी ब्लीचिंग पावडर पाण्यात मिसळले जाते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ZP Recruitment 2024 : पात्रता फक्त 12 वी पास; डेटा एंट्री ऑपरेटर पदावर नोकरीची संधी; मिळवा आकर्षक पगार

ZP Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । जिल्हा परिषद, धुळे अंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर (ZP Recruitment 2024) पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. 12 वी पास उमेदवार या भरतीसाठी अर्ज करु शकतात. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2024 आहे.

संस्था – जिल्हा परिषद, धुळे
पदाचे नाव – डेटा एंट्री ऑपरेटर
पद संख्या – 04 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – धुळे
वय मर्यादा – किमान १८ व कमाल ३५ वर्षे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मार्च 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद धुळे
मिळणारे वेतन – Rs.20,650/- दरमहा (ZP Recruitment 2024)

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदशैक्षणिक पात्रता
डेटा एंट्री ऑपरेटरकिमान १२ वी पास (पदवीधर उमेदवारास प्राधान्य)मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि.इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि.एम.एस.सी.आय टी किंवा केंद्रशासनाची या संदर्भातील तुल्यबळ संगणकाची परीक्षाउत्तीर्ण असणे आवश्यक आहे

असा करा अर्ज – (ZP Recruitment 2024)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनीं नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://zpdhule.maharashtra.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

AERA Recruitment 2024 : थेट राजधानी दिल्लीत नोकरीची संधी!! भारतीय विमानतळ प्राधिकरणात भरती सुरु

AERA Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय विमानतळ आर्थिक नियामक (AERA Recruitment 2024) प्राधिकरण अंतर्गत भरती जाहीर झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून संचालक (धोरण आणि सांख्यिकी), अवर सचिव (धोरण आणि सांख्यिकी), खंडपीठ अधिकारी, तांत्रिक व्यवस्थापक, कनिष्ठ हिंदी अनुवादक, रिसेप्शनिस्ट-कम-टेलिफोन ऑपरेटर पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन व ऑनलाईन(ई- मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 एप्रिल 2024 आहे.

संस्था – भारतीय विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरण
भरली जाणारी पदे –संचालक (धोरण आणि सांख्यिकी), अवर सचिव (धोरण आणि सांख्यिकी), खंडपीठ अधिकारी, तांत्रिक व्यवस्थापक, कनिष्ठ हिंदी अनुवादक, रिसेप्शनिस्ट-कम-टेलिफोन ऑपरेटर
पद संख्या – 08 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन/ऑनलाईन
अर्जासाठी ई-मेल ID [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 एप्रिल 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – उप प्रमुख, भारतीय विमानपत्तन आर्थिक विनियामक प्राधिकरण, ऐरा भवन, प्रशासनिक कॉमप्लेक्स, सफदरजंग हवाईअड्डा, नई दिल्ली 110003

नोकरी करण्याचे ठिकाण – नवी दिल्ली
वय मर्यादा –56 वर्ष
भरतीचा तपशील – (AERA Recruitment 2024)

पदपद संख्या 
संचालक (धोरण आणि सांख्यिकी)01 post
अवर सचिव (धोरण आणि सांख्यिकी)03 posts
खंडपीठ अधिकारी01 post
तांत्रिक व्यवस्थापक01 post
कनिष्ठ हिंदी अनुवादक01 post
रिसेप्शनिस्ट-कम-टेलिफोन ऑपरेटर01 post

मिळणारे वेतन –

पदवेतन
संचालक (धोरण आणि सांख्यिकी)पीबी 4 (₹ 37,400-67000; ग्रेडपे ₹ 8700)/ स्तर 13
अवर सचिव (धोरण आणि सांख्यिकी)पीबी 3 (₹ 15600-39100; ग्रेडपे ₹ 6600)/ स्तर 11 03 पीबी 3 (₹ 15600-39100; ग्रेडपे
खंडपीठ अधिकारीपीबी 3 (₹ 15600-39100; ग्रेडपे ₹ 6600)/ स्तर 11
तांत्रिक व्यवस्थापकपीबी 3 (₹ 15600-39100; ग्रेडपे ₹ 5400)/ स्तर 10
कनिष्ठ हिंदी अनुवादकपीबी 2 (₹ 9300-34800; ग्रेडपे ₹ 4200)/ स्तर 6
रिसेप्शनिस्ट-कम-टेलिफोन ऑपरेटरपीबी । (₹ 5200-20200; ग्रेडपे ₹ 1900)/ स्तर 2 स्तर 2

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन किंवा ऑनलाइन(ई-मेल)पद्धतीने करायचा आहे.
2. उमेदवारांनी अर्ज पदांनुसार संबंधित पत्त्यावर आवश्यक कागदपत्रांसह पाठवावा.
3. उशिरा आलेल्या अर्जाचा (AERA Recruitment 2024) भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 एप्रिल 2024आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://aera.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MOIL Recruitment 2024 : डिग्री धारकांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी!! MOIL अंतर्गत ‘या’ पदावर भरती सुरु

MOIL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । MOIL लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदे (MOIL Recruitment 2024) भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. ही सरकारी नोकर भरती आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2024 आहे.

तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अपडेट महत्वाची आहे. बॅचलर्स डिग्रीधारक उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरणार आहेत. या भरतीच्या माध्यमातून पदवीधर प्रशिक्षणार्थी, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, व्यवस्थापक पदांच्या एकूण 44 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत; त्यामुळे विलंब न करता उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवरुन अर्ज करायचा आहे.

संस्था – MOIL Limited (MOIL Recruitment 2024)
भरली जाणारी पदे – पदवीधर प्रशिक्षणार्थी, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, व्यवस्थापक
पद संख्या – 44 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 मार्च 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर
आवश्यक शैक्षणिक पात्रता – Bachelor’s degree with minimum 60% marks
वय मर्यादा – 18 to 30 years (as of March 21, 2024)

भरतीचा तपशील – (MOIL Recruitment 2024)

पदपद संख्या 
पदवीधर प्रशिक्षणार्थी25 पदे
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी17 पदे
व्यवस्थापक02 पदे

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इतर कोणत्याही माध्यमातून आलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही.
3. उमेदवारांनी खाली (MOIL Recruitment 2024) दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करायचा आहे.
4. ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी PDF नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.moil.nic.in/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : ‘स्टाफ नर्स’ पदावर नोकरीची मोठी संधी!! ताबडतोब पाठवा अर्ज

Job Notification - 2024-03-10T171517.025

करिअरनामा ऑनलाईन । वसई विरार महानगरपालिकेत रिक्त (Job Notification) पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज पोहोच करण्याची शेवटची तारीख 13 मार्च 2024 आहे.

GNM अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही भरती असणार आहे; कारण या भरतीच्या माध्यमातून ‘स्टाफ नर्स’ पदाच्या एकूण 21 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये निवड (Job Notification) झालेल्या उमेदवारांना महिन्याला 34 हजार 800 रुपये पगार मिळू शकतो. इच्छुक उमेदवारांनी विलंब न करता आवश्यक कागदपत्रासह या भरतीसाठी अर्ज पाठवायचा आहे.

संस्था – वसई विरार महानगरपालिका
भरले जाणारे पद – स्टाफ नर्स (GNM)
पद संख्या – 21 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 मार्च 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय आरोग्य विभाग, महानगरपालिका बहुउद्देशिय इमारत, प्रभाग समिती “सी” कार्यालय, चौथा मजला. विरार (पू)

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Notification)
1. उमेदवार 12वी विज्ञान शाखेतील परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2. उमेदवाराकडे नर्सिंग कौन्सिलची जनरल नर्सिंग व मिडवाईफरी विषयाची पदविका असणे आवश्यक.
3. महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची (Job Notification) नोंदणी केली असावी.
वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 66 वर्षापर्यंत
मिळणारे वेतन – रु.३४,८००/- (शासन रु.२०,०००/- + मनपा रु.१४,८००/-)
नोकरी करण्याचे ठिकाण – वसई विरार (महाराष्ट्र)

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – vvcmc.in
शुध्दीपत्रक मुदतवाढ येथे CLICK करा – CLICK
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : राज्यातील ‘या’ विद्यापीठात नोकरीची संधी; दरमहा मिळवा 45 हजार पगार

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । महात्मा फुले कृषी विद्यापीठात भरती (Job Alert) निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहायक प्राध्यापक (कृषी शास्त्र) पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2024 आहे.

संस्था – महात्मा फुले कृषी विद्यापीठ
भरले जाणारे पद – सहायक प्राध्यापक (कृषी शास्त्र)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (Job Alert)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मार्च 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – राहुरी, नाशिक (महाराष्ट्र)

आवश्यक शैक्षणिक पात्रता – पीएच.डी. किंवा Master’s degree (NET/SET/SLET)
परीक्षा फी – 500/- रुपये
मिळणारे वेतन – 25,000/- रुपये ते 45,000/- रुपये दरमहा
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहयोगी डीन, कृषी महाविद्यालय, मुक्ताईनगर, जि. जळगाव – 425 306

काही महत्वाच्या लिंक्स – (Job Alert)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.mpkv.ac.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Success Story : पैसे नव्हते मजुरी केली पण अभ्यास सोडला नाही… प्लॅटफॉर्मवर काढल्या अनेक रात्री; आधी IIT मग असे झाले IAS

UPSC Success Story IAS M. Shivaguru Prabhakaran

करिअरनामा ऑनलाईन । आपल्याला आयुष्यात काहीतरी चांगले (UPSC Success Story) करायचे आहे; या इच्छेतल येणाऱ्या अनेक अडचणींमुळे बहुतेक तरुण पराभूत होतात. परंतु काही लोक असे असतात जे प्रतिकूल परिस्थितीच्या विरोधात जातात आणि आपली इच्छा पूर्ण करूनच दाखवतात. आज आपण अशाच एका तरुणाची यशोगाथा वाचणार आहोत. एम. शिवगुरु प्रभाकरन (IAS M. Shivaguru Prabhakaran) असं यांचं नाव आहे. सध्या ते तामिळनाडूचे आयएएस (IAS) अधिकारी आहेत. शिवगुरू प्रभाकरन हे यूपीएससीची तयारी करणाऱ्यांसाठी एक मोठे उदाहरण आहेत.

आई आणि बहिणीने हिंमतीने घर चालवले
शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या प्रभाकरनने लहानपणापासूनच आई आणि बहिणीने घेतलेले अथक परिश्रम पाहिले आहेत. त्यांच्या वडिलांना दारूचे व्यसन होते, त्यामुळे घरात रोज भांडणे होत होती, या (UPSC Success Story) वातावरणात त्यांच्या कुटुंबातील दोन्ही महिला काबाडकष्ट करून उदरनिर्वाह करत होत्या. मुलाला अधिकारी बनवण्यासाठी आई आणि बहीण बांबूच्या टोपल्या विणून विकत असत. समोर अनेक आव्हाने होती पण त्यांना न जुमानता प्रभाकरनने आपली स्वप्ने पूर्ण करण्याचा निर्धार केला होता.

अर्ध्यातच शिक्षण सोडावे लागले (UPSC Success Story)
प्रभाकरन (IAS M. Shivaguru Prabhakaran) यांनी स्वप्न मोठे पाहिले होते; पण वेळ खराब होती. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्यांना आपले शिक्षण अर्ध्यातच सोडावे लागले. ते लाकडे कापण्याच्या कंपनीत काम करु लागले. या दरम्यान त्यांच्या बहिणीचे लग्न झाले. यानंतर त्यांनी पुन्हा अभ्यास सुरू केला. आपल्या भावाचे आणि स्वतःचे शिक्षण सांभाळत, त्याने वेल्लोर येथील थंथाई पेरियार गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे सिव्हिल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले. इथेही त्याने स्वतःचे आणि भावाचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी काम करुन पैसे कमावले.

सॉ मिलध्ये काम केल्यानंतर प्रभाकरन रेल्वे स्टेशनवर जाऊन अभ्यास करायचे. यावेळी त्यांना मागासलेल्या लोकांसाठी प्रशिक्षणाची सुविधा देणाऱ्या ‘सेंट थॉमस माऊंट’ची माहिती मिळाली. यामुळे प्रभाकरन यांचे आयुष्य बदलले. त्यांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळाला, त्यानंतर त्यांनी कसून मेहनत घेतली आणि एमटेक (M. Tech) मध्ये टॉप रँक मिळवली.

अनेक रात्री रेल्वे स्टेशनवर काढल्या
पूर्णवेळ काम आणि वीकेंडला अभ्यास; असा समतोल (UPSC Success Story) साधत त्यांनी या प्रवासात अनेक अडचणींचा सामना केला. ते अनेकदा स्टेशनवरच रात्र काढत असत. त्यांच्यातील जिद्दीमुळे आव्हानांचा सामना करण्यास मदत झाली; असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

UPSC मध्ये अनेक वेळा अपयश आले
पदव्युत्तर पदवी पूर्ण केल्यानंतर, प्रभाकरनने अनेक अडथळ्यांना तोंड देत UPSC परीक्षेवर लक्ष केंद्रित केले. पण सुरवातीच्या तिन्ही प्रयत्नांमध्ये त्यांना अपयश आले. त्यांचा निर्धार पक्का होता. प्रभाकरन चौथ्या प्रयत्नात यशस्वी झाले. त्यांनी 2017 मध्ये झालेल्या संघ लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत संपूर्ण (UPSC Success Story) भारतातून 101वी रँक मिळवली. अखेर प्रभाकरन यांचं स्वप्न पूर्ण झालं आणि ते IAS अधिकारी बनण्यात यशस्वी झाले. आर्थिक संकट आणि कौटुंबिक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आयएएस (IAS) अधिकारी प्रभाकरन यांचा जीवन प्रवास सुरू झाला, त्यांनी जिद्दीने स्वप्ने पूर्ण करून प्रतिकूल परिस्थितीला पूर्णपणे बदलून टाकले.अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Recruitment 2024 : UPSCची महत्वाची अपडेट!! 1056 पदांच्या भरतीसाठी ‘या’ तारखेपर्यंत अर्जात दुरुस्ती करता येणार

UPSC Recruitment 2024 (4)

करिअरनामा ऑनलाईन । संघ लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षेची तयारी (UPSC Recruitment 2024) करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने अर्ज सुधारणा विंडो सुरू केली आहे. त्यामुळे आता उमेदवार त्यांचे अर्ज चुकले असतील तर ते दुरुस्त करू शकतात. इच्छुक उमेदवारांसाठी ही मोठी संधी ठरणार आहे. या भरतीसाठी 14 फेब्रुवारीपासून अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. या भरती अंतर्गत सरकारने 1056 रिक्त पदे जाहीर केली आहेत. उमेदवारांनी मोठ्या संख्येने आपले अर्ज देखील सादर केले होते. जर तुम्हाला तुमच्या अर्जामध्ये सुधारणा करायची असेल तर दि. 12 मार्चपर्यंत तुम्ही ही सुधारणा करू शकता.

आयोग – संघ लोकसेवा आयोग
परीक्षेचे नाव – UPSC CSE 2024 आणि UPSC वन सेवा पूर्व परीक्षा 2024
पद संख्या – 1056 पदे (UPSC Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज दुरुस्त करण्याची शेवटची तारीख – 12 मार्च 2024

वय मर्यादा – (UPSC Recruitment 2024)
1. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2023 रोजी 21 ते 32 वर्षे
2. SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट
परीक्षा फी – (UPSC Recruitment 2024)
जनरल/ओबीसी/100/-
SC/ST/PWD/महिला – फी नाही

मिळणारे वेतन – 56,100/- ते 70,000/- रुपये दरमहा (आरोग्य लाभ, प्रवास प्रतिपूर्ती, स्थगित वेतन आणि अतिरिक्त लाभ)
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत
पूर्व परीक्षा तारीख – 26 मे 2024
मुख्य परीक्षा तारीख – नंतर जाहीर केली जाईल

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – upsc.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com