GK Updates : मधाची चव कशामुळे गोड लागते? तुमचं सामान्य ज्ञान वाढवणारे प्रश्न पहाच

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न – मधामध्ये असे काय आढळते ज्यामुळे त्याची चव गोड लागते?
उत्तर – फ्रक्टोज नावाचा पदार्थ मधामध्ये आढळतो, ज्यामुळे त्याची चव गोड होते.
प्रश्न – मानवी शरीरात गुणसूत्रांच्या किती जोड्या आढळतात?
उत्तर – (GK Updates) मानवी शरीरात गुणसूत्रांच्या 23 जोड्या आढळतात.

प्रश्न – नारळाचा खाण्यायोग्य भाग काय म्हणून ओळखला जातो?
उत्तर – नारळाचा खाण्यायोग्य भाग एंडोस्पर्म म्हणून ओळखला जातो.
प्रश्न – कावीळ नावाच्या आजाराने (GK Updates) आपल्या शरीराचा कोणता भाग प्रभावित होतो?
उत्तर – काविळीमुळे आपल्या यकृतावर परिणाम होतो.

प्रश्न – आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात लांब षटकार मारण्याचा विक्रम कोणत्या फलंदाजाच्या नावावर आहे?
उत्तर – आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात लांब षटकार मारण्याचा विक्रम माजी पाकिस्तानी फलंदाज शाहिद आफ्रिदीच्या नावावर आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 158 मीटरमध्ये षटकार मारला होता आणि आजपर्यंत त्याचा विक्रम कोणीही मोडू शकले नाही. (GK Updates)
प्रश्न – ब्लीचिंग पावडर पाण्यात का मिसळली जाते हे माहिती आहे का?
उत्तर – पाणी स्वच्छ करण्यासाठी ब्लीचिंग पावडर पाण्यात मिसळले जाते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com