UPSC Recruitment 2024 : UPSCची महत्वाची अपडेट!! 1056 पदांच्या भरतीसाठी ‘या’ तारखेपर्यंत अर्जात दुरुस्ती करता येणार

करिअरनामा ऑनलाईन । संघ लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षेची तयारी (UPSC Recruitment 2024) करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने अर्ज सुधारणा विंडो सुरू केली आहे. त्यामुळे आता उमेदवार त्यांचे अर्ज चुकले असतील तर ते दुरुस्त करू शकतात. इच्छुक उमेदवारांसाठी ही मोठी संधी ठरणार आहे. या भरतीसाठी 14 फेब्रुवारीपासून अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. या भरती अंतर्गत सरकारने 1056 रिक्त पदे जाहीर केली आहेत. उमेदवारांनी मोठ्या संख्येने आपले अर्ज देखील सादर केले होते. जर तुम्हाला तुमच्या अर्जामध्ये सुधारणा करायची असेल तर दि. 12 मार्चपर्यंत तुम्ही ही सुधारणा करू शकता.

आयोग – संघ लोकसेवा आयोग
परीक्षेचे नाव – UPSC CSE 2024 आणि UPSC वन सेवा पूर्व परीक्षा 2024
पद संख्या – 1056 पदे (UPSC Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज दुरुस्त करण्याची शेवटची तारीख – 12 मार्च 2024

वय मर्यादा – (UPSC Recruitment 2024)
1. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2023 रोजी 21 ते 32 वर्षे
2. SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट
परीक्षा फी – (UPSC Recruitment 2024)
जनरल/ओबीसी/100/-
SC/ST/PWD/महिला – फी नाही

मिळणारे वेतन – 56,100/- ते 70,000/- रुपये दरमहा (आरोग्य लाभ, प्रवास प्रतिपूर्ती, स्थगित वेतन आणि अतिरिक्त लाभ)
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत
पूर्व परीक्षा तारीख – 26 मे 2024
मुख्य परीक्षा तारीख – नंतर जाहीर केली जाईल

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – upsc.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com