करिअरनामा ऑनलाईन । “पंतप्रधान बेरोजगार भत्ता योजनेअंतर्गत (Big News) केंद्र सरकार प्रत्येक महिन्याला 10 वी पास तरुणांना प्रत्येकी 6 हजार रुपये देणार”; हे ऐकून तुम्हालाही नक्कीच आनंद झाला असेल. पण असा दावा करणारा एक मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामधून तुमची फसवणूक होणार हे निश्चित. या व्हायरल होणाऱ्या मेसेजपासून तुम्ही चार हात लांबच रहा. काय आहे फॅक्टचेक पाहूया….
मेसेज मधून कोणतं आवाहन करण्यात येतंय व्हायरल होत असलेल्या मेसेजनुसार बेरोजगार तरुणांना सरकार प्रत्येक महिन्याला 6 हजार रुपये देणार आहे. पंतप्रधान बेरोजगार भत्ता योजनेअंतर्गत नोंदणी सुरू करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत सरकार (Government) तरुणांना भत्ता देणार आहे. त्यामुळे आपल्या मोबाइलवर खालील लिंकवर तात्काळ क्लिक करून अर्ज करा; असं आवाहन या मेसेजमध्ये करण्यात आलं आहे. मात्र हा संदेश बनावट आहे. अशी कोणतीही योजना भारत सरकार चालवत नाही. त्यामुळे प्रत्येकाने सावध राहण्याची गरज आहे.
देशातील अनेक तरुण सध्या बेरोजगारीने त्रस्त आहेत. सरकारी नोकरी असो वा खासगी नोकरी.. तरुण-तरुणी वेगवेगळ्या पर्यायांमधून नोकरीचा शोध घेत आहेत. अशा तरुणांची (Big News) कमजोरी लक्षात घेवून काही स्कॅमर यांना गंडा घालण्याचा प्रयत्न करत असतात. अशावेळी सोशल मिडियाच्या माध्यमातून अतिशय वेगाने नोकरीच्या शोधत असलेल्या तरुणांपर्यंत पोहचले जाते. व्हायरल मेसेजच्या माध्यमातून अशा तरुणांना जाळ्यात ओढलं जातं.
संशयास्पद लिंक क्लिक करू नका (Big News) तुम्ही कोणत्याही संशयास्पद लिंकवर कधीही क्लिक करू नका. अशा मेसेज मार्फत तुमच्या खात्यातील माहिती चोरण्याचा प्रयत्न करण्यात येतो; ज्यामुळे तुम्हाला आर्थिक फटकाही बसू शकतो. स्वतःचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आपली वैयक्तिक माहिती कोणालाही न देण्याचे आवाहन पीआयबी फॅक्टचेकने केले आहे. अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com
करिअरनामा ऑनलाईन । 12 वी पास झाल्यानंतर तुम्हाला काही (Career in Aviation) चांगले करायचे असेल, परंतु कोणत्या क्षेत्रात जावे याबद्दल जर संभ्रमात असाल तर हा लेख तुमच्यासाठी महत्वाचा आहे. तुम्ही पायलट बनू शकता आणि आकाशात उंच उडू शकता. फार कमी लोक या क्षेत्रात करिअर करण्याचा विचार करतात; कारण आहे या क्षेत्राबद्दल असलेला माहितीचा अभाव. पायलट झाल्यानंतर तुम्ही लाखो रुपयांपर्यंत कमाई करू शकता. पाहूया या क्षेत्रातील करिअरच्या संधीविषयी…
काय आहे आवश्यक पात्रता या क्षेत्रात करिअर करण्यासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांसह किमान 50 टक्के गुणांसह 12वी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. यानंतर, कोणत्याही एव्हिएशन इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा, वैद्यकीय चाचणी आणि मुलाखत उत्तीर्ण करावी लागेल. या सर्व फेऱ्या पार केल्यानंतर तुम्हाला एव्हिएशन इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश मिळतो. येथे, तुम्हाला विमानाशी संबंधित गुंतागुंत शिकवण्याबरोबरच विमान उडवण्याचे पूर्ण प्रशिक्षण दिले जाते.
हवाई दलात भरती होण्याची मिळते संधी जर तुम्हाला भारतीय हवाई दलात (Indian Air Force) पायलट बनण्याची इच्छा असेल तर 12वी नंतर तुम्हाला UPSC NDA परीक्षा, Air Force Common Admission Test (AFCAT), NCC स्पेशल एंट्री स्कीम परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल, त्यानंतर निवडलेल्या उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाते. भारतीय हवाई दलात पायलट म्हणून नोकरी मिळविण्यासाठी, तुम्ही संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा देखील देऊ शकता.
कमर्शियल पायलट होण्याची संधी बारावीनंतर एव्हिएशन इन्स्टिट्यूटमधून प्रशिक्षण घेऊन तुम्ही (Career in Aviation) व्यावसायिक पायलटही (Commercial Pilot) होऊ शकता. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर, तुम्हाला व्यावसायिक पायलट परवान्यासाठी (CPL) फिटनेस चाचणी आणि लेखी परीक्षा द्यावी लागेल. यानंतर, यशस्वी उमेदवार कमर्शियल पायलट म्हणून त्यांचे करिअर सुरू करू शकता.
किती मिळतो पगार? वायुसेनेत अधिकाऱ्याचा पगार 56,100 रुपयांपासून सुरू होतो, तर कमर्शियल पायलट म्हणून तुम्ही सुरवातीला 1 लाख रुपयांपर्यंत कमाई करू शकता. तुम्ही जसा अनुभव घ्याल त्याप्रमाणे तुमचे उत्पन्नही वाढत जाते. अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com
करिअरनामा ऑनलाईन । राखेतून उठून फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप (Army Success Story) घेतलेल्या मुलाची ही संघर्षगाथा आहे. तुम्ही विचारही करु शकणार नाही अशा अनेक आव्हानांवर मात करत हा मुलगा लष्करात अधिकारी झाला आहे. कारण त्याने ठरवलंच होतं.. काहीही होवूदे.. आयुष्यात हार मानायचीच नाही.
थक्क करणारा संघर्ष उमेश किलू हा मुंबईच्या धारावी झोपडपट्टीत (Dharavi Slum) राहणारा तरुण. धारावी झोपडपट्टीची अवस्था तुम्हाआम्हा सर्वांनाच माहित आहे. सर्वांप्रमाणेच उमेश याचं अगदी छोटंस 10 बाय 5 फुटांचं घर इथे आहे. त्याच्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत बिकट. पण उमेशला आयुष्यात पुढे जायचं होतं. त्याला जगावेगळं काहितरी करुन दाखवायचं होतं. कितीही झाले तरी आयुष्यात हार मानायची नाही असं त्यानं ठाम ठरवलं होतं. तो दिवस उजाडला आणि अखेर (Army Success Story) त्याच्या प्रयत्नांना यश आलं, आयुष्यातील खाचखळगे पार करत हा मुलगा लष्करात अधिकारी झाला आहे. धारावी झोपडपट्टीत राहणारा उमेश कीलू भारतीय लष्करात अधिकारी झाला असून त्याने आपल्या कुटुंबासह परिसराचे नाव मोठे केले आहे. चेन्नई येथे ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीमध्ये (Officers Training Academy) पासिंग आऊट परेड पार पडली आणि हा तरुण लेफ्टनंट (Lieutenant) झाला आहे. त्याचा संघर्ष ऐकून तुम्हीही थक्क व्हाल…
10 बाय 5 च्या खोलीत राहत होतं कुटुंब (Army Success Story) उमेश कीलूचा (Umesh Keelu) जन्म मुंबईतील धारावीच्या सायन कोळीवाडा झोपडपट्टीत झाला. मुंबईतील अत्यंत गजबजलेलं ठिकाण म्हणजे धारावीची झोपडपट्टी. 10 x 5 ची टिचभर खोली आणि पुऱ्या सोयी सुविधा; अशा अनेक अडचणींवर मात करत उमेश आणि त्याचे कुटुंब दिवस काढत होते. डोंगरा एवढ्या आर्थिक अडचणी असतानाही त्याने IT मध्ये B.Sc आणि Computer Science मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले. याबरोबरच त्याने NCC (National Cadet Corp) मधून ‘C’ प्रमाणपत्र मिळवले आहे.
अचानक वडील गेले उमेशने सांगितले; “माझे वडील पेंटर होते. 2013 मध्ये त्यांना अर्धांगवायू झाला आणि तेव्हापासून ते अंथरुणाला खिळून राहिले. माझ्या सैन्य प्रशिक्षणासाठी रिपोर्ट करण्याच्या एक दिवस आधी मार्च 2023 मध्ये वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचे अंत्यविधी झाल्यानंतर मी प्रशिक्षणासाठी पुन्हा हजर झालो आणि माझे 11 महिन्याचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले आणि सैन्यात ऑफिसर बनलो.
13 व्या प्रयत्नात मिळाले यश वडिलांच्या निधनानंतर उमेश हा कुटुंबात एकटाच कमावता होता. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्याने सायबर कॅफेमध्ये पार्ट टाईम नोकरी केली (Army Success Story) आणि तेथे त्याने संगणक ऑपरेटर म्हणून काम केले. त्याने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि ब्रिटीश कौन्सिलसह आयटी सेवा क्षेत्रातही काम केले आहे. उमेश कीलूने गेल्या काही वर्षांत सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड (SSB) पास करण्यासाठी तब्बल 12 वेळा प्रयत्न केले आहेत. एवढे अथक परिश्रम घेतल्यानंतर तो आता भारतीय सैन्यात अधिकारी झाला आणि त्याने आपल्या पालकांचे स्वप्न पूर्ण केले.
‘अपयश आले तरी निराश होऊ नका’ तरुणांना सल्ला देताना उमेश सांगतो; “जर तुम्ही तुमच्या जीवनात काही ध्येय ठेवत असाल आणि तुम्ही कठोर परिश्रम करत असाल तर तुम्ही तुमचे ध्येय साध्य कराल. तयार राहा, पुढे जा, सर्व (Army Success Story) समस्यांना तोंड द्या, अडथळ्यांना तोंड द्या. तुम्ही परीक्षेत नापास झालात तरी सराव करत राहा. सल्लागारांशी, अधिकाऱ्यांशी बोला, जे तुम्हाला खरोखर मदत करतील.” अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com
करिअरनामा ऑनलाईन । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (SPPU Pune) महत्वाची अपडेट जारी केली आहे. विद्यापीठाच्या वतीने पदवी प्रदान सोहळा येत्या मे-जून 2024 मध्ये आयोजित करण्यात येणार आहे. या पदवी प्रदान सोहळ्यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यापीठाची पदवी प्राप्त करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी पदवी, पदविका प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करावा; असे आवाहन विद्यापीठाच्या परीक्षा प्रमाणपत्र विभागाने केले आहे.
कुठे करायचा अर्ज ऑक्टोबर-नोव्हेंबर 2023 मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या convocation.unipune.ac.in या वेबसाईटवर दिलेल्या नमुन्यात ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यासाठी विद्यार्थी दि. 30 मार्चपर्यंत विनाविलंब शुल्कासह अर्ज करू शकतात. त्यानंतर विद्यार्थ्यांना दि. 31 मार्च ते दि. 15 एप्रिलपर्यंत विलंब शुल्कासह अर्ज करता येणार आहे.
कोणते विद्यार्थी करु शकतात अर्ज (SPPU Pune) ऑक्टोबर-नोव्हेंबर 2023 मध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पदवी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करण्यास पात्र आहेत. अर्जाचा नमुना, शुल्क याबाबत सविस्तर माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. पदवी किंवा पदविका प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज (SPPU Pune) योग्य शुल्कासह भरल्यानंतर अंतिम वर्षाच्या गुणपत्रिकेची छायांकित प्रत अपलोड करणे आवश्यक आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा प्रमाणपत्र विभागाने दिली आहे. अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com
करिअरनामा ऑनलाईन । राजारामबापू सहकारी बँक पेठ, सांगली (Job Alert) येथे शाखा व्यवस्थापक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2024 आहे.
बँक – राजारामबापू सहकारी बँक पेठ, सांगली भरले जाणारे पद – शाखा व्यवस्थापक अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-MAIL) E-MAIL ID – [email protected] अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मार्च 2024 नोकरीचे ठिकाण – सांगली
आवश्यक शैक्षणिक पात्रता – B.com./ M.com./ B.Sc./ M.Sc. Preferably with MBA, JAIIB, CAIIB असा करा अर्ज – (Job Alert) 1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे. 2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. 3. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करायचा आहे. 4. अर्जासोबत आवशक (Job Alert) कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे. 5. या पदांकरिता सविस्तर सूचना rajarambapubank.org संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. 6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2024 आहे.
करिअरनामा ऑनलाईन । राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (CET Cell) यावर्षी (MHT CET Exam 2024) घेण्यात येणाऱ्या MHT CET परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ही परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आता 15 मार्चपर्यंत विलंब शुल्कासह ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
या कालावधीत होणार परीक्षा प्रवेश परीक्षा कक्षातर्फे अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, बी. प्लॅनिंग आणि कृषी तंत्रज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी MHT CET ही सामाईक प्रवेश परीक्षा दि. १६ ते ३० एप्रिल या कालावधीत होणार आहे. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील परीक्षा केंद्रावर ही परीक्षा होणार आहे.
इतक्या विद्यार्थ्यांनी केली आहे नोंदणी (MHTCET Exam 2024) या परीक्षेसाठी आतापर्यंत 7 लाख 12 हजार 426 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी सीईटी सेलने अंतिम मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार, सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 500 रुपये अतिरिक्त विलंब शुल्कासह १५ मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहे.
अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज अपूर्ण (MHTCET Exam 2024) या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांच्या माहितीची तपासणी केली असता अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज अपूर्ण असल्याचे ‘सीईटी सेल’च्या निदर्शनास आले. त्यामुळे सीईटी परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी यापूर्वी प्रवेश परीक्षा कक्षाने अनेकवेळा मुदतवाढ दिली आहे. ही परीक्षा देऊ इच्छिणारे विद्यार्थी परीक्षा देण्याच्या संधीपासून वंचित राहू नयेत, म्हणून विलंब शुल्कासह विद्यार्थ्यांना अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.
महत्वाचे… परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीचे वेळापत्रक, माहिती पुस्तिका, अर्ज कसा भरायचा, यासंदर्भात संपूर्ण माहिती प्रवेश परीक्षा कक्षाच्या www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
काही महत्वाच्या तारखा – विलंब शुल्क भरून ऑनलाइन (MHT CET Exam 2024) अर्ज नोंदणी आणि निश्चिती करणे – दि. 15 मार्च ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्यासाठी अंतिम मुदत – दि. 16 मार्च अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com
करिअरनामा ऑनलाईन । खडकी कन्टोमेंट बोर्ड, पुणे येथे विविध (Kirkee Cantonment Recruitment 2024) रिक्त पदांच्या भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून स्टाफ नर्स ICU, स्टाफ नर्स हॉस्पिटल या रिक्त पदांच्या एकूण 6 जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड थेट मुलाखतीने केली जाणार आहे. यासाठी उमेदवारांना परीक्षा द्यावी लागणार नाही. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखत दिनांक 21 मार्च 2024 या दिवशी होणार आहे.
संस्था – खडकी कन्टोमेंट बोर्ड, पुणे भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता – 1. स्टाफ नर्स ICU – 03 पदे आवश्यक शैक्षणिक पात्रता – बीएस्सी नर्सिंग, बीएलएस/एसीएलएस/आयसीयु एनएबीएच हॉस्पिटल चा अनुभव 2. स्टाफ नर्स हॉस्पिटल – 03 पदे आवश्यक शैक्षणिक पात्रता – जीएनएम नर्सिंग/बीएस्सी नर्सिंग महाराष्ट्र नर्सिंग कौन्सील नोंदणीकृत पद संख्या – 06 पदे (Kirkee Cantonment Recruitment 2024)
मिळणारे वेतन – (Kirkee Cantonment Recruitment 2024) 1. स्टाफ नर्स ICU – 31,500/- रुपये दरमहा 2. स्टाफ नर्स हॉस्पिटल -25,000/- रुपये दरमहा नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे (महाराष्ट्र) निवड प्रक्रिया – मुलाखत मुलाखत तारीख – 21 मार्च 2024 मुलाखतीचा पत्ता – डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे-3.
करिअरनामा ऑनलाईन । ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (Oriental Insurance Recruitment 2024) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 21 मार्च 2024 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2024 आहे.
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही महत्वाची अपडेट आहे. या भरतीच्या माध्यमातून लेखा, ॲक्च्युअरी, अभियांत्रिकी, अभियांत्रिकी (आयटी), कायदेशीर, वैद्यकीय अधिकारी अशी पदे भरली जाणार आहेत. एकूण 100 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी विलंब न करता या भरती प्रक्रियेत सहभागी व्हायचं आहे.
संस्था – ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड भरली आणारी पदे – लेखा, ॲक्च्युअरी, अभियांत्रिकी, अभियांत्रिकी (आयटी), कायदेशीर, वैद्यकीय अधिकारी पद संख्या – 100 पदे (Oriental Insurance Recruitment 2024) अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – 21 मार्च 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 एप्रिल 2024 निवड प्रक्रिया – मुलाखत
वय मर्यादा – 21 ते 30 वर्षे अर्ज फी – 1. SC/ST/Persons with Benchmark Disability (PwBD)/ Confirmed employees of Oriental Insurance Company – Rs.250/-(Intimation charges only) +GST as applicable 2. All candidates Other Than SC/ST/PwBD/Confirmed employees of Oriental Insurance Company – Rs.1000/-(Application fee including Intimation charges) +GST as applicable.
B.Com with min 60% (55% for SC/ST) from a recognized University.OrMBA (Finance) from a recognized UniversityorChartered Accountants From ICAIOrCost and Management Accountant from The Institute of Cost Accountants of India earlier known as Cost and Works Accountants (ICWAI)
ॲक्च्युअरी
Bachelor degree in Statistics / Mathematics / Actuarial Science with 60% marks (55% for SC/ST category) from a recognized UniversityOrMaster degree in Statistics / Mathematics / Actuarial Science or any other quantitative discipline from a recognized UniversityOrBachelor degree from a recognized University with passing / credit of minimum 4 papers from Indian Institute of Actuaries of India / Institute and Faculty of Actuaries, UK. Out of mandatory minimum 4 papers passed / credit, the candidate should compulsorily have passed following two papers. CS2 (Risk Modelling and Survival Analysis).CM2 (Financial Engineering and Loss Reserving)
अभियांत्रिकी
B.E./B.Tech in Information Technology / Computer Science/Electronics & Communication (ECE) Discipline with min 60% (55% for SC / S * T ) from a recognized UniversityOrM.E/M.Tech in Information Technology/Computer Science/Electronics & Communication (ECE) Discipline from a recognized UniversityOrMCA with min 60% (55% for SC / S * T ) from a recognized University
अभियांत्रिकी (आयटी)
B.E/B.Tech in Automobile /Mechanical / Electrical/ Civil/Chemical/ Power/Industrial/Instrumentation Engineering with min 60% (55% for SC / S * T ) from a recognized universityME/M.tech in Automobile /Mechanical /Electrical/Civil/Chemical Power/Industrial/Instrumentation Engineering from a recognized university (Oriental Insurance Recruitment 2024)
कायदेशीर
M.B.B.S/BDS From a recognized UniversityOr equivalent foreign degrees which are recognized as such by the National medical Commission (Formerly Medical Council of India), Dental Council of India, National Commission for Indian System of Medicine, (as applicable) with the prescribed benchmark.Furthermore, the candidate must be holding a valid registration from National Medical Commission (Formerly Medical Council of India) or Dental Council of India or any State Medical or Dental Council (as applicable for Allopathy or Dental Stream respectively); and National/State Commission for Indian System of Medicine as on the date of his/her scheduled interview.
वैद्यकीय अधिकारी
Graduate in law with min 60% (55% for SC/ST) from a recognized university.
असा करा अर्ज – 1. या भरतीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी PDF नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. 3. अर्ज प्रक्रिया 21 मार्च 2024 पासून सुरु होणार आहे. 4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2024 आहे. काही महत्वाच्या लिंक्स – (Oriental Insurance Recruitment 2024) अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY अधिकृत वेबसाईट – https://orientalinsurance.org.in/ अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com
करिअरनामा ऑनलाईन । शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अंतर्गत (Shivaji University Recruitment 2024) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसाह मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे.
या भरतीच्या माध्यमातून ‘नेटवर्क सहाय्यक’ पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी तुमची निवड झाल्यास तुम्हाला शिवाजी विद्यापीठासोबत काम करण्याची उत्तम (Shivaji University Recruitment 2024) संधी मिळणार आहे. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. उमेदवारांनी 14 मार्च 2024 रोजी दिलेल्या पत्यावर मुलाखतीस हजर रहायचे आहे.
संस्था – शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर भरले जाणारे पद – नेटवर्क सहाय्यक पद संख्या – 04 पदे (Shivaji University Recruitment 2024) नोकरी करण्याचे ठिकाण – कोल्हापूर निवड प्रक्रिया – मुलाखत मुलाखतीची तारीख – 14 मार्च 2024 मुलाखतीचा पत्ता – PDF पहा E MAIL ID – [email protected]
मिळणारे वेतन – Rs.750/- per day आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Shivaji University Recruitment 2024)
पद
आवश्यकशैक्षणिक पात्रता
नेटवर्क सहाय्यक
B.E./B.Tech.(ENTC/CSD/IT/Electrical) Or M.Sc. Electronics/Computer Science Or MCA (Science) (Experience of 02 years as described below)OrB.C.A./B.C.S. /B.Sc. (Electronics) Or Diploma (ENTC/IT) (Govt. affiliated Institute) (Experience of 03 years as described below) Experience OR B.C.A./B.C.S. /B.Sc. (Electronics) Or Diploma (ENTC/IT) (Govt. affiliated Institute) (Experience of 03 years as described below) Experience
निवड प्रक्रिया – 1. वरील पदासाठी निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे. 2. उमेदवारांनी संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावर उपस्थित रहायचे आहे. 3. उमेदवारांनी आवश्यक (Shivaji University Recruitment 2024) कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर राहावे. 4. मुलाखतीची तारीख 14 मार्च 2024 आहे. काही महत्वाच्या लिंक्स – अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF अधिकृत वेबसाईट – https://www.unishivaji.ac.in/ अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com
करिअरनामा ऑनलाईन । करन्सी नोट प्रेस, नाशिक अंतर्गत सरकारी (Government Job) नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे. चिकित्सा अधिकारी पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या पदाच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 23 मार्च 2024 आहे.
संस्था – करन्सी नोट प्रेस, नाशिक भरले जाणारे पद –चिकित्सा अधिकारी पद संख्या – 03 पदे नोकरी करण्याचे ठिकाण – नाशिक निवड प्रक्रिया – मुलाखत (Government Job) मुलाखतीची तारीख – 23 मार्च 2024 मुलाखतीची वेळ – सकाळी 9 ते दुपारी 4 मुलाखतीचा पत्ता – चलार्थ पत्र मुद्रणालय, जेल रोड, नासिक (महाराष्ट्र) 422 101
आवश्यक शैक्षणिक पात्रता – वैद्यकीय अधिकाऱ्याने मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने मान्यता दिलेल्या कोणत्याही संस्थेतून एमबीबीएस (MBBS) पदवी प्राप्त केलेली असावी. (Government Job) मिळणारे वेतन – 55,000/- ते 75,000/- रुपये दरमहा निवड प्रक्रिया – मुलाखत 1. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. 2. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसाह मुलाखतीस हजर रहायचे आहे. 3. मुलाखतीची तारीख 23 मार्च 2024 निश्चित करण्यात आली आहे.