PG CET 2024 : कृषी विद्यापीठांमध्ये PG CET प्रवेश परीक्षेचा अर्ज करण्यासाठी मुदत वाढवली

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र कृषी विद्यापीठे परीक्षा (PG CET 2024 ) मंडळे यांच्या वतीने पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षेकरिता अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना आता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दि. 20 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

परीक्षा मंडळाच्या वतीने राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध विद्याशाखांमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा घेण्यात येते. या सीईटी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी यापूर्वी २९ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. या मुदतीत वाढ केल्याने आता उमेदवारांना 20 मार्चपर्यंत अर्ज करता येणार आहे. ही सीईटी (CET) परीक्षा दि. 31 मे ते 2 जून 2024 या कालावधीत होणार आहे.

22 तारखेपर्यंत भरता येणार अर्ज फी
ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर परीक्षा शुल्क भरण्यासाठी दि. 22 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आह. या परिक्षेसंदर्भात अधिक माहितीसाठी https://www.mcaer.org या संकेतस्थळावर भेट द्यावी; असे आवाहन परीक्षा मंडळाचे नियंत्रक डॉ. अमोल देठे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com