5th and 8th Annual Exam : इयत्ता 5 वी आणि वीची वार्षिक परीक्षा ‘या’ तारखेपासून; नापास झाला तर….

करिअरनामा ऑनलाईन । यंदा इयत्ता 5वी आणि 8वीतील विद्यार्थ्यांना (5th and 8th Annual Exam) वार्षिक परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागणार आहे, जर हे विद्यार्थी या परिक्षेत नापास झाले तर त्यांना पुढच्या वर्गात जाताच येणार नाही. सुमारे 14 वर्षांनी RTE च्या नियमात बदल करण्यात आला आहे. या बदलप्रमाणे या दोन वर्गातील विद्यार्थ्यांना सरसकट पुढच्या वर्गात पाठविण्याचा प्रकार आता कायमचा बंद होणार आहे. इयत्ता 5 वी आणि 8 वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा दि. 2 एप्रिलपासून सुरू होणार आहे.

पास व्हावेच लागणार (5th and 8th Annual Exam)
RTE च्या धोरणानुसार इयत्ता 1ली ते 8 वीपर्यंतच्या मुलांना सरसकट उत्तीर्ण करण्याची पद्धत २०१० पासून सुरू झाली होती. या पद्धतीला अनेकांनी विरोध केला, तरीपण ही पद्धत राज्यभर लागू झाली. विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याच्या या पद्धतीमुळे इयत्ता दहावीतून शाळा सोडणाऱ्यांची आणि बारावीपर्यंतच शिक्षण घेणाऱ्यांची संख्या वाढू लागली. पाचवी व आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना किमान इंग्रजी, गणित, विज्ञान हे विषय व्यवस्थित समजणे गरजेचे आहे; जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेणे फार कठीण जाणार नाही; असे शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे. मुलांच्या भविष्याचा विचार करता त्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारावी या दृष्टिकोनातून आता पाचवी व आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा घेतली जाणार आहे. यामध्ये त्या विद्यार्थ्यांना पास व्हावेच लागणार आहे.

नापास झाल्यास मे महिन्यात मिळणार दुसरी संधी
नव्या नियमानुसार पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांना वार्षिक (5th and 8th Annual Exam) परीक्षा पास व्हावीच लागणार आहे. या परीक्षेत नापास झाल्यास त्या विद्यार्थ्यांना मे महिन्यात परीक्षा पास होण्याची संधी दिली जाणार आहे. यावेळी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांनाच पुढच्या वर्गात प्रवेश मिळेल.

प्रश्नपत्रिकेचा नमुना तयार
राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून 5वी व 8वीच्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका नमुना स्वरुपात तयार करण्यात आल्या आहेत. या धर्तीवर सर्व शाळांनी (5th and 8th Annual Exam) आपल्याकडील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक विषयांच्या प्रश्नपत्रिका तयार करायच्या आहेत. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा होणार असल्याने शाळांनी त्यादृष्टीने तयारी करावी; अशा सूचना ‘एसईआरटी’ने दिल्या आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com